सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

१९७३: बाप्पाचा अनोखा अनुभव


मी अनेकवेळा बाणेर ते वारजे हा प्रवास केला आहे आणि कुठलेही टॅक्सी चे अँप असो त्यांचा अगदी म्हणजे अगदीच ठरलेला रस्ता आहे. मी इतक्यांदा आले, गेले पण कधीच वेगळा मार्ग वापरला गेला नाही. मी वारजेला राहत नसल्यामुळे मला तिथली गल्ली बोळ पाठ नाही. त्यामुळे मी ह्याच संभ्रमात होते कि हाच एक रस्ता आहे.  


एवढ्यातच एक दुर्घटना घडली. अतिशय वाईट अशी होती ती. ती सोसायटी माझ्या परतीच्या मार्गात होती. आणि त्या दुर्घटनेनंतर मला जवळपास ५-६ दिवस लागले त्यातून थोडंस बाहेर पडायला. त्यामुळे अगदी म्हणजे अगदी मनापासून मला वाटतं होतं कि मला आज ती सोसायटी बघायची सुद्धा नाही आहे. का कुणास ठाऊक? पण अश्या मानसिक स्थितीत मी कॅब मधे बसले. मी कधीच कॅब मधे असतांना मोबाईल चा उपयोग करत नाही, उगाचच सोशल मीडिया वर चाळे करत नाही, त्या पेक्षा रस्त्यावर बघणे जास्त पसंद करते. तेवढेच नवीन दुकाने, रंगसंगती, वाहतूक, इमारती ई. बघायला मिळते. 


पण आज माझी धाकधूक इतकी वाढली होती कि ज्याचं नाव ते. माझ्या मते कोथरूड बस स्थानक सोडल्यावर अचानक माझ्या टॅक्सी वाल्याने डावीकडे वळण घेतले आणि गल्ल्या गल्लीतून तो चांदणी चौकात बाहेर पडला. मला इतका अत्यानंद झाला म्हणून सांगते. अक्षरशः सुटले असं वाटलं, दडपण पट्टाकिनी उतरल्याचा स्वानुभव नक्कीच आला, मिळाला आणि चाखता आला. माझ्या बाप्पाला कित्ती माझी काळजी, तो कित्ती कान देऊन माझं ऐकतो बघा आणि सदैव माझ्या पाठिशी उभा असतोच, काहीही दुमत नाहीच.  आज अजून एकदा मला त्यांची प्रचिती आली. इतकं सहज त्याने ते घडवून आणलं, कसं काय कोणास ठाऊक.  "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण". शतशः दंडवत बाप्पाला आणि कधीही माझी साथ सोडू नकोस हि विनंती. धन्यवाद. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...