शुक्रवार, २५ जून, २०२१

सततची घाई

माझ्या बस स्टॉप वर उभं राहिल्या राहिल्या खूप शिकता येत मला नेहेमीच, आज पण तस्सेच झाले. मी सकाळी साधारणतः ८. १०-८. १५ वा पोचते बस स्टॉप वर आणि ती चारचाकी शिकणाऱ्यांची आवडीची वेळ असते. नुसती भाऊगर्दी रस्त्यावर, विविध ड्राइविंग स्कूल च्या गाड्या रस्त्यावर, एकाच वेळी. देवा. त्यात आज मी असं बघितलं कि एक नवशिखा ड्राइवर चालवत होता / शिकत होता किंवा चालवण्याचा प्रयन्त करत होता / होती, आणि समोर उंचवटा होता, स्पीड ब्रेकर हो, झालं, मग काय, त्या शिकणाऱ्याने गाडीचा वेग कमी केला अगदी थोडासा कारण तीच अपेक्षा असते जेव्हा स्पीड ब्रेकर बांधतात रस्त्यावर, बरोबर?. मागून दोन-तीन दुचाकी वाहने येत होती, एक भलीमोठी चार चाकी पण होती, आणि ती सराईत चालवणारी मंडळी होती बहुतेक, त्यांच्या स्पीड कडे बघून मला ते जाणवलं. ह्या शिकाऊ वाहनाने जसा वेग कमी केला तस्सा त्या तीनही वाहनाने हॉर्न वाजवायचा रेकॉर्ड केला, नुसता उच्छाद मांडला. आणि डाव्या बाजूने दोन दुचाकी, उजव्या बाजूने एक दुचाकी आणि चारचाकी ने एकसाथ ओव्हरटेक केलं कर्कश्श हॉर्न वाजवत. बापरे. 

त्या नवशिख्याने काय शिकायचं हो?, असंच असत गाडी चालवणं शिकलं कि? आणि सराईतपणे हे गाडी चालवणारे एक्सपर्टस कसे विसरतात हो कि ते देखील हि अशीच कधीतरी शिकले होते गाडी ते. काय घाई आहे?, काय गाठायचं आहे? विमान? रस्त्यावर चालवण्याचे काही नियम असतात का नाही? भयानक असं दृश्य होत ते. बापरे. सद्बुद्धी दे बाबा सर्वांना, प्लीज. 

माझ्या दृष्टीने ते सगळे ओव्हरटेक करणारे नक्कीच दुसऱ्याची गाडी चालवत होते, म्हणून एवढा माज दाखवणं सुरु होत रस्त्यावर नको असतांना. स्वतः कष्ट करून घेतलेली गाडी बहुतेक अशी नाही चालवणार कोणी.

सुगंधी स्वागत

आज सकाळी नित्यनियमाप्रमाणे जाग आली, सकाळचं थोडंस आटोपल्यावर मी जेथे योग करते ती जागा झाडून घेते. पण आज थोडासा बदल होता कारण झाडू-पोछा मावशी आज बहुतेक येणार नव्हत्या. त्यामुळे म्हटलं जास्त वेळ न दवडता मावशी-स्टाईल झाडावं सगळंच पट्टाकिनी. झाडू ड्राय बाल्कनीत ठेवला असतो मी. त्यामुळे झाडू घेण्यास ड्राय बाल्कनीचं दार उघडल्या उघडल्या चमत्कार झाला, अचानक. व्वा. मी एक वेगळीच अनुभूती घेतली कधी नव्हे ती. असं वाटलं कि खूप सारी सुगंधी फुलं माझं स्वागत करत आहेत, किंबहुना ते थांबले होते कि कधी एकदा मी दार उघडते आणि कधी ते फ्रॅग्रन्सफुल असा मला अनुभव देतात. अहाहा. भन्नाट. अप्रतिमच. काही क्षण तर मी माझी नव्हतेच कारण हे पहिल्यांदाच होत होत माझ्या सोबत. भानावर आल्यावर उमगलं कि काल उशिरा लावली वॉशिंग मशीन पिल्लानी माझ्या काही कारणास्तव त्यामुळे कपडे वाळत घालायला पण उशीर झाला आणि त्यामुळे चढाओढ असल्याप्रमाणे त्या अजूनही ओल्या असलेल्या स्वच्छ धुतलेल्या कपड्यांचा तो सुगंध होता. सर्वच कापड्यानी त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे साठवलेला डिटर्जेन्ट चा सुगंध ते माझ्या वर उधळत होते जणू. इतकी वर्ष मी सर्फ एक्सेल वापरते पण त्याचा इतका अप्रतिम सुगंध आहे हे मला आज पहाटे प्रकर्षाने जाणवलं. फारच अभूतपूर्व दिवस सुरु करण्यासाठी त्या वॉशिंग पावडरचे, कपड्यांचे, मुलांचे सगळ्यांचे पोटभर आभार.    

बुधवार, २३ जून, २०२१

Height of simplicity....


Today "The Voice...", my fav program on national TV launched its first episode. In that episode, the A R Rehman is the super guru.

One of the contestant started singing "Piya haji ali..." song, composed by A R Rehman. The moment that song started and even A R gave the young singer support using his keyboard, A R removed his shoes instantly and then took over the song. It happened sooo quickly, that I was really surprised to observe the simplicity at this stage in his life. He nailed it again. Salutes to A R.

Feb 3, 2019, 10:00 PM

श्लोकांची ताकद

लहानपणापासून ऐकलेलं आणि कानावर पडलेलं माझ्या आईच एक लयबद्ध, स्वरबद्ध, रुटीन होत, आंघोळ झाली कि सकाळी आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सुस्वरात खणखणीत आवाजात विविध स्तोत्र म्हणायचीच ती. पहिले एक दोन श्री. गणपती स्तोत्र, त्यानंतर नवग्रह स्तोत्र, सर्व रोग शमनार्थ स्तोत्र, घोरात कष्टात स्तोत्र, रामरक्षा, भीमरूपी, हनुमानचालिसा, विष्णू सहस्त्रनाम असे.

मी असं ऐकलं आहे, वाचलं आहे आणि अर्थात वाइब्स / स्पंदन ह्या वर माझा विश्वास आहे कि स्तोत्र पठाणाने असंख्य फायदेच फायदे होतात. कोणाला? अर्थात जो पठण करतो त्याला, जो श्रवण करतो त्याला, त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना, वास्तूला, प्रत्येक सजीव वस्तूला ई. श्रवण-भक्ती हा शब्द उगाचच नाही तय्यार झाला ना. एका आधुनिक संताने असं म्हटलं आहे कि एक व्यक्ती जर सातत्याने स्तोत्र, मंत्र, जप पठण करत असेल तर तर त्याच्या ह्या प्रयत्नाला यश येत आणि जवळपास चे हजारो लोक समृद्ध होतात, विचारांनी, वागण्यानी, आचारांनी ई.

एवढ्यातच मला कानावर आलं कि माझा एक खास मित्र असिम्प्टम्याटिक asymptomatic आहे, घरीच आहे, आणि आराम आणि काम दोन्ही चालू आहे. त्याला मी कळवलं कि सहज जमल्यास अगदी २ मिनिटाची काही स्तोत्र ऐक फक्त युट्युब वर आणि लिंक पण पाठवल्या. पठ्ठा म्हणतो कसा मी "आज पर्यंत मी कोणाला दुखावलं नाही, मी त्यामुळे काहीही करणार नाही माझं सगळं ठीक आहे, का म्हणू मी हि स्तोत्र?". ई. हि स्तोत्र म्हणायला / ऐकायला सोप्पी आहे, सध्या त्याला जो फावला वेळ मिळाला आहे तो त्याने सदुपयोगी लावावा, स्तोत्र म्हणावी, म्हणजे त्याच्या बरोबर अनेक इतरांचा प्रचंड फायदा होईल. हे कसं सांगू त्या विद्वान माणसाला?  ह्याचाच विचार करते आहे मी. 

अनेक संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे कि स्वरबद्ध पद्धतीने, एकटयाने किंवा सामुहिक रित्या म्हंटल्या गेलेल्या स्तोत्रांचा, त्या लहरींचा खूप छान परिणाम होतो, दीर्घकाळ टिकेल असा परिणाम. आणि हो मंडळी, हा परिणाम माणसांवरच होतो असे नाही, त्या घरात शिजणाऱ्या अन्नावर, आजूबाजूच्या अनेक प्रकारच्या सजीव वस्तूंवर, वास्तुवर देखील बघायला / अनुभवयाला मिळतो, अर्थात डोळे उघडे ठेऊन बघितलं तर. पौराणिक कथांमध्ये देखील आपण अनेकदा ऐकलं आहे ह्या सगळ्यांबद्दल. असो. ज्याचं त्याच्या बरोबर. मी सुचवण्याचं काम केलं, त्याने नाही ऐकलं आणि उलट मलाच प्रश्न विचारला त्याबद्दल त्याचे भरभरून आभार कारण फक्त त्याच्या प्रश्नांच्या सरबत्ती मुळे आज मला एक नवीन विषय मिळाला लिहायला. अहाहा. फारच उत्तम.

शिस्तबद्ध झाडूपोछा मावशी

 
आमच्या घरासमोर एक भलीमोठी सोसायटी आहे आणि तेथे हाऊस किपींग च्या चमू मधे काम करणारी एक मावशी आहे. ती दररोज वायू वेगाने माझ्या घरासमोरून जाते - येते, अगदी ठराविक वेळेला. तिची शिस्त अगदी वाखाणण्यासारखी आहे, साधेच पण फार व्यवस्थित कपडे, साईड पर्स, मोबाईल ई. एकंदरीत फारच शिस्तीत. मला अगदी सकाळी दिसली कि गुड मॉर्निंग म्हणणार, संध्याकाळी दिसली कि चुकून मी गुड मॉर्निंग म्हणेन सवयीनुसार म्हणजे तिला बघितलं कि असं म्हणायचं, पण ती नाही, गुड इव्हनिंग दीदी. हसत खेळत मजेत सतत.  

लॉक डाउन च्या दरम्यान सकाळी मला फिरायला जात येत होत आमच्या गल्लीत फक्त, तेव्हा एक दिवस मी तीच घर बघितलं. बाप रे, माझ्या अंगावर काटे आले. भयानक, फक्त चार मोडके पत्रे, त्यात भलं मोठं कुटुंब, आजूबाजूला हू म्हणून गवत, रस्त्यावर दिवे नाहीत त्यांच्या घराच्या आजूबाजूला पण हिच्या कडे बघून कदापि कळणार नाही, छे. तिचे साधे पण भावेल असे राहणीमान, स्मितहास्य, नो कंप्लेंट्स आणि उत्साह बघून कोणीही म्हणणार नाही ती इतक्या भयानक जागी राहते, आणि फक्त हाऊस कीपिंग च काम करते. फारच शिकण्यासारखं आहे, कधीच म्हणजे कधीच तिची कामाला जाण्याची वेळ चुकलेली मी बघितली नाहीच. संध्याकाळी परत येतांना नेहेमी हातात भाजी, अंडी नाहीतर काही तरी असतंच. परवा सहज लक्ष गेलं माझं कारण ते लक्ष जाण्यासारखंच होत, जवळपास ५ गड्ड्या मेथी होती तिच्या हातात, म्हटलं काय? एवढी मेथी का? "बहुत लोग है ना दीदी तो इतनी सब्जी तो चाहिए". देवा.

मंगळवार, २२ जून, २०२१

योग आणि दिनचर्या

माझ्या ऑफिस मधे एक नवविवाहित आहे, काहीच महिन्यापूर्वी तीच लग्न झालाय. मग नोकरीमुळे त्यांनी एक छोटेखानी घर घेतलं भाड्याने पुण्याला आणि राहू लागले. काल आंतरराष्ट्रीय योग दिवस होता, त्यामुळे आमच्या विश्वविद्यालयात ऑनलाईन अनेक वैविध्य कार्यक्रम होते. त्याच अवचित्य साधून हि नवीन लग्न झालेली मॅडम मला विचारते कशी "मॅडम तुम्ही योग करता का हो रोज?" मी काही म्हणायच्या आताच, "नाही तुम्ही करतच असाल पण मला जमतच नाही, पहाटे उठायचा कंटाळा, आणि उठल्यावर मग गडबड सगळी, ८ वाजता बस गाठायची असते, संध्याकाळी योग करण्याचं मन नाही करत, संघ्याकाळी गेल्यावर काय खायला करायचं, रात्री जेवायला काय करायचं, ह्यातच वेळ कसा निघून जातो लक्षातच येत नाही", ई. एका श्वासात.

म्हटलं चला एक नवीन विषय मिळाला मला लिहायला. माझ्या दृष्टीने आणि मला सुचलेले उपाय थोडक्यात येथे मांडते आहे. अर्थात मी तिला पण हे सगळं सुचवणार आहेच, बघूया, होईल बहुतेक बदल हे सगळं ऐकल्यावर, टिप्स हो.

सुरवातीला एक दिवसा आड करायचा योग, ज्या दिवशी योग करायचा त्या दिवशी उसळ करायची, म्हणजे जास्त भाज्या चिराचिरी करण्यात वेळ जात नाही. भाज्या आधीच चिरून ठेवायच्या, किंवा चिरलेल्या विकत आणायच्या, काही तरी प्लॅन किंवा जुगाड केल्याशिवाय सगळं साध्य होणार नाहीच. घरची काम वाटून घ्यायची दोघांनी बरोबरीने. म्हणजे दोघांनाही वेळ मिळतो योग करायला आणि मज्जा येते. दररोज साग्रसंगीतच जेवण करायचं असं कुठे लिहलंय, "वन डिश मिल" पण पुरेसं असतं, रादर ते जास्त पौष्टिक आणि करायला - खायला सोप्प, बदल पण भन्नाट. त्यामुळे योग करण्यासाठी योग जुळवून आणावा लागतो, ते ऑटोमॅटिक होत नाही. आणि मुख्य म्हणजे "पुणे तेथे काय उणे" सगळं उपलब्ध आहे, स्मार्ट पणे मजेत वेगवेगळे प्रयोग करत राहायचं. बास. मग योग जमलाच म्हणून समजा, योग दैनंदिन दिनचर्येचा भाग झालाच म्हणून समजा.


मी आज मनसोक्त धबधबा अनुभवाला

हो मंडळी, अगदी बरोबर वाचलंत. 

माझ्या दिनचर्येचा हा एक महत्वाचा भाग आहे, हे मोठ्ठ काम असत रोजच माझं, संध्याकाळी कॉर्पोरेशन च पाणी आलं कि वरच्या टाकीत पाणी पंप करणं. गेली कित्येक वर्ष हे न चुकता सुरु आहे पण आज, आज काही वेगळं घडलं. मला त्या पाणी सोडणाऱ्याची वेळ पक्की माहित आहे. बहुतेक अगदी त्याच वेळी मला पंप चालू करायला फार आवडतो कारण मला पाणी आल्याचं कळतं आणि त्या टाकीत पडणाऱ्या आवाजाचा माग घ्यायला मला फा$$$$$$र आवडत, का? मला माहित नाही. आज मी पंप सुरु केला आणि थोड्यावेळाने खालच्या टाकीच झाकण उघडून बघितलं कि किती पाणी चढलंय ह्याचा अंदाज घेण्यासाठी, आणि भन्नाट चमत्कार झाला. फ्रेश ताज्या पाण्याचा मला सुगंध अनुभवता आला. वा वा, इतकं तृप्त झाल्यासारखं वाटलं जसे कि मी अप्रतिम धबधब्याचा अनुभव घेते आहे. मग काय विचारात अनेक वेळा झाकण उघडलं बंद केलं, असं करत बसून राहिले तो सुगंध अनुभवत.

काही दिवसांपासून मला फार वाईट वाटत होत कि मोगरा आणि त्याचा भन्नाट सुगंध आता फक्त पुढल्या वर्षीच अनुभवता येणार, तसेच रोजच्या वर्तमानपत्रात अनेक धबधब्याची छायाचित्रे येतात, पण प्रत्यक्ष सध्या जाता येत नाही, जाऊ नये पण, ई. ह्या सगळ्याची अनुभूती घरबसल्या मला आज अनवधानाने, अचानक पणे मिळाली त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. शतशः धन्यवाद निसर्गाला, निर्मळ पाण्याला, त्याच्या वेगाला, पाणी सोडणाऱ्या काकांना आणि बऱ्याच जणांना ज्यांनी माझ्या अंगणात हि गंगा आणली. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...