सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

ऍक्टिवा ची रीत

गेली अनेक वर्ष माझ्या असं निदर्शनास आलं आहे कि जेव्हा एखादा तरुण ऍक्टिवा सुरु करतो आणि त्याच्या मागे एखादी तरुणी बसणार असली तर लगेच उजवी आणि डावी बाजूला वाकून पट्टाकिनी न चुकता, न विसरता, न सांगता तिला पाय ठेवायला, बसायला, चढायला सोप्प जावं म्हणून सोय केली जातेच. हे सगळं लग्नाआधी बरं'का मंडळी.  लग्नानंतर कोणी करत असेल देखील पण मी तरी अजून पाहिलं नाही, अपवाद आहेत, पण अगदी एका हाताच्या एका बोटावर मोजण्या इतकेच.  असा बदल का ऍक्टिवा चालकात? एक चांगली सवय, एक अदब, एक शिस्त, एक समाधान म्हणून स्वतःसाठी का नाही सातत्य टिकवायचं? मग मागे कोणीही का बसेना.  हाताची शिस्त का घालवायची? गोष्टी मिक्स का करायच्या? ह्या अश्या बदलत्या वागण्यामुळे मागचा शहाणा होतो, स्वयंसिद्ध असतोच, राहतो आणि समजावून देखील घेतो. पुढचा मात्र उगाच कुठल्यातरी फुशारकीत, उसनं अवसान / शान मिरवत न कळत त्रास घेऊन बसतो. असो, जैसी जिसकी सोच. 

माझ्या मावशींनी पहिल्यांदा आणि शेवटचं मला ऐकवलं होतं, जेव्हा माझी दुसरी बाई सुट्टीवर होती. म्हणतात कश्या मी तिचं काम का करू? माझं साधं उत्तर असं होतं : १. ते काम आहे माझ्या घरचं, तिचं किंवा तुमचं नाही, २. त्या जास्तीच्या कामाचा मी योग्य मोबदला नक्की देणार हे तुम्हाला ठाऊक आहेच, ३. सगळ्यात आधी हे ध्यानात ठेवा कि तुम्हाला ताकद आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे आणि अवयव आहेत म्हणून तुम्ही काम करत आहात, ह्या पुढे असं बोलायचं नाही.  

त्याच धर्तीवर ऍक्टिवा चालवता येते आहे कारण सुबुद्धी मिळाली आहे, अवयव आहेत, काम करत आहेत, आणि रस्त्याची जाण / शिकवण मिळाली आहे ई. आणि बरीच करणे आहेत. त्यामुळे प्रत्येकासाठी सोय कराच मंडळी आणि अत्यानंद उपभोगा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...