मी सातत्याने मराठी म्हणींचा वापर करत असते, माझ्या दररोजच्या बोलण्यात. त्यामुळे माझ्या मुलांना खूपच आश्चर्य तर वाटतंच, पण विविध म्हणींची ओळख होते. काय डोकं लावून उत्कृष्ट स्तरावर ह्या म्हणी तय्यार केल्या आहेत, कमाल आहे मूळ लेखकाची, त्यांच्या अनंत, अपार अश्या वांग्मयीन कौशल्याची. आता हि म्हण बघा, क्या बात है? अप्रतिम भाषा सौंदर्याचा एक नमुना म्हणण्यापेक्षा दागिना म्हणावा लागेल, अगदी असा आहे.
माझे असंख्य ओळखीचे आहेत, झालेत ह्या अर्धशतकी वाटचाली दरम्यान, मुलांमुळे, माझ्या बडबडण्याच्या स्वभावामुळे, बदल्यांमुळे, नागपूर मुळे आणि अर्थात माझ्या सिंबायोसिस मुळे ई. खरोखर असंख्य लोकांकडून ऐकलं आहे, वाचलं आहे आणि काही अंशी अनुभवलं आहे म्हणायला हरकत नाही कि हि म्हण कित्ती महत्वाची आहे. काही जणांना पदोपदी विविध अनुभव आलेत. त्यातले सामान धागा असलेले येथे नमूद करते.
माझा लेक सध्या शरीर विज्ञान शिकतोय. त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मागल्या वर्षीपासून स्कॅन करायला शिकवले आहे, विविध पद्धतीने. त्यात मग गर्भवती मुलीचे पण स्कॅन करणे आलेच अनुषंगाने. ते रीतसर शिकत आहेत कि बाळाचे लिंग काय आहे ते, माहिती म्हणून. आता एकदा का पदवी मिळाली, नोकरी सुरु झाली कि ह्या ज्ञानाचा गैरवापर करणे हा गुन्हा तर आहेच पण नैतिकतेला धरून नाहीच. अंतर्गत ज्ञान आहे म्हणून ते काही थोडक्या फायद्या करता दुरुपयोग करून चालणार नाहीच, माणुसकीला धरून पण नाही हे. पण तरी देखील काही जण हे उपद्याव करतांना आपण बघतो, ऐकतो, त्याचा थोडक्यात अर्थ असा कि काही जण हे वेगळे, निराळे असतात. त्यांना असं काही केलं नाही तर चैन पडत नसावी, त्यांना वेगळ्याच मार्गाने जाण्याची खुमखुमी असावी आणि ते अयोग्य आहे हे कधीच कळत नसावे. त्यांच्या वायरींग भलतेच असावे एकंदरीत. कधी कधी म्हणतात ना कि अशी माणसे हि एकतर माणसेच नाहीत, नाही तर ह्या पृथ्वी तळावरची नाहीत हे त्रिवार सत्य.
ह्याच मुद्याला अनुसरून अजून एक महत्वाचे कार्य करणारे आहेत ज्यांना समुपदेशक म्हणतात. त्यांना माणसाची नस ओळखता येते, ते तसे शिकलेले असतात आणि अनुभवाने जास्त प्रगल्भ झाले असतात. अनेक जणांना सल्ले दिल्यावर, ते त्यांच्या उपयोगी पडल्यावर एक वेगळे समाधान तर मिळतेच त्या समुपदेशकाला पण त्यामुळे आणखीन खोलात जाऊन माणूस कळतो. माणसाला घडवण्याची ताकद ह्या उत्कृष्ट अश्या लोकांकडे असते. ती एक प्रचंड मोठी कला आहे जी भल्या भल्यांना जमणे अशक्य. अवघड आणि आव्हानात्मक असे आहे हे कार्य. खूप सुंदर ऐकून घ्यावे लागते आधी, मग त्यावर रामबाण उपाय सुचवावा लागतो, कधी अनेक पद्धतीने आणि अनेक मार्गाने सुद्धा. ते उपाय सुचवण्याकरता त्यांचे शिक्षण, अनुभव, बैठक, स्वभाव, ऐकण्याची कला, हे सर्व त्या आयत्या वेळी उपयोगात आणून स्मार्ट पद्धतीने मांडणे हे महत्वाचे असते. पण काही समुपदेशक ह्याच गैर वापर करतांना आढळतात. नस पकडण्याची कला उत्तम पद्धतीने माहित असल्यामुळे आपल्याच लोकांना चुकीच्या मार्गावर नेणे शिताफीने, बखुबीनें करतांना आढळतात अनेक जण, काही थोडक्या फायद्या साठी, काही ऐहिक समाधानासाठी, चाळे म्हणून, एक वेगळी नशा म्हणून ई. हा खेळ थांबणे अत्यावश्यक आहे. ह्याचा अर्थ ह्या अश्या लोकांनाच समुपदेशकाची गरज आहे. पण ते जाणार नाहीत कारण ते काहीच चुकीचे करत नाही असा त्यांचा गैरसमज आहे. त्यांचे वायरींग इतके खालच्या पातळीचे आहे, किंवा चुकीचे स्थिरावले आहे कि मूलतः गडबड असल्यामुळे, केमिकल लोचा असल्यामुळे काहीच त्यांना उमगत नाही. उलट ते ह्याचा सोहोळा साजरा करतात. अवगत केलेल्या ज्ञानाचा दुरुपयोग करून सोहोळा साजरा करणे, एखाद्याला कसे फसवले ह्याचा बिनधास्त पणे गाजावाजा करणे, त्याचे अप्रूप वाटून घेणे, काय मस्त कमावले आपण हे करून ह्याचा दंभ मिरवणे ई. करणे थांबले पाहिजे. कदाचित हे राक्षस गणाच्या लोकांचे उद्योग असावेत किंवा त्यांच्या खालच्या पातळीवर जर अजून कुठला गण असला तर त्यांचे. असो. कलीयुग आहे सरते शेवटी, प्रारब्ध कोणालाही चुकले नाहीच आणि शिवाय प्रत्येकाचे नशीब. कदाचित हे असं सगळं होणं कमी येईल, ज्यांना फसवले गेले आहे त्यांच्या साठी धडा म्हणून, सांगता येत नाही. पण हे सपशेल चुकीचेच आहे हे निश्चित.
शिक्षणाचा, अनुभवाचा, आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांचा किती भयानक पटीत दुरुपयोग कारतांना दिसतात, अगदी जसे "कुंपणच जेव्हा शेत खाते". सख्खाच शत्रू, जिवंत भुतं हि सगळी, गेलेल्या ची मग भीती कशाला बाळगायची? स्वतःची पातळी सोडलेली, किंवा पातळी नसलेली पण माणसे संबोधायची अशी घाण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा