शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

२०९२: ऊर्जेचे प्रचंड स्तोत


असं म्हणतात ना कि "अगर आप दिल से चाहो तो सारी कायनात आप के लिये काम करती है", अगदी तसेच  विद्यमान श्री. अमिताभ बच्चन साहेबांना सातत्याने कार्यरत राहायला आवडते किंबहुना हा त्यांचा मूळ स्वभाव दिसतोय, त्या मुळे मग त्यांचे कपडे, खास पोशाख जे विचारपूर्वक तय्यार करतात त्यांना / त्या चमूला  पण प्रचंड उत्साह येतो आणि दिवसाला साजेसे कपडे जे पूर्णतः नाविन्यपूर्ण असे असतात ते दिले जातात, ab घालतात पण आणि त्यामुळे मग अख्खा कार्यक्रम (KBC) खूप जोमाने साजरा होतो. तेथे भाग घेणारे खेळाडू पण वेगळ्याच स्फूर्तीने खेळतात, उपस्थित सर्वांनाच लाभ होतो, खूप म्हणजे खूप शिकायला मिळते आणि ती ऊर्जा घरी बसून कार्यक्रम बघणाऱ्यांपर्यंत पण पोचते, कामी येते. म्हणजे बघा, एका माणसामुळे, श्रेष्ठ व्यक्तिमत्वामुळे कित्ती जण प्रभावित होतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या.


आपण एक वाक्य नेहेमीच ऐकलेले आहे, "ह्या वयात हे घालायचं नाही, ते रंग नीट दिसणार नाहीत..." ई. पण साजेसं तय्यार झालं तर किंवा ते निभावलं तर, कुठेही अती न करता, तो समतोल सांभाळता आला तर मग काहीच हरकत नाहीच. बघा ना ab च्या वयाचा आकडा मोठा आहे, तरी पण सगळेच रंग, वैविध्य पोशाख, नानाविध कपड्याचे प्रकार / सूत, त्यावरच्या अलंकारीक सुशोभी वस्तू, कधी पारंपरिक तर कधी अत्याधुनिक, कधी देशी तर कधी विदेशी, कधी मिक्स असे कित्येक यशस्वी प्रयोग केले जातात जे कधीच रिपीट, पुनरावृति केली जात नाहीच, हे साधणं इतकं सोप्पं नाहीच. तसाच तो व्यक्ती आणि व्यक्तिमत्व पण पाहिजेच.  तरच सगळी सूत्र हलतात आणि घडामोडी घडतात. एका चित्रपटात विविध फॅशन चे कपडे बघणे वेगळे, कधीतरी काही वेळा करता पण दररोज च्या कार्यक्रमाचा हा भाग होतो म्हणजे एक वेगळीच अनुभूती आहे. दररोजचा एक वेगळा डोस मिळतो त्यांना बघून, ऐकून, KBC सोबत राहून, कधी तो एपिसोड / भाग संपतो, कधी तो सिझन संपतो हे लक्षात येत नाहीच, आणि खूप उणीव भासते, जाणवते, हे त्याच श्रेय आहे. कमाल आहेत ab.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...