शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

२०७४: पक्षांचा मित्र


मी अगदी लहान असतांना, नकळत्या वयातच माझ्या घरी माझ्या सोबत आधी एक आणि नंतर दोन भन्नाट व्यक्तिमत्व राहायला, वास्तवाला आले आणि अनेक वर्ष सोबत दिली. अगदी नकळत घडले ते आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी मग त्यांना ठेवून घेतले, किंबहुना ते राहिले आमच्या सोबत. एक अगदी नुकतेच जन्मलेले, नीट उडता न येणारे पोपटाचे पिल्लू आमच्या अंगणात आले. आमच्या घराच्या आसपास तेव्हा अनेक मांजरी, बोके, माकडं अशी सगळी मंडळी होती त्यामुळे आईने त्याला एक टोपल्यात ठेवले आधी, न हात लावता, आणि काही वेळातच त्याच्या साठी नवीन कोरा पिंजरा आणला गेला. काही महिन्यात पुन्हा अशीच घटना घडली आणि अजून एका पोपटाच्या पिल्लू ने आमच्या घराचे सदस्तव पत्करले, मी त्याला "मिठू देशपांडे" असे म्हणायची. एकूण पाच सदस्यांचे घर त्यामुळे. 


एवढ्यातच मी अचानक एक आणि तदनंतर अनेक पोपटांच्या संभाषणाचे व्हिडीओ बघितले. अर्थातच सजीव प्राणी / पक्षी आहे म्हणजे ते संवाद साधणारच एक मेकांशी त्यांच्या त्यांच्यात आणि मिठू म्हणजे माणसांशी सुद्धा. त्या सर्व व्हिडीओ चा मतितार्थ असाच होता कि कमीतकमी एका वेळी दोन मिठू जर उत्कृष्ट संवाद साधत आहेत, मागे राहते घर दिसतंय म्हणजे त्या घरात संवाद खूप सुंदर आहे, तिथले संबंध फार छान आहेत आणि भाषा बोलकी, सहज, मनमिळावू अशी आहे ई. अर्थात हे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, आणि मला ते पटले देखील. 


आमच्या घरी पोपट सगळी दारं खिडक्या बंद करून मोकळे सोडले जायचे म्हणजे ते अजून रुळातील, पंखातील ताकद समजेल, व्यायाम होईल आणि सारखे बंद पिंजऱ्यात नको म्हणून देखील. तर अशी मी वाढले त्या मिठू देशपांडे सोबत थोडक्यात, त्याच वागणं, बोलणं, शिट्ट्या मारणं, मला शाळेला उठवणं (आईचे आकिवून अडकून पट्ठ्या नक्कल करत असे, आईचं एक काम कमी, तिच्या घश्याला आराम). 


हा सगळा भूतकाळ आठवायचे कारण म्हणजे आज मला प्रकर्षाने एक ह्या पक्ष्यांचा नवा दोस्त आढळला. आता ती दोघे कसा संवाद साधत असतील? कसे घेत असतील एकमेकांना? त्यांना आवडत असेल का दोघांचे अस्तित्व? काय मनात विचार येत असतील दोघांच्या? कोण सुरवात करत असेल? संवाद होत असेल कि नाही? ई. असंख्य प्रश्न उत्पन्न झाले माझ्या मनात जेव्हा मी एकाच आकाशात, आसमंतात दोन वैविध्य प्रजातींच्या पक्षांना उडतांना बघितले एकाच आवारात, एकाच वेळी.  एक म्हणजे विविध प्रकारचे पक्षी आणि दुसरे म्हणजे ड्रोन. ड्रोन ह्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर शिकता येते आणि पक्षांना दैवी देणगीच्या. एक नैसर्गिक एक अत्याधुनिक. दोघे मानवाचे दोस्त. पण आसमंत एक, मग? ड्रोन पक्षांची भाषा, आपण त्यांच्या मुलखात, प्रांतात आहोत हे जाणत असतील का? जाणण्याची गरज आहे का? का फक्त सांगितलेलं काम करायचं आणि झालं? मला नाही वाटतं असं, त्याच्या कक्षा ते वाढवत असतील किंवा खूप लवकर वाढवतील. मी ड्रोन-प्रोग्रामिंग च्या क्षेत्रात काम करत नाही त्या मुळे मला ठाऊक नाही खास काही, पण उत्सुकता वाढली आज दोन्ही प्रकार एकत्र वावरतांना बघून.  एक जण खरंच दिवाळी पहाट चा आनंद घेत होतं आणि दुसरा तो आनंद अनेक दिवस / महिने / वर्ष सर्वांना मिळावा ह्या साठी साठवून ठेवण्याचे काम करत होतं. सहज सुलभ उड्डाण भरत, नावीन्याने + मधुर स्वराने भरपूर अश्या भारावलेल्या वातावरणाचा आस्वाद घेत पक्षी विहार करत होते आणि ड्रोन सांगेल तेथे जाऊन सांगेल ते टिपत होते, वातावरणाशी, कोण गातंय, काय कार्यक्रम आहे ह्याचा त्यांच्याशी सूत्राम संबंध नव्हताच. दोन्ही गट मस्त विहार करत होते, सर्वांसोबत कुठलाही अडथळा न घेता, आणता. मज्जा आली तो नजारा बघतांना. काही क्षण तर असे होते कि अरे पक्षी नक्की कुठला आणि (अ) पक्षी कुठला हे कळत किंवा दिसत नव्हतं माझ्या चार डोळ्यांना.  


उद्या तुमच्या खिडकीत बसून जर दोन मिठू "काय रे तो व्हिडिओ कसा आला? किंवा किती वेळ टिपायचा आहे हा सिन? सेव्ह केले फोटो, आता काय करू?" ई. डायलॉग बोलू लागले तर आश्चर्य मनू नका कारण तो अत्याधुनिक शब्द-संवादांचा परिणाम असू शकतो, किंवा चार डोळ्यांनी नीट बघा पोपटच आहेत ना? का त्याच रंगांचे (अ) पक्षी उमेदवार आलेत चुकून. लक्ष असू द्या मित्रांनो, दोन्ही कडे, एक स्वतःच्या संवादांकडे आणि पक्षांकडे देखील.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...