काल मी फिजिओ थेरपी घेण्यास गेले होते. मी थोडीशी
वेळेआधी पोचले त्यामुळे मी बसले होते. अजुन एक पेशंट आल्या माझ्या नंतर,
त्यांनीही एक खुर्ची घेतली बसायला. त्यामुळे आता फक्त एकच खुर्ची उरली होती
समोरच्या खोली मधे. आत असतात अजून खुर्च्या लागल्यातर. त्यानंतर एक तरुण
मुलगा असेल तिशीतला आला आपल्या आईला घेऊन. आईला थोडासा चालायला त्रास होत
होता. त्यामुळे त्या थोड्या मागे राहिल्या. हा त्यांचा मुलगा पहिले आत आला.
आणि जसं कि कधीच खुर्ची पहिली नाही असा
फदकींनी बसला, देवा, म्हणजे
आम्ही बघतच राहिलो. आणि त्यानंतर त्या काकू हळू हळू धरून आत आल्या आणि
बघतात तर काय बसायला जागाच नाही. मग मी उठून त्यांना माझी खुर्ची दिली.
कारण ऐवी तैंवी मला आत जायचंच होत आणि तेवढ्यातच कम्पाउंडर ने आतून आणलीच
खुर्ची म्हणावं, पण हे काय अजीब वागणं. जगावेगळं. आधी आपल्या आईला बसायला
द्यायचं कि आपण बसायचं. आणि हद्द म्हणजे आई वाट पहाते आहे, मी उठली आहे तरी
देखील हा शहाणा बसलाय. सॉरी पण हे काही पटण्या
सारखं नव्हतंच. जाऊ दे.
शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१
एक भलताच अनुभव...
"खाके पियो या पीके खावो..."
"खाके पियो या पीके खावो..."
ह्या वाक्याचा मी आज अनुभव घेतला. हे वाक्य
एका प्रसिद्ध जाहिरातील आहे, ज्यात नुडल्स चा नवीन अवतार दाखवला आहे. हा
अवतार म्हणे जास्त पौष्टीक आहे, कारण ह्यात नुडल्स आणि सूप दोन्ही आहेत आणि
दोन्हीची एकत्र मज्जा वेगळीच. तर त्याच आज असं झालं कि मी काल रात्री च्या
जेवणाला रस्सम केलं होत आणि ते उत्कृष्ट झालं होत. मी कधी नव्हे ते अनेक
वर्षांनी दोनदा भात खाल्ला. अहाहा, मज्जा आली. तर थोडसं रस्सम उरलं होत. आज
मी शेवयाचा तिखट भाज्या घालून उपमा केला होता न्याहारी / ब्रेकफास्ट करता.
समोर कालचं अप्रतिम रस्सम आणि आजचा उपमा मस्त एकत्र खाल्ला. जगा वेगळी चव
आणि भन्नाट अनुभव. त्या उपम्याला चार-चांद लागले लिटरली. पोटभर नाश्ता
झाला, रस्सम संपलं आणि वेगळी चव चाखायला मिळाली ती औरच. खरंच "खाके पियो या
पीके खावो..." अस्संच झाले मला, अर्थात घरच्या पदार्था च्या भलत्या
कॉम्बिनेशन मुळे.
"गुंडू-मुंडू-शुंडू" - The most unique nick name
"गुंडू-मुंडू-शुंडू"
ह्याचा अर्थ काय? मला अजिबात नाही माहिती. त्याच्या
मागची कथा मात्र मी सांगणार आहे आज सगळ्यांना. तर त्याच असं झालं कि
आमच्या सगळ्या सरकल मधे सगळ्यात पहिला जो मुलगा झाला तो आकाश. त्यामुळे
अगदी त्याच्या येण्या आधी पासूनच आम्ही सगळे वेगळ्याच दुनियेत होतो. त्याचा
जन्म झाल्या झाल्या मी त्याला बघितलं, घेतलं, खेळवलं ई. त्या नंतर अनेक
वर्ष बहुतेक प्रत्येक दिवसच त्याच्या बरोबर घालवला. त्यामुळे खूपच जिव्हाळा
निर्माण झाला. त्या माझ्या आकाशला मी कधी "गुंडू-मुंडू-शुंडू" म्हणायला
लागले मलाच ठाऊक नाही. आता तोच आकाश १९ वर्षाचा झाला आहे. त्याची शाळा
संपल्यावर आणि कॉलेज ला जायच्या आधी शाळेनी त्यांना एक छोटेखानी
ऑटोबायोग्राफी लिहायला सांगितली आणि त्यात काही मुद्दे असायला हवे होते.
त्यातला एक मुद्दा होता "पेट नेम". आणि ह्याने लिहिलं "गुंडू-मुंडू-शुंडू"
बद्दल. अहाहा, सार्थक झाल्यासारखं वाटलं मला. गेल्या काही वर्षा पासून मी
"हमीद, सुवर्ण, वर्ण, द्व्ये, पुस्सी-कॅट, हौस-खास..." ई. अनेक नाव वापरते
न-कळत माझ्या मुलांना बोलावतांना. का?, अजिबात माहित नाही. पण एकंदरीत रोज
वेगळी मज्जा येते. "हौस खास" हे माझ्या एका मैत्रीच्या मित्राचं स्टार्टअप
आहे, प्रसिद्ध पदार्थांसाठी, हमीद आणि मुक्ता हि नाव मी वर्तमान पत्रात
वाचली, दाभोळकर बहीण भाऊ, पुस्सी-कॅट कवितेत आणि बाकी अपभ्रंश.
"माझा उत्साह-माझे अनोखे मित्र"
"माझा उत्साह-माझे अनोखे मित्र"
मुख्य रस्ता सोडला आणि आमच्या ऑफिसला
वळलो कि संपूर्ण रस्त्याच्या एका बाजूला अप्रतिम, अनेकविध रंगांनी नटलेले
असंख्य वेल आहेत, झाडं आहेत. दररोज न चुकता ते त्यांच्या अप्रतिम
सौंदर्यांनी आणि मनमोहक रूपांनी वेलकम करतातच, सर्वांना. कुठलीही अपेक्षा न
ठेवता, फारच वेगळा अनुभव असतो तो, दर दिवशी सकाळी ऑफिस सुरु होण्या आधी
आणि घरी जायच्या आधी मनमोहक दर्शन घेऊन.. आता त्यात एक भली मोठी भर पडली
आहे, आणि ती सुगंधी अशी आहे. "चेरी ऑन केक" म्हणजे सध्या हे फुल, वेली आणि
त्यात आता नवीन सोनेरी रंगांची अगदी बारीक फुल बघायला मिळतात, कारण?
सगळ्याच आंबांच्या झाडांना मोहोर आला आहे, भरभरून. अहाहा. जबरदस्त देखावा
जो दुर्मिळ, अनोखा सुगंधी असा आहे. ज्या शेतकऱ्याने किंवा मालकाने त्याच्या
आमराईला ह्या अश्या रंगीबेरंगी बोगनवेली लावल्या आहेत, अनेक वर्षा पूर्वी
ते खरोखरच धन्य आहेत. लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा, नारंगी, जांभळट ई. आणि
त्याच्या अनेकविध छटा, त्यात वेलींच्या पानांचा हिरवा रंग, अहाहा,
निसर्गाने आकारलेले अद्भुत चित्रच जणू. माझे तर हे सगळे वेल रंगबिरंगी
दोस्तच आहेत.
"आली कुठुनशी कानी टाळ मृदूंगाची धून... "
"आली कुठुनशी कानी टाळ मृदूंगाची धून... "
हेच भजन सतत माझ्या मनात,
ओठात रुंजी घालताय सध्या, का? अजिबात माहित नाही. मी कुठेही एवढ्यात ऐकलं
पण नाही, लहानपणी ऐकलं, गायलं होत तेवढंच. मग काय, विचारलं माझ्या यू ट्यूब
ला आणि "पडत्या फळाची आज्ञा" त्याने ताबडतोब मूळ गायकाच्या आवाजात ते
ऐकवलं. पण त्यात फक्त भजन होत. मला फारच आवडलं पण मी काहीतरी वेगळं शोधात
होते कदाचित. शोध सुरु राहिला जसा वेळ मिळेल तसा आणि मी एक विडिओ बघितला
ज्यात श्री. महेश काळे, सुप्रसिद्ध गायक आणि त्यांचे साथीदार होते. महेश
काळेंच एक / दोन शेवटच्या ओळी संपल्या त्या व्हिडिओत, त्यानंतर इंग्लिश मधे
अँकर / संवादिका हिने कीर्तनाचं महत्व थोडक्यात सांगितलं आणि महेश काळेंनी
एक विनंती केली कि सर्व प्रेक्षकांनी आता सामूहिक कशी दाद आणि साथ द्यायची
आहे ई. प्रात्यक्षिक दाखवलं आणि मग अक्षरश: मला पूर्ण वेळ तोंडात बोटंच
घालावी लागली त्याच कारण म्हणजे एक छोटा उस्ताद अवतरला स्टेज वर आणि खणखणीत
स्पष्ट उच्चारात भन्नाट गायला. ज्या पद्धतीने महेश काळे आणि साथीदारांनी
त्याला मदत केली आहे, प्रोत्साहन दिले आहे हे वाखाणण्या पल्याड आहे. ध्यन
आहेत दोघेही. कितीही वेळा ऐकलं तरीही पुन्हा ऐकायची इच्छा होतेच आहे. मी
निःशब्द झाले. "आली कुठुनशी कानी (हि नवीन / अप्रतिम) टाळ मृदूंगाची
धून... " असं झालंय थोडक्यात माझं. https://youtu.be/qwnP6UgFqCs
माझे नखरे...
माझे नखरे...
माझ्या लहानपणी बहुतांशी तुरडाळच वापरली जायची आमटी
करण्यासाठी. बाकी डाळी अधे-मधे कधी तरी, गरज किंवा काही कारण असल्यास च.
आणि नेमकी त्यावेळची तूरडाळ बहुतांशी सालासकट येत असे. धुतांना काही सालं
निघायची, पण बरीच उरत असत आमटीत. झालं, मग माझं सुरु व्हायचं, मला नाही
आवडत हा "कचरा" आमटीत, का घातलाय ई. देवा. माझी नवीन पिढी जेव्हा लव्ह आणि
हेट अशी टोकांची भाषा बोलतात, शब्द वापरतात तेव्हा मी रागवायचे त्यांना पण
आता माझं मलाच उमगलं "कचरा" म्हणणं हे हि टोकाचच होत नाही का? अर्थात त्या
वेळी मी लहान होते, काही समजत नव्हतं खास आणि त्यात शेंडे फळ मग काय
विचारता, मोठा लाडोबा पण. आता मी स्वतः गेले अनेक वर्ष सगळं करायला
लागल्यापासून आणि आज सकाळी कुकर लावतांना डाळ धुतांना प्रकर्षाने जाणवलं
आणि आठवलं मला हे सगळं. अर्थात आताच्या डाळी स्वच्छ असतात पण थोडेसे
कधीतरी येतात सालं. खुद्कन हसू आलं, आणि माझे अनेक नखरे एका मोगोमाग एक
आठवत गेले. कोथिंबीर, नारळ / खोबरं, मोहोरी, दाणे ई. सगळंच होत माझ्या
"कचरा" ह्या परिभाषेत / व्याख्येत. फारच छळलय मी आई बाबांना त्या वेळी.
छे छे फार वाईट. माझा वेद हि अस्साच करतो सध्या पण मला खात्री आहे कि मी जस
सगळं खायला लागले, तसेच तो हि करेल नक्की भविष्यात.
सयाजीराजे...
सयाजीराजे...
१८७५ साली बरोडा चे महाराज होते हे सयाजीराजे आणि
त्यांच्या काळी फारच वैविध्य कार्य, उपक्रम आणि सामाजिक गोष्टी केल्या आहेत
त्यांनी. आज अचानक त्यांची आठवण का आली? त्याचं कारण आहे. सांगते, ऐका. मी
गेली अनेक वर्ष बसने जाण-येणं करते आहे ऑफिस ला. आणि त्यात सगळ्यात जास्त
प्रवास मी जो केला आहे तो एका भल्या मोठ्या बस मधूनच. अगदी बाबा आदमच्या
जमान्यातली बस होती ती, लई भारी, महाराजा खुर्च्या / सोफे जसे अशी आसन
व्यवस्था होती, लेग-स्पेस भन्नाट / भलीमोठी, सामान ठेवायचंच असेल तर जागा,
चालकाची केबिन एवढी मोठी कि गरज पडल्यास त्यात चालका व्यतिरिक्त ७-८ माणसं
आरामात मावयाची. जुनी झाली होती पण आरामदायी होती आणि रस्त्यावर पकड छान
असायची. भलीमोठी असल्यामुळे वळवायला, पार्क करायला, चालवायला कठीण होत असेल
पण आमचे ड्राईव्हर काका त्याहून भन्नाट होते त्यामुळे त्यांचा तर "दाये
हाथ का खेल..." होता तिला सांभाळणं म्हणजे. ती जशी होती तसेच तिचे नाव हि
होते, भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेले "सयाजीराजे...". अहाहा. आता सगळ्या
फारच छोट्या बसेस आहेत, आणि मला प्रकर्षाने जबरदस्त फरक जाणवतो रोजच
जाता-येता. रोजच आणि फारच आठवण झाली मला / होते मला तिची म्हणून हा
छोटेखानी पंक्तिप्रपंच. अर्थात हे नाव आमच्या बस ला का दिल होत हे माहित
नाही, पण कदाचित आता समजतंय "ती राजा होती आणि आता आहेत त्या प्रजा"
(माझ्या मते).
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...