विद्यावाचस्पती होणं हे दिसतं तेवढं आणि वाटतं तितकं सोप्प नाहीच. संशोधक होण्याच्या मार्गावर अनेक पायऱ्या असतात, ज्यात तुम्ही आधी उत्कृष्ट असे कथाकार व्हावे किंवा असावे लागते. तांत्रिक गोष्टी, नाविन्यपूर्ण पद्धतीने, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या तज्ज्ञांना पटेल अश्या भाषेत म्हणजे भलं मोठं कौशल्याचं आहे. ते शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवले जात नाही तितक्याशा प्रकर्षाने किंवा आपण देखील त्या कडे इतके लक्ष देत नाही. ती पहिली पायरी गाठावी लागते संशोधक व्हायचे म्हणजे. हि पायरी पादाक्रांत करायची म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाचन आले. बाकी मंडळींनी ह्या क्षेत्रात काय काय केले आहे आधीपासून ते तपासायला लागतेच. त्याशिवाय आपण आपली दिशा ठरवू शकत नाही. वाचन, मनन, चिंतन, मग त्यावर काम आणि लेखन हे सगळं साध्य करावं लागतं. हे जर तुम्ही पूर्णवेळ केलेत तर वेगळी गोष्ट असते, पण पूर्णवेळ नोकरी सांभाळून, घरचे बघून शिवाय ह्या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे कसरतच, नाही का? त्यात माझ्यासारखी गाईड मिळाल्यावर अजून त्यात भर पडते. कारण असं वाटत कि सगळ्यांसोबत, वेळेवर काम झालं पाहिजे. हे सगळं काय कमी आव्हानात्मक होतं, विषय अतिशय अवघड निवडला होता. घरच्या जबाबदाऱ्या, कचेरीतले वेगळे किस्से आणि ह्या सगळ्यांमुळे नाही म्हटलं तरी तब्बेतीवर होणारा परीणाम हे एक पॅकेज असल्यासारखं आहे. घरच्यांची प्रचंड मोठी साथ, समजदार पिल्लू ची मदत, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, उत्कृष्ट सांभाळलेल्या मैत्रिणी, शेजारी, आणि SCRI च्या संपूर्ण चमूची वेळोवेळी मिळालेली मदत ई. सर्वांमुळे अगदी आखून राखून वेळेत सगळं पूर्ण झालं. एवढी मोठी कामगिरी पार पडली. सगळंच विशालकाय असं मांडलं होतं पुढ्यात पण केवळ ती वैशाली होती म्हणून निभावलं आणि सगळं वेळेत पूर्ण झालं. कुठेही डगमगली नाही वैशाली, अगदी मस्त आणि पाय घट्ट जमिनीवर ठेवून उभी राहिली. माघार घेतली नाहीच, धडपड सुरूच ठेवली आणि यश मिळत गेलं. ते इतकं वेगळ्या पद्धतीचं होतं (म्हणजे माझ्या दुर्ष्टीने) कि आंतरराष्ट्रीय को-गाईड देखील सहजी मिळाले, त्यांची सगळी प्रक्रिया पट्टाकिनी पूर्ण देखील झाली कागदोपत्री आणि इतक्या मोठ्या पदावर असून देखील त्यांनी कुठलाही अडथळा निर्माण केला नाहीच. प्रत्येक वेळी त्यांची पण साथ मिळत गेली, हे खूप म्हणजे खूप वाखाणण्यासारखं आहे. शाब्बास वैशाली. खूप शिकण्यासारखं आहे आणि म्हणूनच ह्या पुढे माझी विनंती आहे कि आपण हे अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू. सरते शेवटी मी मनःपूर्वक आणि पुन्हा एकदा माफी मागते कि मी जरा जास्त कठोर झाले होते ह्या सगळ्या प्रक्रिये मधे, ते मला कळत होतं पण तरी देखील मी नरमले नाहीच, तशीच कठोर वागत गेले, जास्त वेळ दिला नाही पण खूप मुभा दिली काम करण्याची आणि आज नावामागे डॉक्टर लागलं. अभिनंदन. मला खात्री आहे कि ह्या पुढील संशोधनाचा प्रवास असाच अविरत सुरु राहील आणि ह्या ज्ञानाचा फायदा अनेक जणांना निश्चित होईल.
रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा