मी आणि माझी लेक आधी TLC नावाच्या महत्वाच्या चॅनेल वर जगातले सर्वात मोठे केक हा कार्यक्रम नित्यनेमाने बघत होतो. आणि आता आम्ही बाहेर देशात लग्नात परिधान करणारा खास पोशाख कसा निवडतात त्यावर आधारित एक सुंदर कार्यक्रम चित्रित केला आहे तो बघत बसतो आणि आनंद घेतो. अनेक देशांमधे असा सुंदर, महागडा ड्रेस परिधान करणे हे परंपरा आहे त्यामुळे त्याबद्दल विचार मांडणे हा एक मस्त उपक्रम हाती घेतला आहे. मज्जा येते बघायला. त्यात जिचे लग्न असते ती, तिच्या काही सख्या, आई, सासू, नणंद, भाऊ, वडिल असा ताफा आलेला असतो. हा ताफा ह्या करता सोबत आणतात कि नवरी शिवाय तो ड्रेस घातल्यावर कसा दिसतोय, नवरीची / तिच्या व्यक्तिमत्वाची, व्यक्तित्वाची झलक दिसते आहे का? होणाऱ्या नवऱ्याला, लग्नादिवशी उपस्थित समुदायाला तो आवडेल का हि सगळी चर्चा करण्याकरता ती मंडळी आली असतात. त्यांना औंतराज असं संबोधलं जातं अतिशय उत्कृष्ट लहेज्यात. "ON-too-razh" अशी त्याची फोड आहे, किंवा अश्या पद्धतीने तो शब्द उच्चारावा हे अपेक्षित आहे. मूळचा हा फ्रेंच शब्द आहे.
मला हा शब्द आणि ज्या पद्धतीने सर्व जण तो उच्चारतात ते मला इतकं भावलं कि मी प्रेमातच पडले अक्षरशः.
ड्रेस निवडायला आलेल्या किंवा आमंत्रित केलेल्या मंडळींना नवरीच्या स्वभावाचा अभ्यास असतो, कारण ते तिच्या सोबत अनेक दिवस, वर्ष सहवासात असतात. म्हणजेच त्यांना ड्रेस घातलेला बघितला कि किंचितश्या अंतर्ज्ञानाने, किंवा अंतर्नाद होऊन ड्रेस बद्दल चे त्यांचे विचार मांडता येतात. मग त्यात रंग आला, ड्रेस नक्षीकाम आले, तिला एकंदरीत शोभून दिसतोय का नाही हे, लग्न कधी आणि कुठे आहे ह्या वरून ठरवणं, तिला फक्त तात्पुरता तो कपडा आवडला आहे का, आणि तिच्या स्वभावानुसार काही दिवसांनी त्याला / ड्रेस ला ती नकार देऊ शकते का? तिच्या वयानुसार, आकारानुसार प्रभावी दिसतोय का? ई. नवरीला ओळखतो म्हणजेच हे सगळं आणि इतर काही गोष्टी ठरवणं आलंच. म्हणून फ्रेंच शब्द तर आहेच पण त्याचा मला भावलेला मराठी उच्चार आणि अर्थ असा.
भारतात पण बहुतांशी प्रमाणात हे असंच होतं. मला माहिती आहे त्या प्रमाणे काही अंशी फरक हा आहे कि ड्रेस च्या ऐवजी साडी, सगळंच आई वडिल न घेता, अगदी जवळचे नातेवाईक पण हातभार लावतात, कारण ५ साड्या तिच्या घ्यायच्या असतात, एक मामाची असते, बाकी उगाच पैसे किंवा इतर वस्तू देण्याऐवजी मग साडी घेऊन देणं तिथल्या तिथे, तिच्या आवडीची हे पसंद करतात. काही त्यांना साडी घेऊन मिळेल ह्या अपेक्षेने पण आले असतात.
तुम्हाला नवरी, होणार नवरा, ठिकाण, वर्षातील कुठल्या ऋतूत, आत का बाहेर आहे समारंभ ई. बाकीच्या देशात महत्वाचे असते. त्यामुळेच औंतराज.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा