गुरुवार, २ मार्च, २०२३

गोंधळलेला बुद्धिवान

चूक नाही म्हणणार मी पण गडबड झाली आज चुकून एका भल्या मोठ्या बुद्धिवाना कडून. अगदी अशक्य वाटेल असं, पण घडलं खरं, आणि माझ्या सोबत, अगदी आज. 

मी माझ्या एका मैत्रिणीला मेल चं उत्तर देतं होते. सुरवात करतेवेळी कृत्रिम बुद्धिमत्ता ने घडवलेले मॉड्युल नेहेमीप्रमाणे जागे झाले आणि "डिअर सर" असं छापून आलं. मी अवाक, म्हटलं माझ्या चार डोळ्यांना काही भलतं दिसतंय का? डोळे चोळले, चष्मा पुसला आणि पुन्हा बघितलं तर "डिअर मॅडम" असं आपोआप लिहून येण्याशिवाय सर म्हटलं गेलं. बरं ह्या माझ्या मैत्रिणीला, सहपाठीला मी ह्या आधी कित्येकदा मेल केला आहे, पहिल्यांदा करत नाही आहे. शिवाय तिचं नाव नेहेमीचं मुलींच नाव आहे, वेगळं किंवा भलतं नाव नाहीच, कुठलाही गोंधळ, घोटाळा नाहीच. मग हे का झालं हे डोक्यात येण्या ऐवजी मला काहीतरी वेगळं सुचलं ते मग मी माझ्या सहपाठीला लिहून पाठवलं ताबडतोब, अगदी थोडक्यात. सर हि एक भली मोठी पदवी, मान, सन्मान आणि ते देखील त्या जुन्या जमान्यात दिलेला ब्रिटिशांनी दिग्गज मान्यवराला बहाल केलेला. त्या काळी सर म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या भारतात वापरली गेलेली साहेब हि पदवी, किंवा सन्मान. 

माझ्या मैत्रिणीला जी एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे, खूप कष्टाने बहारदार पणे स्वतःची एक जागा निर्माण केलेलं असं, आणि ते देखील बऱ्याच पातळीवर, एक शिक्षिका, संशोधक, लेखक, विद्यावाचस्पती आणि त्या पुढील संपादलेलं ज्ञान आणि इतर अनेक असे मोठे हुद्दे. अनेक वर्षाची विविध स्तरावरची महत्वाची स्थानं भूषवलेली व्यक्ती, मान्यवर आणि अश्या साठी सर हि पदवी बहाल झालीच पाहिजे. सर ह्या मागे कुठलेही लिंग किंवा भेदभाव वगैरे नाहीच. एक शान आहे फक्त. मग जर ह्या कृत्रिम बुद्धिवानाने (AI Module) अश्या सगळ्या माहितीमुळे सर म्हटलं तर ते गौरवोद्गारच नाही का? तो बुद्धिवान फक्त नावावर न जाता संपूर्ण पार्श्व भूमीवर भर देणारा निघाला. अहाहा च. क्या बात है? कधी कधी असा गोंधळ व्हायला हवा नाही?, मस्त काही तरी वेगळं, विस्मृतीत गेलेलं भन्नाट काही डोळ्यासमोर उभं ठाकतं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...