रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

प्रवास

मला अजूनही तो दिवस लख्ख / स्वच्छ आठवतो आहे जेव्हा मी आणि ह्यांनी मिळून घरी अप्रतिम अशी राखी तय्यार केली होती आणि ती माझ्या लेकीने फक्त मम म्हणत गोऱ्यापान, लठ्ठ मनगटावर बांधली होती. काय दिसत होतं ते मनगट तेव्हा. आई शपथ. त्या नंतर म्हणजे २००४ पासून सुरु झाली मग एक खूप गोड जबाबदारी जी मी तब्बल १८-१९ वर्ष निभावली, ती म्हणजे माझ्या वार्णिकाच्या भावंडांना राखी पाठवणे पत्रासहित. आधी आई वडिलांच्या पत्यावर आणि नावावर ती राखी पाठवली जायची. मग त्यात एक सुक्ष्म बदल घडला तो म्हणजे ते पत्र वाचन. अहाहा . माझे कान अगदी तृप्त होतात आणि हसून हसून पुरेवाट जेव्हा हि नवीन पिढी माझं लिहिलेलं मराठीतलं पत्र वाचते आवर्जून प्रत्येक वर्षी न चुकता. आणि आता ह्या वर्षी अजून काही महत्वाचे, हवे हवेसे आणि आशिर्वादात्मक असे बदल आहेत ते म्हणजे माझी लेक आता प्रत्येक भावाला ऑनलाईन स्वतः राखी पाठवणार आहे, कारण सर्वात मोठा इंटर्नशीप करतो आहे, ऑफिस ला जातो आहे, दुसरा वसतिगृहात आहे आणि तिसरा कधीही वसतिगृहात पोचेल. त्यामुळे सगळेच १९-२० च्या उंबरठ्यावर आहेत, फक्त उंचीने नाही तर वैचारिक, बौद्धिक आणि इतर अनेक पातळीवर मोठे झाले आहेत, सर्वार्थाने उंची गाठण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे आता फक्त माझं एकच काम उरलंय ते म्हणजे हे असं गोंडस छोटसं पत्र लिहिण्याचं. ते माझ्या हातून सतत घडो, हि आमची नवीन पिढी सर्व पातळीवर सुधृढ, समाधानी आणि संपन्न राहो हि ईश चरणी प्रार्थना. आणि दरवर्षी अशीच राखी पाठवा सर्वांना, एकत्र या  आणि हा सण जमेल तेव्हा साजरा करा हि विनंती.  सामूहिक पत्र वाचनाची वाट पाहते आहे मी, ११ ऑगस्ट ला, खूप छान सोहोळाच असतो तो माझ्या दृष्टीने. 

फेथ

माझं घट्ट प्रेम आहे होमिओप्याथी वर. त्यामुळे देखील कदाचित मला इतक्या वर्षात एक लक्षात आलं आहे कि प्रत्येक  होमिओप्याथी डॉक्टरचा एका औषधावर प्रचंड विश्वास असतो, फेथ म्हणावं हवं तर. कि हे एक औषध दिलं किंवा त्या पेशंट नी घेतलं कि तो बरा होणारच. त्याच्या शिवाय देखील अजून बाकी लागणारी औषधं दिली जातात. पण तो एकावर विश्वास फार महत्वाचा. अगदी तस्सेच एक पत्रिका बघणारे दिग्गज काका होते ते देखील प्रत्येकाला त्याच्या पत्रिके प्रमाणे उपचार सांगायचेच पण एक मंत्र प्रत्येकाला सांगायचेच मनापासून म्हणायला. अगदी त्याच प्रमाणे आता मला एक नवीन फेथ चं उदाहरण समोर उभं ठाकलं आहे. माझ्या घरच्या मावशींना समजावून सांगता सांगता मला घाम फुटतो आहे अक्षरशः. त्यांचा फेथ ह्या जागावेगळाच आहे. गोडलिंब सगळ्यात भरभरून घातला प्रत्येक पदार्थात म्हणजे तो चविष्ट होतोच हा दृढविश्वास आहे त्यांचा, बाकी काहीही कमी जास्त असणं शक्यच नाही मग. देवा. अगदी कोशिंबीर देखील नाही सोडत त्या. काय बोलावं सुचतच नाही. माझ्या घरी तरी कोशिंबिरीत गोडलिंब घालण्याची प्रथा नाहीच. त्यामुळे देखील असेल मला फार म्हणजे फार वेगळं वाटतंय. असो. जैसी जिसकी सोच.

एक गोंडस शहाणा

एक जगमान्य प्रथा आहे एकतर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याशी डायरेक्ट बांधलेला असतो / जुळला असतो किंवा कोणत्याही वस्तू किंवा बंधा शिवाय देखील. संगणक क्षेत्रात त्याला वायर्ड किंवा वायरलेस अश्या दोन सौज्ञा / संज्ञा दिल्या आहेत.  तसे तर घरी आणि दारी सध्या सर्वत्रच वायरलेस चा जमाना आहे, पण नेहेमीच ती संपूर्ण यंत्रणा चालतेच असे नाही ना, त्याला देखील असंख्य अनंत अडचणी उद्भवतातचं बऱ्याचदा. त्यामुळे प्रत्येकाला एक तर विविध वायरलेस कनेक्शन्स तय्यार ठेवावे लागतात किंवा मग वायर्ड शिवाय पर्याय नसतो. माझं देखील काहीसं असंच होत होतं म्हणून मग मी तिसरा तरणोपाय शोधून काढला तो म्हणजे ह्या दोन्हीचं संमिश्रण, वायर्ड डेस्कटॉप ला जोडायचं आणि त्याचा हॉटस्पॉट लॅपटॉप वर घ्यायचा. सोप्प आहे, नाही का? जोवर माझे हात सातत्याने सुरु असतात, व्यग्र असतात तोवर माझे दोन्ही संगणक भन्नाट काम करता, न कंटाळता, न थांबता. पण जर थोडासा जरी अवधी गेला, मी थोडीशी थांबले कि हा माझा शहाणा डेस्कटॉप म्हणतो कसा खूप वेळ तुमच्याकडून काहीच ऐकलं नाही, आणि लॅपटॉपशी जुळलेली नाळ तोडतो, डायरेक्ट. अजबच आहे हा, असं एकदा मला वाटलं पण मग समजलं / उमगलं कि डेस्कटॉप आणि त्याचं इंटरनेट कनेक्शन हे खरंच शहाणंच आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, वीज बचत, शिवाय सतत जागं राहावं लागत नाही त्याला जेव्हा माझा लॅपटॉप झोपी गेलेला असतो, स्लीप मोड मधे जातो. फारच मनापासून आवडली मला हि त्याची कृती. किती काळजी माझ्या डेस्कटॉपला, किती प्रामाणिक असावं ना, खूप शिकण्यासारखं आहे. अर्थात हे त्याला कोणी खूप मस्त व्यक्तीने / टीम ने शिकवलं आहे, कोड केलं आहे, त्या व्यक्तीला पण दंडवत, उत्कृष्ट विचार सरणी आहे. मनापासून भावलं मला.

शिक्षक दिवस

"शिकवण देणारा", "माणूस घडवणारा" गुरुवर्य म्हणजे शिक्षक. अशी आख्यायिका आहे कि श्री. दत्तात्रय स्वामी महाराज जे स्वतः जगमान्य त्रिमूर्ती आहेत त्यांनी देखील २४ गुरु केले होते. माझे आई-वडिल नेहेमी सांगायचे कि घर म्हणजे पहिली शाळा, आई म्हणजे पहिली शिक्षक. किती तथ्य आहे ना ह्यात?. आणि आई-वडिल हे सदोदित शिक्षकचं राहतात, कारण त्यांच्याकडून शिकावं तेवढं कमीच आहे. त्यांच्याकडे अक्षरशः खजाना असतो सगळ्याच पद्धतीच्या ज्ञानाचा, शालेय, धार्मिक, अध्यात्मिक, व्यावहारीक, आणि सर्वदृष्टीचे. त्याच बरोबर एक मराठी म्हण पण कानावर पडली आहे सदोदित लहानपणापासून, "निंदकाचे घर असावे शेजारी". भरकटू देतंच नाही आपल्याला मार्गावरून. अगदी तस्सेच माझे बाबा नेहेमी म्हणायचे कि राजकारणात विरोधी पक्ष जास्त महत्वाचा तो सत्ताधारी पक्षापेक्षा महत्वाचा कारण तो सातत्याने चांगलं काम करण्यास उदुक्त करतो, त्यांची पद्धत चुकीची असली तरी देखील कामी येतेच. अगदी तस्सेच आपल्या सामान्य माणसंच आहे. आपण नेहेमीच अनाहूत सल्ले देणाऱ्यांच्या सानिध्यात असतोच. "उचलली जीभ लावली टाळ्याला" असे सातत्याने करणारे महानुभव असंख्य असतातच, पण ते फार मोठ्या भुमिका वठवतात. आपल्याला सतत चांगला मार्ग दर्शवतात, सरळ ठेवतात, उगाच उडू देत नाहीत अजिबातच. अर्थात त्यांची प्रत्येकाची सांगण्याची पद्धत चुकीची असू शकते, नसत्या वेळेला सल्ले तुमच्या कडे येऊ शकतात किंबहुना येतातच पण हवे तेवढे घ्या, त्यावर काम करा, नको ते ताबडतोब सोडून द्या, उगाच बहुमूल्य वेळ त्या सल्ल्यांबद्दल विचार करण्यात घालवू नका, दोश देत बसू नका मुळीच आणि पुढे मार्गक्रमणा करा हसत-खेळत, शांततेत, नेहेमीच. काही जण विचारल्यावरच आणि उपयुक्त सल्ला देतात, काही अप्रत्यक्ष जाणीव करून देतात, काही डिवचतात तर काही जखमा देखील करण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या सर्वांना मनापासून धन्यवाद द्या कारण हे असे देखील तुमचे शिक्षकच आहेत ना?. "शिकवणारा शिक्षक" नाही का? त्यांची पद्धत त्यांच्या दृष्टीने योग्य आहे, ती आपल्याला अयोग्य वाटू देऊ नकाच, कधीच. आजपासून प्रत्येकाला मनापासून, स्मितहास्यासहीत आभार, कारण मंदावून, थंडावून आणि एकाजागी स्थिर राहून कदापी चालणार नाहीच. "जो थांबला तो संपला", न कळत स्थैर्य आणि व्यर्थ अभिमान येऊ देऊ नका. सल्लेदारांना गुरु मानून तर बघा, कशी नवनवीन दिशा सापडेल / गवसेल, "न भूतो न भावष्यति" अशी. आज शिक्षक दिवसाच्या संध्या छाये निमित्य हे माझे चार शब्द "स्वानुभवातून आत्मप्रचिती" असे. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...