कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम जो अमिताभ जी ज्याचे यजमान पद भुषवितात तो बघतेच. अर्थात ऑन - एअर असतांनाच जमेलच असे नाही. पण तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे मला हवा तो भाग हवं तेव्हा बघता येतो, त्याचा आनंद उपभोगता येतो. हा कार्यक्रम फारच लोकप्रिय झाला आहे आणि त्याच मुळे गेले १५ क्रतू त्याचे झाले आहेत. जे खूप वाखाणण्यासारखंच आहे.
माझी आई जेव्हा पासून टीव्ही आला अस्तित्वात आणि तुरळक घरात सुरवातीला तेव्हा पासूनच म्हणते आहे कि हा ज्ञान आणि मनोरंजन दोन्ही करतो, त्याच साठी घडला आहे. त्यामुळे माझ्यासाठी प्रत्येक ठळक कार्यक्रमाच्या दोन बाजू आहेत. ह्या कार्यक्रमातून खूप ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचा असंख्य नागरिकांना फायदा होतोय. हे जरी खरं असलं तरी माझ्या साठी दुसरी बाजू जास्त महत्वाची आहे. बघता बघता मला ह्या दुसऱ्या बाजूने जास्त आकर्षित केलं. त्याची असंख्य कारणे आहेत. जसे जसे ह्या कार्यक्रमाने ऋतू बघितले तसे तसे तो जास्तीत जास्त वृद्धिगत होत गेला. कार्यक्रम बहराला म्हणजे संपूर्ण टीमचं उत्साहाने काम करत गेली आणि नवनवीन सफल प्रयोग करत आणि मांडत गेली. जे माझ्या सारख्या आणि इतर प्रेक्षकांना खूपच भावले, भिडले थेट. तो संपूर्ण भव्य दिव्य सेट उभारण्याचे श्रेय आणि त्यामागचं वैचारिक कार्य म्हणे एका मुलीने केलं आहे. तिथूनच मी प्रेमात पडले ह्या कार्यक्रमाच्या. जी काही विविधता त्या सेट वर बघायला मिळते त्यानेच डोळे दिपतात अक्षरशः. अमिताभजींचे पोशाख अथ:पासून इतिपर्यंत ठरवणे, त्या करता वाट्टेल तिथे भटकणे, भलभलत्या लोकांना गाठणे, करवून घेणे, हे सगळं पण एक मुलगी करते प्रकर्षाने. अर्थात ह्यांची चमू असणार पण डोकं तीच आहे. तिच्या बद्दलची मुलाखत ऐकली आहे मी. म्हणून लिहिते आहे. कुठल्या दिवशीचे काय महत्व आहे, कोण येणार आहे, विषय काय सुरु आहे, आणि असे बरेच कंगोरे लक्षात घेऊन सूत्रसंचालन ठरवले जाते. रंगसंगती, अधिक उपयुक्त पूरक घटक / ऍक्सेसरीज ठरवले जातात. ते इतके भन्नाट असतात माझ्यासाठी कि मी त्याची दिवानी होते बघितल्या बघितल्या. उदाहरणार्थ टाय बांधण्याची एकाच पद्धत आहे किंवा तो एकाच प्रकारे घालून मिरवला जातो हे मला माहिती होतं. म्हणजे टाय हा एक घटक आहे, एक कपडा आहे, ज्यात कधी प्लेन, तर कधी विविध रंगांची उधळण केलेले असतात, पण तो एकाच तुकडा असतो, विशिष्ट पद्धतीने शिवलेला. पण अहो महद आश्चर्यम, काल बघते तर काय, एक वैविध्य रंगानी सजलेल्या टायची थोड्या मोठ्या आकाराची जणू गादी होती ज्यावर एक प्लेन नेहेमीचा टाय पहुडला होता. संपूर्ण कार्यक्रमात मी फक्त तेच बघत राहिले आणि माझे अक्षरशः ऍक्टिव्ह मेडिटेशनच घडले. वेगवेगळ्या आकारांच्या, प्रकारच्या, फॅशनच्या, रंगांच्या, सुशोभित केलेल्या पिना ज्या त्यांच्या कोटाची शोभा वाढवतात म्हणून सांगते, अहाहा च. त्यांचे बूट, मोजे, घड्याळ आणि पाकीट शुशोभीकरणावर घेतलेली मेहेनत नजरेस पडतेच. कोट नसेल तर बाकी कपडे देखील लक्ष वेधून घेतात माझे. अधेमधे जमलंच तर मग मी प्रश्न उत्तर बघण्याचा प्रयत्न करते. हे काय कमी होतं, सगळ्यात भारी म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाची एबी नि केलेली सुरवात, कधी गोष्ट, कविता, चारोळ्या, अनुभव, ओव्या ई. असे अनेक वैचारिक, बहुउपयोगी पेहेलू पाडलेले असतात. क्या बात है? जे कोणी हे ठरवतं त्यांना माझा संस्थांग नमस्कार. हे सगळं पाहण्यासाठी म्हणून मी टीव्ही समोर बसते. संपूर्ण चमूचे कौतुक करावे तितके कमीच आहे. जरी त्यांचे ते काम असले, अर्थार्जन होत असेल त्यातून, तरी प्रत्येक वेळी, वेळोवेळी, वर्षानुवर्षे ते वेगळीच उंची गाठत आहेत. हे निश्चितच फक्त काम करणे नव्हे, जीव ओतून / झोकून देऊन करणे होय. प्रत्येकाने, आपापल्या क्षेत्रात असं केलं तर सोन्याहून पिवळे होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा