मी जेव्हा नियमीत फिजिओ थेरपी ला जात होते तेव्हा काही रुग्णांना विविध व्यायाम करतांना बघितले त्यांच्या गरजेनुसार, किंवा तज्ज्ञांनी जसे सुचवले तसे आणि त्यात अगदी साधे साधे, रोजच्या वापरातले पण अनेक घटक होते. जसे कि दाराची कडी उघडणे, बंद करणे, विविध प्रकारच्या कड्या असतात आणि त्यामुळे कदाचित वेगवेगळ्या ठिकाणचा व्यायाम घडतो. त्यात एक भर पडली आहे आता सध्या माझ्या तर्फे, ती अशी कि, कि माझे स्वयंपाक घर आता माझ्या ताब्यात आहे. इतकी वर्षे मी कधी तरी हजेरी लावत असे तेथे. दोन्ही वेळा स्वयंपाक करणाऱ्या मावशी होत्या घरी त्यामुळे माझे फिरकणे क्वचित घडत असे तेथे. पण आता मीच शेफ असल्यामुळे अनेक प्रकारच्या बरण्यांना, डब्ब्यांना झाकण लावणे, उघडणे, दररोज न चुकतात व्यवस्थित रित्या वरण रवीने घुसळणे, एक सारखे करणे, कणिक किंवा पराठ्याचे पीठ मळणे, ते लाटणे, थालिपीठं थापणे, भाजणे, उलटणे, ताक तय्यार करणे आणि अशी अनेक कामे होत आहेत, ज्यामुळे देखील नकळत पण काही वेळा करता, दररोज, वेळोवेळी, ठरावीक काळापुरता व्यायाम घडतोय. का कुणास ठाऊक पण खूप म्हणजे खूप मज्जा येते आहे, इतकी कि मला दोन प्रश्न पडलेत, मी हे इतक्या उशिरा का करायला सुरवात केली? आधी का नाही केलं? हा एक आणि दुसरा म्हणजे ज्या स्वयंपाक करणाऱ्या सगळ्या जणी आहेत त्यांचा कित्ती मस्त व्यायाम घडत असेल मग त्या खुश का नसतात? मला तर कदाचित ह्या टप्प्या टप्प्याने होणाऱ्या व्यायामाचा परिणाम असेल पण एक वेगळीच ख़ुशी प्राप्त झाली आहे, टिकुन आहे आणि वृद्धिंगत पण होते आहे. हे खरंच एक वेगळं क्षेत्र आहेच, एक कला आहे. कळत होतं तेव्हा देखील मला पण वळलं नाही कधी, उशीर झाला पण हरकत नाही. आणि हे फक्त व्यायामा पुरतं मर्यादित नाहीच. कित्ती प्रकारचे रंग अनुभवायला मिळतात, वैविध्य पदार्थाचे, जिन्नसांचे टेक्स्चर, पोत (बारीक, खडबडीत, मऊ, दाणेदार असे) हाताळायला मिळते. जिभेला आणि शरीराला दररोज नवनवीन पदार्थ हवेच असतात त्यामुळे खूप विविधता मांडली जाते आणि त्यावर काम देखील होते. क्या बात है? हे काय कमी होतं म्हणून खाऊ घालण्याचे समाधान वेगळेच. अहाहा च. एक छोटेखानी क्रांती घडते हातून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीच. शिवाय "अथ: पासून इति पर्यंत", "हेड तो टो" संपूर्ण शरीराला, मनाला आणि प्रत्येक अणुरेणूंना व्यायाम घडतोच, सर्वांचा मस्त उपयोग होतो त्या स्वयं-पाक घरात. त्यामुळे माझ्यासारखा उशीर करू नका. शिरा त्या भागात आणि प्रयोग करून तर बघा. अगदी सहज जमेल आणि क्रांती घडेलच ह्यात शंका नाही.
गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२४६४: तळ गाठणे
आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा