सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

रुखवत


मी एवढ्यातच एका लग्न सोहोळ्याचा आनंद / अत्यानंद उपभोगला. एवढ्यातच अर्थात नावीन्यपूर्ण रितीने नटलेला, सजलेला आणि बहरलेला असा तो विवाह. तो संपूर्ण भव्य दिव्य झगमगाट डोळ्यात आधी साठवून घेतला, फारच कौतुकास्पद असा मांडला होता, अत्याधुनिक पद्धतीने. प्रत्येक गोष्टीची रेलचेल तर वाखाणण्या पल्याड अशीच होती. आणि हे सर्व पाऊल पडता क्षणी टिपलेल्या गोष्टी हो. मग आम्ही मंडपात / हॉल मधे प्रवेश करते झालो आणि तिथले दृश्य बघून तर डोळे दिपले गेले. सगळं पोटभरून बघितल्यावर माझे चार डोळे रुखवत शोधू लागले. हो मंडळी, अगदी बरोबर वाचलंत. ह्या २०२४ च्या आगमनाच्या टप्प्यावर मी रुखवत शोधात होते. कारण मला इतकंच माहिती होतं कि जर अत्याधुनिक लग्न करायचं तर सगळ्याच बाबतीत ते लागू पडलं पाहिजे, काही नाही. समजावून सांगते. आधीच्या काळी, अनेक पिढ्यांपासून सुरु असलेली रुखवताची परंपरा अशी होती कि सर्व कलागुण जे संसार सुरु करायला, सांभाळायला आणि फुलवायला मदत करतात ते मुलीमधे असले पाहिजेत आणि ते दर्शवता आले पाहिजेत. किंबहुना दर्शवता येतील असेच, मोठ्या प्रमाणात, सुबक आकारात ई.  मांडणे म्हणजे रुखवत. मग त्यात काही अजून मुलींचे हातभार लागायचे. लग्न समारंभात आलेल्या प्रत्येकाला थोडक्यात समजलं पाहिजे कि मुलगी किती सत्तगुणी आहे ते. ते रुखवत मग कित्ती तरी वर्ष सांभाळून ठेवले जायचे, दर्शनी भागात, घराच्या. 


खैर, आता सगळंच बदललं आहे, सर्व सामान झालं आहे, मुलगा मुलगी हा भेदभाव राहिलेला नाही, सगळेच प्राविण्य मिळवलेले आहेत आणि सोप्प झालंय एकंदरीत.  संसार हा दोघांचा झाला आहे सर्वार्थाने. दोघांमध्ये सगळ्याच कला आहेत, अगदी स्वयंपाक ते बाकी सर्वच. मग जर जगाच्या पाठीवर आपण हे मान्य केले आहे तर लग्नात येणाऱ्या सर्वांना दोघांचे गूण का दिसू नयेत. रुखवत अत्याधुनिक का असू नये? आणि त्यात आताशा तर प्रत्येक क्षण टिपण्याची सोय आहे. मग लावा कि सगळ्या कलांचे फोटो, बघू दे सर्वांना. आता प्रमाणपत्रांचा जमाना आहे, ढीगभर असतातच प्रत्येकाकडे. मग ती सगळी लावा आणि ज्याने ते मिळवलं आहे त्याने कला म्हणून चार ओळी लिहाव्यात कि हे प्रमाणपत्र मिळवल्यावर त्यात काय बदल झाला आणि ते त्याने प्रत्यक्ष त्याचा कसा उपयोग केला? ई.  स्वयंपाक घरातले केले पदार्थ दाखवावेत फोटोत, ते कश्या विविध्य पद्धतीने केले ते सांगावे. व्हिडिओ प्ले करावा कलागुण दर्शवणारा. नवीन सजवलेलं घर दाखवावं, NGO साठी केलेलं काम, एखादा कचेरीत किंवा इतर ठिकाणी सॉल्व केलेला प्रॉब्लेम टिपावा. बाकी काही शौक, कला अवगत असतील तर त्या दाखवाव्यात. का नाही? 


रुखवताचं महत्व अनन्यसाधारण असं आहे सर्वार्थाने बघायला गेलं तर. त्यात देखील काळानुसार बदल होतं गेले. मग ते जपा. एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन ते सगळं पॅक करायची जबाबदारी द्या. तसं सगळं व्यवस्थित प्लॅनच करा ना, मग बघा त्याची पण एक न्यारी मजा.  "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे". 

बंगालीमधे पण रुखवत असतो म्हणे आणि त्याला बघा काय म्हणतात ते "तथ्य". क्या बात है, काय चपखल नाव आहे नाही?

1 टिप्पणी:

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...