सध्या सुट्टीवर आले आहे मी नागपूर हुन पुण्याला जवळपास चार महिन्यांनंतर. त्यामुळे सर्वप्रथम म्हटलं माझ्या डॉक्टर मैत्रिणीची भेट घ्यावी. कारणं अनेक होती, एक म्हणजे ती ला अनेक महिन्यात बघितलं नव्हतं, बोलले हसले नव्हते तिच्या सोबत, तिच्या मुलीबद्दल चौकशी करायची होती, पोटभर गप्पा मारण्याकरिता कधी भेटायचं हे ठरवायचं होत आणि औषध (नवीन / बदल) हे पण हो. दिल्या तिने एकदाच्या गोळ्या बदलून. मग मी पण त्या पट्टाकिनी विकत आणल्या दुकानातून. रात्री जेवणानंतर घ्या असं सांगण्यात आलं होत आणि मी पहिल्या दिवशी रात्रीचं जेवण झाल्यावर गोळी घेतांना पाहिलं तर माझ्या हातात टवका गेलेली गोळी स्थानापन्न झाली. मला वाटलं माझं गोळी काढतांना काही चुकलं कि काय. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पण तसंच. म्हटलं काय होतंय काय? मग चवथ्या दिवशी पदर खोचला आणि उत्तर शोधायचं ठरवलंच. हळूच प्रयत्नपूर्वक ती पिटुकली गोळी वेष्टनातून बाहेर काढली, माझ्या तळहातावर निरीक्षणासाठी ठेवली आणि मी उडालेच. अहो ती गोळी चक्क हृदयाच्या आकाराची होती. इतकी छोटी आणि त्यात हुबेहूब हृदय कोरलं होत / साकारलं होत. अहाहा च. माझ्या साठी ती अत्यावश्यक अशी असलेली गोळी मी रोज घ्यावी म्हणून किती मोटिव्हेट करावं कोणी. जबरदस्तच. फारच भावली मला कल्पना / संकल्पना आणि ज्याच्या सुपीक डोक्यातून हा आकार साकारला गेला त्याला शतशः मनापासून धन्यवाद. अर्थात मला सध्या तरी अश्या बाहेरील मोटिव्हेशन ची गरज नाही, घेतल्या जातात गोळ्या लागणाऱ्या, पण असे असतील ना बरेच जणं, त्यांच्या साठी कुठल्यातरी व्यक्तीने / गोळ्या तय्यार करणाऱ्या तज्ज्ञाने केलेला हा विचार आणि कंपनीने तो उचलून धरला हे फार भावलं मला. आणि हो आकाराशिवाय गुगल बाबा ला विचारणा केली तर त्या गोळ्या पांढऱ्या, लाल, गुलाबी, हलक्या गुलाबी ई. वैविध्य रंगात आढळल्या. शपथच. वेळेवर गोळ्या घेऊन माणसं पटापट बरी व्हावीत ह्या बद्दलचे प्रयत्न अवर्णनीय आहेत हे मानलेच पाहिजेत. म्हणजे नवीन गोळ्या तय्यार करतांना आकार, प्रकार, रंग, रूप आणि माणसं ह्यांचा पण सखोल आणि सतत विचार करणे अत्यावश्यक आहे हे प्रकर्षाने आढळलं. मतितार्थ असा कि माणूस म्हणून नवीन गोळ्या-औषध नावारूपास आणा फक्त व्यवसाय म्हणून किंवा शर्यत म्हणून नकोच..
शनिवार, १ जानेवारी, २०२२
चकाचका
माझी लेकरं लहान होती तेव्हा, नुकतीच बसायला आणि घन पदार्थ खायला लागली होती तेव्हाची हि एक गोष्ट आहे. एक दररोज च्या वापरातलं सर्वांना प्रिय असं बिस्कीट आहे ज्यात नारळ घातलेला असतो आणि बिस्किटाच्या वरून सुंदर पद्धतीने मांडणी करून साखरेचे कण पेरलेले असतात. माझी आई मुलं लहान होती म्हणून आमच्या कडे होती काही दिवस मुक्कामाला तेव्हा सातत्याने मुलाना व्यस्त / व्यग्र ठेवायचं म्हणून आणि शिवाय थोडीशी स्वतः खाण्याची आवड लागावी म्हणून ती हे नारळ साखर बिस्कीट त्यांना देत असे हातात. खूप खूप वेळ त्या बिस्किटावर चिकटलेले साखरेचे कण काढण्यात त्यांच्या गोऱ्या गोबऱ्या छोट्याश्या बोटांनी (ते अनेक असफल प्रयन्त असायचे त्यांचे) आणि मग तो कुठे तरी पडलेला शोधून खाण्यात मुलांचा बराच वेळ जायचा. आम्हाला / प्रेक्षकांना ते बघण्यात मज्जा यायची ती वेगळीच. आज अनेक वर्षांनी मी जेव्हा त्याच बिस्किटांचा आनंद उपभोगत होते सकाळच्या चहा सोबत तेव्हा एक लक्षात येईल असा बदल दृष्टीपथात पडला माझ्या. तेच बिस्कीट, तीच कंपनी, मी पण तीच पण बिस्किटावरची साखर गायब हो, पूर्णपणे गायब. अर्थात आता माझी मुलं मोठी झालीत, त्यांना वेळ घालवण्याकरता ते साखरेचे कण नकोत, पण प्रकर्षाने जाणवेल असा बदल दिसला म्हणून हा पंक्ती प्रपंच. हा बदल साखरेच्या वाढीव दरामुळे आहे कि कंपनीला काही नवीन करायचं आहे, का अजून काही हे माहित नाही, पण माझ्या खूप गोड, साखरे पेक्षा गोड आठवणी आहेत त्या बिस्किटा सोबत त्या पिटुकल्या साखरेच्या कणांसोबत हे मात्र नक्की आणि त्या आयुष्यभर राहणार हे पण तेवढंच खरं. साखर-साखर हा गोड शब्द किंवा हि गोड संज्ञा त्या वेळी माझ्या मुलांना बोलायला अवघड होती त्यामुळे ते चकाचका = साखर-साखर असं त्यांच्या बोली भाषेत म्हणायचे ते बोल, ती गोंडस मुलं, ती माझी त्यांना सतत व्यग्र ठेवणारी आई माझ्या डोळ्यादेखत उभी ठाकली आज पुन्हा एकदा. धन्य ती बिस्किटं आणि धन्य त्या आठवणी.
"नाईस-टाइम" हे खरं त्या बिस्किटांचं नाव, पण आमच्या घरी चका-चका ह्याच नावाने प्रसिद्ध आहे, इतकं कि हि अनुकथा लिहितांना आज मला गुगल वर जाऊन शोधावं लागलं मुळ नाव बिस्किटांचं. काय हे वेड?
http://britannia.co.in/products/nice-time/nice-biscuits
अँप म्हणजे व्याप
अँप ची सध्या इतकी भाऊगर्दी झाली आहे कि ज्याचं नाव ते. जो उठतो तो एक नवीन अँप घेउनच येतो. अगदी म्हणे तिसरी चौथी च्या विद्यार्थांनी देखील वैविध्य अँप तय्यार केलेत. अहाहा. काय बोलायचं आता. आधीच प्रत्येक कंपनीचा फोन वापरण्याची पद्धत वेगळी, त्यात "करलो दुनिया मुठीमे" अशी स्थिती झाली आहे, मोबाईल म्हणजे सर्वोसर्वच झालाय. प्रत्येकाला तसं पाहिलं गेलं तर प्रत्येकाबद्दल सर्वच ठाऊक आहे, किंबहुना माहिती मिळणं अतिशय सोप्प झालायं. प्रत्येक अँप ला तुमची जन्म कुंडली इतंभूत माहिती आहे, तुमच्या स्वतः पेक्षा कितीतरी पटीने जास्त. प्रत्येक अँप ची आपली एक वेगळीच खास मांडणी. त्यामुळे प्रत्येक अँप गणिक नवीन शिकणं आलंच, ते लक्षात ठेवणं आलं आणि अनेकदा बरेच बदल पण घडतात त्या अँप मधे, ते पुन्हा शिका ई. कधी कधी नको नको होतं, सोय आहे पण किंमत पण मोजावी लागते मोठ्या प्रमाणात. तुमचे खाजगी नंबर अनेकांना दिले जातात / उपलब्ध होतात त्यामुळे नको तेव्हा नको ते भलत्या वेळी फोन येतात, थोडीशी नाही म्हटलं तरी अनाहूत भीती राहते अँप डाउनलोड करते वेळी आणि वापरतांना सुद्धा. सर्वप्रथम तर नक्की अँप कुठला आहे, त्याच चिन्ह दिसत कसं, बरोबर अँप डाउनलोड केला ना इथं पासून सुरवात होते. सोय आणि गैरसोय तराजूत ठेवून मोजले तर गैरसोयीचा परडा भारी दिसतो बहुतांशी वेळा. असो
"तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून पण जमेना" अशी अडकत्यात अडकल्यासारखी स्थिती झाली आहे. "बदल हाच सतत स्थिर असतो / Change is the only constant" अश्या पद्धतीने तंत्रज्ञानाला आपलंस करत मार्गक्रमणा करूया पुढे हेच बरं.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...