आपण सगळेच अगदी लहानपणी पासून ते अगदी आत्तापर्यंत अनेकदा डोंगरावर चढत गेलो आहोत. शाळेची सहल, मित्रांबरोबर किंवा घरच्यांसोबत केलेली ती चढाई. मग ती डोंगरावर असेल नाहीतर उंच देवळात, ती मज्जा वेगळीच, नाही का? आठवतेय का? काय म्हणतेय मी, अहो जेव्हा त्या पायऱ्या किंवा नुसता चढ चढल्यावर दम लागतोच. दम लागला कि आपण पाण्याचे दोन घोट घेण्यास टेकतो, दगडावर, पायरीवर, झाडाच्या बुंध्याशी, सावली बघून ई. अगदी दोन शब्द बोलणं पण तेव्हा त्या क्षणी नको वाटतं. थोडासा दम खाल्ला, दीर्घ श्वास नित्य नियमित, सुरळीत झाला कि मग एक स्मित हास्य येत गालावर आणि मग बोललं जातं. तो जो दीर्घ श्वास आपण सगळे घेतो उंच चढल्यावर, सायकल चालवल्यावर, धावल्यावर, पळून झालं कि, खेळून दमलो कि, किंवा इतर वेळी म्हणजे फक्त शारीरिक श्रम नसतात तर ते एक समाधान असते. म्हणूनच बहुतेक दीर्घ श्वास घेते वेळी बहुतांशी सर्वांचे डोळे बंद होतात आपोआप किंवा मिटले जातात. तो आनंद, अत्यानंद, संतोष काही जागावेगळाच असतो. आपल्या शरीराने मस्त काहीतरी कमावले आहे, गुरुत्वाकर्षणाने, हवा, वारा ई. ने ते साध्य करायला मदत केली म्हणून. आपण कळत-नकळत त्या सर्वांना शतशः मनःपूर्वक धन्यवाद देतो, दरवेळी.
हि जी नाण्याची दुसरी बाजू आहे ती प्रत्येक वेळी बघितली तर? मज्जा येईल नाही. दीर्घ श्वास फक्त योग करतांना किंवा करायचा म्हणून किंवा घेतला जातो म्हणून नाही तर कधी कधी असे दीर्घ श्वसन करते वेळी प्रत्येकाला धन्यवाद द्या, अगदी आवर्जून. प्रत्येक दीर्घ श्वास कोणाच्या तरी नावे करून तर बघा काय कायापालट होईल तो. इतक्या वर्षात तुमच्या संपर्कात आलेले सजीव आणि निर्जीव सगळेच आठवायला सुरवात करा म्हणजे नंतर ती सवय होईलच आणि कृतकृत्य होईल. प्रत्येक राहिलेले घर, शाळा, कचेरी, प्रत्येक वस्तू जिच्या मुळे तुम्हाला मस्त शिकता आलं, डोक्यावर सुरक्षित छत लाभलं, शेतकरी ज्या मुळे पोटभर उत्कृष्ट चविष्ट चारीठाव मिळालं आणि तृप्त होता आलं, ते बाकी सर्व व्यक्ती आणि वल्ली देखील हो. चला तर मग ह्या दिनदर्शिकेनुसार सुरु होणाऱ्या नवीन वर्षी हा प्रयोग करून बघूया. सर्वांना नवीन वर्षाच्या पोटभर शुभेच्छा.
मस्त लिहिलय. खरचं वाचून खूप छान वाटलं. डोळे मिटून एक दिर्घ श्वास घेतला.
उत्तर द्याहटवाअरे वा वा, मस्तच. Thank you.
उत्तर द्याहटवाA very unique way of greeting...as unique as the author and her flair for coming up with such creative thoughts..
उत्तर द्याहटवाThank you so much for the most motivating comments and words. Thank you so much for taking out time to jot down these words dear. I can guess who this must be though. Next time kindly mention the name too, so as to personally thank you for this.
हटवा