२००४ साला पासून माझ्याकडे एक रामबाण इलाज आहे, जेव्हा हवा तेव्हा वापरायचा, काहीही साईड इफेक्ट नाहीच, शिवाय उपयोग फार म्हणजे फार आणि सगळ्या वयोगटाला उपयोग बरं का मंडळी.
असं कुठे लिहिलं आहे कि सर्दी, पडसं झालं कि फक्त व्हिक्स नावाचे व्हेपोरब वापरायचं? बाम हो आपला, साधा. अर्थात सर्दी झाली कि सायनस चे पॉईंट्स मोकळे होण्याकरता किंवा तो निलगिरी, कापूर आणि इतर औषधीचा सुगंध उपयोगी पडतो. पण इतर वेळा पण त्याचा मस्त उपयोग होतोच.
डोकं आहे हि जाणीव झाली कि, म्हणजे थोडसं डोकं दुखल्यासारखं वाटलं कि डोळे मिटायचे आणि अगदी किंचित हे व्हेपोरब लावायचं कपाळाला म्हणजे जरा पट्टाकिनी बरं वाटतं. अमृतांजन रोल ऑन असेल तर ते देखील अशाच पद्धतीने काम करतं.
मी माझ्या लहान मुलांना मस्त गुंगी यावी, ते पट्टाकिनी झोपावेत म्हणून बहुतांशी दररोज त्याचे पाय चेपून देत असे, आणि कपड्यांना किंवा उशीच्या अभ्रयाला थोडेसे व्हिक्स लावत असे, वातावरण निर्मिती म्हणा हवं तर. त्याचा उपयोग झाला, मला आणि त्यांना पण. दोघे मस्त गाढ झोपायचे.
काल मला ह्या व्हेपोरब ची आठवण झाली, दिवसभर जरा दगदग झाली होती, म्हटलं आता पूर्ण आणि शांत झोप हवी आहे आणि त्या करता काही तरी करावं खास, छोटेसे. नवीन कोरी बाटली होती घरी. त्याचे उद्घाटन केले, पहिल्यांदाच उघडले, इतक्यातच तय्यार केले होते ते, तारीख बघून मगच कपाळावर लावले. आणि महद आश्चर्यम, एका अंशाचा सुद्धा फरक पडला नाही, काही माझ्या कपाळावर लावलंय हे देखील समजले नाही, त्याचे अस्तित्व पण नव्हते आणि असर पण शुन्याहून कमी. क्या बात है? एक तर असं असू शकतं कि मी उगाचच जास्त अपेक्षा करत होते, कि ह्या मुळे मला मस्त सुगंध मिळेल, औषधी असा आणि असरदार पणामुळे छान झोप लागेल. शिवाय ज्या हातांनी ते चोळले तो नाकापाशी धरला कि पण फारच सुंदर वाटायचं, पण काल म्हणजे अगदीच काहीच नाही झालं. दुसरं म्हणजे व्हिक्स ने त्याचा फॉर्मुला बदलला असेल कदाचित, जास्त हलका फुलका केलेला दिसतोय म्हणजे चिपचिप वाटणार नाही. काहीही असो, इतके महागडे ते व्हेपोरब संपूर्ण पणे उडून गेलेले होते असा भास झाला. पैसे वाया गेले, झोप लागली नाही आणि निकृष्ट किंवा ढासळलेल्या दर्जाची कीव आली. हि डब्बी कधी संपतेय असं झालंय किंवा आमच्या मावशींना देऊन टाकते आणि ह्या नंतर कधीच हे विकत घेणार नाही असा प्रण करते. नवीन रब शोधण्याची वेळ आली आहे. चला उठा शोधायला मदत करा मला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा