एवढ्यातच एका अतिशय चुणचुणीत मुलीची तोंडओळख झाली पण ती फारच भावली मनाला. प्रचंड वेगळं छोटसं व्यक्तिमत्व होत ते, आणि फक्त माझ्याशीच नाही पण माझ्या लेकीशी पण बिनधास्त बोलली / संवाद साधला. काही मिनिटात सगळं सांगून झालं, addition, वर्ड रायटिंग, नंबर्स til १०० ई. भरभरून बोलत होती. तिच्या हातात तिचा एक फोन पण होता, एक पिगलेट पण होता, एकंदरीत काय तर भन्नाट व्यक्तिमत्व होत. आवडली ती सर्वांना फारच आणि अर्थात आम्ही तिला आवडलो म्हणून तर ना, दोन्ही कडून असत, नाही का?
"आईचा पदर" नावाची एक संकल्पना होती किंवा असेल अजून देखील पण थोडीशी दुर्मिळ / दुर्लभ अशी. त्या बहुउपयोगी पदराची महती आपल्याला माहित आहेच सगळ्यांना, अगदी आईच्या मागे लपण्यापासून, ते तोंड पुसण्यापासून, ते नाक पुसण्यापासून, पांघरूण म्हणून, आधार म्हणून ई. कोणे एके काळी साडी आणि तिचा पदर होता म्हणून मुलं त्या पदरामागे लपू शकत होती, लाजू शकत होती आणि ते त्यावेळी कदाचित ठिक होत. पण हि जी आम्हाला आवडलेली मुलगी होती ना तिची आई आजच्या जमान्यातली अत्याधुनिक, त्यामुळे तिने / आईने मस्त भिनधास्त जीन्स-टी शर्ट घातला होता. मग कशाच्या मागे लपणार मुलगी? आईने आणि ह्या संपूर्ण पिढीने कात टाकली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे साहजिकच नवीन पिढी पण त्याच्या पुढची, अजून बिनधास्त.
मी, आमच्या पिढीतले अनेक जण म्हणतात ना "ह्या वयात आपण किती बावळट होतो नाही?" ई. अगदी खरं आहे ते. हि छुटुकली जास्तीत जास्त ४ वर्षाची असेल, देवा पण वर म्हंटल्याप्रमाणे चुणचुणीत आणि आगाऊ नाही हो, अगदी व्यवस्थित.
तात्पर्य असं कि हि सगळी त्या "आईचा पदराची" कमाल. होता तेव्हा त्याने गुण दाखवले, नाही तर वेगळे गुण बघायला / अनुभवायला मिळाले.
प्रत्येक छोटी भेट किती छान काहीतरी नवीन शिकवून जाते नाही आणि आठवणींच्या हिंदोळ्यात फिरून येत येत ते वेगळंच. ह्या सगळ्यामुळे मला अजून एक अनुकथा मांडता आली "हे हि नसे थोडके". अहाहा.
#active-girl #incremental-learning #mom's-saree #saree #jeans-tshirt #new-gen-mom #new-gen-kids #frank-kids #bold #shy-kids #talkative #open