हा एक KBC वर आलेला खेळाडू आहे. त्याने एक ज्वलंत प्रश्न विचारला आहे आई ला, जनतेला, आणि नॅशनल टीव्ही वर सर्वांनाच. कुठल्या ग्रंथात म्हटलं आहे कि आईने घरचे सगळे करायचे सातत्याने, न थांबता, न सुट्टी घेता आणि वडिलांनी बाहेरचे? आईला सुट्टी कधी? तर त्यावर त्याचे उत्तर असे आहे कि आपण तीन जण घरात राहतो, बाबांना रविवारी सुट्टी असते आणि त्याला शनिवार रविवार, दर दिवशी शाळेतून आल्यावर संध्याकाळी पण मोकळा वेळ असतो. मग त्या वेळेचा सदुपयोग का नाही करायचा आणि आईला कामात एक तर मदत करायची किंवा घरची कामे आपण करायची, बास. आणि तो सगळी म्हणजे सगळीच कामे करतो, न चुकता, दररोज. त्याला कोणीही कामं कर म्हणून सांगितले नाही, सुचवले नाही, पण त्याने बघितले आणि सुरु केले करायला. वाह वाह, क्या बात है? हे सगळं करून शिवाय तो प्रचंड हुशार पण आहे, अभ्यास देखील करतो आणि सगळेच आलबेल मस्त सांभाळतो केवळ १३ वर्षाचा असतांना. कधी पासून सगळं करतोय कोणास ठाऊक. पण वाटतंय कि खूप दिवसांपासून नाही तर गेले अनेक वर्ष तो ह्यात आहेच. त्याच्या ह्या सातत्य राखण्याने, आता नॅशनल टीव्ही वर त्याच्या बद्दल सर्वांना कळल्यानंतर सर्वत्र उत्कर्ष साधला जाणार ह्यात काही शंकाच नाही. त्याला बघून, त्याच्या बद्दल ऐकून देखील अनेक जण पुढाकार घेतील हे निश्चित. आणि हे फक्त घरची कामे करण्याबद्दल नाही, आईला मदत करण्यासाठी नाहीच, पण एकंदरीत व्यक्तिमत्व विकासाबद्दल आहे, वेळेचे नियोजन ह्या बद्दल आहे, जडण-घडण ह्या साठी सुद्धा आहेच. घर सर्वांचे आहे, मग आईला मदत करतो हा मुद्दाच बाजूला पडतो. त्या घरची कामे करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, जबाबदारी आहेच. त्यामुळे ह्या दृष्टीने सर्वत्र हा संदेश पोचला पाहिजे, त्यावर ताबडतोब काम झाले पाहिजे आणि मगच त्याला उत्कर्ष साधला येईल.
शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा