शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

माझ्या मते

माझ्या मते
मेंदूचं सगळा विचार, आचार आणि दिशादर्शकाचे काम करतो,
इतर अवयवांना सूचना देतो
आणि नाव मात्र माझे होते

हृदय रक्ताभिसरण करतं, पोटऱ्यांशी संवाद साधतं
अविरत धडधड सुरूच ठेवते,
कार्यरत राहते, मला अग्रक्रमी ठेवते,
आणि नाव मात्र माझे होते

पाय सर्वत्र नेतात, गाडी चालवतात, चढ उतार करतात
त्यांच्याच मुळे मी हव्या त्या ठिकाणी वेळेआधी पोचते
आणि नाव मात्र माझे होते

पाच इन्द्रेन्द्रिय त्यांचे कार्य करतात,
बघायला, ऐकायला, चव घ्यायला, सुवास आणि स्पर्शाची जाणीव देतात,
आणि नाव मात्र माझे होते

मी हाडाची शिक्षिका
गळ्याने, स्वरयंत्रानेचं संपूर्ण कार्य सिद्धीस नेले
आणि नाव मात्र माझे झाले

गुरुत्वाकर्षण, हवा, पाणी, माती, इतर जिवाणू
आणि इतर सगळे वैज्ञानिक सिद्धांत आहेत म्हणून
माझे अस्तित्व आहे,
ते घडवून आणतात सगळे
मी खरं तर फक्त नाममात्र आहे
आणि हेच त्रिवार सत्य आहे
मग माझ्या नावात काय आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...