कुठल्याही पद्धतीची चित्रकला साकार करायची म्हणजे कागदं आली वैविध्य प्रकारची,पेन, पेन्सिल, रंग, ब्रश, खोडरबर, आणि इतर साहित्य देखील. अर्थात कुठलीही कला साकारण्याआधी त्याबद्दलचा विचार, नियोजन, कृती, बैठक, मांडणी, प्रसन्नता, वातावरण, वातावरण-निर्मिती, इच्छा आणि बऱ्याच गोष्टी लागतात. ह्या सर्वांपुढे (म्हणजे वस्तू आणि ज्यांनी त्या तय्यार केल्या, तुमच्या पर्यंत पोचवल्या ई) नतमस्तक झाल्यास कलाकारांच्या हातून कलाकृती घडते, जन्मास येते. मग ते चित्र / पेंटिंग असो, किंवा इतर काही. ह्या सर्व वस्तूंची साथ जर मिळाली नाही तर पुढे जाणं शक्य नाही. कुठलीही एक कलाकृती म्हणजे एक खास प्रवास. "त्याने" तय्यार केलेला पूर्वनियोजित असा प्रवास. ते चित्र चित्रकाराला हवे त्यावेळी जमेलच असे नाही. त्या करता सुद्धा वेळ यावी लागते. आणि मग ते चित्र एकदा उभं ठाकलं कि भिंतीची शान होणार, किंवा कोणाच्या मालकीची होणार, का विकली जाणार, त्याच शहरात राहणार का परदेशी जाणार हे ठाऊक नसतंच, कधीच, कोणालाच. एवढ्यातच मी माझ्या जुन्या संस्थेला भेट द्यायला गेले होते. माझ्या सोबत काही भारतीयच पण परदेशी स्थायिक झालेले असे होते. माझ्या खास मैत्रिणीने जी कि एक संपूर्ण आर्ट-स्टुडिओ सांभाळते महाविद्यालयाचा तिने तिचं एक खास चित्र भेट दिलं. आणि आज ते चित्र दिमाखात विमान प्रवास करत आहे, सातासमुद्रापार जात आहे. तेथे पोचल्यावर ताठ मानेने फ्रेम केल्यावर ते अमेरिकेच्या आलिशान भिंतीवर एक अत्यंत खास आठवण म्हणून विराजमान होणार आहे. त्या चित्राने किंवा माझ्या मैत्रिणीने ते साकारताना पुसटसा तरी विचार केला असेल का कि हे चित्र सरते शेवटी कुठे स्थानापन्न होणार आहे ते? अशक्यच. पण बघा. होतं त्याच्या नशिबी आणि उडाले ते चित्र. अर्थात सध्याच्या आभासी / (तत्वतः) वास्ताविक जगात भिंतीवर विराजमान होण्याआधी ते शेकडो लोकांच्या हाती पोचलं देखील असेल. त्यांनी त्याचा आनंद उपभोगला देखील असेल, त्या चित्राकडे बघून प्रेरणा घेतली असेल आणि परमानंद गाठला असेल.
"युअर वर्क शुड स्पिक अबाउट यू, नॉट यू", "तुमचं कार्य बोललं पाहिजे तुम्ही नाही" अशी एक म्हण आहे. त्यामुळे सातत्याने कार्य करत राहा, तुम्ही एका खास कार्यासाठी इथे आहेत, प्रत्येक कार्य महत्वाचं आहे, पुढे वाटचाल करा इतकंच. प्रवास आपोआप घडेल, त्याचा उगम, त्यामागची संकल्पना, उदिष्ट, शेवट ई. कडे लक्ष न देता, त्या करता "तो" आहेच कि.
तर अश्या ह्या अनोख्या प्रवासाची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण.
बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२
प्रवास
हास्य
बऱ्याच दिग्गजांनी असं म्हटलं आहे, लिहिलं आहे आणि अनुभवलं असेल त्यामुळे ते माझ्या वाचनात आलं. त्यांच्या नुसार वैद्यकिय शाखेला देखील अजून संपूर्ण मानवी शरीर समजले / उमगले नाही. मानवी शरीर यंत्रणा हि इतकी गुंतागुंतीची आहे, वेगळी आहे, वैविध्य स्थरावर काम करणारी आहे आणि प्रेत्येकाची कदाचित वेगळी देखील. तंत्रज्ञानाच्या मदती मुळे आत काय चाललंय हे बऱ्याच प्रमाणात समजायला लागलं आहे पण अजूनही तो टक्का फार कमी आहे. वैद्यकिय तज्ञ त्यांचे अनुभव आणि तंत्रज्ञानाची मदत मिळून खूप काही साधता आले आहे पण तरी देखील बराच टप्पा गाठायचा आहे, किंवा अनाकलनीय आहे खुपश्या बाबी. त्यातली एक महत्वाची बाब म्हणजे आहार. सध्या किंवा गेली काही वर्ष पाश्चात्य संस्कृती म्हणा किंवा फॅड रुजू होत आहे आपल्या देशात आणि त्यानुसार बरीच मंडळी डाएट करतांना आढळतात, द्र्ष्टीस पडतात. संशोधक प्रयोग करतात, त्यांचा अनुभव आणि आलेले परिणाम / निकाल / निष्कर्ष ई. वर डाएट सादर करतात, बरीच मंडळी त्याचं अनुसरण करतात, सफल किंवा असफल होतात. माझ्या मते प्रत्येक संशोधकाचा एक ठोकताळा असतो, ठराविक धाटणीतला निष्कर्ष असतो, काही थोड्या व्यक्तींवर प्रयोग केलेला असतो, त्यामुळे तो प्रत्येकालाच लागू पडेल असे नाही. सहज मला असं जाणवलं कि प्रत्येक व्यक्ती जे खातो किंवा नाही खात, डाएट करतो, टोकाला जातो, अती जास्त किंवा कमी खातो कोणाच्या तरी सांगण्या-बोलण्या मुळे, हे सगळं अजून एक जण जवळून ऐकतं असतो, प्रत्युत्तर देत असतो, आणि पोटभर हासत देखील असतो. आपली पचन यंत्रणा मनात म्हणत असेल कि काय हि शहाणी समजणारी माणसं, त्यांना असा समाज / गैरसमज आहे कि संपूर्ण पचन-यंत्रणा त्यांना इतंभूत माहिती आहे. मानसिक+शारीरिक+आणि इतर अनेक गोष्टींचा परिणाम त्यांना पाठ आहे, मानव हा सर्वश्रेष्ठ आहे. हास्य मांडलंय हे माझ्या मते. पण असो त्या पचन-संस्थेला, एकंदरीत शरीराला हासत-खेळत अविरत काम करता येतं ह्या माणसाच्या अश्या विचार आणि आचारांमुळे. ज्या ज्या सर्वांमुळे पुढ्यात ताजताज वाढलंय त्या सर्वांसमोर नतमस्तक व्हा, शारीरिक सहज, साधा-सोप्पा आणि नियमित व्यायाम होईल ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्या, अतिरेक टाळा, सात्विक भोजन करा, थोडेसे छंद जोपासा, हसा, आनंदी राहा म्हणजे तुम्ही स्वतःच हास्य करून घेणार नाही. तुमची पचन-संस्था सातत्याने धन्यवाद देईल.
Mouse
“Wireless laser presenter”, “slide changer” or “remote for ppt presentation” etc are synonyms terms which are very frequently used by technical people, I mean they use the term and tiny device too. There are various types of these remotes available, one is just the slide changer, another one is highlighter, pointer and what not. Its challenging to use these remotes while retaining the attention of the listener, crowd or people, as the speaker might not be very familiar with it. The basic requirement is to change the slides while explaining the contents on the screen by maintaining the tempo of story telling independently. The speaker need not request others to jump back and forth to the slides, wait for others to react… I leaned a new smart and fabulous thing / way-out today as one of the teams used wireless mouse as slide changer. I witnessed it for the first time, and it was indeed a wow moment for me. GenZ is awesome and really smart.
Twinning
The moment we see this phrase we just think about similar clothes / attire, thoughtfully planned for a specific event or day, with a beloved friend or colleague etc. This is a boom these days during college festivals or other events just to enjoy the event, to take selfies / photos and to post it on various social media sites. The same phrase was visible to me today during one of the lab exam presentations. Two members were there in a group project. The project was decided and teams worked on it for the entire semester. The first group who was ready to deliver today was in similar looking attire including color code of clothes, belt and shoes too. The presentation was technically very strong. The ppts were apt, graphs were informative, flow includes storytelling using data, communication was awesome etc to name a few. The project was thoughtful planned, benefited for society, implementation, ppt, report and twinning in all respects shows perfect “time management”, interest, self-motivation and team work was carried out with utmost enjoyment. Thanks to my beloved students Dear Aadith and Apoorva, made my day for sure.
संभाषण
माझ्या सोसायटीत आणि कचेरीत शेजारी शेजारी दोन लिफ्ट्स आहेत. हे सर्वश्रुत आहे कि एक बटन दाबले कि लिफ्ट येते. दोन लिफ्ट्स आहेत म्हणजे दोन वेगवेगळी बटणे दाबायची गरज पडत नाही. जी लिफ्ट तुम्ही ज्या मजल्यावर आहेत त्याच्या जवळपास आहे ती येऊन उभी राहते तुमच्या दिमतीला आपसूक. अर्थात तश्या पद्धतीची आदेश / सूचना दिलेली असते लिफ्ट च्या यंत्रणेला. पण तरी देखील आज सहज माझ्या मनाला शिवलेला विचार मांडते आहे इथे कि शेजारी शेजारी दोन वेगळ्या लिफ्ट्स आहेत म्हणजे त्या दोघांमध्ये एक भली मोठी भिंत आहे, विटा सिमेंट ने बांधलेली. शिवाय लिफ्ट चा ढाचा बसवण्याकरता बांधलेल्या विविध थरांच्या भिंती देखील आहेत, स्टील च्या, लाकडी, लोखंडाच्या आणि अजून काही असतील कदाचित. इतक्या भक्कम भिंती मधे असून देखील ह्या दोन शेजारी शेजारी पहुडलेल्या लिफ्ट्स जर संवाद साधू शकतात, संभाषण करू शकतात तर मग माणसं का नाहीत हो? कुठल्याही भिंती भौतिक / फिसिकल बांधलेल्या भिंती आजूबाजूला नसतांना, अगदी शेजारी शेजारी बसलेले असतांना कुठल्याही प्रकारची देवाण घेवाण होत नाहीच. आणि झालीच तर काही अंशी वाद होतो संवाद नाही. आपण बहुतांशी नियमितपणे अश्या शेजारी बांधलेल्या लिफ्ट्स बघतो, वापरतो देखील मग शिकतो काय त्यातनं? माणसानेच, तंत्रज्ञान तज्ञानेच असा प्रोग्रॅम तय्यार केला असेल ह्या लिफ्ट्सनी संवाद साधावा ह्या करता. मग त्याच किंवा त्या सारख्या बाकी माणसांनी का साधू नये साधा आणि सातत्य असणारे संभाषण? कुठल्याही बाबतीत सातत्य अतिशय महत्वाचं, नाही का? त्यामुळे कृपया आत्तापासून तो मोबाईल नामक अवयव जरा बाजूला सरकवा, त्याच तोंड बंद करा आणि भिंती नसलेल्या सजीव प्राणी, पक्षी, झाडं, झुडपं, माणसं ह्यांच्याशी काही क्षण गप्पा मारून तर बघा आणि मला निश्चित कळवा हो मंडळी. आणि हो त्यात सातत्य राखा म्हणजे तीच सगळी सजीव मंडळी तुमची वाट बघतील, तुमच्या सुमधुर आवाज ऐकण्यासाठी उत्सुक राहतील आणि मग "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे". लिफ्ट मध्ये तरी दिलेली कमांड वापरून संवाद साधतात, ती कमांड देखील बुद्धियुक्त माणसालाच द्यावी लागते, पण आपल्याला अशी कमांड द्यावी लागत नाही, आपण कोणावरही अवलंबून नाही, भाषण, संभाषण, संवाद हा नैसर्गिक रित्या यायला हवा आणि येतोच, मग का त्याचा विसर पडला आहे आपल्या सर्वांना? परवाच गंमत म्हणून एका ठिकाणी भोजन करण्यासाठी गेलो आम्ही, बघतो तर काय ती जागा खास तरुणांसाठी होती. त्यामुळे बहुतांशी प्रत्येक टेबलावर जोडी बसली होती आणि दोघे अगदी जेवतांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या मोबाईल मध्ये व्यग्र. काय दृश्य होतं म्हणून सांगते. महद आश्चर्य वाटलं मला. ह्या ठिकाणी तरी नको ना, कारण तुमची अत्यंत लाडकी / प्रिय व्यक्ती समोर बसली आहे, असं असतांना गप्पा मारण्याचं सोडून भलतंच काय? माझ्या आकलना पल्याड आहे हे.
फक्त सजीवांकडून नाही तर ज्यांना आपण कृत्रिम रित्या सजीव केलं आहे, प्रोग्रॅम करून, सूचना देऊन अश्यांकडून देखील शिका,म्हणजे तुमच्या हातून पुढील प्रोग्रॅम अजून प्रगल्भ आणि उत्कृष्ट होईल. माझं हे ठाम मत आहे कि प्रोग्रामर जसा असतो तसे त्याचे प्रोग्रॅम. मग तुम्हीच जर संवाद साधला नाही तर संवाद साधायला लिफ्ट्स ना किंवा इतर मशिन्स ना कसे शिकवणार? साधं आणि सोप्प आहे सगळं.
मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२
चुंबकत्व
मला समजायला लागल्यापासून अनेक गोष्टींप्रमाणे एक गोष्ट मात्र फार प्रकर्षाने जाणवली / समजली होती कि मनगटी घड्याळ हे कमवावं लागतं. ते सहजी मिळत नाही. त्यावेळी माझ्या घरी फक्त माझ्या वडिलांकडेच फक्त मनगटी घड्याळ होतं. त्यांनी ते कचेरीतुन आल्यावर काढून ठेवलं कि मग मी त्याला स्पर्श करायची, घालून बघायची आणि नकळत संवाद साधला जायचा. अनेक वर्षांनी मग आईला, भावाला अशी घड्याळं मिळाली. तेव्हा एकतर स्टील चा किंवा चामड्याचा पट्टा असायचा. नंतर सोनेरी पट्टा अधेमधे नजरेस पडायचा. व्यक्तिमत्वाला "चार चांद" लागायचे घड्याळामुळे, फक्त माझ्या दृष्टिकोनातून. हळूहळू मग पाण्यात घालता येतील असे मजबूत प्लास्टिक-वजा, बांगडी सारखे दिसणारे, खडेजडित, स्टील धातूंचेच पण वैविध्य रंग चढवलेले असे, इलॅस्टिक स्वभावाचे, कड्या सारखे आणि आताशा पट्टा एका बाजूने वेगळे होणारे (स्मार्ट घड्याळ, ज्यांना चार्ज करावं लागतं असे) अनेकाविध प्रकारचे निघालेत, काही त्याला धरबंध नाहीच. एवढ्यातच माझ्या पाहण्यात आणि वापरण्यात एक अनोखा पट्टा आला आहे जो चुंबक तत्वावर घडवला आहे. त्याला कुठलेही धरबंद नाहीत, म्हणजे हुक नाही, कुलूप नाही, छिद्र / खाच नाही ई. फक्त पट्टा आहे, त्याच्या टोकाला आणि संपूर्ण पट्ट्याला चुंबकीय क्षमता आहे त्यामुळे मनगटाच्या आकारानुसार फक्त ओढून सोडून द्यायचं. बास. काय काय नवीन निघेल काही सांगता येत नाही. स्वस्त आणि मस्त, कुठलीही डागडुजी बराच काळ लागणार नाही असा तो पट्टा, प्रचंड हलका, पण दिसायला अगदी नेहेमीच्या पट्ट्यासारखाच. वापरल्यावर / हात लावल्यावरच समजणार कि नक्की काय दडलंय ते. प्रचंड लवचिक देखील.
माझ्या दृष्टीने असे नवनवीन शोध लागतात, माणसं नव्याची (नवीन वस्तू विकत घ्यायची / वापरायची / मिरवायची) भुकेली असतातच. त्या व्यतिरिक्त अश्या वस्तूंकडून भरपूर शिकण्यासारखं असतं. आत्ता ह्या क्षणापासून मला वाटतंय कि सर्वांनी कुठल्याही खाच + हुक = लॉक / कुलूप / घट्टपकड अश्या बाह्य आणि जास्तीच्या वस्तूंची गरज पडू देऊ नयेच. हा चुंबकीय शक्ती असलेला पट्टा / घड्याळ कसं प्रत्येकाच्या मनगटाप्रमाणे सहज बदल करतं तस्संच आपणही घरी / दारी करावं ना? काय हरकत आहे, म्हणजे कुठलीही देखभाल / डागडुजी ई. खर्च पडणार नाही, वाढणार नाही आणि त्यामुळे काही अडणार नाही मग कुठलाही माणूस, परिस्थिती, आव्हान का असेना. हलकं फुलकं राहून, आकार बदलून शिवाय चुंबकत्वाच्या शक्तीने भरपूर असे प्रत्येक क्षण आनंदाने पार पडण्याचा प्रयत्न करावाच. चला तर मग, लागा कामाला ताबडतोब.
शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२
रुसलेला लाडू
माझ्या आईच्या हाताला एक जगावेगळी चव होती, उत्कृष्ट स्वयंपाक, पक्वान्न आणि इतर सगळे म्हणजे सगळे पदार्थ सहजी करण्याची हातोटी होती तिची. खास असायचं सगळंच आणि ते देखील एकुलती एक मुलगी, प्रचंड लाडात आणि श्रीमंतीत वाढलेली, गुगल वगैरेची साथ नसतांना, माहेरी स्वयंपाकघर कुठल्या दिशेला आहे हे माहित नसलेली अशी. त्यामुळे माझ्या साठी आणि बाकी ज्यांनी ज्यांनी तिच्या हातचं चाखलंय त्यांना ते फार मोठ्या दर्जाचं होतं. बेसनाचे लाडू करावे तर फक्त तिनेच. कधीही मी कुठलेही दुसरे लाडू खाऊच शकत नाहीच, अजून देखील. सर्वप्रथम म्हणजे माझ्या आईला गॅस शेगडी मधे मोठा गॅस पण होतो हे माहितच नव्हतं कारण प्रत्येक पदार्थ हा शांततेत, शिस्तीत कमी आचेवरच केला जायचा. तोंडी सतत एकतर स्तोत्र किंवा भजन आणि परमानंदाची स्थिती, मग चव येणारच ना. सर्वदूर डाळीचं पीठ भरपूर साजूक घरी कढवलेल्या तुपावर भाजलेलं समजायचं, सुगंध पसरायचा, मग त्यात ना मोजता ना मापता एक कोमट दुधाचा हपका द्यायचा, तय्यार ठेवलेली पिठीसाखर मिसळली कि वळायला तय्यार. तळहात लाल व्हायचे पण दृष्ट लागतील असे प्रचंड स्वादिष्ट लाडू उभे राहायचे. मंडळी अगदी बरोरबर वाचलंत उभे राहायचे, कधीही बसले नाहीतच. तो आकार, त्या रंगछटा, माउसरपणा, शिस्तीत पहुडलेला किसमिस अहाहा च. तोंडात टाकला कि विरघळलाच पाहिजे. एक लाडू खाणं माहितच नव्हतं मला कधीच. एका पाठोपाठ एक सुरु. माझे बाबा नेहेमी म्हणायचे, "आईची माया नावाचा मसाला / तडका / जिन्नस त्यात आहे बेटा", त्यामुळे वर्षानुवर्षे ती चव, तो देखावा कधीही बदलला नाहीच. बसलेले, अर्थवट भाजलेले, अतरंगी, वाकडे-तिकडे, अनाकर्षक असे लाडू बघितले कि एक तर तोंडात टाकायचीच इच्छा होत नाही पण त्यामुळे प्रत्येक क्षण आई सोबत घालवलेला आठवतो, तिच्या स्वयंपाक घरात फेरफटका मारायला मिळतो बसल्याजागी.
बसका लाडू असतो हे माझ्या खिजगणतीतचं नव्हतं मुळी. ताठ मानेने, अभिमानाने उभे राहिलेले च लाडू बघून लहानाची मोठी झाले त्यामुळे पण असेल कदाचित मान उंच करून जगण्याचीच सवय जडली आहे. ती अशीच शेवटपर्यंत टिकावी हि ईशचरणी प्रार्थना. ध्यानी-माई-स्वप्नी नसतांना लाडू देखील काय भन्नाट शिकवून गेला नाही.
तर अशी हि बसलेल्या / फसलेल्या = रुसलेल्या लाडवांची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...