सोमवार, ३ मार्च, २०२५

2142: A Beautiful Lesson from Life and Nature

I once read a truly inspiring and touching story. It was a real-life incident set in a girls' school where a unique competition was organized. The specialty of this competition was that every student had to participate—opting out was not an option. It wasn’t an open contest but a mandatory one for all. Since the rules were well-defined, the students eagerly prepared for it.

On the day of the competition, the judges closely examined the hands of all participants. The contest was called "The Most Beautiful Hands." Many girls had taken great care of their hands using various methods. However, one girl’s hands stood out—not because they were smooth and soft, but because they were rough and bore signs of hard work.

When asked about it, she gave an honest reply that made the entire class laugh. Unlike the others, she couldn’t afford expensive creams, lotions, or beauty treatments. Due to her family’s financial condition, she had to manage household chores along with school and studies. But she did it all happily, as she understood and valued the struggles of her mother.

And, of course, she was awarded the title of "The Most Beautiful Hands."

After taking voluntary retirement, I unknowingly got the chance to explore Pune in a way I had never imagined. These days, I visit different educational institutions once or twice a week to teach and interact with students. Though I always knew Pune was vast, it was only on paper. Now, I truly experience its grandeur.

As I travel across the city, I am greeted by stunningly vibrant flowers blooming everywhere, as if they are welcoming me with a warm smile. Among them, Bougainvillea lining the roads never fails to amaze me. Despite the scorching heat, dust, pollution, and constant traffic—without anyone particularly caring for them or providing water and nutrients—these flowers bloom beautifully, spreading joy and energy to all who see them. How do they manage to thrive against all odds? It’s truly a wonder!

Observing them, I can’t help but bow in admiration to these flowers, trees, and nature itself. There’s so much to learn from them. They don’t wait for ideal conditions, nor do they complain; they simply keep doing their work with dedication. That’s how life should be. Make the best of what you have.

Take trees, for instance—dust and pollution may surround them, but that doesn’t stop them from blooming. Likewise, hands are meant for work. Their true beauty lies in how useful they are—whether it’s writing neatly in a classroom or helping with household chores. Moving forward in life, contributing whenever possible, spreading positivity and inspiration, and leading by example—that’s what truly matters.

How wonderful is that?

I bow down immediately and naturally connect with the sight of Bougainvillea, mango blossoms, and raw mangoes. It happens so instinctively that I don’t even realize it.

A humble request—next time you're traveling in a car, especially in the back seat, on your way to work, put your mobile aside for a moment. Observe and soak in the beauty around you. Even the simplest things can bring immense peace and joy.

२१४१: "हात, मेहनत आणि निसर्ग: सौंदर्याची नवी व्याख्या"


मी एक उत्कृष्ट आणि फारच मनाला भावलेली अशी गोष्ट वाचली होती. त्या कथेत (प्रत्यक्ष घडलेली कथा) एक शाळा असते मुलींची आणि त्यात एक स्पर्धा आयोजित केली असते. त्या स्पर्धेचं वैशिट्य म्हणजे, थोडक्यात सांगायचं झालं तर, सगळ्यांनीच भाग घ्यायचा असतो, काही जणींनी नाही. सर्वांसाठी खुली स्पर्धा नाही तर सर्वांसाठी आयोजित अशी. स्पर्धेचे नियम, अटी माहिती असल्यामुळे सगळ्याच जणी जोमाने कामाला लागल्या. स्पर्धेचा दिवस आला आणि सगळ्या मुलींचे हात निरखून बघितले गेले, कारण ती "सुंदर हात" अशी स्पर्धा होती. कित्येक जणींनी असंख्य पद्धतीने हात जपले होते. त्यात एकीचे हात मात्र थोडेसे खरखरीत, प्रचंड प्रमाणात रोज कष्ट केलेले असे दिसले. जेव्हा तिला विचारले तेव्हा तिचे उत्तर ऐकून सगळा वर्ग जणू हसला. कारण तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिला बाकिच्यांसारखा हाताला आराम, महागडे क्रिम / लोशन / शेक ई. लावणे परवडणारे नव्हते. रोजचे काम शाळा, अभ्यास सांभाळून करणे अत्यावश्यक होते आणि ती  ते अत्यानंदाने करत होती कारण तिला तिच्या आईचे / माउलीचे कष्ट दिसत होते. अर्थातच तिलाच सर्वात सुंदर हात हा खिताब मिळाला. 


मी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर मला नकळत संपूर्ण पुणे दर्शन करण्याचा योग आला आणि येतोय. कारण मी सध्या आठवड्यातून एक किंवा दोन दिवस विविध शैक्षणिक संस्थानाला भेट देते, काही शिकवते ई. इतकं मोठ्ठं पुणे आहे हे फक्त कागदोपत्री मला ठाऊक होतं. ठिकठिकाणी अप्रतिम रंगांची फुलझाडं नजरेस पडतात, माझे हसतमुखाने जणूकाही स्वागतच करतात. रस्त्याच्या कडेला वैविध्य रंगानी नटलेले बोगनवेल बघितले कि आश्चर्यचकित व्हायला होतंच. इतकी गर्मी, रस्त्यावरची धूळ + प्रदूषण + सततचे वाहने, त्यात कोणीही काळजी घेणारे, खत पाणी घालणारे तर सोडाच संपूर्णपणे दुर्लक्षित असे. असे असून देखील सर्व पाहणाऱ्यांना आवर्जून एक ऊर्जा देऊन जातात, सुंदर दृश्य दाखवतात, काय अप्रतिम खुलून फुलतात, लगडलेले असतात, बहरलेले असतात. हे कसं काय जमतं त्यांना कोणास ठाऊक? 


हे बघितलं कि बोगनवेल, बाकी फ़ुलं आणि फळं झाडं ह्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला होतंच आपोआप. कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखे आहे. कोणची वाट न बघता, कोणाबद्दल तक्रार न करता हे त्यांचं कार्य नेटाने करत राहतात. असं पाहिजे. पुढ्यात आहे ते उत्तमच. झाडांच्या बाबतीत बोलायचं झालं तर धूळ असली तरी बेहत्तर, आम्ही जमेल तेव्हा, जमेल तस्से फुलून खुलणारच. आईला मदत करतांना हातांचा उपयोग होणारच. हात हे कामासाठी बहाल केले गेलेत, त्यांचं सौंदर्य हे कामासाठी उपयोगी पडण्यात आहे, मग ते वर्गात सुवाच्य अक्षरात लिहिणे असो, किंवा घरची कामे करण्यात असो. पुढे जाणे, ह्या प्रवासात नकळत कोणासाठी काही जमले तर करणे, ऊर्जा आणि स्फूर्ती देणे,  उदाहरण म्हणून कार्य करून दाखवणे ई. महत्वाचे. क्या बात है? 


माझे दोन हस्तक आणि एक मस्तक आपोआप कधी जुळले जातात बोगनवेलींना, आंब्याच्या मोहोराला / कैऱ्यांना बघून मलाच माहिती होत नाही. एक मनःपूर्वक विनंती. जर तुम्ही गाडीत मागे बसून प्रवास करत असाल कामाच्या जागी जाते वेळी तेव्हा मोबाईल नामक वस्तू जरा बाजूला सारा आणि नखशिखान्त सौंदर्य अनुभवा, साधं साधं असलं तरी खूप सुकून प्रदान करणारे आहे ते. 

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

२१३८: योग्य प्रयत्न, साधना आणि समर्पण


"लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही" असं काहीसं मी अगदी लहान पणापासून ऐकलं आहे, वाचलं आहे आणि अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख झालेला बघितला आहे. मी शाळेत असतांना सर्वत्र एक वाक्यता होती, म्हणजे घरी दारी, शाळेत, समाजात सगळेच मोठे सारखंच सांगायचे, कुठेही फार फरक नसायचाच. त्यामुळे हे अनेकदा माझ्या पर्यंत पोचले. ह्या म्हणीचा किंवा वाक्याचा अर्थ सोप्पा आहे, एका व्यक्तींमधे सर्वगुणसंपन्नता शोधणे व्यर्थ आहे, कारण ती सापडणे अवघड आहे. सौंदर्य, हुशारी, पैसा, आणि असे इतर अनेक पैलू एकत्र आढळत नाही सहसा. कुठेतरी कधीतरी किंचित किंवा भली मोठी तफावत नक्की जाणवते. असं काहीस आम्हाला समजावलं जायचं. आणि मग काही उदाहरणं देखील मांडली जायची. सरते शेवटी मग निसर्ग, देव, भाग्य, नशीब ई. मुद्दे पुढे ठेवले जायचे.  म्हणजे ह्या सगळ्यांमुळे किंवा काही कारणांमुळे खूप क्वचित सर्वगुणसंपन्न व्यक्ती उदयास येतो. तेव्हा कदाचित आमची म्हणजे सामान्य जणांची सर्वार्थाने तय्यारी केली जात होती, अपेक्षाभंग होऊ नये म्हणून, किंवा कुठलीही तुलना करण्याची सवय लागू नये म्हणून. असो. 


मी जशी जशी मोठी होत गेले, वाचन, मनन, चिंतन, माणसांची ओळख ई. वाढत गेले तेव्हा समजलं कि अनेक उदाहरणं अशी आहेत कि जेथे सर्वगुणसंपन्नता आहे. थोडासा अभ्यास केल्यावर लक्षात आलं आणि स्पष्ट झालं असं म्हणायला हरकत नाही कि हुशारीने काम केलं कि पैसा येणारंच, विश्वसुंदरी हि तिच्या जगावेगळ्या हुशारीने तो खिताब पटकावते आणि त्या सोबत कदाचित सात पिढ्यांना पुरेल एवढा पैसा देखील येतो सोबत. आणि हे फक्त एक उदाहरण झालं. प्रत्येकाला त्याच्या परीने कष्ट आहेतच. ते कोणालाच सुटले नाहीत. आणि आता माझ्या पुढ्यात एक खूप छान व्हिडिओ आला, त्या नंतर मी त्यांचे अनेक उपलब्ध असलेले व्हिडिओ बघितले आणि खरंच अंगावर काटा आला. दोन भाऊ आहेत, सख्खे वाटतात. पहिला व्हिडिओ बघितला तेव्हा लहान भाऊ तबल्यावर होता आणि मोठा पेटी वाजवत गात होता. मस्त सादरीकरण केलं दोघांनी मिळून, इतक्या लहान वयात खूपच जाण आहे ताला सुरांची. बाळकडू मिळालं आहे जणू काही त्यांना.  संगीतमय असं सगळं भारावलेलं वाटलं मला. दोघांमधले नाते पण वेगळ्याच स्थराचे आहे. मग बघितलं तर मोठा पण उत्कृष्ट तबला वादन करतो, सूचना देतो लहान्या भावाला. क्या बात है? आणि दोघे इतक्या सहजतेने सादरीकरण करतात कि ज्याचं नाव ते. यू ट्यूब वर आहेत त्यांचे व्हिडीओ आणि लोकांचा प्रतिसाद पण आहे, साधे आहेत विडिओ, म्हणजे काही अंशी कमाई पण होत असणार. हे सगळं आशिर्वादात्मक भासलं, जाणवलं आणि उमगलं कि "त्याचा वरदहस्त असल्याशिवाय साधं पान देखील हालत नाही". कमाल आहे दोघांची. अनेक गाणे सादर केलेत दोघांनी, वय लहान आहे, सातत्य आहे, बरेच दिवस, वर्ष तालीम घेत आहेत असं जाणवतं, तरी देखील फार साधे आहेत. हे सगळं संगीतामुळे, साधनेमुळे शक्य झालं असणार नक्कीच. 

दोघांचेही संगीत कौशल्य, समर्पण आणि साधना त्यांच्या लहान वयातच दिसून येते. त्यांच्या साधेपणातच त्यांच्या कलेची महानता आहे. अनेक श्रोत्यांना नक्कीच दोघांना बघून हुरूप येणार हे नक्की.   

या उदाहरणांवरून असे दिसते की योग्य प्रयत्न, साधना आणि समर्पण यांच्या माध्यमातून लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदू शकतात. म्हणूनच, आपल्या पारंपारिक समजुतींना आव्हान देत, नवीन दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे.

https://www.youtube.com/watch?v=Gz3ZzEOthJA (especially look from 0.20m)


२१३७: थ्री इन वन


मला मी नागपूरकर असण्याचा प्रचंड अभिमान आहे आणि त्याची कधीही न संपणारी अशी भली मोठी यादी आहे, कारणे आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे माझा स्वाभिमान दिनशा आईस क्रीम. तेव्हा, म्हणजे माझ्या लहानपणी आईस्क्रीमची चव फारच वेगळी, जगावेगळी होती. फेस कमी, आणि क्रीम जास्त, घनता जास्त होती. मज्जा यायची खायला. वीट मिळायची आणि त्यामुळे भरपूर ताव मारला जायचा, उभा आडवा. हळूहळू आईस्क्रीम वाढण्यात बदल होत गेले, बशीत भलीमोठी आणि लठ्ठ वीट ते काचेच्या वाटीत मिळालेला गोळा असा. पण खूप विविध प्रकार पण उदयास आले आईस्क्रीम चे. आणि रंगत वाढतच गेली. एक अत्यंत उत्कृष्ट असा प्रकार दिनशा ने त्यावेळी आणला होता तो म्हणजे "थ्री इन वन". तीन चवींचे आईस्क्रीम एकाच बशीत एका वेळी वाढले जायचे. ते तीन रंग देखील असले अप्रतिम होते ना कि ताव मारलाच जायचा आपोआप.

आज कळलं कि हा थ्री इन वन ची भन्नाट संकल्पना माझ्या पुढ्यात का मांडली गेली त्या वेळी. आज मला एका ठिकाणी वर्ग घ्यायला जायचे होते. सकाळची गडबड होती, मुलीचा डब्बा होता, नाश्ता करायचा होता आणि बरेच काही. त्यात माझी खास काळजी घेणारी आहार तज्ज्ञ, तिच्या विचारपूर्वक तय्यार केलेल्या सूची नुसार भाजी आणि आमटी दोन्ही पानात वाढलेच पाहिजे, तितक्या प्रमाणात पोटात गेलेच पाहिजे. वेळेचे बंधन, आणि आहाराचा विचार, म्हटलं काय करावं? माझ्या शेजारच्या एक जबरदस्त व्यक्तिमत्वाची, त्यांच्या खास पदार्थाची आठवण झाली. त्या दुधीची आमटी / तडका डाळ करायच्या. म्हटलं चला हेच करूयात. मग काय मस्त झणझणीत पण कमी तेलाची फोडणी देऊन, कांदा, टमाटर, दुधी, तीन प्रकारच्या डाळी, कसुरी मेथी वगैरे घालून जमवला भन्नाट "थ्री इन वन" पदार्थ. वेगवेगळे दोन पदार्थ अशक्य होते त्या कमी वेळात करणे, त्यामुळे हा सुवर्णमध्य शोधून काढला आणि गरमागरम तव्यावरची वाफाळलेल्या भाकरीसोबत फस्त केला देखील. त्या सोबत पानात कोशिंबीरीने आणि चविष्ट ताकाने साथ दिल्यामुळे नागपूर, दिनशा, थ्री इन वन ची संकल्पना आठवली हो. मज्जा आली. हा बदल फारच भावाला मला.

मी बहुतेक दुधीची भाजी कधी सुकी, कधी रस्सा, हलवा, पराठे, मुठिया, कोफ्ता ई. पदार्थ करते. पण आज वेगळ्या पद्धतीने डाळ घालून एकत्र भाजीने जेवणाला चार चांद लावले हो अक्षरशः.

माझ्या दिनशा ला, त्यांनी ओळख करून दिलेल्या थ्री इन वन च्या संकल्पनेला मनःपूर्वक धन्यवाद.

"असे पदार्थ वाढले जाती आणिक स्मृती ठेवुनी / देऊनी जाती"

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

2125: "Adding More Colors to Life: A Business Idea for the Festive Spirit"

 2125: "Adding More Colors to Life: A Business Idea for the Festive Spirit"

After transitioning from a full-time to a part-time career and addressing MBA students for the first time, I find myself thinking differently (sort of Ripple effect). One major shift in my mindset is that I now see things from a business perspective—something I had never done before.

In India, we celebrate Navratri by embracing nine different colors over nine days. In recent years, we have also welcomed a week-long Valentine’s celebration, spanning from February 7th to 14th, where each day represents a unique sentiment—Rose Day, Teddy Day, Chocolate Day, and so on. These special days are often associated with specific colors.

So, why not introduce another week of colorful celebrations, similar to Navratri? If Rose Day is symbolized by red, Teddy Day by brown, and Chocolate Day by white or coffee shades, why not extend this idea further? On Hug Day, for example, people could choose to wear or surround themselves with a color of their choice—or even go multicolor!

This concept could evolve into a massive business model, far bigger than it is today. Instead of simply exchanging gifts, people could celebrate through vibrant fashion choices, themed events, and décor. Various industries—fashion, e-commerce, delivery services, tailoring, and more—would thrive on this idea.

What do you think? Could this modern, international twist on celebrations create a new wave of festivities, no longer limited to the younger generation but embraced by all age groups? Share your thoughts!

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

२१२३: नाकापेक्षा मोती जड


मी अगदी कळत्या-नकळत्या वयापासूनच हे ऐकलं / वाचलं होतं कि सायकल अशी घ्यावी किंवा चालवावी ज्यावर बसल्यावर जमिनीवर पाय पोचतील, निश्चित टेकतील. (म्हणजे बघा कित्येक वर्षांपासून, दशकांपासून, जमिनीवर पाय रोवून असणे ह्याच महत्व नमूद केलंय). आणि अर्थात हे अत्यंत महत्वाचे आहेच, म्हणजे सायकल ज्या कारणासाठी शिकतो, पुढे जाणे, ध्येय गाठणे, चालवणे, हवेशी गप्पा मारणे हे सगळं साधलं जातं. पाय टेकले कि आधार वाटतो नेहेमी करताच, पडणार नाहीच ह्याची एक प्रकारे खात्री असते. तेव्हा जे आईवडिल, गुरुजन, मोठी माणसे सांगत होती ते पाळलं, ऐकलं आणि पटवून घेतलं कि हे महद सत्य आहे.  "का?" असा प्रश्न विचारला नाहीच, कारण तो पडलाच नाही. 


आताशा एक नवीन फॅड आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. वैविध्य गियर असलेली भली मोठी, किंबहुना जरा अवजडच अशी सायकल चालवायची, तिच्या सोबत मस्ती करायची, स्टंट करायचे, उड्या मारायच्या, उडवायची तिला आणि बरेच काही. आणि मंडळी, हे सगळं अगदी लहान वयात, पाय अजिबात पोचत नसतांना, रस्त्यावर कोण कुठे कसं चालवतंय हे लक्षात न घेता सुटतात हि पोरं. एकंदरीत भयानक आहे हे. आईवडिल तर दृष्टिपथात नसतातच हे सगळं घडत असतांना, आणि असलेच तर ते मग्न असतात फोटो, रील, व्हिडिओ काढण्यात त्या पोराचा कि कित्ती भारी, शूर असा आहे हो तो.... ई. आणि कळस म्हणजे हे सगळं जर आईवडील करत नसतील तर फोन वर असतात, कुठला तरी कॉल किंवा कचेरीचा कामाचा कॉल घेण्यात. बाकी वयाने मोठे सांगण्याचा प्रयत्न करतात, पडले कि त्या मुलाला आणि सायकलीला उचलतात, पुन्हा असं करू नको हे सांगतात ... त्यांच्या मर्यादा एवढ्याच. त्या पुढे जाणं अशक्य आणि अवघड.  


ज्याने कोणी हि म्हण बांधली आहे "नाकापेक्षा मोती जड" त्याला हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं दिसलं होतं कदाचित. अगदी योग्य अशी म्हण आहे. आधी फक्त लग्न जमवण्याच्या वेळी वापरली जायची, ते देखील मुलीच्या शिक्षणाच्या, योग्यतेच्या बाबतीत पण आता इथे देखील मला ती वापरावीशी वाटली. ती सायकल केवढी?, तो चालवणारा जीव केवढा? कशासाठी हे सगळं? का देतात इतकी मोठी सायकल इतक्या लहान वयात? आणि ठीक आहे दिली, मग तुमची जबाबदारी आहे उपस्थित राहण्याची, त्या पिटुकल्या जिवाकरता आणि इतर जे तो नजरअंदाज करतो त्या करता. जागे व्हा पालकांनो, आणि मुलासोबत वेळ घालावयाचा असं ठरवलं तर तो मोबाईल नामक अवयव जरा बाजूला सारा.   

२१२३: सोडून दे


असा एक पण दिवस जात नाही जेव्हा मला नकळत माझ्या आईची आठवण येत नाही. आज देखील अगदी तसेच घडले, नकळत. मी फोडणीची भगर करायला घेतली होती. आणि अगदी मंद आचेवर ती तिचे काम करत होती आणि अर्थात मी माझे. तिला मी सोडून दिले होते. आणि मला कळायच्या आत ती पठ्ठी तय्यार झाली पण, शिजून, फुलून, मोकळेपणाने आणि पट्टाकिनी पण. काहीही बघावं लागलं नाही, खाली लागलं नाही, गॅस मोठा करावा लागला नाही,  ह्या सगळ्यांमुळे चिंता पाठिशी उभी ठाकली नाहीच. आम्ही दोघींनी आपआपली कामे व्यवस्थित पार पाडली स्मितहास्य राखून. तेव्हा सहज माझ्या तोंडून निघालेच, माझी आई नेहेमी सांगत असे कि मंद आचेवर सोडून द्यावा पदार्थ, मोठा गॅस कधीच करावा लागतं नाही शिवाय भन्नाट चवीचा पदार्थ झटकीनी तय्यार होऊन जातो.  हे खरं तर विरुद्धार्थी आहे, मंद आच आणि झटकीनी होणे. 


आपल्या मुलांचं मोठं झाल्यावर किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पण अगदी तसंच असतं, सगळे जिन्नस  घालून, किंवा त्यांना त्याची ओळख करून देऊन सोडून द्यावे.  ह्याचा अर्थ असा नाही कि संपूर्ण दुर्लक्ष करावे, पण बारीक लक्ष नकळत राखून, अंतर सांभाळून मार्गक्रमणा करावी. म्हणजे मग एक मोकळीक मिळते आणि चविष्ट रसायन कधी तय्यार होतं ते समजत देखील नाही. 


पदार्थ असो वा अजून काही, सतत ढवळत राहायची, केवळ गॅस मोठा होऊ शकतो, मोठा केला कि वेळ वाचतो ई. ह्या सगळ्यांची गरज नसतेच मुळी. हे लक्षात यायला जरा वेळ लागतो. "देर से हि सही..."


बघा स्वतः करून, आजमावून. मज्जा येणार हि खात्री नक्की. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...