मी फक्त असं ऐकलं आहे आणि बरीच मंडळी करतांना दिसतात देखील, ते असं कि तुमच्या जवळपासचं व्यक्ती गेल्यावर त्याचा आवडता पदार्थ वर्ज करायचा एक वर्ष, त्यांच्या स्मरणा प्रित्यर्थ. ह्या मागचे कारण समजायला मी अजून कदाचित लहान आहे किंवा कधी खोलात शिरले नाहीच. असो. मला एक प्रकर्षाने जाणवलं ते असं कि आपल्या अवतीभोवती असंख्य मंडळी सातत्याने वावरत असतात. प्रत्येकाच्या काहींना काही सवयी असतात. त्यातल्या काही आपल्या आवडीच्या असतात आणि काही नावडीच्या. अर्थात हे आपल्या सर्वानांच लागू पडतं म्हणावं. कदाचित माझ्या काही सवयी इतरांना भावल्या नसतील किंवा मला काही इतरांच्या सवयी खटकत असतील. बहुतांशी प्रत्येकजण इतरांच्या खटकणाऱ्या सवयींबद्दल सुतवाच्य करतंच, नेहेमीच. सुतवाच्य करून करून समोरचा दमतो पण बऱ्याचदा त्या अंगवळणी पडलेल्या सवयी काही केल्या जात नाहीतच.
सर्वप्रथम माझ्या मनाला शिवून गेलेला विचार असा होता कि खाद्य पदार्थच का? एखादी सवय सोडली वर्षभर तर? करून बघायला काय हरकत आहे, कदाचित फक्त त्या व्यक्तीला नाही तर बऱ्याच इतर जणांना परमोच्च आनंद होईल, फायदा होईल.
कोणी गेल्यानंतरच का सवयी बदलायच्या, हयातीत असतांना का नाही? जर कोणी पोट तिडकीने सांगतंय तर प्रयोग म्हणून करून बघायला काय हरकत आहे, काही दिवस करा, नाही जमलं तर चालू ठेवा, २-३ आठवड्यात जमेल देखील, अशक्य काहीच नाही ह्या जगात, नाही का? आणि कोणी जर काही सांगत असेल तर खरंच ते वैताग देणारं असेल म्हणूनच ना? उगाचच कोणी तुमच्या मागे लागणार नाहीच.
दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी करून बघा, खूप लाभ होईल, दृश्य अदृश्य अश्या स्वरूपाचा. प्रत्यक्षदर्शींनी शिकायला मिळेल आणि असाच आनंद द्विगुणित होत राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा