Locate me at FB: https://www.facebook.com/preeti.mulay for more such stories.
Listen to this story on: https://youtu.be/aQDrUWS1Gkk
Locate me at FB: https://www.facebook.com/preeti.mulay for more such stories.
Listen to this story on: https://youtu.be/aQDrUWS1Gkk
Find me on Facebook too: facebook.com/preeti.mulay
गेल्या काही वर्षा पासून मी एक निरीक्षण करते आहे कि रस्त्यावर धावणे आणि दुचाकी चालवणे हे जरा जास्तच प्रमाणात चालू झालं आहे, अगदी वेड लागण्या इतपत.
मी असं ऐकलं आणि वाचलं आहे अनेक लेखात जे दिग्गजांनी लिहिले आहेत, कोणी ऐऱ्या गैऱ्याने नाही, कि
१. हे धावणे, दुचाकी चालवणे वगैरे जर व्यायाम म्हणून मनापासून करत असाल तर त्याची एक वेळ असते, काळ असतो, कधीही केव्हाही कुठेही करणं धोकादायक आहे,
२. रस्त्यावर धावणे पण टाळावं म्हणतात ई.
आणि हाईट म्हणजे सगळेच रस्त्यावर आले आहेत आजकाल, लहान, तरुण, मोठे, आजोबा, बारीक, लठ्ठ ई. जमतंय / नाही-जमतंय, गरज आहे-नाही आहे ई. देखील,
ह्या वरून मला एक आज एक फार मोठा प्रश्न पडला आणि त्याचा अंदाज देखील बांधता आला तो असा कि
"मुख्यतः मध्यम वयाचेच का जास्त प्रमाणात दुचाकी चालवत आहेत?"
माझ्या लहानपणी जरी फार सुरक्षितता होती सगळीकडे, रहदारी कमी होती, तरीही खबरदारी म्हणून घराच्या आसपास च सायकल चालवावी अशी सूचना दिली जायची आणि ती पाळली जायची पण. त्या वेळी ज्या मुलांना वाटत असेल कि दूर दूर जावं सायकल चालवावी, हवा खावी, निसर्ग अनुभवावा, ई. आणि जे राहून गेलाय इतक्या वर्ष ते सगळं पटापट अनुभवण्यासाठी, सोशल मिडिया वर कदाचित लिहिण्यासाठी (स्टेटस आणि फोटो) काही जण चालवत असतील, अनेक कारणं आहेत फक्त माझ्या दृष्टीने. जसं कि मध्यम वयात आता थोडा वेळ आहे, परवडू शकतंय, घरची जबाबदारी कमी झाली आहे ई. सगळे कारणं जरी योग्य असली तरी देखील ८.३०-९ सकाळी, संध्याकाळी, रात्री.... ह्या काही वेळा नाहीत ना सायकल काढायला आणि धावायला?
आणि हे किती दिवस?
घरातच इतकी जास्त वैविध्य काम असतात करण्यासारखी ज्याने घर चकाचक होत, संपूर्ण शरीराला व्यायाम होतो, फार समाधान मिळत, आणि पुढील पिढी करता एक छान उदाहरण उभं राहत, बाहेर पडायची गरजच नाही. आणि एका जाहिरातीत म्हटल्या प्रमाणे "भारत ये एक अंडर कंस्ट्रक्शन देस है..." त्यामुळे धूळ येतेच, घरात माणसं राहतात त्यामुळे पसारा होतोच,
त्यामुळे विचार करा आणि मग कृती हि आग्रहाची विनंती, म्हणजे अती महागड्या सायकल वर कपडे वाळत घालण्याची वेळ येणार नाही.
To enjoy more such stories locate me at www.facebook.com/preeti.mulay
Listen to this story on :
Twitter: @DrPreetiMulay, https://twitter.com/DrPreetiMulay
LinkedIn: https://www.linkedin.com/in/dr-preeti-mulay-536b43a9/
संक्रांत सण झाला, रथसप्तमी पार पडली, मार्च महिना २०२१ चा आला देखील आणि उन्हाळ्याची चाहूल लागली. सूर्य बाप्पा तळपायाला लागले आहेत आत्ताच. परवा काही कारणास्तव लवकर ऑफिस मधून निघाले आणि रस्त्यावर आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा नकळत आधी सावली शोधली माझ्या डोळ्यांनी (४ बरं का) आणि हुश्श झालं सावलीत गेल्यावर. ह्या अगदी छोट्या प्रसंगामुळे हा पंक्ती प्रपंच. अनेक वर्षांपासून अनुभवलं, वाचलं आणि जगलं देखील ह्या सावलीच महत्व. माझे बाबा नेहेमी म्हणायचे "झाडासारखं असावं, कुठलीही अपेक्षा न ठेवता फळं / फुलं आणि सावली द्यायची". लहान थोर गरीब श्रीमंत पक्षी प्राणी माणसं ई. सगळ्यांचा हवी हवीशी अशी हि बहुमूल्य अनमोल सावली. हि सावली "ती" आहे बरं का मंडळी म्हणजे माया प्रेम भरभरून देणारंच, हवं त्या पेक्षाही कित्येक पटीने अधिक आणि नेहेमीच. झाडं स्वतः उन्हात स्थिर उभे राहतात दुसऱ्यांना सावली देण्याकरता. माहुत देखील मला असं वाटतं कि अवाढव्य हत्तीच्या सावलीत अनेक वेळा विसावत असेल, तीच गत उंट हाकणाऱ्यांची देखील असेल कदाचित. जसा जसा हा सूर्य बाप्पा आपली उन्हाची दिशा आणि प्रखरता बदलतो त्याप्रमाणे सावली देखील बदलतेंच. अनेक प्रकारची झाडं तर अशी आहेत कि ज्यांना "सावलीची झाडं" असेच संबोधतात. तर अशी हि ऊर्जा, उत्साह आणि शांतात देणारी सावली माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे माणसांना, त्यांच्या महागड्या गाड्यांना... फक्त झाडचं सावली देतात का हो? नाही, मोठ्या इमारती पण देतात, छत्र्या पण देतात, मंडप पण देतात ई. हि झाली उन्हात हवी हवीशी सावली. पण ह्याच शब्दाचे दोन अजून अर्थ आहेत, मायेची सावली (आई वडील, आजी आजोबा, गुरुवर्य आणि घरचे मोठे) आणि छबी (आपली पुढली पिढी). चला तर मग आज पासून ह्या सगळ्या सावली देणाऱ्या स्त्रोत ना आपलंस करूयात, काळजी घेऊयात, माया देऊयात.... नेहेमीच.
अनेक
पिढ्यांपासून अर्थात भारतात आणि त्याहून महाराष्ट्रात मी प्रकर्षाने बघत
आले आहे कि अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात, त्यात प्रचंड विविधता तर
असतेच पण त्या सगळ्यांमधला एक कॉमन / समान धागा हा आहे कि सगळेच सण हे
मुलींचे / बायकांचे जास्त असतात, त्यात त्यांना विविध प्रकारच्या पूजा
करण्याची संधी मिळते, त्यामुळे नवीन साडी-चोळी-दागिना ई. मिळतो.
मैत्रिणींना बोलवण्याची, त्यांच्या सोबत वेळ आनंदाने साजरा करण्याची संधी
मिळते, गोड-धोड पक्वान्न चाखता येतात, विविध गाणी-नृत्य ई. चा पण समावेश
असल्यामुळे वेगळीच मज्जा तर येतेच पण ऊर्जा हि मिळते. दोन-तीन पिढ्या एकत्र
सगळं साजऱ्या करतात. आणि हे सगळं उत्कृष्ट सजावटी मधे, वैविध्य फुलांच्या
सुगंधी मंगलमय वातावरणामधे. माझ्या मते हे सगळं ह्या दृष्टीने होत असे कि
१) त्या काळी बहुतांशी सगळ्याच महिला घरी असत, त्यांना त्यामुळे हे सगळं
व्रत वैकलै करण सहज जमत होत २) आणि त्यामुळे त्यांना महत्व दिल जायचं ३)
त्याचा परिणाम म्हणून कि काय पण त्यामुळे जबाबदारीने सगळी काम मनापासून होत
असत आणि बरीच अजून कारण देता येतील. आता काळ बदलला आहे त्यामुळे माझ्या
दृष्टीने काही जणी असे पौराणिक सण साजरे करतात आणि बाकी सगळ्याच आधुनिक सण
हि प्रचंड प्रमाणात एन्जॉय करतातच. आज हि एक असाच आधुनिक सण आहे आणि माझ्या
मुलांनी शनिवारीच साजरा करायला सुरवात केली, स्वतः भन्नाट पदार्थ केला,
गेम खेळला आणि पोटभर वैविध्य विषयावर गप्पा मारल्या माझ्याशी. अहाहा.
दोन्ही प्रकारचे सण महत्वाचे आहेतच आणि साजरे करण्याची पद्धत फार वेगळी
आणि अप्रतिम आहे. महत्व तेच, गिफ्ट्स पण मिळतातच (अक्चुअल आणि व्हर्चुअल
पण, अगदी अभिनंदनाचा पाऊस पडतो), भरपूर विविध पदार्थांची चंगळ पण असते.
हा ना एक फारच मजेशीर किस्सा आहे आमच्या ड्राईव्हर काकांचा. ते कधी अगदी शांत पणे बस चालवतात, कासवाची गती, अगदी सायकल वॉल सुद्धा पुढे जाईल अशी गती,अजिबात काहीही झालं तरीदेखील अजिबात गती वाढवणार नाहीतच. किंवा कधी कधी काहीही झालं तरी गती कमी करतच नाहीत. असो, होत असं बस चालवतांना. आज प्रकरण काही वेगळंच होत. थोडासा विचार केला, आणि बघितलं तर असं आढळलं कि काल पर्यंत आमचे काका भलंमोठं जाडजूड लोकरीचे स्वेटर आणि माकडटोपी घालून बस चालवत असत. पण आज एकदम मोकळं-ढोकळ प्रकरण होत, ना स्वेटर ना टोपी, अगदी "मी कात टाकली" अस्सच काहीस. आणि त्यामुळे ते बस चालवण्यात झळकत होत, जश्या कि हवेशी गप्पा होत होत्या, सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक केलं गेलं, मस्त मोठ्याने हॉर्न वाजवत आणि गती पण जास्त होतीच. बस मधल्या सहप्रवाशांना देखील लक्षात आलंच पण कारण लक्षात आल्यावर मोठ्याने हशा पिकला. आता हेच मला नॉन मराठी मंडळींना समजावून सांगायचं आहे हिंदीत आज संध्याकाळी. देवा
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...