गेले काही दिवस surreal हा शब्द अनेकदा वाचनात आला माझ्या. अनेक वर्तमानपत्रातून एका बातमीने सर्व भारतीयांचं मन फक्त जिंकूनच नाही घेतलं तर उर अभिमानानं भरून आलं आहे. "नातू नातू" ह्या गाण्याला, चित्रपटाला आणि एकंदरीतच संपूर्ण चमूला जगमान्य पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांची खूप वाह वाह होत आहे. त्या संदर्भात surreal moment हा शब्द अनेक जण मांडत आहेत त्यांचं मनोगत व्यक्त करतांना इंग्लिश वर्तमानपत्रात. अजब, अमूर्त, स्वप्नवत असे काही शब्दार्थ आहेत ह्या इंग्लिश शब्दाचे. माझ्या दृष्टीने ह्या कामगिरीला सुरेल असं संबोधलं पाहिजे मराठीत. कारणे अनेक आहेत. "नातू नातू" हे गाणं असल्यामुळे सूर, लय, ताल, बोल, स्पंदन ई. तर आलेच आणि ह्या बक्षिसामुळे आता हे सर्व जगभर पोचले आहे. हि बक्षिसे मिळण्याआधीच असंख्य मनं जिंकण्याची कामगिरी ह्या चमूने साधली आहे सुरेल पद्धतीने / सुरेल रितीने. सुरेलपणा संपूर्ण चमूच्या साधेपणात पण झळकतो आहे, अगदी गाणं शब्दबद्ध करणाऱ्यांपासून ते चाल देणे, नृत्य, अवतीभोवती नाचणारी चमू, ठिकाणं, वैविध्य वेशभूषाकार, केशभूषाकार आणि इतर सर्वच जण. ह्या सर्वांच्या सुरेल मिलापामुळेच हे ऐतिहासिक काम साध्य झालं.
ह्या उत्कृष्ट प्रसंगावरून बोध हाच, कि जे काम कराल ते सुरेल होऊ द्या, कामाचा प्रत्येक अंश, कृती आनंदाने पार पाडा, आनंद आणि त्याची तरलता कधी आपोआप पसरेल तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्याची फळं पुन्हा एकदा, अनेकदा सुरेलता देऊन जाईल आणि ती वृद्धिंगत देखील होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा