सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

मूकसंमती

कुठल्याही गोष्टीकरता, कार्यकरता घरच्यांची, मोठ्यांची किंवा नवऱ्याची एक तर संमती असते किंवा विरोध असतो. मूकसंमती थोडीशी कठिणंच असतं मिळणं.  एकतर ते मूळ स्वभावात असावं लागतं आणि त्या करता भलं मोठं मन देखील. ऐऱ्या गैऱ्याची गोष्ट नाही ती. बाकी देशात आणि जगात काय होतं हे मला ठाऊक नाही पण सर्वसाधारण मध्यम वर्गीय भारतीय घरात जास्त करून सर्वप्रथम विरोध दर्शवला जातो वैविध्य पद्धतीने आधी मग कदाचित त्याचं संमतीत रूपांतर होतं पण प्रथमदर्शनी संमती मिळणं थोडंसं आव्हानात्मक च असतं. हे कदाचित दोन्ही पक्षांसाठीच खरं आहे, जो संमती देतो त्याला आणि मिळते त्याला. एखादं कार्य खूप प्रशंसनीय झालं आहे, आवडलं आहे, अश्या पद्धतीची पाठीवर थाप देणारे निराळेच आणि आगळे वेगळे, दुर्मिळ देखील. 

माझं स्वतःचंच उदाहरण देऊ शकते मी. बरीच वर्षे माझ्या काही आजूबाजूच्यांना माझं नाव चुका असं वाटायचं. त्यांच्या दृष्टीने माझ्या हातून फक्त चुकाच व्हायच्या किंवा त्यांचं ठाम मत असं होतं कि मी फक्त चुकाच करू शकते, अजून काही संभव नाहीच. त्यावेळी प्रचंड मनस्ताप होत असे. पण हळूहळू प्रयत्नांती परमेश्वर ह्या पद्धतीने मी त्यातून बाहेर पडले. प्रत्येकाला एक आव्हान म्हणून मला स्वीकारण्याची ताकद त्याने बहाल केली. 

त्यानंतरचा टप्पा होता तो आधी विरोध आणि मग नाराजी सहित संमती. ती देखील पायरी यशस्वीरीत्या पार पडली. 

आणि आता तर त्याने इतक्या वेगळ्या ठिकाणी मला विराजमान केलं आहे कि आता कशाचीच वाट बघितली जात नाही, किंवा कशामुळे फरक पडत नाही. ह्या अश्या पिटुकल्या बदलामुळे असेल माझ्या सानिध्यातल्या लोकांनी आता मूकसंमती द्यायला सुरवात केली आहे, जी माझ्या दृष्टीने सर्वात मोठी शाबासी आहे. त्यांना कळत नाही आहे ते कित्ती मनापासून आणि केवढी मोठी थाप देत आहेत मला अबोलपणे. अहाहा च. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण". अशी माझी थोडक्यात स्थिती झाली आहे.  खूपच बळ एकवटावं लागत असेल अशी मूकसंमती द्यायला, हे काही दिसतं तेवढं साधं काम नाहीच.   

जशी जगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे, त्याच पद्धतीने माझ्या वाटचालीत देखील, दृष्टिकोनात देखील आणि त्यामुळे कार्यात. "निंदक असावा शेजारी", ह्या पद्धतीने सर्व बोलणाऱ्यांना, न बोलणाऱ्यांना माझा साष्टांग नमन. सरते शेवटी प्रत्येकाच्या हातून घडणारे आणि न घडणारे कार्य "त्याने" ठरवले आहे, वेळ आखून दिली आहे, मग चिंता कशाची. शाबासकी देणारे ते कोण आणि घेणारे तुम्ही कोण हो? फक्त आखून दिलेलं कार्य करा आणि नतमस्तक व्हा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...