आज मी / आम्ही एक वेगळ्या दुनियेत भटकंती करून आलो, फेरफटका मारून आलो. तेव्हा ह्या एका नव्या योजनेबद्दल समजलं आणि तिच्या बद्दल हितगुज पण झालं. योजना म्हटलं कि सरकारी विविध तपशील, आखणी, बेत, आराखडा डोळ्यासमोर उभा ठाकतो. जीवन विमा, बँका पण विविध योजना नेहेमी राबवतो, आणतो बाजारात. सरकार अनेक योजना जाहीर करते, त्यांची अंमलबजावणी पण करते, अगदी तारीख वार सगळं व्यवस्थित सुरु असतं योजनेनुसार. एक डोक्यात आराखडा तय्यार होतो, मग तो वरिष्ठांसमोर मांडला किंवा सादर केला जातो, त्याचा अवधी काय, फायदा कोणाला ई. प्रश्नांची उत्तरे दिली जातात / शोधली जातात, त्या नंतर ती योजना जाहीर करणाऱ्यांना काय लाभ हे सुद्धा ध्यानात घेतलं जातं. हे सगळं होऊन जर होकार मिळाला तर मग ती योजना जाहीर होते, लोकांना कळते आणि आवडली तर त्यावर उड्या पडतात.
मला तरी आजवर हे असं सगळं थोडक्यात माहिती होतं योजना ह्या शब्दाबद्दल. बास.
हा शब्द म्हणजे अनेक टप्पे दर्शवणारा आहे, कारण योजना जरी एक असली तरी तिला राबवली जाते विविध टप्प्याने, वेगवेगळ्या पायऱ्या गाठल्या कि मग योजना पूर्ण होते, म्हणजे दोन्ही बाजुंनी, घेणाऱ्याच्या आणि देणाऱ्याच्या देखील. त्यामुळे वाक्यरचनेत किंवा अर्थानुसार माझ्या दृष्टीने हे क्रियापद असल्याचे दर्शवते.
मी उडालेच जेव्हा हा शब्द म्हणजे एका मुलीचे नाव आहे हे समजलं. ती त्या नावाप्रमाणेच भासली, दिसली आणि तिच्या काही तास आम्ही क्रिया बघितल्या आणि ती काय भन्नाट आहे हे संपूर्ण ध्यानात आलं. ती असेल २५-२६ वर्षांची आणि इतके वर्ष आधी तिच्या आई वडिलांना तिचं असं इतकं वेगळं नाव ठेवावंसं वाटलं हे कित्ती वेगळं आहे. मला तर इतकं आवडलं ते कि मी तिच्याशी आदल्या दिवशी फोन वर बोलले तेव्हाच तिला सांगितलं, आज प्रत्यक्षात भेट झाली आणि माझ्या आनंदाला पार उरला नाहीच. मज्जा वाटली एकंदरीत आणि तिच्या पालकांची किंवा "त्याची" ह्या मागे काय योजना होती, आहे हे काही लक्षात आले नाही पण ती मात्र अगदी योजना आखून कामे करते, फारच आवडीने करते, सप्पाट्याने / लगबगीने करते, मस्त झोकून देऊन करते. एका नंतर एक रीघ लागली तरी तिची गती कमी होतांना दिसली नाही. आणि सरते शेवटी "शितावरून भाताची परीक्षा" हे ठाऊकच आहे आपल्याला. तेव्हा आम्ही जरी तिला साधारण एक दीड तास बघितली असली तरी ती लक्षात आलीच काय समीकरण आहे हे. मला खास भेटायला आली ती वरच्या मजल्यावर जेव्हा मी पोचल्यावर तिची चौकशी केली तेव्हा. हि योजना "त्याने" आखली, रेखाटली आहे त्यामुळे प्रगती तर निश्चितच. मस्त भविष्यकाळ असणार ह्या योजनेला हे काही सांगायला नकोच, नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा