टेकनो स्याव्ही "तो", ह्या सदरा अंतर्गत मी लिहिल्या प्रमाणे मला अनेक वर्ष दिशा दाखवण्याचं कार्य त्याने सातत्याने केलं होतं. सर्व व्याधींचा किंवा प्रतिबंधात्मक रामबाण ईलाज पुढ्यात मांडला होता, पण मी त्या कडे काना डोळा करत आले, किंबहुना हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही कि किंचित स्वतःला शहाणी समजत आले. असो.
पण आता सर्वप्रथम म्हणजे मागचे सगळे अनावश्यक विचार बाजूला सारून हे स्तोत्र पठण नित्यनेमाने करायचंच हे मनाशी पक्के केले आहे.
- लहानपणापासून बघितलं आणि ऐकलं आहे कि त्या खास चार दिवसात देवाशी निगडित कुठलीही सेवा करायची नाही, पण माझ्या लेकीमुळे मला हे पटलं आहे कि माझ्या खोलीत बसून, हात जोडून स्तोत्र म्हणायला काय हरकत आहे, त्याचं नामस्मरण कधीही, कोणीही, कुठेही करू शकतो, नाही का?
- एक वेळ ठरवली आहे, दिवेलागणीची
- सगळी तांत्रिक साधनं बंद ठेऊन, बाजूला सारून नित्यक्रम सुरु आहे
- मोठ्याने म्हणणं सुरु आहे, प्राधान्य दिलं आहे वाचण्या किंवा ऐकण्या ऐवजी
- हवी तशी एकाग्रता एकवटता येत नाही आहे, त्यामुळे आधी रामनाम म्हणायला सुरवात केली आहे ("मन उधाण वाऱ्याचे...")
आज साधारण एक आठवडा झाला पठण सुरु करून. तब्बेतीत, एकंदरीत शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक ई. अनेक बदल घडतील, दिसून येतील, भासतील, अनुभवता येईल लवकरच हि पक्की खात्री. जशी जशी मला सूचना मिळेल तसे तसे मी येथे व्यक्त होईनच, तो वर सगळे जण जमेल तसे, जमेल तेवढे, जमेल ते, आवडेल ते नित्यक्रम सुरु ठेवा, वैज्ञानिक दृष्ट्या औषधं म्हणून पठण करा, कुठलेही किंतु-परंतु मनात न ठेवता, कुठलीही अपेक्षा न बाळगता. किंबहुना नित्यनेमाने पठण करत राहिलात तर कदाचित अपेक्षा हा शब्द कधी विसरला जाईल हे लक्षात देखील येणार नाही.
टेकनो स्याव्ही "तो": https://drpreetimulay.blogspot.com/2023/02/blog-post.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा