शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

अर्धा डॉक्टर

मी लहानाची मोठे झाले कंपाउंडर हा शब्द ऐकत. त्या वेळी छोटेखानी दवाखाने असल्याचे, म्हणजे एक डॉक्टर, एक छोटासा टेबल, एक/दोन खुर्च्या आणि चार औषधाच्या बाटल्या, बास. अनेक पिढ्या ओळखून असलेले असे डॉक्टर, त्यामुळे चपराख औषधं मिळायची, साधी सोप्पी. खूप कमी वेळा जावं लागायचं डॉक्टर कडे कारण घरचं अन्न, स्वच्छ वातावरण, शांत मन, घरी आई-वडिल आणि वडिलधाऱ्यांची उपलब्धता आणि सगळं सरळ आणि सोप्प. त्या वेळी खरंच  कंपाउंडरच अर्धा डॉक्टर असायचा. त्याला पक्कं माहित असायचं औषधांबाबतीत आणि एकंदरीत. प्रथम दर्शन त्या कंपाउंडरचंच व्हायचं डॉक्टर कडे गेल्यावर. अगदी तीच आठवण झाली परवा मला, आणि मी पुन्हा ह्या जमान्यात एका वेगळ्या धाटणीतले अर्धे किंबहुना अर्ध्यापेक्षा जास्त भारी काही तरी अनुभवलं. 

एक महाविद्यालयातला शिक्षक हा खूप वैविध्य कामात असतो सतत, शिकवण्या व्यतिरिक्त संशोधन, ऑडिट, प्रवेश प्रक्रिया, आणि इतर अनेक. मी एक ऑडिटर म्हणून गेले एका संस्थेत. तेथे एक वेगळी पद्धत टिपली माझ्या चार डोळ्यांनी. तेथे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी होते. त्यांना कोऑर्डिनेटर असं संबोधलं जात होतं त्या संस्थेत तरी. एक फलटण होती त्यांची, शिक्षकाला झाकावं आणि त्यांना काढावं इतकं सगळं म्हणजे सगळं ठाऊक होतं त्यांना प्रत्येक आणि प्रत्येक विषयाबद्दल, परीक्षा घेतल्या बद्दल, विद्यार्थ्यांबद्दल, ऍडमिशन बद्दल आणि सगळंच अक्षरशः कोळून प्यायल्या सारखं. मी निःशब्द झाले म्हटल्या पेक्षा त्या सगळ्या कोऑर्डिनेटर्स नी निःशब्द केलं मला त्यांचं भव्य दिव्य काम बघून. शिक्षक नसतांना प्रत्येक विषयाबद्दल एवढी माहिती ठेवणं अगदी जिभेच्या टोकावर, शिवाय प्रत्येक फाईल जपून, सजवून राखणं म्हणजे कमाल कमाल आहे. मला आधी वाटायचं कि प्रोफेसरनाच काय ती त्यांच्या विषयाची माहिती असते, वर्षानुवर्षे काय काय वैविध्यता आणली ते सर्वदृष्टीने (शिकवणे-मूल्यांकन करणे / टिचिंग-इव्हाल्युएशन्स). पण छे हो, हे सगळे कोऑर्डिनेटर्स फक्त शिकवायला जात नाहीत बाकी पाठीमागची धुरा (बॅकग्राऊंड वर्क) ह्यांनी अगदी शिताफीने सांभाळलं आहे, अनेक वर्ष. अहाहा च.  

बघा ना औषध गोळ्यांचे पण डॉक्टर आणि शिक्षणातले पण. त्यामुळे ह्या सगळ्या कोऑर्डिनेटर्स ना खूप मोठी शाबासकी द्यावी लागले, प्रत्येक विषयासंदर्भात सगळे रेकॉर्डस् उत्कृष्ट सांभाळ्याबद्दल, अत्यानंदाने, समाधानाने, स्वतःचं काम समजून आणि हसत-खेळत शिवाय. 

आताच्या नवीन पिढीला प्रश्नच नाही कंपाउंडर हा शब्द माहित असण्याचा. किंबहुना कदाचित ह्या पिढीला हे देखील माहित नसेल कि कोण काय किती आणि कशी कामं करतं. प्रत्येकाच्या कामाचा नाही तरी काही क्षेत्राचा आढावा घ्या म्हणजे नक्की कळेल कि त्या क्षेत्रात काम करणं म्हणजे आव्हानात्मक असतं. कोऑर्डिनेटर हि शिक्षकाची खंबीर, मजबूत, स्थिर आणि मोठी सावली आहे हेच खरं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...