काल सहज यू ट्यूब वर फेरफटका मारतांना एक विडिओ नजरेस पडला आणि त्याने खिळवून ठेवले मला अक्षरशः. इतके कि त्यानंतर मी त्या व्यक्तींचे अजून दोन विडिओ बघून काढले. समोरचे दिसत नव्हते डोळ्याला मी इतकी भारावून गेले होते. "डाउन सिन्ड्रोम" असलेल्या एका मुलीची (अनन्या) आई तिची कहाणी कथन करत होती. दिवसभर कशी अनन्या ची आई कणखर, खंबीर आणि अविचल आहे हे जरी दर्शवत असली तरी ती कोलमडायची अनन्या झोपी गेल्यावर. अनन्या खूप लघवी असली तरी तिची शारीरिक, मानसिक आणि वैचारिक क्षमता नव्हती सामान्य मुलांसारखी झेप घ्यायची. अगदी तसेच आईला पण सगळे आधी करून दाखवावे लागत होते अनन्याला सातत्याने प्रेरित करण्यासाठी, जे फार अवघड होते. पण सगळी दिव्य पार पाडत शिवाय घरी आणण्याची सख्खी जुळी बहीण, आई डॉक्टर, सगळीच तारेवरची कसरत सांभाळत त्याच अनन्या चा शाशत्रोक्त पद्धतीने शुभविवाह पार पडला. अनन्या आता दुबई ला स्थायिक झाली आहे, तिथली सून झाली आहे. हे सगळं मी पहिल्या व्हिडिओत बघितलं
पण त्यानंतरचे दोन डोळ्यातले पाणी थांबवतंच नव्हते. जितके अनन्या च्या आई ने पराकाष्ठेची तिला एक माणूस म्हणून घडवले, अर्थात सख्या लोकांची, डॉक्टरांची आणि इतर जणांची मोलाची मदत घेत अगदी तसेच विघ्नेश च्या आईने देखील शिवधनुष्य पेलले दुबईत गेली कित्येक वर्ष. तिच्या कडे देखील विघ्नेशची छोटी बहीण होती, त्याची शाळा, कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि अर्थात माणूस म्हणून जडण - घडण, हे सगळं होतंच. आणि असं सगळं अनेक वर्ष सरल्यावर विघ्नेशची आई अजून एका तश्याच पिल्लाला सांभाळायला तय्यार झाली म्हणजे ती कित्ती वेगळ्या कोटीची व्यक्ती असेल हे मला शब्दात मांडता येत नाहीच, कारण माझ्या शब्द कोशात तिच्या साठी योग्य अक्षरसमूह नाहीतच.
मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबात खूप शिकलेली, नोकरी करणारी, पैसे कमवत राहणारी, घर सांभाळणारी, स्वयंपाक येत असलेली, घरचे दारचे कामे करता येत असलेली, गाडी चालवायला येत असलेली, हुशार, नाती जपणारी, आणि अशी १००-२०० पाने भरतील अशी सून हवी असते. त्यात चुकीचे काहीच नाही. अशी सून मिळाली तरी उणे दुणे काढणे अगदी पहिल्या घटकेपासून सुरु. अश्या समाजात विघ्नेशच्या आई सारखी माउली पण असते हे नव्याने समजलं. हे नवीन जोडपं कितीही निर्मल, स्वच्छ, सरळ आणि प्रेमळ असलं तरी त्यांना सांभाळण्याची पण गरज आहेच. कमालीच्या पल्याड, असामान्य व्यक्तिमत्व असतात ह्याचं पुन्हा एकदा दर्शन घडलं. विघ्नेश च्या आई वडिलांचं एक वाक्य मला जास्त भावलं. ते दुबईला च वास्तव करण्या मागचं कारण म्हणजे त्या देशात अश्या मुलांना खूप जपतात, मानाने सन्मानाने, अगदी सगळेच. कोणीही कुणालाही हिणवत नाहीच. अनन्या च्या आईला तर माझा साष्टांग नमस्कार पण विघ्नेश च्या आईला कोटी कोटी प्रणाम आणि दररोज तिच्या साठी खास प्रार्थना आणि मागणे कि तिला शक्ती दे.
आणण्याच्या जुळ्या बहिणीला तिच्या आईने सहज म्हणून एक प्रश्न विचारला, कि तुझ्या साठी विघ्नेश सारखा जोडीदार बघितला तर? ती म्हणते कशी, तो दररोज कुठलीही अढी मनात न ठेवता मला अनेकदा "आय लव्ह यू" म्हणेल. रागावणार नाही, उगाचच चिडणार नाही, उणे दुणे काढणार नाही, फक्त म्हणजे फक्त माझ्याच साठी माझाच होऊन राहील आणि हि तिची यादी फार लांब लचक आहे. माणुसकीचा एक स्वच्छ सुंदर आणि कल्पक नजराणा असतात हि माणसं. दिलेले काम मनापासून, कलात्मक रीतीने, वेळेआधी करतात, कोणाच्या अध्यात मध्यात नाहीच, डावपेच नाही, राजकारण नाही अगदी सरळ मार्गी आयुष्य जगणारे. प्रत्येकावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करणारे असे.
मला कित्ती लिहू आणि कित्ती नाही असं झालायं. मला हे असे विश्व संपूर्ण पणे अनभीन्य आहे पण तरी देखील संपूर्ण बुडायला झालायं त्यात मला आता. "काय वर्णू तव गूण, अल्पमती नारायण".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा