सोमवार, ४ मे, २०२६

2451: सूर तेच, स्पर्श वेगळे


मी नेहमीच Indian Idol आवडीने पाहत आले आहे. पण यावर्षी खास वेळ काढून ते खऱ्या अर्थाने अनुभवता आलं. प्रतिक्रिया देणं, हसणं, आनंद घेणं, कधी डोळ्यात पाणी येणं, कधी जुन्या आठवणींमध्ये रमणं… सगळंच मनापासून.

हा सिझन सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाला आणि अजूनही वीकेंडला पाहायला मिळतो. इतका मोठा कालावधी असल्यामुळे बदल होणं स्वाभाविकच आहे. त्यात कीबोर्ड वाजवणाऱ्या कलाकारांमध्येही काही बदल झाले.

त्यात दोन कलाकार विशेष लक्षात राहिले.

पहिला कलाकार खूप सातत्यपूर्ण. त्याची देहबोली, चेहऱ्यावरचे भाव, प्रतिक्रिया सगळंच सांगतं की तो पूर्णपणे त्या क्षणात आहे. तो हसतो, स्मित करतो, गायकांशी संवाद साधतो आणि तो संवाद फक्त औपचारिक वाटत नाही, तर एक जिव्हाळा जाणवतो. तो फक्त एक वादक म्हणून नाही, तर त्या सादरीकरणाचा भाग म्हणून उभा असतो. दोन्ही हातांनी, कधी दोन कीबोर्डवर सहज वाजवत, गायकांना प्रोत्साहन देत तो पूर्ण वातावरण जिवंत ठेवतो. अशा कलाकारांमुळे बँडला एक वेगळीच ऊर्जा मिळते.

दुसरा कलाकार अगदी शांत. त्याचं पूर्ण लक्ष समोर स्टँडवर ठेवलेल्या नोट्सवर. तो वाजवत असताना बाकी काही अस्तित्वातच नाही असं वाटतं. एकाग्रतेचं एक वेगळंच रूप.

आणि मग एक नवीन कलाकार दिसला. त्याचा अंदाज पूर्ण वेगळा. कीजवर ठाम प्रहार, बहुतेक वेळा एका बोटाने वाजवणं, आणि पूर्ण लक्ष फक्त वाद्यावर. कुठेही नजर नाही, कुठलाही बाह्य संवाद नाही. पण त्याचा आणि त्याच्या वाद्याचा एक वेगळाच संवाद जाणवतो, आणि तोही तितकाच आकर्षक वाटतो.

हे सगळं एकाच मंचावर, त्याच सिझनमध्ये, त्याच गायकांसोबत अनुभवायला मिळणं खूपच रंजक वाटलं. सगळे जवळपास एकाच वयोगटातील, पण अभिव्यक्ती आणि काम करण्याच्या शैली किती वेगळ्या.

गेल्या सिझनमध्ये, मी आणि माझी मुलगी एकाच सोफ्यावर बसून हा कार्यक्रम पाहत होतो. तेव्हा ती सहज म्हणाली, गायकासाठी सगळ्यात मोठं प्रमाणपत्र म्हणजे वादकांना त्याचं गाणं मनापासून आवडणं. जेव्हा वादक स्वतः गाण्याचा आनंद घेतात, तेव्हा त्याहून मोठं काहीच नसतं.

मला माहीत आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तरीही त्यांना पाहताना हे लिहावंसं वाटलं. सगळेच उत्कृष्ट आहेत. हे फक्त एक निरीक्षण.

2450: Different Styles, Same Stage

I have always enjoyed watching Indian Idol, but this year I finally found the time to truly engage with it. To react, laugh, enjoy, feel emotional, and absorb it fully.

This season began in September 2025 and is still ongoing, being aired as a weekend show. With such a long duration, changes are natural. One noticeable change was among the keyboard players.

Two of them stood out.

The first one has been consistently present. His personality, expressions, and overall presence make it clear that he is completely immersed in what he is doing. He laughs, smiles, and interacts with the singers in a way that shows a real bond. He is not there as just another player. He is part of the moment. He enjoys every second, connects with fellow musicians, and plays effortlessly. Most of the time he does not even need to look at the keys. With both hands, often across two keyboards, he manages everything seamlessly while still encouraging the performers. Artists like him bring life to the entire band.

The second one is the calmest. His entire focus is on his handwritten notes. When he plays, nothing else seems to exist. It is pure concentration, steady and unwavering.

Then came a replacement. His style is completely different. He strikes the keys with force, mostly using one finger, occasionally bringing in more. His attention never shifts from the keyboard. There is no attempt to engage elsewhere. Yet, there is something very compelling about the way he communicates with his instrument.

Watching such a range of styles on the same platform, in the same season, with the same singers, is fascinating. They are all from a similar age group, yet their ways of expression are so different.

Last season, as my daughter and I sat together on the same couch watching this show, she said something that has stayed with me. When the instrument players enjoy the singing, that is the best certificate for the artist. Nothing beats it.

I am aware that every individual is different. Still, watching them made me write this. All of them are excellent. This is simply an observation.

2449: From Open Skies to Closed Shelves


Something unusual happened today. The packaged dry fruits on my shelf began to speak.

At first, it felt like imagination. But the voices were gentle, familiar, almost like elders who had been waiting to be heard.

One of them, a raisin, spoke first.

You see us like this now, sealed and silent. But we were not always like this. There was a time when we lived in the open, under the sun, close to the soil that grew us. We came from farms where things were not rushed, where what was grown was meant to be shared within a home.

Grapes did not last long in their fresh form. So someone, with patience and care, chose to preserve them. We were dried under the sun, slowly, naturally. The warmth of those days stayed within us. We were not just stored food, we were an extension of the season itself.

We would then find our place in copper and metal containers in the house. Those containers were not shut away and forgotten. They were opened often, with familiarity and affection. A handful here, a pinch there. We moved effortlessly from farm to home to plate, becoming a quiet part of everyday life.

There was joy in that rhythm. There was meaning in that movement.

Then things began to change.

The sun was replaced. Machines took over. Drying became faster, sharper, detached from time and touch. We were processed, separated, packed tightly into plastic, and placed on shelves. We travelled farther, but somehow reached less.

Now we sit for long periods, first in stores, then in cupboards. Sometimes we are seen more on screens than in hands. People look at us through glass before they ever taste us. There is access, but not connection. There is availability, but not presence.

And yet, within us, something remains unchanged. Whether dried in sunlight or by machines, we still carry nourishment. We still hold the ability to support life. But the way we are received has shifted.

If you can, visit a farm when the season arrives. Taste what is fresh. And when the season ends, take home what has been dried with care, from the same source. Share it. Consume it regularly, not occasionally. Let it be part of life again, not just something stored.

And remember, it is not just us. The same story belongs to many others you see around you. We are all, in some way, moving through the same current.

The voices faded after that.

The packets on the shelf were still, just as before. But something about them had changed. Or perhaps, something within me had.

Now, every time I reach for them, I wonder if I am simply consuming them, or if I am also choosing the way their story continues.

रविवार, ३ मे, २०२६

२४४८: उन्हातली गोडी, कपाटातली कोंडी


 किसमिस आजी आणि नात बोलत होते. गप्पांमध्ये दोघीही रंगून गेल्या होत्या. आजी मस्त मस्त गोष्टी सांगत होती आणि नात मन लावून त्या ऐकत होती. अधेमधे प्रश्नांची सरबत्तीही सुरू होतीच. एकंदरीत आजीला समाधान मिळत होतं आणि नातीला काहीतरी नवीन, अनोखं कळत होतं.

आजीने नेहमीप्रमाणे, पण यावेळी जरा जास्तच उत्साहात सांगायला सुरुवात केली,
"माहिती आहे का?, माझ्या वेळी, म्हणजे मी लहान असताना, शेतकरी बहुतांश कुटुंबापुरतंच उत्पादन घ्यायचे. फार मोठ्या प्रमाणावर नाही. त्यामुळे घरची द्राक्षं खाता यावीत, या दृष्टीने सगळं होतं. हे मला अनुभवता आलं किंवा ऐकिवात आहे.

मग द्राक्षं काही दिवसच मिळतात, म्हणून ती साठवून ठेवूया अशी कल्पना आली. आणि त्यातून एक वेगळाच अनुभव मिळाला गं. सूर्याच्या किरणांचा सुंदर उपयोग करून, त्याची ऊर्जा जणू प्रत्येक फळात साठवली गेली. त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचं तर शेल्फ लाईफ वाढलं. द्राक्षांचा मौसम संपल्यानंतरही ती सुकामेवा म्हणून उपलब्ध राहू लागली. पदार्थांमध्ये तिची उपस्थिती वाढली.

नंतर ती इतर सुकामेव्यांसोबत मिसळून लोकांपर्यंत पोचवली जाऊ लागली. पण मग काय, सूर्य बाप्पाला बाजूला केलं आणि क्षणार्धात मशीन वापरून सगळं सुकवलं जाऊ लागलं. ते चटके कुणालाच आवडले नाहीत, म्हणून ते सगळेच जणू रुसले गं.

आधी कसं नैसर्गिकरित्या वाळल्यावर, एखाद्या आजीच्या डब्यात स्थान मिळायचं. आणि तो डबा किती वेळा उघडला जायचा. पण आता काय, तर आपल्याला वेगळं केलं जातं. कुठल्याही बागेतलं, मशीनने सुकवलेलं, प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबून ठेवलं जातं. मग ती पिशवी दुकानात आणि नंतर घरच्या कपाटात बंद.

आधी शेतात, उन्हात, डब्यात आणि मग सरळ तोंडात आनंदाने फस्त केलं जायचं. परसातल्या पानांत बघण्यातच अप्रूप होतं. आणि आता आधी काचेच्या तुकड्यावर, फोटोत बघायचं, आणि मग कधी तरी त्याच काचेच्या तुकड्याकडे बघत बघत खायचं. नुसती ढकलाढकली. आनंद नाहीच.

हे सगळं सांगण्याचं कारण एकच, आता सगळं बदललंय. त्याची सवय करून घे, नाहीतर मला झाला तसा त्रास होईल.

जरी उन्हात किंवा मशीनमध्ये सुकवलं, तरी आपल्यात जीव असतो गं. आपल्या सेवनाने माणसांचं जीवन सुधारतं. मग असे वेगवेगळे प्रकार का वापरतात, कोण जाणे.

द्राक्षांचा मौसम आला की एखाद दोन शेतात जावं, ताजी द्राक्षं खावीत. आणि मौसमाच्या शेवटी, त्याच शेतकऱ्याकडून उन्हात वाळवलेली घ्यावीत. कुटुंबासोबत आनंदाने खावीत. आहे ना सोपं?.

आपल्यापुरतंच नाही गं, बाकी सगळ्या सुकामेव्यांचंही काहीसं असंच झालंय. सगळेच जणू एकाच होडीत.

पण त्या काचेच्या तुकड्याला बाजूला सारलं तरच ना प्रकाश पडेल या बुद्धिजीवी जगात.

जाऊ दे, ते बुद्धिजीवी आपल्याला स्वीकारोत किंवा नाही. तू मात्र हा बदल स्वीकार. कपाटात बंद राहायची सवय कर. वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या बांधवांसोबत राहा. विविध सुकामेव्यांसोबत मिसळून राहायला शिक. आणि मोठ्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या शोकेसमध्ये, दुकानात निमूटपणे पडून राहा".

२४४७: माझ्या मोगऱ्याची आठवण


माझ्या मोगऱ्याची फारच आठवण येते आहे. का कुणास ठाऊक? कदाचित उन्हाळा हा त्याच्या बहराचा ऋतू आहे म्हणून, किंवा तो सुगंध मला फारच प्रिय आहे म्हणून.

अगदी लहानपणी आम्ही ज्या बंगल्यात राहत होतो, तिथे चौफेर मोठी बाग होती. काय नव्हतं त्या अंगणात? विविध फुलं, फळं, भाज्या, वेल, तुळशीची रोपं… खूप वैविध्य.

आम्हाला सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहायला जावं लागलं, बदली झाली आणि quarter तय्यार नव्हतं, डागडुजी सुरु होती म्हणून. तिथली बाग तर अजूनच मोठी. अहाहा!

डागडुजी झाल्यावर राहायला आलो quarter मधे तेव्हा पुन्हा नव्या रंगांची फुलं, झाडं, कधीही न अनुभवलेली झाडे, पाने, वेली ई. दिसू लागली. पुढे स्वतःच्या घरी गेलो तेव्हा चाफा, लाल पेरू, कलिंगड, वालाच्या शेंगा, आणि अनेक प्रकारची फुलं… खूप काही होतं. जेवढं जमलं तेवढं मनापासून सगळं जपलं. तेव्हा वेळ होता, आवड होती, समाधान मिळायचं. थोडंफार जबाबदारीपासून मुक्त असं जगता येत होतं, म्हणून अशा गोष्टींना वाव मिळायचा.

दोनाचे चार झाले आणि चित्र बदललं. तरीही मी मोगरा, गोडलिंब आणि गवती चहा अशी काही झाडं जपली होती.

मोगरा बहराला आला की मी त्याच्यासोबत वेळ घालवायचे. तो सुगंध मला सोडवतच नसे. असं वाटायचं तिथेच बसून राहावं. कारण तो बहर काही दिवसांचाच असायचा. तो सुगंध मी जणू साठवून ठेवायचे. नेहमी वाटायचं, निसर्गाला कसं कळत असेल की हीच ती वेळ फुलायची, बहरायची, इतरांना आनंद द्यायची? आणि तो सुगंध दूरवर पसरायचा. कधीच त्या मोगऱ्याने मोजून मापून सुगंध दिला नाही.  कदाचित म्हणूनच त्याला जपण्याचा प्रयत्न व्हायचा. जमेल तसं पाणी, थोडी माती, थोडी काळजी.

झाडांमध्ये जीव असतो. त्यांना जपावं लागतं, वेळ द्यावा लागतो. नाहीतर ती हवी तशी फुलत नाहीत. आणि ते त्यांच्या बाबतीत अन्यायच आहे.

आता मात्र हे सगळं करावंसं वाटत नाही. आणि त्यामुळेच कदाचित यावर्षी माझ्या दारात मोगरा फुललाच नाही. प्रचंड आठवण येते आहे त्याची. त्या बहराची. त्या सुगंधाची. त्या प्रसन्नतेची.

२४४५: एक कला


व्हरांडा हा एक घराचा खूप महत्त्वाचा भाग असायचा, माझ्या लहानपणी. आम्ही जिथे राहत होतो, तिथे मोठे सरकारी बंगले होते आणि पुढे-मागे दोन्ही बाजूंना वऱ्हांडे असायचे.

पुढच्या वऱ्हांड्यात गाडी, सायकल, चपला वगैरे असायचं. मागच्या वऱ्हांड्यात मुख्यतः कपडे वाळत घालायची सोय असायची. उंच, छताच्या जवळ दोऱ्या बांधलेल्या असायच्या आणि त्यावर ओले, जड कपडे काठीच्या सहाय्याने बखूबीने वाळत घालावे लागायचे बहुतांश वेळा, रोजच.

ती एक कला होती. 

कपडे इतक्या शिताफीने पसरवावे लागत असत की कोणता कपडा कुणाच्या शेजारी, कोणाला लपवायचं, कोणाला पुढे ठेवायचं, हे सगळं ठरवावं लागायचं.

नंतर स्टॅन्ड आले आणि काम सोपं झालं. मग पुलीच्या सहाय्याने वर-खाली होणारे बार आले आणि ते तर अजूनच सुकर झालं.

माझ्या आधीच्या पिढीपर्यंत मुलीला कपडे किती व्यवस्थित वाळत घालता येतात, यावरून तिची पसंती ठरायची. तो एक फिल्टर होता, एक मापदंड होता. अर्थात त्याबरोबर चालून दाखव, बसून उठून दाखव, गाणं म्हणून दाखव असे अनेक टप्पेही होते. मुलाचं काय? फक्त नाव पुरेसं असायचं का तेव्हा? असो.

आज पुन्हा एकदा कपडे वाळत घालताना नकळत हसू आलं.

का? कुणास ठाऊक, पण मला परत एकदा हे काम आवडायला लागलं आहे. कपडे नीट वाळत घातले की ते दृश्य डोळ्यांना इतकं सुबक, सुंदर वाटतं.

दुसऱ्यांना उगाच प्रदर्शन नको, याची काळजी आपण घेतोच. पण स्वतःलाच छान वाटावं म्हणून, त्या स्टॅन्डलाही आनंद मिळावा म्हणून, आणि बाल्कनीत स्टॅन्ड विराजमान असेल तर आजूबाजूच्यां कठड्याला, भिंतीला, जमिनीला, आणि इतर सर्वांना  बरं वाटावं म्हणून, हे काम फक्त काम म्हणून न बघता, आनंद देणारं साधन म्हणून बघितलं तर?

मला तर खूप मजा येते आहे. समाधान मिळतंय.

कोणाची शाबासकी मिळावी म्हणून नाही, कोणी तारीफ करावी म्हणून तर नाहीच. फक्त स्वतःसाठी. त्या रंगांसाठी. त्या सुगंधासाठी.

कधी मी स्टॅन्ड आडवा ठेवते, कधी उभा. कधी इकडे, कधी तिकडे.

छोटे छोटे बदल. वेळ काही जास्त लागत नाही. पण जो परिणाम मिळतो, तो खूप वेगळा असतो.

करून बघाल?

2444: When the Sarangi Lives Through a Keyboard

 “Dil cheez kya hai… aap meri jaan lijiye…”

An iconic song from a completely different era, a time when music was not just composed but deeply felt.

What makes this song unforgettable is not only the lyrics or the singing, but the coming together of poetry, composition, live instruments, and a strong cultural touch.

One instrument that stood out in the original is the sarangi. It did not just accompany the song, it almost spoke. It carried emotions that words could not fully express.

I do not come from a music background, but I enjoy watching Indian Idol for moments like these.

Yesterday, Anshika performed this song again. What stayed with me was not just her singing, but everything that supported it.

The orchestra recreated the same emotional experience using today’s instruments. And yet, somewhere within that modern setup, the essence of the sarangi was beautifully present.

Through the keyboard. Through the understanding of the musician. Through pure sensitivity.

Just imagine the depth of effort behind this. Understanding such a complex traditional instrument, decoding its emotional language, embedding it seamlessly in latest keyboard and then recreating it so seamlessly on a modern platform.

This is not easy. This is not routine. This is art. This is respect. This is evolution.

Truly touched. Salutes to the unseen genius behind such moments.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...