बघा म्हणजे ह्या शब्दात सुद्धा योग च आहे, गम्मत आहे नाही. महाराष्ट्रात अगदी लहानपणापासून रहात असल्यामुळे मी वटसावित्रीची पूजा अगदी जवळून पहिली, अनुभवली. पूजा म्हणण्या पेक्षा व्रत म्हणावं. व्रत ह्या करता कारण पूजेची तय्यारी, गुरुजी, उपवास, वडाची पूजा, कथा, इतर लहान-थोरातांसाठी संपूर्ण स्वयंपाक नेहेमीसारखा, मेहेंदी, बांगड्या आणि इतर बरेच टप्पे, म्हणून. इतकं साधं, सोप्पं नाहीच ते. त्या वेळच्या मुली, बायकाच करो जाणे असे व्रत. निर्जली पण काही जणी असतात वडाची पूजा करे पर्यंत. घराची कामे झाली, देवांची पूजा झाली, आवरा सावरी झाली कि मग वड पूजा. अनवाणी पायांनी, ठरावीक प्रदक्षिणा, तो उदबत्तीचा मंद सुगंध, वडाच्या सानिध्यात केलेली पूजा, सुद्धा हवेचे सेवन आणि वडाचे आशीर्वाद भरभरून असे. आणि हे सर्व पावसाळ्याच्या सुरवातीला म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ लाभणार. माझ्या मते हे पूजेचे टप्पे म्हणजे एक प्रकारचा योगाचा. दर दिवशी बऱ्याच जणी घरी न चुकता योगासने करतात, कोणी क्लास ला जातात. बहुतांशी ठराविक आसनेच करून घेतली जातात चार भिंतींच्या खोलीत. पण निसर्गाच्या सानिध्यात, मैत्रिणीं सोबत, त्याला अध्यात्माची जोड, अनेक वर्ष ऐकलेली कहाणी आणि ह्या पूजेचे सामर्थ्य ई. मुळे होणारा योगा हा जास्त प्रभावी ठरणार हे निश्चित. त्यामुळेच माझ्या मते आज हा दुग्ध शर्करा योग साधला गेला. आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि वटसावित्रीचे व्रत एकाच दिवशी आले. यदा कदाचीत काही कारणास्तव कोणाला योग दिवस साजरा करता आला नसेल तर अजिबात काळजी नसावी. तुमच्या प्रदक्षिणा म्हणजेच आजचा योग समजा. व्रत पण करता आले नसेल तरी देखील काहीही हरकत नाही. उद्या पासून नक्की मस्त योगासने कराच दर दिवशी, न चुकता, न थांबता, विविध आसने करत तज्ज्ञांच्या मदतीने. मरगळ असेलच तर दूर पळते, स्फूर्ती येते, कामे वेगाने होतात, आणि गोळाबेरीज म्हणजे अंतर बाह्य बदल होतोच. नुसता विचार नको, विचारपूर्वक कृती करायला सुरवात करा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा