आज जरा जास्तच पहाटे खूप लगबग सुरु आहे असा भास झाला मला, खूप सगळे, म्हणजे अख्खे कुटुंबीयच गडबडीत दिसले. मला आधी काही उमजेना, समजेना. मी तशी जागेपणी साखर-झोपेतच होते म्हणून असेल. पण त्यांच्या लगीनघाईने मला जाग आलीच. नीट ऐकलं, बघितलं तर जास्त काही लक्षात आले नाही. पण जसजसा मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, निरखून बघितले, त्यांची ये-जा नीट लक्ष देऊन बघितली तेव्हा कुठे प्रकाश पडला डोक्यात. एक म्हणजे अहो हा जून महिना नाही का, आणि त्यात तसा दुसरा आठवडा म्हणजे नवीन शाळा, दप्तरं, वह्या, पुस्तके, बुटं ई. हि झाली एक बाजू, पण सर्वात महत्वाची दुसरी बाजू म्हणजे आईची, घरच्यांची. डब्बा करण्याची गडबड, मुलांना उठवण्यापासून ते तय्यार करून शाळेत पाठ्वण्यापर्यंत दमछाक. आणि अर्थात मी विसरलेच होते त्या झुंजूमुंजू पहाटेच्या उत्साही वातावरणात कि आज महत्वाचा दिवस त्यात, योग-दिवस. त्यामुळे प्रत्येक शाळेत काही ना काही कार्यक्रम असणारच. कालची पालखीची सुट्टी दिली होती त्यामुळे आज शाळेचा दिवस होता हो. त्यामुळे दिवस लवकर सुरु झाला होता आणि तो मी दुरूनच पण अतिशय मनापासून उपभोगला, अनेक वर्षांनी पुन्हा एकदा.
तर त्याचं काय झालं, मी गजर लावला होताच लवकर उठायचा आज कारण माझा पण एक पिटुकला कार्यक्रम होता, त्या आधी मस्त तय्यार व्हायचं होतं. पण बघते / ऐकते तर काय सुमधुर आवाजानेच, त्या गंमतीदार लगबगीचा सूर कानावर पडत राहिला आणि मी वेगळ्याच उत्साहाने उठले. आज भारद्वाज कुटुंबीयांची लगबग त्यामुळे ह्याची देही ह्याची डोळा अनुभवता आली हो. क्या बात है. मला वाटत होतं आपल्याच कडे पहाटेची गडबड असते जेव्हा शाळकरी मुलं घरी असतात, पण छे हो, भारद्वाज काही कुठेही कमी नाहीत. मज्जा आली. आता ठरवलंच आहे कि रोज ह्यांची सकाळची कवायत, धावपळ अनुभवायची खिडकीत बसून. अहाहा च.
IYD YogaDay Yog SchoolReopning BackToSchool PerspectiveMatters RefreshingStart SchoolRoutine Observation Nature NatureBeauty
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा