निर्जळी, न खाता पिता, कडक, दूध घेऊन, फळं खाऊन किंवा उपवासाचे प्रमाणात खाऊन उपवास केला जातो. "एकादशी दुप्पट खाशी" हा एक वर्ग नाकारता येणार नाहीच. त्यामुळे इतके विविध प्रकारात उपवास आणि उपवास करणारे मोडतात. एका खास दिवशी नियमितपणे, खास पद्धतीचे उपवास करणारे पण असतात, उदाहरणार्थ, पांढरे बुधवार, मिठाचा मोदक उपवास आणि असे अनेक. मी पण बरेच प्रकारचे उपवास केले आहेत आणि तेव्हा जमले देखील उपवास करणे, शक्य होते आणि केले. पण मग थोडेसे कठिण वाटायला लागले म्हणून मनःपूर्वक क्षमा मागून नेहेमीचे, दररोजचे खाण्यापिण्याचे नित्यनियम पाळले जाऊ लागले, माझ्या हातून.
जितका निर्जळी उपवास तांत्रिक किंवा वैज्ञानिक दुर्ष्टीने प्रकृतीसाठी महत्वाचा आहे तितकाच उपवासादिवशी सेवन करण्यात येणारे जिन्नस प्रमाणात खाणे पण महत्वाचे. मी पूर्णतः उपवास सोडून दिल्यामुळे माझ्या रोजनिशीतून ते आत्यंतिक महत्वाचे जिन्नस पार झाले, निघूनच गेले. आणि अर्थात कुठेतरी चुकीची समजूत घर करून बसली होती कि उपवासाचे खाल्याने मला त्रास होतो. म्हणजे अध्यात्मिक दुर्ष्टीने म्हणा किंवा आहाराच्या मी दूर पळत राहिले त्या पासून. बाप्पा बसला आहेच लक्ष देत माझ्या आणि सर्वांकडे. एवढ्यातच म्हणतो कसा, बरं नाही करायचा उपवास तर ठीक आहे, मंजूर आहे अगं पण ते उपयुक्त जिन्नस न सेवन करणे हा उपाय नाहीच मुळी. बघतोच मी कसा उपवास करत नाहीस ते? असं म्हणून कंबर कसली कि त्याने. मग काय माझी जी आहारतज्ञ आहे तिने जो सुचवलेला तक्ता आहे त्यात असे पर्याय आहेत सकाळच्या न्याहारी पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कि अनेक दिवस सकाळ ते रात्र कॉम्बिनेशन असे खाल्ले जाते ज्यात उपवासाचे जिन्नस असतात पण खूप वेगळ्या मार्गाने सेवन करण्याचे आणि भरपूर फळं. बघा म्हणजे घडतोय उपवास न कळत आणि शिवाय हवे तेवढेच सेवन करून जे पौष्टिकच नाही तर त्याच्या पल्याड आहेत. कदाचित माझ्या आतल्या सगळ्या छुप्या रुस्तम अवयवांनी माझ्या आहारतज्ज्ञाला चुपचाप फोन करून कळविलेले दिसतंय त्यांना काय काय लागणार आहे, खायची इच्छा आहे ते म्हणूनच तर हा सगळा योग जुळून आला पंधरा दिवसांकरता. क्या बात है? मज्जा आवी गयो च, अंतर्बाह्य, अजून काय हवंय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा