संपादन करणे म्हणजे आत्मसात करणे, सातत्याने शिकत राहणे, पादाक्रांत करणे नवीन शिखरं, ध्येय गाठणे आणि असे बरेच काही. संपादक हा संपादन करत अनेक कामे करत असतो ज्यात फक्त महत्वाचे लेखनचं नाही. तर तपासणे, पडताळणे, बारीकीने लक्ष देऊन लेख जसेच्या तसे घेऊन छापणे किंवा बदल करून. फक्त लिहिण्यावर ते थांबत नाहीतच. त्यांचा खास स्तंभ लिहिण्यासाठी दररोजच्या वर्तमानपत्रात त्यांना कितीतरी खोलात जाणून, सर्व बाजूंनी वाचावे लागत असणार, मनन, चिंतन करावे लागणारच तेव्हा ठराविक जागेत बसेल असा, लोकांपर्यंत पोचेल असा आणि वाचकांना भावेल असा लेख उतरला जाणार कागदावर, नाही का? मला काल पर्यंत संपादक म्हणजे एवढंच ठाऊक होतं, त्यांची कक्षा अशीच असेल ह्याची खात्री होती. पण काल जेव्हा मी आदरणीय राहुल देशपांडे ह्यांचा दिवाळी पहाट कार्यक्रमाला गेले तेव्हा एका संपादकाला ऐकण्याचा योग आला थोडक्यात. ते तर कोपरखळ्या मारून, शाब्दिक देत किंवा शब्दांशी उत्तम रित्या खेळत / वापरात प्रसंगानुरूप खूपच उत्कृष्ट बोलत होते. पण त्या सोबतच ते खूप काही सांगून गेले. त्या ठिकाणी भले मोठे फलक लावले होते. त्यात ह्या संपादकांचे वृत्तपत्र तर होतेच पण त्या सोबत बाकी आघाडीच्या वर्तमानपत्राचा लेखाजोखा मंडला होता. ह्याचाच अर्थ ह्या संपादकांना त्यात देखील लक्ष घालावे लागत असणारच कि कुठले वृत्तपत्र कसे लोकांच्या पसंदीस पडते आहे, का?, बाकी कुठे उत्कृष्ट आहेत, कमी पडत आहेत? ई. आपले वर्तमानपत्र कसे परफॉर्म करते आहे हे बघता बघता ते देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिवाय बाकी जण काय करत आहे, काय नाही? मग जाहिरातींमधले लक्ष, बातम्यांच्या शब्दांकडे, किती पाने, कोणत्या दर्जाची, कुठले रंग वापरायचे, दिवाळी अंक, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीचे, मोबाईल आवृत्ती, वेबसाइट, अँप ई. बापरे हि यादी भली मोठी आहे. एका बातमीचे अनेक प्रकार आणि आकार देखील. छापील बातमी पानांवर अवलंबून, वेबसाइट वरची साधारण छापत अशीच, पण अँप किंवा मोबाईल आवृत्ती जरा छोटी लिंक सोबत दिलेली. हि सगळी माध्यमं बघत, खात्री करत दररोज पुढे जायचं म्हणजे कमाल कमाल आहे. संपादन सामर्थ्य किंवा कौशल्य, अनेक कक्षा असलेले असं कार्य आहे. काय काय संपादन करायचं हे अमर्याद आहे माझ्या मते. आंतरराष्ट्रीय दर्जांपासून, ते गावापर्यंत, आर्थिक गणितं ते सामाजिक भान, खेळ ते काव्य आणि कला.... जरी खूप मोठी चमू काम करत असली ह्या भल्या मोठ्या १८-२० पानांवर रोज, तरी डोळ्यात तेल घालून सगळं बघणं, शिवाय दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम आयोजित करणं, त्या करता अनेक लोकांच्या संपर्कात राहणं, अद्भुत असे विश्व असेल असे वाटते / वाटले मला काल. अर्थात प्रत्येकाच्या स्वभानुसार, त्या त्या वृत्तपत्राच्या संस्कारानुसार किंचित बदल होत असतील हि. कोणास ठाऊक. हा, एक कक्षा मांडायची राहिले. कदाचित ह्या बातम्यांवरून दूरदर्शनवर माहिती देत असतील जर त्यांची वाहिनी असेल तर. म्हणजे कदाचित त्यांना वेळेत सगळं मिळाले आहे कि नाही ह्या कडे पण लक्ष द्यावे लागत असेल.
अश्या विविधांगी गुण असलेल्या संपादकांना नमन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा