माझे पाय आता हळूहळू ताळ्यावर येऊ लागलेत, काही अंशी बरेच बरे आहेत असे म्हणायला हरकत नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे दररोज ची थांबलेली धावपळ, दगदग आणि ताणतणाव. काम करायला मी कधीच मागे राहिले नाही, त्यामुळे कामे करायला माझी कधीच ना नव्हती, पण ती योग्य पद्धतीने आणि गतीने होणे माझ्यासाठी, माझ्या पायांसाठी गरजेचेच होते. पाय ताळ्यावर यायला लागले कि एक नाही, दोन नाही तर चक्क तीन नवीन पाहुणे येऊन टपकले अचानक. थोडीशी डॉक्टर ना शंका होतीच पण तिचे निरसन करणे आवश्यक होते ते झाले. काही स्नायूंना गतबंधन करून राहावेसे वाटले असेल आणि मग काय मिठीच मारली कि त्यांनी, चक्क तीन ठिकाणी. अश्या मिठ्या मारत आत दडून बसले तर कसे चालणार, लपूनछपून काय एकत्र बसायचं ना? बिनधास्त वावर कि, मारा मिठी पण ती तात्पुरती, हि म्हणजे जरा जास्त वेळाची झाली हो. असो. त्या करता आता लक्षात आल्यामुळे पुढील तीन महिने म्हणे मला ढिशुम ढिशुम करत बसावे लागणार आहे, औषधांचा मारा, व्यायाम, मस्त वैविध्य शिस्तीत खानपान आणि भरपूर ध्यानधारणा. सोप्प आहे, मी लागणार लवकरच कामाला. हे सगळं आज पासून सुरु करायचं आहे. ह्या मिठ्या जरा मला भारी पडल्या आहेत, जरा जास्त त्रासदायक हो. त्यात मला एक खास बोलावणे आले एका संस्थेकडून. खूप दिवस झाले ते आमंत्रण मी स्वीकारून. पण अगदी ज्या दिवशी माझे उभे राहून शिकवण्याचे काम आहे त्याच दिवशी ह्या नवीन पाहुण्यांनी त्यांचं डोकं वर काढलं. त्यांच्या अपेक्षेनुसार मला जरा सावकाश, संथ आणि न गडबड करता राहणे अत्यावश्यक आहे. पण समोर उभं ठाकलेलं काम पूर्ण होणं देखील अतिशय महत्वाचे. "त्याला" माझा स्वभाव पूर्णपणे ठाऊक आहेच. त्यामुळे त्याने एक युक्ती शोधून काढली. मी अशी तशी मानणारी तर नव्हतेच मग काय त्याने संपूर्ण शहरात इतका पाऊस पाडला कि सगळे ठप्प झाले. बरोबर इतक्या वेळ होता तो पाऊस कि जोवर माझ्या कामाची वेळ निघून जात नाही. मला टुकटुक करत म्हणतो कसा, बस चुपचाप घरी आता, पुरे झाले काम, आराम थोडासा आत्ता हवा आहे, बघतोच मी तू कशी जातेस ते. बाप रे, म्हणजे कित्ती काळजी बघा माझी त्याला. तो पाऊस कुठे, माझ्यातल्या मिठ्या कुठे, त्याला कसं कळलं असेल असं वागायला? धन्य झाले मी त्याचे हे विचारपूर्वक वागणे बघून, माझ्यासाठी जे केलयं ते बघून. माझ्या सारख्या अनेक जणींना आज हमखास सुट्टी आणि आराम मिळाला असावा. धन्यवाद. आणि ज्यांना ह्या कृतीमुळे त्रास सहन करावा लागला त्यांना मनापासून सॉरी. क्षमा करा, माझ्या ध्यानी मनी नसतांना हे असं सगळं घडलं. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण".
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा