आपल्या भारतातले महावस्त्र म्हणजे साडी, अगदी अंगभर आणि प्रत्येक मुलीला शोभून दिसणारे असे. त्यात पाचवर आणि नऊवार असे दोन प्रकार. आधी तर साडी पटकिनी आणि चापचूप नेसणं म्हणजे एक कला होती. त्या नंतर काळानुसार त्यात किंचित बदल झाले आणि आताशा साडी चढवली जाते, नेसली नाही. अर्थात हे प्रमाण कमी आहे, काही तरुण किंवा घाई असलेल्या व्यावसायिकांना लागू आहे. बऱ्याच जणी अजूनही साडी नेसतात, अगदी व्यवस्थित आणि टप्याटप्याने. प्रत्येक साडी ला दोन किनारे असतात असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. एक जो पायघोळ असतो आणि दुसरा जो साडीचा आधार असतो, वर आणि खालचा किंवा फॉल चा भाग असं म्हणायला हरकत नाही. ऊन, वारा, पाऊस, पाणी, धूळ, माती ह्या सगळ्यांशी चार हात करत तो फॉल चा काठ लढत राहतो, तक्रार न करता, अविरत. आणि ह्या अश्या साडीची घडी घातली, कपाटात ठेवली म्हणजे हँगर ला लावून अथवा किंवा व्यवस्थित इस्त्रीसारखी गुंडाळून, तरी हे दोन किनारे एकत्र येतातच. एका कडे धुळीची ताजी चव तर दुसरीकडे बहुतांशी पावडर किंवा अत्तराचा सुगंध. पण तरी देखील पर्याय नसतो एकत्र राहण्याशिवाय. अगदी प्रत्येक वापरानंतर साडी धुतली जातेच असे नाही, धुतली म्हणजे घरी किंवा दारी. तरी पण बिनतक्रार कश्या दोघी अत्यानंदाने बागडतात एकत्र. एकदाका फॉल चढवला कि वरचे खाली आणि खालचे वर पण होऊ शकत नाहीच ना. मग आपण माणसे का असं शिकत नाही? जगी, स्थळी, पाषाणी असंख्य पद्धतीची माणसे आढळतात, संपर्कात येतात, काही कदाचित धुळीची ऍलर्जी घेऊन येतात तर काही अत्तराचा निर्मल सुगंध, काही ओलावा, तर कधी चिखल, आणि सरते शेवटी माणसांना माणसंच लागतात हो. मग काय हरकत आहे ह्या दोन पॅरलल, भिन्न वृत्तीच्या किंवा वातावरणात राहिलेल्या काठांसारखे राहायला? सगळे आपलेच आहेत ना? आणि कोणाचंच कोणाशिवाय अडत नाही असं नाही. बघा जमलं तर ह्या वैविध्यतेने नटलेल्या काठांकडून काही बाळकडू घेता आलं तर?
मंगळवार, २३ जुलै, २०२४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा