गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

फेशियल


फेशियल हे खूळ इतक्यातच जास्त जोम धरतेय. इतक्यात म्हणजे झाले असेल एक तप कदाचित. मला काही त्यात फारसा रस नाहीच. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आधीच्या मुली / स्त्रिया काय करत असतील? हा प्रश्न मला नेहेमी पडतो. काही दिवसांपासून मला त्याचं उत्तर गवसलं म्हणून हा पंक्ती प्रपंच. आधी एक तर संपूर्ण पौष्टिक असे पदार्थ सेवन होत असतं. त्यात परसात उगवलेल्या भाज्या, स्वतःच्या शेतीतले पिकलेले सगळे भरपूर प्रमाणात मिळत होते. मुबलक होते सारेच, त्यात स्वच्छ हवा, निरोगी वातावरण, निर्मळ प्रदूषण विरहित श्वास देखील सामील होते. पाणी लख्ख असे आणि दगदग त्या मानाने फारच कमी. घड्याळाच्या काट्यावर दुर्लक्ष करत पळापळ नव्हती घरच्या स्त्रीची. घरचे आणि बाहेरचे, मुलांचे, पैशाचे, आणि इतर अनेक असे विविध मार्गी क्लेश नव्हतेच. त्यामुळे देखील एक तेज कायम होतं त्यांच्या चेहेऱ्यावर आणि व्यक्तिमत्वावर देखील. बाहेर खायला उपलब्धच नव्हतं त्यामुळे आईची घरी किंमत होती, फारच मोठ्या प्रमाणात. आता हॉटेल / रेस्टारंट मध्ये पाटी असते अगदी घरच्या सारखं म्हणून आणि घरी आणण्या च्या मसाल्यांवर म्हणतात हॉटेलचा स्वाद. सगळा सावळा गोंधळ उडाला आहे. म्हणून मग नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायला, स्ट्रेस नावाचा सवंगडी झाकायला तो फेशियल चा आधार. 


आणखी एक पराकोटीचे महत्वाचे कारण म्हणजे तेव्हा सातत्याने स्वयंपाक घरीच होत होता, मसाले घरचे आणि बहुराशी सगळेच घटक स्वच्छ आणि शुद्ध स्वरूपाचे. त्यामुळे मसाले युक्त, ठराविक वेळी, दररोज कमीतकमी दोनदा उत्कृष्ट वाफ मिळायची. ती योग्य प्रमाणातली उष्णता, आणि एकंदरीत बाष्पीभवन फारच सर्वांसुंदर, बहुमूल्य असा परिणाम द्यायचा. तो नजरेस पडायचा. विहिरीवरचे पाणी, जात्यावरच्या दळण, पाट्यावरचे ओले मसाले, गॅस + कोळशाचे समीकरण, तुळशीच्या प्रदक्षिणा, जमिनीवरची उठबस, विविध पीठं मालाने + लाटणे, वैविध्य तेलांचा सर्वतोपरी वापर ई. आणि अनेक अश्या कारणांमुळे उत्कृष्ट उपयोग होत असे. मुख्य म्हणजे चिमण्या तेव्हा फक्त घराबाहेर वास्तव्याला असायच्या. जेव्हा पासून चिमण्यांना स्वयंपाक घरात अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं तेव्हा पासून बिघडलंच सगळं, म्हणजे प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने हो. "कालाय तस्मै नमः". मी आणि आमची अख्खी पिढी ते जगलो आणि आता हे जगतोय, सुंदर आठवणी जाग्या झाल्या, आई, आजीची भेट घडली आज नव्याने पुन्हा एकदा. त्यांच्या सगळ्यात आधुनिक अश्या तेव्हाच्या माजघरात, स्वयंपाकघरात, कोठीच्या खोलीत चक्कर मारता आली मला. 

४ टिप्पण्या:

  1. A lovely juxtaposition of the past purity and simplicity vis-a-vis the contemporary complexity.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिती, अगदी खरंय. बायकांचे बाहेर पडणे आणि त्यामुळेच आलेला ताण. त्यातच इतरांना आपण छानच दिसले पाहिजे अशी अपेक्षा. म्हणूनच हे सर्व वाढले आहे. कालाय तस्मै नमः.

    उत्तर द्याहटवा
  3. Very true kaku. thank you so much for taking out time to go through this anukatha, really appreciated.

    उत्तर द्याहटवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...