फ्लॅट संस्कृतीला का लोकांनी थारा दिला, का त्यांना बैठे घर पद्धतीपेक्षा फ्लॅट भावाला? असंख्य कारणे आहेत, काही ठळक: सुरक्षा, सोयी, शेजार, समुदाय, वैविध्य कार्यक्रम, देखभाल आपोआप होते, स्वच्छता, आणि बरेच काही. पण ह्या सर्वांच्या पल्याड पण एक कारण आहे. फ्लॅट्स म्हणजे गगनचुंबी इमारती. एका प्लॉट वर अनेक कुटुंब राहतात. बैठे घर म्हणजे एका छोट्या किंवा मोठ्या प्लॉट वर / जागेवर फक्त एकच कुटुंब. इथे जमीन मालकीची नसते, पण अनेक जण त्यावर राहत असतात. ते मागे पुढे राहायला येतात, एकाच वेळी नाही. काही जण फ्लॅट्स विकतात, खरेदी करतात आणि असे अनेक वेळा होते. त्या एका जमिनीच्या तुकड्यावर जेव्हा एक कुटुंब राहते तेव्हा फक्त एकदाच त्या वास्तूची पूजा होते, झाली असते कितीतरी आधी जेव्हा ते घर बांधले असते आधीच्या पिढीने. पण फ्लॅट म्हणजे जितकी कुटुंबे तितक्यावेळी त्या एका प्लॉट वर पूजा. आपल्या भारतातले पुजारी मोठ्या आवाजात पूजा सांगतात, करतात, मोठ्याने आरती म्हणतात, त्यामुळे फक्त ज्या फ्लॅट मधे पूजा होत असते फक्त त्यांनाच नाही तर आजूबाजू, वर खाली अगदी सर्वांना ते मंत्रोच्चार कानावर पडतात, एक सुंदर, भावपूर्ण, भक्तिमय वातावरण निर्मिती होते आणि त्याचा उपयोग खूप दिवस दिसतो, कळतो, आणि पोचतो देखील सर्वांना, सर्व सजीवांना. ह्या महत्वाच्या कारणासाठी देखील फ्लॅट जास्त भावत असतील प्लॉट पेक्षा. असा माझा अंदाज तर आहेच पण ती वास्तू देवता देखील जास्त प्रमाणात आणि चांगल्या कुटुंबीयांना नक्कीच बोलवत असणार, साद घालत असणार, त्या शिवाय हे घडणे नाहीच.
मंगळवार, १६ जुलै, २०२४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा