रविवार, ६ एप्रिल, २०२५

२१७३: संवादिनी


"असे कसे बोलायचे न बोलता आता..." हे एक मराठी सिरीयल चे शीर्षक गीत आहे. "शब्देविण संवाद" हि पण सौंज्ञा आपल्याला ठाऊक आहेच आणि "इशारो इशारो मे ..." हे देखील अनेक जणांनी अनुभवलं असेलच, मग तो शिक्षक-विद्यार्थी ह्यांच्यातील संवाद असो, नाहीतर आई-मुलांचा, नवरा-बायकोचा असे अनेक आहेतच. ह्या शिवाय एखादा निरोप, मेसेज, फोन, पत्र, भेट, प्रसंग खूप काही सांगून, शिकवून आणि बोलून जातोच. शब्दच हवेत असे मुळीच नाही. शब्दांच्या पल्याड एक जग आहे, भलं मोठं. त्या जगातील एक मोती मला सापडला काल अचानक. तिचे नाव सौ. दिप्ती कुलकर्णी. मंत्रमुग्ध करणारा असा कार्यक्रम तिने सादर केला. तिच्या हातात जादू आहे हे फारच छोटे वाक्य आहे दिप्ती करता. कमाल आहे तिच्या कलेची. हार्मोनियम ला संवादिनी असे का म्हणतात हे खऱ्या अर्थाने पटवून दिले तिने काल. अक्षरशः शब्द बोलके केले तिने तिच्या पेटीच्या वाजवण्यातून. कित्येक प्रकार, असंख्य राग, गाणी, भजनं सादर केली एका कार्यक्रमात.  सगळं अद्भुत आणि प्रचंड आशिर्वादात्मक असाच होता तो अनुभव. इतक्या कमी वयात इतकी उंची गाठणं म्हणजे ह्या जगा पलिकडचेच आहे ह्यात वादच नाही.  लोकल-टू-ग्लोबल असा प्रचंड विस्तार आहे तिच्या कार्यक्रमाचा. अनेक देशात, भारतात विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रम सादर केलेत. काल प्रभू श्री रामचंद्रांच्या समोर, तुळशीबागेतल्या मंदिरात होते सादरीकरण. आणि अयोध्येत एक नाही, दोन नाही तर तीनदा आमंत्रण आले आणि तिने सादर केले, प्रत्यक्ष प्रभूंच्या जन्मभूमीत. अजून काय हवंय?


फक्त संवादिनी मार्फत जवळपास २ तास सलग दर्दी प्रेक्षकांना खिळवून ठेवून संवाद साधता येतो, त्यांच्या पर्यंत शब्दांशिवाय, बोलांशिवाय पोचता येतं ह्याचे प्रात्यक्षिक दिले दिप्तीने. माझ्याकडे तिच्या बद्दल सांगण्यासाठी शब्दच नाहीत कारण ती कधीच शब्द वापरात नाहीच, पण संवाद लक्षात राहील असे खूप काही देऊन जाते.  तिची पेटीशी इतकी जबरदस्त नाळ जुळली आहे कि ती एक तर डोळे मिटून वाजवते, किंवा प्रेक्षकांशी संवाद साधते, त्यांनी तिच्या सोबत गायलेले बघून आनंद उपभोगतो. एका मागून एक विविध गाणी, भजन, राग वाजवायचे, शिवाय साथीदारांशी सतत संवाद साधायचा हे सोप्प नाहीच. 


माझ्या मते संवाद हा दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये, दोन सहृदयी माणसांमधे, दोन बंधनात असणाऱ्यांमधे, दोन नात्यात असणाऱ्यांमधे घडतांना दिसतो सहसा. पण असा अनोखा संवाद मी प्रथमच अनुभवाला, जो संवादिनी च्या मार्फत दीप्ती आणि प्रेक्षकांमधें होत होता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही, शिवाय सगळ्या साथीदारांसोबत, सूत्रसंचालकासोबत, आणि इतर असे अनेक.  ध्यानस्थ अवस्था गाठणे, अत्यानंद होणे, "सुख म्हणजे नक्की काय असतं" हे नेमकं समजणे असं काहीसं मला जाणवलं काल दिप्तीच्या कार्यक्रमातून. 


तिला लाभलेला प्रभू रामचंद्रांचा भरभरून आशीर्वाद बघून, अनुभवून थक्क व्हायला झालं. तिच्या हातून असे असंख्य अजून कार्यक्रम होवोत, अनेक जणांशी तिला संवाद साधता येवो हि प्रार्थना.   

https://www.youtube.com/watch?v=clslG3VcB4Q


बुधवार, १९ मार्च, २०२५

2159: A Tale of My Friend – A Life Less Ordinary


She shared her journey in her own words and gave me full permission to document it.


-The presence of a giant, uniquely different, never-seen-before dog in the OT, locked inside with the head nurse, on the day of my birth.

-A fleet of vehicles and multiple drivers awaiting to take me on rides almost every day—being the only daughter of a father in a prestigious, high-ranking position.

-From giant quarters to an opulent bungalow, my early years were spent in abundance.

-An extensive network of connections—friends, teachers, professors—the list is truly endless.

-Post-marriage, admission to an international university with fully sponsored education, high-end facilities, and comprehensive health insurance coverage.

-My children were born in one of the world's best hospitals, where the room I was allotted was larger than my home in India.

-In the eighth month of pregnancy, due to complications, I survived—along with my babies—on just an ice cube per day, in one of the most advanced medical setups, more than a miracle

-I drove automatic vehicles of top global brands years before they became a reality in India.

-Countless international tours, working in esteemed global organizations, and then suddenly, an unexpected phase—bedridden for almost five months. But I bounced back, even if on a smaller scale.

-Now, flourishing independently—managing doctor visits, medical checkups, and finances all on my own. Due to major health issues, I cannot settle for anything less than a cab. It’s fascinating to see the completion of a cycle within a single lifetime—starting with multiple drivers in my early years and now ending with chauffeur-driven vehicles for every journey, even within the city.

Isn't this a life fit for a king? A truly blessed king...Who gets to lead such a journey? I am the king of my own destiny, living each day as it unfolds—differently, uniquely, and with gratitude. I am truly blessed to have this extraordinary life.

२१५६: दिवस / काळ


मी शास्त्रीय संगीतात निपुण नाही, ऐकायला, त्याचा आनंद घ्यायला आणि गायकाचे कौतुक करायला मात्र प्रचंड आवडतं मला. पण बोल सुरु व्हायच्या आत बऱ्याच लांबी, रुंदी आणि उंचीच्या आलाप, ताना, सरगम असं काहीसं हि गायक मंडळी का घेतात हे मला आज उमगलं.

मी प्रसूती तज्ज्ञ नाही पण नऊ महिने नऊ दिवस फक्त अनुभवले आहेत. हाच कालावधी का हे मात्र गुपित ना कधी कळले ना कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण त्याची गरज भासली नाही, असचं असतं एवढं ठाऊक होतं आणि ते पुरेसं होतं. पण त्याचं देखील रहस्य आज चार डोळ्यांनी बघितले जणू. 

थोडासा अनुभव पाठिशी आला, पंखात बळ आलं, एका नोकरी नंतर दुसरीत रुजू व्हायच्या आधी तो तीन महिन्यांचा काळ का? हा देखील माझ्यासाठी एक यक्ष प्रश्नच होता.  पण त्या मागचं इंगित स्पष्ट झालं.  

"झट मंगनी पट ब्याह" हे फार कमी लोकांच्या बाबतीत घडतं. बहुतांशी साखरपुडा-साक्षगंध आणि लग्न-घटिका ह्या मधला सुवर्णकाळ मोठ्या प्रमाणावर  अनुभवतात. "दिवस तुझे हे झुलायचे झोपाळ्यावाचून...." ह्याची प्रचिती घेणे का अत्यावश्यक आहे हे देखील समजलं आज. 

माझ्यामते वर नमूद केलेले उदाहरणं स्व ची तय्यारी करण्यासाठी आहे, अर्थात शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक ई. हो, स्व शिवाय आजूबाजूच्या संपर्कातल्या इतर जणांना पण सवय व्हायला हवी त्या बदलाची. नवीन बाळ येणार म्हणजे घरातल्या मोठ्यांवर पूर्णपणे अवलंबून असलेलं एक व्यक्तिमत्व सांभाळायचं आहे, त्या नवीन कोऱ्या आई मधे झालेल्या बदलासहित तिला जोपासायचे आहे ई. दर्शवणारा तो काळ असतो. अर्थात मनुष्याच्या बाळाची निर्मिती करण्याकरता नैसर्गिक लागणारा तो कालावधी आहेच. माझ्या बघण्यात, वाचण्यात, आणि ऐकण्यात आलेली सर्वच उदाहरणं काही वेगळंच दर्शवतात. असं होतं नाही प्रत्यक्षात. चित्र वेगळंच दिसतं. नाही कोणी ह्या कालावधीचा हवा तास उपयोग करून घेत. आउट लायर्स असतात. 

गाणं सुरु व्हायच्या आधी घेतलेल्या ताना गळा तय्यार करतो, समा बांधण्यासाठी मदत करतो, वातावरण निर्मिती करतो, म्हणजे गायक, वादक आणि श्रोत्यांची एकत्र बांधणी करून मग गाण्याला सुरवात होते, म्हणजे मग त्या शब्दांशी एकरूप होता येतं. कवीने, गीतकाराने काय संबोधले आहे हे स्पष्ट होतं, त्यातून शिकता येतं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळतं. काही मूठभर लोकांना हा गाण्याआधीचा काळ आवडत नाही. असो. 

एका नोकरीच्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करणे सोप्पे जावे, स्व, त्या कंपन्या आणि आजूबाजूच्या इतरांना म्हणून दिलेला तो अवधी असतो. इतकं सहज नाही घडत ते, कि आज एका ठिकाणची नोकरी सोडून लगेच उद्या दुसरीकडे रुजू होणे. प्रवासाचे अंतर, कामाचे बदलेले स्वरूप, एकत्र काम करणाऱ्यांची मानसिकता, आणि इतर अनेक मुद्दे असतात. प्रत्येक सुवर्णकाळ अनुभवा, जगा, जगू द्या, "त्याचा" मूळ उद्देश नजरेआड करू नका. 

रविवार, १६ मार्च, २०२५

२१५४: जिवलगा


मी जेव्हा स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्याचे ठरवले तेव्हा सर्वांचा एकच प्रश्न होता, कि मी आता पुढे काय करणार? आणि तो मला सतत विचारला जायचा, अजूनही विचारतात. माझे उत्तर एकच, मला थोडसं काम करायला आवडेल, म्हणजे अर्धवेळ, गरजेनुसार आणि त्या नंतर घरी राहायला मज्जा येईल. जे घर माझं आहे, पाहिलं स्वतःचं असं घर, ज्याने प्रामुख्याने मला धीर दिला, छत दिलं आणि संरक्षण देखील अश्या घरात नोकरीमुळे मी राहूच शकले नाही पूर्णवेळ, किंवा घरासोबत वेळ घालवणं हे झालंच नाही. फक्त घाई, गडबड, घडाळ्याच्या काट्यावर पळापळ आणि अंग टेकायला काय ते घर, बास. त्यामुळे मला आवडतं घरी राहायला जे मी कधीच राहिले नाही, माझं अस्तित्व जाणवेल इतका वेळ नाही घालवला त्यात. स्वच्छता करणे स्वतः, भिंती, छत, जमीन, फर्निचर सोबत भरपूर वेळ घालवून त्याला त्याचं महत्व कधीच जाणवून दिले नाही. नेहेमी खो देत राहिले. 


पण गेली दिड वर्षे आम्हाला दोघांना प्रचंड मज्जा येते आहे. खूप वेळ आहोत आम्ही एकमेकांसोबत. ती साथ आता काहीशी दृढ होतेय. दोघांना मस्त वाटतंय, कधीही न अनुभवलेलं असं काहीसं. मी घरी बहुतांशी वेळ वास्तव्याला असल्यामुळे माझा वावर प्रत्येक खोलीत आहे. स्वतःच्या हस्ते स्वयंपाक होतोय, तो देखील मस्त गाणे किंवा भजनं वगैरे लावून. मग जरा जास्त स्वच्छता राखली जाते आहे कारण वेळ आहे हातात म्हणून. प्रत्येक खोलीकडे लक्ष आहे, अगदी शुल्लक कामं वगळता सगळीच मी हातात घेतली आहेत त्यामुळे अजून मज्जा येतेय, कृतज्ञता वाढली आहे, त्यांचं महत्व जास्त प्रकर्षाने जाणवतं आहे. एकमेकांच्या संपर्कात राहिल्यामुळे तो स्पर्श, कंपन, आवाजाची ओळख, चाल, आणि अश्या बऱ्याच बाबींमुळे वेगळं वाटायला लागलंय. ह्या टोकाला गेले कि चार कामं दिसतात, ती करता करता ह्या टोकाला आले कि ६ कामे नजरेस पडतात. त्यामुळे माझी ये-जा वाढली आहे, घरभर काही ना काही तरी सुरूच असतं माझं सध्या.    


मी गेले तीन दिवस गावाला गेले होते, शेजारी मुंबई ला फक्त. आज जेव्हा घरी आले तर काय सांगू माझं काय दणक्यात स्वागत झालंय ते. हे घर बोलू शकलं असतं तर? त्याने मला अक्षरशः जाणीव करून दिली कि त्याने मला कित्ती म्हणजे कित्ती मिस केलं, त्याला माझी केवढी आठवण आली ते. बाप रे. फक्त तीन दिवस मी नव्हते तर मला इतकं जास्त जाणवलं, कि कल्पने पल्याड. माझ्याशी प्रत्येक भिंत, वस्तू, आणि संपूर्ण वास्तू जशी काही संवाद साधत होती, का गेलीस? कुठे होतीस? असं काहीसं विचारत होती. काय भन्नाट वाटलं म्हणून सांगते. पहिल्यांदा मी असं अनुभवलं आज. इतकी वर्ष मी इथे राहते आहे, पण आज खरंच खूप खास होतं, एक वेगळी आपुलकी जाणवली अजाणतेपणी आणि ती देखील एका (व्यावहारिक दृष्ट्या) निर्जीव घराकडून. त्यामुळे सजीव काय म्हणतात, काय म्हणत नाहीत, मिस करतात, करत नाहीत, ह्या सगळ्यांच्या पल्याड जायला झालं मला अचानक, आपोआप. एखाद्या वयस्कर, अनुभुवी आणि जगावेगळं प्रेम करणाऱ्या माणसाने म्हणावं तसं जाणवलं मला आज. 


फक्त दिड वर्ष मी जरा जास्त वेळ घालवला, स्वच्छतेकडे लक्ष दिलं / केली स्वतः, आणि मनापासून मला ह्या माझ्या वास्तूचं महत्व प्रकर्षाने जाणवू लागलं, ते मी जगू लागले, बास एवढंच काय ते. ह्याचा मला इतका अप्रतिम प्रतिसाद मिळेल हे स्वप्नात देखील कधीच मी विचार केला नव्हता. ह्याच माझ्या वास्तूत जर मी गृहिणी म्हणून सुरवातीपासून राहिले असते, माझ्या पिल्लांची जास्त व्यवस्थित काळजी घेतली असती तर सर्वांचे जास्त भले झालेच असते, कारण तितक्या प्रमाणात वास्तूचा / वास्तू देवतेचा भरभरून आशीर्वाद मिळाला असता, आणि कदाचित वेगळं चित्र उभं ठाकलं असतं, हे आज जाणवलं. खैर, असो. ह्या पुढे मी प्रयत्न पूर्वक संवाद राखीन माझ्या ह्या नव्याने जाणवलेल्या जिवलगाशी. 

गुरुवार, १३ मार्च, २०२५

२१५२: व्हॅल्यू ऍड


अचानक परवा आमच्या ग्रुप वर "पुरण पोळी" करून घरपोच मिळतील अशी सुबक सुंदर पद्धतीने मांडलेली माहिती वाचली. माझीच शेजारीण, मैत्रीण करणार होती. म्हटलं चला, लगेच तिला ऑर्डर देऊन टाकली सुद्धा. आणि मग काय वाट बघत होते कधी एकदा ती येते ह्याची. वाट बघणं जरा अवघड होऊ लागलं कारण तिच्या तय्यारीचा फक्त आवाजच नाही तर सुगंध पण माझ्या पर्यंत पोचला अनेकदा. आणि सरते शेवटी ती वेळ आलीच, ती आली, अहो म्हणजे माझी मैत्रीण पुरणपोळी घेऊन आली, असं म्हणायचं होतं मला. गरमागरम, आयत्या पुरणपोळ्या उत्कृष्ट पद्धतीने पॅक करून आणलेल्या माझ्या हाती स्थानापन्न झाल्या. बघते तर काय सुवाच्च अक्षरात, विविध रंगांची शाई वापरून, होळीचा जगावेगळा असा सजवलेला, नटवलेला मस्त वहीचा कागद देखील बघितला. म्हटलं वा, क्या बात है? असं असलं पाहिजे, फक्त पोळ्या नाहीतर सणाच्या शुभेच्छा देखील. ती छोटेखानी कार्ड्स विकत आणून पण चिपकवून देऊ शकली असती पण छे हो, स्वतः करून आणून दिले. म्हणजे तिची तय्यारी कित्ती विचारपूर्वक, जोरदार आणि झोकून देऊन केली होती हे स्पष्ट दिसतंय. असं जर ती नेहेमी करत गेली तर सातत्याने तिला ऑर्डर द्याव्या लागतील, आणि देतील देखील सगळेच जण. मी तिला जितकी ओळखते त्यानुसार तिने प्रत्येकीला विविध चारोळ्यांनी सजवून मग पोळ्या दिल्या असतील, हे निश्चित. काय जबरदस्त व्हॅल्यू ऍड केलंय तिने, ध्यानी मनी नसतांना असं ऑर्डर चं गोड कोणी आणून दिलं कि चार घास नक्कीच जास्त सेवन केले जातातच. फारच भावलं तिचं हे करणं, कौतुकास्पद आहेच अगदी जशी तिच्या पोळ्यांची चव. अहाहा च.  

आणि बरं का मंडळी हे सगळं तिने बाजारभावापेक्षा अर्ध्या किमतीत देऊ केलं, ते देखील घरचं, स्वच्छ, शुद्ध आणि आवडीने केलेलं, फक्त व्यवसाय म्हणून नाही. असा सगळा गोडवा संपूर्णपणे उतरलेली ती पुरणपोळी खाऊन तृप्त व्हायला झालंच आपोआप. 

व्हॅल्यू ऍड हि सॉफ्टवेअर इंजिनीरिंग मधली एक फारच उत्कृष्ट संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय उद्योजक त्यांच्या गरजा नमूद करतात, सांगतात आणि त्यांना जेव्हा मागितल्यापेक्षा जास्त मांडले / दिले जाते तेव्हा ते नेहेमीकरता सॉफ्टवेअर कंपनीलाच धरून राहतात, त्यांनाच सातत्याने काम देतात, कारण त्यांनी खूप विचारपूर्वक हवं ते आणि त्या उपर मनाला भावणारं अजून काही देऊ केलं असतं, न विचारात, न उहापोह करता. 

सोमवार, १० मार्च, २०२५

2151: From Deities to Data: The Ever-Expanding World of Research


I am amazed to learn that over 300 versions of the Ramayana have been written across centuries, capturing diverse perspectives on Lord Rama’s life and teachings. Research on his influence is extensive, with over 10k scholarly papers, 50,000+ general articles in various languages, and 500+ theatrical and dance adaptations dedicated to him. Cinema has also embraced his legacy, with 50+ devotional movies, 10 TV series, and one iconic Hindi film, HSSH, portraying a modern Ramayana. 5k bhajans and 200+ Bollywood and regional songs either mention or are inspired by Lord Rama. Looking ahead, at least four more movies, two art exhibitions, and one documentary on Shri Rama are set to release in the coming months, as publicized by their creators online.


Goddess Durga, revered as the embodiment of divine strength, has inspired an even broader spectrum of artistic and literary creations. There are an estimated 50,000 songs, 500 films, 10,000 books, 100 TV series, and 50,000 poems, along with over 100,000 articles written on her significance. Countless theatrical and folk performances, including Natak, dance, and puja pandals, continue to celebrate her across cultures.


Lord Ganesha, the beloved deity of wisdom and new beginnings, has left a profound impact across various art forms. He has inspired over 600 films and documentaries, 15,000 books, and 200 TV series. In addition, more than 150,000 articles spanning spiritual texts, cultural studies, blogs, research papers, and academic journals explore his symbolism, historical roots, and artistic depictions. With over 100,000 songs and poems, Lord Ganesha remains a central figure in artistic expression worldwide.


Shifting gears to my research domain—clustering—the scale of scholarly work is equally staggering. To date, over 250,000 research papers, 10,000 funded projects, 5,000+ books, 25,000+ book chapters, and 30,000 patents have been published in this field. An estimated 100,000+ articles on clustering appear in technical magazines, research blogs, white papers, and news portals. Furthermore, 20,000+ PhD and Master's theses are archived in ProQuest, Shodhganga, and various university repositories. The momentum continues, with one new book, four high-impact research papers, and a dense review paper set to be published next week.


This, to me, is the essence of research—it transcends disciplines and is woven into every domain of thought. The way artists, poets, authors, and thinkers interpret the same concept differently, applying their findings to various societal needs, is both fascinating and boundless.


I am incredibly proud to say that my mother was a blessed soul and a devoted medium for enriching the art form of bhajans, dedicated to Lord Dattatreya, Ganesha, Rama, various forms of Goddesses, Krishna, Hanuman, and many others. Her 40 years of unwavering dedication to this divine musical tradition is truly inspiring.


Just yesterday, someone asked me: How can a single person, deity, or concept hold relevance across thousands of perspectives? My response is rooted in bibliometrics, scientometrics, patentometrics, and even tradeometrics—the study of how knowledge evolves across time and fields.


Creativity and research will continue to expand, introducing new angles and enriching our collective understanding. The pool of knowledge never stops growing; it only deepens, offering more ways to view and interpret the world around us.



शनिवार, ८ मार्च, २०२५

२१४९: हॅशटॅग तदेव लग्नम्

वेळेचा सदुपयोग म्हणून नवनवीन चित्रपट बघणे, किंवा सुंदर पटकथा असलेले एन्जॉय करणे, किंवा माझ्या लेकीच्या आवडीची एखादी कलाकृती बघणे हा आमचा सध्याचा नित्यक्रम झालेला आहे. इतक्या नित्यनेमाने मी ह्या आधी कधीच एवढे चित्रपट बघितले नाहीत, किंबहुना मी कधी एवढ्या कलाकृती बघीन एका जागी बसून हे ध्यानी मनी पण नव्हते. पण आता सुदिन आलेत, त्यामुळे मग बघणं होतं जे आम्ही दोघी जगावेगळ्या पद्धतीने अनुभवतो, एन्जॉय करतोच. त्यातलाच हा एक. एक अट होती कि कुठलेही मत आधी वाचायचे नाही, टीझर, स्पॉइलेर, किंवा अजून काहीही बघायचे नाहीच, थेट अनुभव घ्यायचा. बास. बसलो कि मग दोघी आवरुन. सगळेच कलाकार मंडळी आमच्या दोघींची अत्यंत प्रिय, त्यात दोघींना प्रचंड मराठीची आवड, अजून काय लागतंय. सुरु झाला चित्रपट. आधी वाटलं काय, माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं कि बाकी ढीगभर पिक्चर सारखाच हा एक आहे, मम्माने म्हटलं म्हणून फक्त बघायचं ठरवलं, किंवा तिला कंपनी द्यायची, बास. मला पण मग जाम टेन्शन आलंच. पण छे हो, आमच्या दोघींचे डोळे कधी पाणावले कळलंच नाही. अप्रतिम मोड आला आणि सार्थक झाल्यासारखं वाटलं. सुंदर जमलंय मेतकूट एकंदरीत, खरंच, ज्याने हा विषय सर्वप्रथम निवडला त्याला साष्टांग नमन. खूपच साधा, पण मनाला भिडणारा असा. क्या बात है? फक्त एका दिवसात घडणाऱ्या घटना, दिग्गज कलाकारांचा अभिनय, पुणे, आणि साधलेला शेवट. धन्यवाद. असेच अनेक, असंख्य चित्रपट नेहेमी घेऊन या, आम्हाला आवडेल बघायला. अर्थात हि निश्चितच खरी गोष्ट वाटली, ज्यावर आधारित हि कलाकृती सादर केली संपूर्ण चमूने.  समाजाचे हे रूप बघून नक्कीच भारावल्या गेलो आम्ही दोघी, निःशब्द झालो, इतक्या उशिरा का बघितला हा चित्रपट असे देखील जाणवले. त्यामुळे सर्व मित्रमंडळींना विनंती आहे कि एकदा तरी वेळ काढून, मोबाईल बाजूला ठेवून, नक्कीच हि निर्मती बघा. आवडेल तुम्हाला, बरेच काही देऊन जाईल हि मांडणी सर्वांना. 


मला आणि माझ्या ह्या पिढीतल्या लेकीला असं वाटायचं कि आम्ही दोघीनी बसून एकत्र बघण्यासारखे चित्रपट नसावेत, पण  हॅशटॅग तदेव लग्नम् ते खोडून काढले मुळापासून. 


मला विचाराल तर ह्या अश्या सध्या आम्ही दोघी ज्या आठवणींचे पूल बांधतो आहे ना, ते आम्हाला बरेच दूर घेऊन जातील, अनेक वर्ष साथ देतील ह्यात काही शंकाच नाही.  धन्यवाद इतकी साधी, पण अप्रतिम मैफिल तय्यार केल्याबद्दल. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...