बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

वाटेवरची दुसरी पायरी

"वाटेवरची पहिली पायरी", "टेकनो स्याव्ही "तो"" ह्या दोन सदरा अंतर्गात मी माझे विचार मांडले आहेतच ह्या आधी. "श्री. विष्णू सहस्त्रनाम" म्हणण्याची प्रक्रिया, नित्यकर्म "तो" करून घेतोच आहे माझ्या हातून, अगदी दररोज. सध्या वातावरणात बदल, आजूबाजूला सातत्याने शिंकणारे / खोकणारे असल्यामुळे असेल कदाचित माझे देखील घसा / नाक ई. बोलायला लागले आहेत, ह्या सगळ्या नवीन पाहुण्यांमुळे डोकं आहे हे नव्याने जाणवायला लागलंय. असो.  मी "श्री. विष्णू सहस्त्रनाम" साधारणतः तिन्हीसांजेला दिवे लागणीच्या वेळेला म्हणते. मोठ्याने म्हटल्यावर उच्चार तर स्पष्ट होतातच पण त्याचा सर्वदूर परिणाम देखील होतो, जाणवतो. पण सद्यस्थितीत मोठ्याने म्हणणं किंचीतस अवघड होतंय, घसा खवखवतोय, नाक चोंदलंय त्यामुळे मग मी सध्या वाचन स्वरूपात ह्या विलक्षण प्रभावी स्तोत्राचा पाठ करते आहे. किंवा शांतपणे डोळे मिटून श्रवणभक्ती करणे हा अजून एक तरणोपाय आहेच. तंत्रज्ञानामुळे सगळं सहज साध्य होतंय सध्या तर साधून घेतलंच पाहिजे. किंबहुना हे साध्य व्हावं म्हणूनच तंत्रज्ञान "त्याने" आणलंय कि काय असं वाटतं. त्यामुळे मंडळी, काहीही असलं तरी देखील नित्यक्रम सुरु ठेवण्याला तो निश्चित सर्वार्थाने मदत करतो, त्याकडे लक्ष द्या आणि कार्य घडू द्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...