साधा प्रश्न आहे माझ्या पुढ्यात उभा. कि ह्या मुलींना, आयांना कोणी का वाढत नाही? मुलींनी सर्वांना वाढणं जर अपेक्षित आहे, अलिखित नियम आहे तर मग हा असा नियम का नाही, लिखित स्वरूपात यायला हवा. जरं भजे तळून का वाढले जात नाही? पुन्हा एकदा सगळे पदार्थ मस्त गरम करून, विचारून, आग्रह करून का ताटात वाढले जात नाही? शेजारी बसून खाऊ घातले तरी हरकत नाही ना? थोडासा वेळ त्यांना पण द्यावा अधे मधे. काय हरकत आहे गरमागरम पोळ्या करून वाढल्या आणि त्याच वेळा थोडासा भात लावला आणि पहिल्या वाफेचा पानात वाढला तुपाच्या धारेसहित? दहा हत्तींचे बळ येईल तुमच्याच घरच्या स्त्रियांना, मुलींना, आयांना. तुम्हाला त्यांनी ठणठणीत राहणं नको आहे का? त्यांच्या औषध पाण्यावर तुम्हाला उगाचच खर्च करायला आवडेल का अश्या पद्धतीने त्यांच्या सोबत राहायला नेहेमीकरता? ठरवा पट्टाकिनी तुमचे तुम्हीच. आणि सगळं जग बदलत आहे, प्रत्येक पद्धतीने, कंगोऱ्याने, मग ह्या बाबतीत बदल का घडू नयेत? करून बघा आणि फळं चाखा. मज्जा येईल सर्वांनाच ह्याची खात्री आहे १०० टक्क्यांपेक्षा जास्तच.
रविवार, १८ ऑगस्ट, २०२४
२००४: कर्तव्य, काम, नोकरी

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा