गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

२२९६: अनपेक्षित स्तोत्र-घड्याळ

मी पहिल्यांदाच आई झाले होते आणि मी भली मोठी स्वप्रचलित स्वयंसिद्धा पण होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आईलाच विचारायची हे मला जमले नाही; तिने पण कधी ढवळाढवळ केली नाही माझ्यात. बाळांना मालिश करतात आणि त्याचे महत्त्व मला ठाऊक होते, अनेकदा ऐकले होते. प्रेग्नेंसीच्या काळात जे नवीन आई होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले, तेव्हा पुन्हा एकदा सांगण्यात आले. मग काय, विडा उचलावाच लागला.

एक यक्ष प्रश्न उभा ठाकला ज्याचे उत्तर कोणीच कधीच दिले नव्हते, मी पण विचारला नव्हता: बाळाला किती वेळ मालिश करायची? स्वतःलाच मग ते उत्तर गवसले. आधी मी फक्त गप्पा मारत होते मालिश करते वेळी; मग मात्र त्या गप्पा अंघोळीच्या वेळी मारण्याचे ठरवले आणि मालिशच्या वेळी मोठ्याने स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. स्तोत्र संपेस्तोवर मालिश हे समीकरण आपोआप सुरू झाले.

आज जवळपास २२ वर्षांनी हे सगळं पुन्हा प्रकर्षाने आठवले. सतत सगळे डोळ्यासमोर असतेच माझ्या; पण आज काहीतरी वेगळे होते. कोवळं ऊन खाता खाता माझा चालण्याचा पिटुकला व्यायाम सुरू होता, तेव्हा अचानक लक्षात आले की मला किती वेळ चालायला हवे? किंवा किती वेळ चालले की ती योग्य ठरेल, उपयोगी होईल? आता हा प्रश्न घेऊन मी जाऊ कोणाकडे? आणि प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने त्याचे उत्तर देणार, जे योग्य असते; पण मला झेपेल एवढे चालणे म्हणजे काय? याचे उत्तर सरते शेवटी सापडले आणि मी माझी दररोजची स्तोत्रे म्हणायला सुरुवात केली, एकामागून एक. क्या बात है! इतके भन्नाट वाटले म्हणून सांगते, दररोजचे चालणे आणि आज यात मला निश्चितच खूप फरक जाणवला. सगळी स्तोत्रे म्हणून झाली आणि मग मी वेळ बघण्यासाठी आणि घोटभर पाणी पिण्यासाठी घरी गेले, तर साधारण ह्या वयाच्या टप्प्यावर चालायला हवे, ढोबळ मानाने तेवढे झाले होते. अहाहा! खूपच मजा आली. नवीन समीकरण समजले मला.

माझ्या घराशेजारी एक उत्कृष्ट दिसणारी, सजवलेली (मस्त रंग वापरून) अशी ओपन-जिम आहे. तेथे पण मी वेळ घालवते, कारण समोर भला मोठा डोंगर आहे जो हिरव्या रंगांच्या विविध छटांनी नटलेला आहे, गाव देवीचे देऊळ आहे, असंख्य रंगांचे, प्रकारचे, आकाराचे पक्षी आहेत, शब्दात बांधता येणार नाही असा उत्कृष्ट वारा आहे, आणि बरेच काही. त्यामुळे मी रमते तेथे. सर्वांशी बारीबारी गप्पा सुरू असतात माझ्या, आणि अर्थात त्यांच्या देखील (मूक संवाद, खोडून काढत नाहीत ते कोणीच मला, कान देतात फक्त).

तेथे ८-१० प्रकारचे जिम उपकरणे आहेत. त्यातले मला काहीच प्रिय आहेत, करता येतात, जमतात. त्यातली एक म्हणजे माझी सखी सायकल. बहुतांशी तिचा उपयोग मी रोज करतेच, फेरफटका मारण्यासाठी. आज पण पुन्हा एकदा तोच प्रश्न: "मी किती वेळ सायकल चालवायची, तिची मजा घ्यायची?". मग काय, चालताना एक भले मोठे स्तोत्र राहून गेले होते म्हणायचे. आज पहिला दिवस त्यामुळे मग मी म्हटले, जरा सगळेच स्तोत्र आज नको; आणि जी छोटीछोटी स्तोत्रे होती, ती म्हटली आधी. जशी सायकलवर बसले, तसा हा विचार आला आणि पठण सुरू झाले आपोआप. पुन्हा एकदा सहज माहिती म्हणून जेव्हा घड्याळ बघितले, तेव्हा सगळे गणित चपखल बसलेले आढळले: वेळ, व्यायाम, स्तोत्र. अहाहाच पुन्हा एकदा! माझा आनंद गगनात मावेना. "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हेच खरं. मला तर हे खूप म्हणजे खूप भावलंय, पटलंय बुवा.

आणि हो, मी त्या कोवळ्या उन्हाच्या वेळी एकटी असते अख्ख्या जिममध्ये, माझंच राज्य असतं; त्यामुळे बिनधास्त मोठ्याने म्हणता आलं. आणि त्याचा अजून एक फायदा कळला. माझ्या गुरूंनी सांगितलेले आठवले, अनेकदा अनेक ठिकाणी वाचलेले स्मरले, की सार्वजनिक ठिकाणी पठण केल्यास त्याची व्याप्ती वाढते, बऱ्याच जणांना फायदा होतो, ती कंपने पोहोचतात, उत्साह निर्माण होण्यास मदत होते, एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, इत्यादी. अर्थात, हे सातत्याने केल्यास. माझी "त्याला" प्रार्थना आणि विनंती आहे की आज जे नव्याने सुरू झाले आहे, ते माझ्या हातून सतत घडो, घडवून घे.

आधी मी एक साधी व्यक्ती असल्यामुळे व्यायाम करताना, चालताना नको ते विचार पण यायचे. ते कधी मी हुसकावून लावण्यात यशस्वी व्हायचे, कधी नाही. बघा "त्याने" कसा उत्कृष्ट उपाय शोधून काढला आणि मांडला माझ्यासमोर ते. फक्त मांडला नाही, तर प्रात्यक्षिक करून घेतले देखील. कसं जमतं "त्याला" हे सगळं? कमाल आहे त्याची!

स्तोत्रे म्हणण्याचे अनेक नियम आहेत, मला ठाऊक आहे, मान्य आहेत; पण जर हे माझ्यासमोर उभे ठाकले आहे, म्हणजे त्यात काहीतरी दडले आहे हे निश्चित. मला कुठलेही नियम डावलायचे नाहीत, पण हे मी ह्या वेळी म्हणावे हे मी ठरवलेच नाही, किंवा मी कोण होते ठरवणारी हो?

व्यायाम हा हवा तेवढाच व्हायला हवा, मग तो मालिशच्या स्वरूपातला असो वा कुठल्याही वयातला. प्रत्येक जणांची गरज वेगळी असते. म्हणून 'माझ्यासाठी योग्य काय?' ह्याचे उत्तर माझ्या दृष्टिकोनातून ह्यापेक्षा योग्य असूच शकत नाही. पाठांतरही झाले, मोबाईलच्या दूर राहता आले, निसर्गाचे सानिध्य लाभले. सहज अजून काय हवे?

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

२२९५: लोखंडी कणा

सात एक वर्षांपासून एक जण मला अगदी बिलगून राहू लागला आहे. काही केल्या जाण्याचे नाव घेतंच नाही आहे, म्हणजे मग त्याला मित्रच म्हणावं लागेल ना? तर हा माझा नवीन सखा आधी समजलाच नाही कि आला कोठून आणि का? मग हळू हळू खोदून काढल्यावर समजलं कि ह्या ठिकाणांहून आलायं आणि तो प्रथमदर्शनी नकोसा असा होता आणि आहे. त्यामुळे त्याला हुसकावून कसे लावायचे ह्या करता सगळा खटाटोप सुरु होता. तज्ज्ञ भलत्याच दिशेला गेले होते आणि इतक्यातच त्यांना बरोबर दिशा मिळाली आहे. माझी पाय दुखी हि खरं तर पाठीच्या कण्या मुळे आहे, तिथे काही तरी गडबड आहे म्हणे. इतकी वर्ष सातत्याने शारीरिक आणि मानसिक यातना सहन केल्यावर प्रकर्षाने काही जणांसमोर नतमस्तक होता आलं. आधी त्यांच्याबद्दल आदर, सन्मान आणि कौतुक होतंच पण आता ते कित्येक पटीने वाढलंय. 

भली मोठी वाहने जी मंडळी चालवतात मग ती पुरुष मंडळी असतो नाहीतर माझ्या भगिनी, सातत्याने इतके तास रस्त्यावर ते ओझं वाहून न्यायचं, वेळेत पोचायचं आणि धावायचं, तेच रस्ते, कधी कधी नीरस पण वाटतं असणार. बहुतेक त्यांची पाठ किंवा पाठीचा कणा हा लोखंडाचा असेल, निश्चितच. मला जर थोडक्या अंतरावर इतका त्रास होतो, तर ह्या सगळ्या ट्रक चालकांना, टँकर च्या ड्राइवर ना कायचं होत असेल? ह्याची कल्पना पण करवत नाही. हे वाचल्यावर काही म्हणतील कि त्यांना सवय होते. मला नाही वाटतं ते इतकं सोप्प आहे. मी इथे फक्त दूरचा जड वाहनाचा प्रवास ह्या बद्दल नाही बोलत आहे. कदाचित अनेकांना नीट आणि पुरेशी झोप मिळत नसेल, कुठेही खावं लागत असेल, अनेकदा ते देखील मिळत नसेल आणि ह्या सर्वांचा त्या पाठीच्या कण्यांवर नक्कीच परिणाम होत असणार. आणि हे एक किंवा दोन दिवस नाही तर सातत्याने सुरु. मी कणभर ह्यातून गेले तर मला इतकं जाणवलं, ह्याचं काय होत असेल. आणि सरते शेवटी मोबदला म्हणजे पैशात आणि शाबासकीच्या स्वरूपात मिळत असेल का? 

आता जेव्हा तज्ज्ञ सांगतात कि प्रवास करणं टाळा, तेव्हा दोन-तीन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात त्या म्हणजे, हे सगळे जड वाहनांचे ड्रायव्हर्स, दुसरे म्हणजे माझे  फिरण्याचे प्रेम अर्थात माझ्या वर्कशॉप्स करताच फक्त, आणि पिटुकले उदर्निवाहाचे, वेळ सत्कर्मी लावण्याचे साधन म्हणून सुद्धा. "तो" मला निश्चितच हार मानू देणार नाही मुळी. तो मला लोखंडाचा कणा नाही तर लोखंडाचे गुणधर्म असलेला कणा नक्कीच दिलेला आहे, आणि तो दाखवेल दिशा त्याची शक्ती काही टिकवून ठेवायची ते. कारण जेव्हा मी त्या वर्कशॉप्स ना सुरवात करते तेव्हा सगळं दुखणं भुर्रकन पळून जातं, नंतर मुक्कामी येतं ते ठीक, पण तो माझा श्वास आहे, ते मी खूप एन्जॉय करते त्यामुळे मी फक्त सध्या वर्कशॉप्सला च बाहेर पडते, बाकी नाही. गैरसमज नसावा. 

2294: Conversations

I am a joyful graduate from the "books era," in which only my teachers were my gurus, no one else, not YouTube or social media. From that perspective, I was a student focused solely on core concepts. With the advent of technology, many more directions, subjects, and concepts have since popped up. Hence, I cannot claim to be an official student of those new subjects; I learned a few concepts on the go, as required.

One of them that is most dear to me is Data Analysis. We talk to each other, you know who?those hidden patterns that data wants to show me and which I wish to retrieve and learn.

Initially, I was only aware of empirical details, which dictated that I first preprocess the data, ensure it is clean and crystal clear, locate impactful attributes, and perform analysis once the data is ready. The focus then was on learning only from historical data. Who else understands the importance of core concepts better than me? But very recently, I understood the importance of recent, fresh data, of course, supported by what happened in the past.

So now, I concretely feel that I must keep performing incremental clustering of ever-growing data, and keep incrementally learning about what data is trying to tell you. This should be done with more focus on current data and trends. I must also shift my focus to impactful rows, data series and time series rather than merely individual attributes.

All these new things will help decision-makers more than just analyzing empirical data. As the data grows now, I must consider the topmost patterns, what exactly they are directing toward. Clubbing the two, analysis generated based on historical data and the freshness added by new add-ons, will prove more fruitful.

On top of that, the individual analyst may use randomization techniques to see what else is possible. I should also analyze worldwide data from the same niche domain to determine what kind of futuristic data may be generated. Thus, instead of one or two, the analyst may have three layers of details to produce optimal results.

These are just thoughts that have popped up. The researcher hidden in me should tap the publications to know if such ensemble or meta-model methods are already proposed at the data level, not the algorithm level.

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

2293: Barely a machine

 Since my childhood, I have maintained a strong Public Relations (PR) network, an achievement made impressive by growing up in an era devoid of social media. With age, the length, breadth, and most importantly the depth of this network continued to increase. I am confident that even today, if I were to knock on any door, I would not be turned away. As my friends often tell me, "We know the 'original you,' so nothing else matters."

As I've mentioned in earlier posts, I deeply appreciate the concept of the Bell Curve. Today, we, my friends and I, feel we are collectively at the peak of that curve. We believe we have achieved multiple milestones, placing a decisive "tick mark" in front of every goal we set.

Recently, one of my closest friends unexpectedly shared a deeply personal narrative with me I still don't know why she chose to open up. She is blessed with three children: the first was a single birth, and the second time brought double the celebration with twins. Two boys and a girl, all of them are now grown-up, working professionals, with one still pursuing research studies.

Her core confession was this: when her children were born, she was technically never able to feed them, despite various attempts and experiments. They thrived on outside sustenance. Following this phase, she became more than a full-time working professional and was rarely around her kids; they largely managed themselves and grew up independently.

Now, having reached that age-peak, the center of the Bell Curve, she feels the complete slope in the downward direction. There are no complaints, but her children have either stopped or significantly reduced communication, confining it to mere "hi" or "hello."

Perhaps the generation gap is too vast, or their professional situations are too demanding. Or, maybe the old saying holds true: "Mothers who fed their kids will get that respect; ultimately, it's give and take."

She accepted the fact with quiet grace, describing herself as "barely a machine" through which three new lives came into this world. That is where her contribution ended.

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

२२९२: श्रीमंती (भाग १)

दोन सख्या मैत्रिणींनी मला सांगितलेल्या कथा मी इथे थोडक्यात मांडते आहे. 

एका मैत्रिणीची मोठी बहिण प्रथितयश डॉक्टर आहे. तिचे भले मोठे रुग्णालय होते, आता तिने निवृत्ती स्वीकारली आहे. फारच मोठ्या प्रमाणात जेव्हा तिचे हॉस्पिटल सुरु होते तेव्हा तिचे वडिल जमेल तेवढ्या वेळ तेथे येऊन बसत. सहज. एकदा काका तिथे बसले असतांना त्यांनी बघितले कि एक म्हातारे गृहस्थ रुग्ण म्हणून आले, पायात साध्या चपला पण नव्हत्या, साधी विजार, शर्ट आणि टोपी, असा पोशाख होता. अगदी म्हणजे अगदीच साधी राहणी होती त्यांची. डॉक्टर नि बोलावल्यावर ते आत गेले, तपासणी झाली असणार, मग बाहेर येऊन रिसेप्शन वर फी देऊ लागले. हे सगळं काका टिपत होते. आणि जेव्हा रिसेप्शन वर ते फी देणार तेवढ्यात काकांनी रुद्रावतार धारण केला. "मी हेच शिकवलं का? हेच संस्कार दिलेत? इतक्या साध्या माणसाकडून का फी घ्यायची?" ई. त्यांची फारच मोठ्या आवाजात वाक्य सुरु होती. ते ऐकून त्यांची मुलगी बाहेर आली काय झालंय नेमकं ते बघायला. तो वर तो माणूस फी देऊन हळूहळू बाहेरच्या दिशेने जायला निघाला. ताईने मग काकांना बाहेर नेऊन दाखवले. ते दृश्य बघून काकांना महद आश्चर्य वाटले. 

ती व्यक्ती जगातल्या एका सर्वात महागड्या गाडीत बसून गेली घरी. ती व्यक्ती म्हणजे त्या गावातीलच नाही तर तिथल्या जवळपासच्या सर्व गावातमिळून असलेली सर्वात धनाढ्य व्यक्ती होती. पण त्यांना जणू चप्पल टोचायची, तीच बाब महागड्या कपड्यांची. त्यामुळे लहानपणापासून लागलेली सवय, मुरलेले असेच ते वागत होते, आणि मुख्य म्हणजे त्यांना त्याच काहीच वाटत नव्हतं. त्यांच्या आजूबाजूला वावणाऱ्या लोकांना पण ते काय आहेत हे ठाऊक असल्यामुळे त्याची सवय झाली होती. असं नव्हतं कि ते चप्पल किंवा उंची कपडे विकत घेऊ शकत नव्हते. त्यामुळे प्रत्येकाची श्रीमंतीची व्याख्या नेहेमीच वेगळी असते आणि किंबहुना असलीच पाहिजे. 

माझ्या अजून एका मैत्रिणीचा मुलगा लवकरच स्त्रीरोग तज्ञ होणार आहे, होऊ घातला आहे. त्याची आई आणि तो ह्यांचा संवाद जेव्हा जेव्हा व्हायचा तेव्हा तेव्हा म्हणे आईच्या तोंडी काही ठळक वाक्य तीच तीच पुन्हा पुन्हा बोलली जायची. ती वाक्ये म्हणे तिचा पहिला पगार, किंवा आता तिला महिन्याकाठी लागणार पैसा, महागाई ई. त्यात भरीस भर म्हणजे आईची साधी राहणी. एकदा शेवटी त्यांच्या भेटीत मुलगा आईला म्हणतो कसा "तू श्रीमंत होतीस आणि आहेस आई, पण तुला श्रीमंत म्हणून जगात आलं नाहीच, किंवा तू ती श्रीमंती जगली नाहीस". तिच्यात आणि तिच्या ह्या शेंडेफळामधे साधारणतः तीन पिढ्यांचे अंतर आहे. तिने त्याला जन्म दिला आहे, काही वर्ष तो तिच्या सोबत राहिला असल्यामुळे दोघे एकमेकांना ओळखतात. 

तिला समजल्या दोन गोष्टी:

 १. ह्या नंतर कधीच हे विषय येऊ द्यायचे नाहीत बोलण्यात, हवा-पाण्याच्या, त्याच्या क्षेत्राच्या गप्पा गोष्टी करायच्या किंवा फक्त ऐकायच्या, बास, 

२. मुलाची श्रीमंतीची व्याख्या म्हणजे उंची हाटेलात खाणे, बाहेरचे खाणे सतत, भल्या मोठ्या महागड्या दुकानातूनच खरेदी करणे, आंतरराष्ट्रीय पद्धतीचे राहणीमान ठेवणे, पैशाची चिंता न करणे, मस्त मौला होऊन जगणे, देशोदेशी फेरफटका मारत राहणे, इथे जाणे, तिथे बसणे ई. 

 तिला मग जे डोळ्यासमोर उभं ठाकलं ते असं होतं, कि साठी कडे आईची वाटचाल सुरु आहे तरी ती एकटी सगळं करते, राहते, जगते, हसते. हा, अधूनमधून हे ते नखशिखांत दुखतं, पण ठीक आहे, गाडी पुढे जाते आहे. एक होऊ घातलेला डॉक्टर ह्याच्या शिवाय अजून कोण जाणू शकणार शारीरिक मानसिक स्वास्थ्याचं महत्व? मग हि श्रीमंती नाहीतर काय? लहानपणापासून ज्या शरीराला गरमा गरम तव्यावरच्या भाकरीने, ठेच्याने, झुणक्याने जपलंय ते सर्व अजूनही ती स्वहस्ते तय्यार करून यथेच्छ ताव मारते आहे, ते पचतंय, मग हि श्रीमंती नाही तर काय? तिच्या खळखळून हसण्याने सगळी इमारत हादरते, लोकांना पण हसावेसे वाटते तर मग हि श्रीमंती नाही तर काय? तिच्या आईने उंची कॉटन च्या साड्या नेसल्या, तिला पण तीच आवड आहे. ती वाटेल तेव्हा, वाटेल त्या रंगाची / रंगांच्या साड्या विकत घेते आणि मिरवते, मग हि श्रीमंती नाही तर काय? आईची श्रीमंतीची व्याख्या, जगण्याची पद्धत वेगळी आहे मुलापेक्षा, आणि असणारच नाही का? कारण तिच्या वेळी हॉटेल माहित देखील नव्हते, घरचं खाणं काय ते ठाऊक होतं किंवा मोठं झाल्यावर शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणींच्या घरच्या पदार्थांचा पडलेला फडशा एवढंच काय ते. ती तिच्या पद्धतीने ऐटीत जगते आहे. 

त्याच्या सोबत गप्पांचा ओघ बदलणे अनिवार्य आहे आणि ती ते करणारच. त्याच्या संगतातीत असतांना, त्याच्या परिभाषेप्रमाणे श्रीमंती थाटात जगणार. आव्हानात्मक आहे पण करून बघता येईल.   

२२९१ : दृश्य वेडेपणा

 मी संगीत आणि "दिवाळी पहाट" किंवा "इंडियन आयडॉल" सारख्या स्पर्धात्मक संगीत कार्यक्रमांची वेडी चाहती आहे. मी नुसती बसून बघत नाही, तर माझं सगळं लक्ष गायनातील बारकावे, वाद्यवृंदाची रचना (orchestration) आणि एकंदरीत माहौल टिपण्यावर असतं. हा अनुभव माझ्यासाठी खरंच एक प्रेरणास्रोत ठरतो. म्हणूनच, आयडॉलचा नवीन सिझन सुरू झाला की मी सोफ्यावर खिळून राहते; माझ्या डोळ्यांसाठी, कानांसाठी आणि माझ्यासाठी ती एक उत्सवाची मेजवानीच असते!

गायक जेव्हा त्या मूळ कलाकृतीच्या, म्हणजेच गाण्याच्या, मूळ वाद्यवृंद रचनेत (originality of orchestration) कोणताही बदल न करता, त्यात आपला स्वतःचा खास स्पर्श, भावना आणि सुगंधाची भर घालतात आणि ते सादरीकरण पूर्णपणे स्वतःचे बनवतात, ही गोष्ट मला सर्वाधिक भावते. माझ्यादृष्टीने संशोधन लेखनाचे स्वरूप अगदी याच्यासारखेच आहे.

तुम्हाला तुमच्या संशोधन क्षेत्राचे मूळ स्वरूप आणि सध्याचे ज्ञान कायम ठेवायचे असते. पण त्यात तुमची स्वतःची वेगळी 'झिंग' (distinct madness), ज्ञानाची भर आणि अद्वितीय योगदान (unique contribution) घालायचे असते. तरच ती कलाकृती एका नवीन रूपात यशस्वी ठरते. अंतिम वाचकांना एक उत्कृष्ट 'मास्टरपीस' हातात मिळतो. हा नवीन मापदंड पुढील पिढीतील संशोधकांना संशोधन निबंधाची खरी व्याख्या शिकवतो आणि मग ते हा वारसा अधिक पुढे घेऊन जातात.

त्यामुळे, लेखन आणि कहाणी सांगण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेचा मनमुराद आनंद घ्या. तुम्ही "मी AI वापरला तर 'चोरी' (Plagiarism) होईल का?" असल्या प्रश्नांमध्ये अजिबात अडकू नका. AI साधने तुमचे मित्र आहेत. लेखनाच्या मुख्य भागाव्यतिरिक्त (core writing) आणि ज्ञानाच्या अद्वितीय संश्लेषणाव्यतिरिक्त (unique synthesis) ते संशोधनाच्या सर्व टप्प्यांमध्ये तुम्हाला मदत आणि आधार देतात.

हा अद्वितीय दृष्टिकोन हेच तुमचं 'बाळ' / कलाकृती आहे. तुम्हाला त्याला जोपासायचे आहे, आपला स्वतःचा, शक्तिशाली आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंध (powerful and unique aroma) त्यात मिसळायचा आहे.

आनंदाने संशोधन करा, माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो!

2290: Madness

I am a fervent admirer of music and, in turn, musical shows like "Diwali Pahat" and "Indian Idol." I don't just watch; I concentrate on the singing variations, the orchestrations, and the entire atmosphere (mahol). This experience is genuinely motivating for me. Hence, I am glued to my sofa once a new season of Idol begins, turning it into a feast for my eyes, ears, and soul.

What appeals to me most is when singers maintain the originality of the song's orchestration, that piece of art, but then add their own unique touch, feel, and fragrance, making the performance entirely their own, rewiring, recrafting and redrafting experience indeed.

According to me, that is exactly what research writing is all about.

It requires you to maintain the originality of the domain and its existing knowledge, but then you must add your own distinct 'madness,' augment the knowledge pool, and pour in a unique contribution. Only then does it become a winning piece of art in a new avatar. The final readers will hold a master-piece in their hands.

This new standard teaches the next generation of researchers the true definition of a research paper, allowing them to carry the legacy forward.

So, enjoy the process of writing and storytelling in its entirety. Don't get stuck worrying about common queries like, "If I use AI tools, what about plagiarism?"

AI tools are your partners; they provide help and support in all phases of research except for the most critical part: the core writing and the unique synthesis of knowledge.

That unique insight is your baby. You need to nurture it, adding your own powerful and unique aroma that will last long after the paper is read.

I hope this addresses the common question asked by many participants.

Happy researching, dears!

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...