मी एकदा एक गोष्ट ऐकली होती आणि हे देखील समजलं कि ती म्हणे सत्यकथा होती. ती कथा येथे मी थोडक्यात देते आहे. एक ठिकाण होतं, तेथे एक जंगल होतं. तिथल्या लोकांना ते जंगल नको होते, कारण त्या ऐवजी त्या मोठ्या जागी त्यांना काही तरी दुसरं उभं करायचं होतं. सर्वानुमते मग काही तरी करायचं ठरलं. मी गोष्ट छोटी करून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तिथल्या रहिवाश्यांनी जाऊन झाडाखाली उभे राहून त्याला शिव्या द्यायला सुरवात केली. आणि काही दिवसात हळू हळू सगळी झाडे मरून गेली. जागा साफ झाली. सरकारी स्तरावर पण कुठलीही अडचण आली नाही.
अगदी तसेच कुटुंब प्रमुखाचे पण आहे. तो जर सगळ्या कुटुंबीयांना सातत्याने शिव्या देत असेल, घालून पाडून बोलत असेल, सारख्या चुकाच दाखवत असेल तर त्याचा अर्थ साफ आहे. त्याला ते कोणीच नको आहेत. मग काय हवे आहे? हा अगदी वेगळाच मुद्दा झाला. कदाचित संपूर्ण चैन, मोकळीक आणि बाकी इतर. त्यामुळे हे असे इशारे आहेत, लक्ष ठेवा नाहीतर सगळं साफ व्हायला वेळ लागणार नाही. स्वतःची अशी लेव्हल नसलेल्या माणसाकडून नामुष्की करायची कि नाही हे तुम्ही ठरवा आणि पाऊले उचला आत्ताच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा