मंगळवार, ११ जून, २०२४

इडियट बॉक्स

 दूरदर्शन, दूरचित्रवाणी किंवा इंग्लिश भाषेत टेलिव्हिजन हा संच माझ्या घरी खूप म्हणजे खूपच लवकर आला, आमच्या कुटुंबाचा भाग झाला. त्या वेळी अगदी ठराविक वेळेपुरता तो चालत असे. त्यामुळे त्या वर कार्यक्रमांची मेजवानी सुरु झाली कि पडद्यावर मुंग्या दिसेस्तोवर आमची त्याला चिटकून बसत असू. तो काळच फार वेगळा होता. तेव्हा ह्या संचाला "इडियट बॉक्स" असे संबोधले जायचे प्रेमाने. पण माझी आई म्हणायची कि घर बसल्या मला सगळ्या दिग्गज कलाकारांना ऐकता येतं, सगळे कार्यक्रम बघता येतात, माहिती मिळते, मुलाखतींचा आनंद उपभोगता येतो मग हा नक्कीच बहू उपयोगी असा संच आहे. हा नसता तर घराबाहेर पडा, कार्यक्रमास्थळी जा, वाहन शोधा, तिकीट काढा आणि परत यावेळी या हे सगळं जमवावं लागलं असतं. पण टीव्ही मुळे हे काहीही न करता अनुभवता येतं. 


एवढ्यातच सतत वर्तमानपत्रात एक जाहिरात झळकते आहे एका मस्त कार्यक्रमाची. खूप विचारपूर्वक आखलेला नजराणा आहे तो माझ्या दृष्टीने. संगीत उपचार ह्या विषयावर उहापोह आहे थोडक्यात त्या ठिकाणी. पण एक तर कार्यक्रमाचे ठिकाण खूप दूर आहे, अवेळी आहे, परत यायला वाहन मिळेल कि नाही अश्या विचारात तो कार्यक्रम उपभोगता येणार नाही. त्यामुळे मग मी ठरवलं कि वाट बघायची, काही दिवस, महिने. कधी ना कधी तरी तो टीव्ही वर प्रसारित होईलच ना? आणि आताशा टीव्ही म्हणजे फक्त एक वाहिनी नाही तर असंख्य पर्याय आहेत. कोणी ना कोणीतरी माझ्या सारख्या प्रेक्षकांसाठी हे सोया निश्चित करेलच. त्यामुळे वाट बघणे हेच काय ते माझ्या हातात आहे आणि ते मी आनंदाने स्विकारले आहे. कुठेही काहीही तक्रार नाहीच, यत्किंचितही. 


मी अनेक वेळा माझ्या विविध कार्यशाळेत गम्मत म्हणून हा प्रश्न विचारते सर्वांना, कि संगणक किंवा तंत्रज्ञान म्हणजे काय? एका शब्दात उत्तर द्या. किंवा संगणक किंवा तंत्रज्ञान ह्याला एक सामानार्थी शब्द काय? लोकं विचारात पडतात आणि बरेच पर्याय सुचवतात जे त्यांना योग्य वाटतात. माझ्यामते फक्त एक पर्यायी शब्द आहे आणि तो म्हणजे संयम / पेशन्स. तसं पाहायला गेलं तर सगळंच आपल्या हातात आहे असं आपल्याला वाटतं तंत्रज्ञानामुळे. पण छे हो मुळीच नाही. संगणक चालेल, वाय फाय चालेल, पट्टाकिनी गुगल उत्तर देईल किंवा सगळी कामे ठरल्यावेळी होतीलच असे नाहीच. काय खात्री आहे कितीही महागडी यंत्रणा असली तरी शाश्वती नाहीच. त्यामुळे मी ह्या क्षेत्रात राहून पेशन्स टिकवणे, ठेवणे अगदी मनापासून एन्जॉय करते, नेहेमीच, आज तागायत. त्यामुळे हा मला मनापासून बघायचा जो कार्यक्रम आहे तो देखील घर बसल्या दिसेस्तोवर संयम बाळगणार आणि मग त्याचा पुरेपूर आस्वाद घेणार, त्यातून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करणार, भाष्य करणार आणि त्याची आठवण / स्मृती जपणार, खूप जणांना त्या बद्दल सांगणार, मला काय आवडलं ते, का तो कार्यक्रम बघावा ते, किंवा तो का आखावासा वाटला हे पोचवेन ई. 


आज २०२३ चा दिवाळी पहाट हा कार्यक्रम आणि त्या नंतर एक भन्नाट मुलाखत ऐकली यूट्यूब वर आणि मला अगदी धन्य झाल्यासारखे वाटले. त्याचे नियोजन इतके अप्रतिम होते कि मला असं वाटलं कि मी गुलाबी थंडीची मजा घेत पहाटे एखाद्या भव्य पटांगणातल्या सोफ्यावर बसून तो बघते आहे. जून महिन्यात पुन्हा एकदा दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थाने उपभोगता आला मला. "काय वर्णू तव गूण..." असं म्हणावसं वाटतं ह्या टीव्ही संचाबद्दल आणि त्या अख्या चमू बद्दल ज्यांनी हे माझ्या समक्ष मांडलं / पेश केलं. अहाहा च.    

सोमवार, १० जून, २०२४

Liberal base

Looking back, I definitely say that "I was born with a golden spoon in my mouth," though not literally. But if I think about it now, it was no less than a golden spoon. Initial care by my grandmom, mom, and most senior relatives made me what is my base. My grandmom then used to help research scholars think innovatively related to their niche domains. Then it was the turn of my first ever school: my mom's handholding, which made my base more stronger. My father was the entire university for me, and his preaching(s) still hold true, and they are with me, deeply impacted. Then it was the turn of my pre-school teachers, and the way they handled me and all children was out of this world. They practically showcased all the basic concepts with multiple examples until we all understood. Those were the days without any technological interventions or gadgets. We never learned geometry lessons in the four walls of the classroom. It was always in the open playground. Hats off to my respected teachers for introducing me to such playful techniques.


With growing years, at the apt time, a uniquely different preaching entered in the form of a new motivator. It was then the time of one of my mamaji, whose Guinness record is still intact. I wish I would have received more moments with him to absorb the universe. What a personality indeed! He sowed the seed of indirect ways to narrate the technically strong titles. I used to feel mesmerised by his use of words and phrases and manoeuvring the vehicles, his boundless knowledge.... Storytelling was the forte of my mavsi, who was, fortunately, my neighbour too. The great-connect was established due to the distance and her continuous contribution via her speeches to the betterment of society at large.


Almost all my friends—parents, siblings, neighbors, and colleagues—had cool personalities. They used to take things lightly, perform quietly, and move on consistently. Hardly any used to crib; otherwise, all were full of josh, enthusiasm, innovative approaches, linguists, artists, time management specialists, and loving personalities by default. I was surrounded consistently by such gurus all over for years together. Now I am realising their importance more and more. And I am failing to describe their worth in building me. I know I am not ruling the world or a country. I am a tiny person, but still, all credit goes to them, to my liberal, strong base.

शनिवार, ८ जून, २०२४

महत्व


एखाद्या मित्राने आपल्यासाठी जर काही केले, मदत केली, वेळेवर धावून आला तर आपण देखील त्याची परतफेड करतोच, कणभर जास्तच प्रमाणात. मित्रच कशाला कोणीही असो माणूस म्हणून आपण सदैव तत्पर मदतीसाठी, नातेवाईक, शेजारी-पाजारी, कचेरीतले कोणी, ओळखीचे, मित्राचे मित्र ई. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ह्यात भरच पडली आहे, असे म्हणायला हरकत नाही. एक मेसेज टाकला कि बहुतांशी सगळेच धावून येतात.  अनाहूत पणे पण झकास मदत मिळते, काही संस्था फक्त ह्या साठीच कार्यरत असतात. थोडक्यात काय "एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ". माणुसकी म्हणून, कोणी आपल्यासाठी काही केलं तर ताबडतोब त्याची परतफेड म्हणून सगळेच धडपडत असतातच. कोणी कष्टाने, तर कोणी पैशाने कार्यरत राहतातच. ह्या आधुनिक जगात खरं तर कोण कोणासाठी काही फुकट करतं सांगा? सगळेच फक्त फायदा बघत असतात. पण जर मी सांगितले असे एक जण आहेत जे सातत्याने दुसऱ्यांसाठी झटत असतात, यातना सोसत कार्यरत असतात, आणि हे सगळं कुठलीही अपेक्षा न ठेवता, एक महत्वाचे कर्तव्य म्हणून, जबाबदारी म्हणून, सगळे आपल्यावर अवलंबून आहेत ह्याची जाण म्हणून आणि अशी इतर अनेक कारणांसाठी. ऐका तर मग त्या अवलिया बद्दल थोडेसे, कारण त्याचे कार्य शब्दात सामावणारे नाही, चार ओळी पुरेश्या नाहीतच. 


पाण्याची शृंखला तर आपण सगळे जाणतोच, ढग कसे तय्यार होतात, पाऊस कसा पडतो, बाष्प आणि पुन्हा ढग ई. हे असे अविरत सुरूच असते कार्य. नाही का? पाऊस पडला कि जलाशय भरली जातात, मग त्या नद्या असतो, सागर, तळे, विहिरी, कालवे, समुद्र किंवा जमिनी. विविध प्रकारे पाण्याची नैसर्गिक साठवण पण होते आणि तेच साठलेले पाणी पुन्हा पाऊस पडलाय, लागणारे बाष्प तय्यार करण्यास मदत करते. प्रत्येक सजीवाला अत्यंत आवश्यक असे ते स्तोत आहे. "पाणी हेच जीवन" असे म्हटले आहे हे काही खोटे नाहीच. अगदी शेती साठी, अन्न शिजवण्यासाठी, तहान भागवण्यासाठी, स्वच्छतेसाठी, बांधकामासाठी, आणि इतर अनेक ठिकाणी पाणी हे अत्यावश्यक घटक आहे. 


बंधारे, धरणं बांधून पाणी अडवले जाते, म्हणजे साठा राहील, जवळपासच्या शेतीला उपयोगी होईल, वीज निर्मिती होईल, जमिनीत पाणी मुरले जाईल आणि पाण्याची पातळी वाढायला त्याची मदत होईल, अश्या अनेक कारणांसाठी. धरणाचे अजून एक महत्वाचे फायचे हे शहरातील लोकांसाठी आहे. त्यांना अविरत पाण्याचा पुरवठा होण्यासाठी.  नदीतलं पाणी एका दिशेने, विविध गतीने, खडक आणि इतर वनस्पती, वळणं सांभाळत वाहते. सोप्पं नाही हं ते, दिसतं फक्त आपल्याला कि हि एक साधी नैसर्गिक बाब आहे पण नाही. समुद्रातले पाणी आपल्या चवीची काळजी घेण्यासाठी, मीठ तय्यार करण्यासाठी आणि इतर कारणांसाठी आत-बाहेर करत राहते, ते देखील विविध उंची वर, गतीने, काळ-वेळेनुसार. प्रचंड कष्टमय कार्य ते. जमिनीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्ग शोधात वाहात राहणे, अधे मधे मुळांना शोषण करणे, प्राणिमात्रांची तहान भागवणे हे देखील आहेच. पिण्या योग्य पाणी तय्यार होण्याची प्रक्रिया पण सर्वश्रुत आहेच. त्यात काही औषधे मिसळली जातात, गाळले जाते, टाकीत सोडले जाते, आधी भल्यामोठ्या पाईप मधून प्रवास करायला पाण्याला भाग पडले जाते, त्या नंतर गरजे नुसार उभे-आडवे-तिरके-वर-खाली प्रवास सुरूच. ह्या टाकीतून त्या टाकीत, भल्या मोठ्या ते थोड्या वेगळ्या आकाराच्या, मग अगदी बारीक, मग प्युरीफायर कडे, प्युरिफायर च्या अतिसुक्ष्म पाईपातून नको असलेले बाहेर आणि काय काय सांगू तो त्याचा प्रवास. आणि हा प्रवास म्हणजे खाच खळगे, मार, इकडे झुकणे, तिकडे वळणे, इथे अडथळा तिथे मार्ग काढणे. एवढे अविरत कष्ट सोसत ती गंगा मैय्या आपल्या दारात उभी असते सदोदित, आपल्या साठी फक्त, आपल्या गरजेसाठी. आपण तिच्या साठी काय करतो? मनःपूर्वक दररोज, न चुकता, अनेकदा किंवा जेव्हा जेव्हा तहान भागते तेव्हा तेव्हा धन्यवाद तरी देतो का? पाण्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे हे माहिती असून प्रत्येक वेळी पाणी पितांना संवाद साधतो का? लक्ष देऊन पाणी पितो का? बसून एका जागी, शिस्तीत, शांतपणे पाणी पिण्याचा अनुभव घेतो का? ते महत्वाचे आहे हे शरीर चालू राहण्यासाठी हे पाण्याला दर्शवतो का? माझ्यामते फारच कमी वेळा आपण हे सर्व करतो.  ज्या पाण्याने तुमच्यासाठी इतके केले आहे, करत राहणार आहे त्यासाठी काही क्षण राखीव पाहिजेतच प्रत्येकाकडे. आपण केलं तर पुढची पिढी करणार आणि त्यांना देखील हे पाणी मिळणार. धन्यवाद देऊन तर बघा मित्रहो, मनातल्या मनात. 

अजून एक तरणोपाय असा आहे कि सगळीकडे म्हणजे अगदी सर्वत्र, घरी-दारी, हॉटेल, भोजनालय, रेस्टॉरंट्स ई.  मोठ्या आकाराच्या पाण्याच्या पेल्यांऐवजी फुलपात्र वापरली पाहिजेत. म्हणजे एकावेळी थोडे पाणी भरले जाईल, वाया जाणार नाही, फेकले जाणार नाही. काय भन्नाट नाव ठेवलं आहे बघा, फुल आणि पात्र, असे पाणी पिण्याचे भांडे जे भरून पाणी प्यायले कि समाधान मिळतेच. इकडे तिकडे नेण्यासाठी योग्य, सांभाळायला, रचून ठेवायला सोप्पे. क्या बात है? 

काही जण झाडं लावत आहेत, काही त्यांची निगा राखत आहेत, काही संस्था जमिनीत पाणी मुरवण्याकडे भर देत आहे, काही नद्या साफ करत आहेत, काही नद्या जोडणीचे कार्य करत आहेत, काही पाऊस अधिक चांगला कसा पडेल ह्या कडे लक्ष वेधत आहेत... आपण हात जोडूयात फक्त, मोबाईल बाजूला ठेऊन, दररोज रात्री झोपतांना, किंवा सकाळी उठल्यावर, कधीतरी जमेल तेव्हा. हि माझी कळकळीची विनंती आहे, आग्रह नाही. आपल्यासाठी, आपल्या पुढील येणाऱ्या काळासाठी, समाजासाठी तरी कराच. ह्या अश्या पाण्यासाठी तक्रारी करणारे जास्त आहेत.  

गुरुवार, ६ जून, २०२४

आदरणीय बहिणाबाई


मला अनेक अर्थपूर्ण कार्यक्रम बघायला आवडतात दूरदर्शनवर. हे कार्यक्रम म्हणजे कधी संपूर्ण पल्ल्याचे चित्रपट मराठी, हिंदी किंवा इंग्लिश भाषेतले, लघुकथांवर आधारीत लघुपट, विद्यार्थ्यांनी तय्यार केलेले छोटेपट, विविध दिग्गज कंपन्यांच्या जाहिराती, मुलाखती ई. खूप म्हणजे खूपच जबरदस्त शिकवून जातात हे सगळे कार्यक्रम मला, अत्यानंद मिळतो तो निराळाच. तर अशी मी, एक शाब्दिक मेजवानी उपभोगत होते इतक्यात. त्यात आदरणीय बहिणाबाईंचा संदर्भ दिला गेला. अर्थात त्यांनी खूप डोंगराएवढं मोठ्ठं काम करून ठेवलं आहे त्यातील एक वाक्य ऐकवले गेले संदर्भ म्हणून. ते असे होते कि "मुलीला माहेर लाभावं म्हणून माय सासरी जाते". चट्टकिनी डोळ्यात पाणी उभे राहिलेच माझ्या. किती छोटेसे वाक्य पण संपूर्ण सार कथन करून गेले. ह्या साराची पात्र होती आई, लेक, आयुष्य, पिढ्या, सासरकडची वागणूक, माहेरची आठवण, आपली माणसं, जुळवून घेणं, अथक कार्य सुरु ठेवणं आणि पेरणं. आई संबंधी असे बोल मी पहिल्यांदा ऐकले आणि कृतार्थ व्हायला झाले. "आई कुठे काय करते?" हा प्रश्न ज्यांना पडतो किंवा भविष्यात पडेल त्यांचा वरचा मजला रिकामा नसेल तर त्यांना हे उत्तर मिळेल. माहेर घडतं हे माहिती होतं पण आता निश्चित झालं. ते कोणामुळे खास करून आणि ते देखील लाडक्या लेकीसाठी? हे उमजले. आईचा सहवास, तिचे अस्तित्वच पुरेसे असते. 


सगळं जग तंत्रज्ञानाच्या नावाने जरी खडे फोडत असले तरी माझी एक खास मैत्रीण नेहेमीच त्याची तारीफ करत असते. ती म्हणते माझ्या आई वडिलांना, मित्र मैत्रिणींना, प्रेमाच्या माणसांना "ह्याची देही ह्याची डोळा" बघता येत, मनात येईल तेव्हा ह्याच तंत्रज्ञानामुळे. त्यामुळे त्यांचा जसा काही सहवास लाभतो आहे दूर असून सुद्धा हे अनुभवता येतं, ह्या पेक्षा अजून काय हवं आहे. क्या बात है? नाही? अशी ती आई, किंवा आई समान व्यक्ती, ज्या नकळत, किंवा अदृश्य असे खूप काही पेरत असतात, कार्यमग्न असतात, उहापोह न करता. अश्या सर्व माउलींना आणि आदरणीय बहिणाबाईंना मानाचा मुजरा आणि नमस्कार. सगळ्यांचा आदर द्विगुणित झाला किंवा पटीने वाढला आता माझ्या देखत.   

बुधवार, ५ जून, २०२४

रिकामटेकडी


हा शब्द जरा जास्तच वापरात आहे माझ्या सध्या, कारण खरंच मी रिकामटेकडी आहे, कामचं नाहीत. स्वेच्छा निवृत्ती पत्करल्यामुळे तर अधिकच रिकामी आहे. काल अपरात्री मला अचानक एक विचार मनात आला कि हा शब्द कसा घडला असेल. कारण माझ्या मराठीच्या शिक्षिकेने तर शब्दाचे मूळ कधीच कथन केले नाही, मी देखील ते कधीच विचारले नाही आणि फक्त ते वाक्यात उपयोग करत गेले, आज पर्यंत. नद्या आहेत, सागर आहे, समुद्र आहे, झाडं आहेत आणि असे बरेच जण आहेत, मग रिकामा व्यक्ती शी टेकडी हा शब्द प्रयोग का करावासा वाटला असेल कोणाला? मला जे समजलं, उमजलं ते मी आता इथे देत आहे. रिकामा आणि टेकडी मिळून तय्यार झालेला शब्द. टेकडी म्हणजे डोंगरासारखे आणि अर्थात स्त्रीलिंगी शब्द. कारण डोंगर हा "तो" आणि "ती" टेकडी. "दुरून डोंगर साजरे" आणि इतर म्हणी तय्यार झाल्या आहेत ह्या भल्या मोठ्या आकाराच्या नैसर्गिक रित्या तय्यार झालेल्या ठिकाणाला किंवा जागेला धरून किंवा संबोधून, सगळ्याच भाषांमधे. उंचच उंच, खडकाळ, रुक्ष, कोरडे आणि सातत्याने उभे, हेच काय ते टेकडीचे महत्व. अर्थात जंगली वनस्पती किंवा हिरवळ उगवते त्यावर पावसाळ्यात, पण त्या शिवाय काहीच नाही.  डोळ्यांना सुंदर दिसतात ते डोंगर, किंवा त्या टेकड्या, काही उत्साही त्यावर चढून जातात, व्यायाम करण्यासाठी जातात, उंच भाग म्हणजे स्वच्छ हवा, ह्या करता जातात, कारण त्याला "उंच हवेचे ठिकाण" असेच संबोधले जाते. माझ्या मते गावाला, शहराला जर टेकड्यांनी वेढले असेल तर शुद्ध आणि गार हवा वाहते.  असे काहीसे उपयोग आहेत त्या टेकडीचे. पण सर्वानुमते एक स्थिर वास्तव्य, ह्या पल्याड काहीच नाही. थोडक्यात काही जण निरुपयोगी असे पण म्हणतील. कारण नदी सातत्याने वाहते, तिच्या तळाशी जलजीव वस्ती असते, वनस्पती असतात, तसेच समुद्राचे, मागे पुढे, ने आण सुरूच, मीठ तय्यार करण्याची प्रक्रिया सातत्याने आणि जीवसृष्टी असते ते वेगळंच, खूप कुटुंब पोसतो तो समुद्र. झाडे हालतात, ऑक्सिजन, कार्बोन डाय ऑक्साईड वैगरेंना मदत करतात. थोडक्यात काय, खास असं काहीच टेकडी करत नाही, बाकीच्यांसारखं, हा दोन पायांच्या बुद्धिवान लोकांचा पवित्रा. 


आधीच्या काळी स्त्रिया उत्तम घर चालवायच्या, प्रत्येकाच्या प्रकृतीची त्यामुळे काळजी घेतली जायची. सातत्याने घर एके घर आणि स्वयंपाकघर हे काय ते त्यांचे स्थान, काम आणि ओळख होती. खूप कमी स्त्रिया कामावर जायच्या. सध्या सगळ्याच बहुतेक बाहेर पडल्या आहेत आणि स्वतःची ओढाताण करून घेत आहेत. कारण सासरच्यांना सून कमावणारी हवी आणि घरचं सगळं करणारी देखील. ती बाहेर पडून अर्थाअर्थी स्वयंसिद्धा झाली कारण मागील पिढीपासून तिला ऐकावं लागलं कि तू काय रिकामी, घरी काय काम असतं? कमवायची अक्कल नाही? बाहेर जाऊन काम करणं म्हणजे काय ठाऊक आहे का? ई. आणि अनेक असे वाक्य. अहो पण २०२४ मधे कमावून आणणाऱ्या स्त्रीला सुद्धा हे ऐकावं लागतं म्हणजे आश्चर्यच आहे, नाही का? ह्या सगळ्या पार्श्वभूमी वरून  मला असं वाटतंय कि रिकामी ती जशी टेकडी म्हणून हा जोडशब्द तय्यार झाला असावा. कार्यक्षम काय तो "तो", डोंगर पण तो, मग ह्या दोघांचा मिळून का नाही शब्द  तय्यार झाला? हे मला ठाऊक नाही.  कधी कधी रिकामटेकडा असा शब्द कानावर पडतो, पण जास्त करून तिच्या बद्दल जास्त बोललं जातं. जगातल्या सर्व टेकड्यांना आता अशी विनंती आहे कि तुम्ही जे काही कार्य करता, तुमचा हा निसर्ग, माणसे, सृष्टी ई. चालवण्यात जो वाटा आहे त्याबद्दल बोलत्या व्हा. म्हणजे कदाचित तुमच्या पायथ्याशी, किंवा तुमच्या पायाची जिला सर आहे तिला देखील कदाचित मान मिळेल, मिळवावा लागणार नाही, व्यर्थ ऐकून घ्यावं लागणार नाही.  बघा काय करता येतंय ते.  

सोमवार, ३ जून, २०२४

थापलाट


महाराष्ट्रियन घरी थालिपिठाची एक वेगळीच परंपरा आहे. ताजे ताजे तिखट असे थालिपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा, अहाहा च. काय विचारता? पर्वणीच आहे / असते ती. काही जण तूप घेतात तर काही दही, लोणचे. आवडीप्रमाणे. थालिपीठाची खास भाजणी असते, म्हणजे दोन्ही प्रकारची, उपवासाची वेगळी आणि कांदा, भाज्या वगैरे मिसळून करण्यासाठी खास अशी. हे झाले ठरवून / घाट घालून केलेले न्याहारीचे पदार्थ. किंवा मुलं घरी आली, भूक / काहीतरी दे  म्हटलं कि चट्टाकिनी थालिपीठ तय्यार, पौष्टिक आणि पोटभरीचे. माझी आई नेहेमी म्हणायची कि थालिपीठावर जी बोटे उमटतात थापतांना ती दिसायला तर खूपच उत्तम दिसतात, जशी कि एक वेगळ्या प्रकारची रांगोळी आणि तो आशीर्वाद असतो, मुलांनी पोटभर खावं, त्यांच्या वाढीला ते उपयोगी पडावं ह्या करता. 


काल मी लाल भोपळ्याचे पराठे करण्याची तय्यारी केली, पीठ मळले आणि कुकर लावायला थोडासा वेळ लागला. तो वर बघते तर काय घट्ट मळलेले पीठ थोडेसे सैलसर झाले होते. मला अजून वाढ करायची नव्हती पिठात त्यामुळे मग गोळा केलेला आधी थापल्यासारखा केला, तो एक गोल फुलक्याच्या आकाराचा  झाल्यावर मग हलक्या हाताने लाटून पराठा पूर्ण तय्यार केला. त्यामुळे दोन्हीचा आनंद घेता आला, थापण्याचा आणि लाटण्याचा सुद्धा. हे सगळं करायला थोडा वेळ गेला पण मळलेले तेवढेच पीठ वापरले गेले, भर घालायची जरुरत नाही पडली. 


दिवाळी संपल्यावर जर चकलीची भजनी शिल्लक राहिलीच तर आई त्याचे पण थालिपीठ करायची. किंवा कधी आमटी, भाजी उरली असल्यास, ते खपवण्याचं साधन म्हणजे हमखास थालिपीठ. आणि अश्या थालीपीठात मग कणिक, भाकरीचे पीठ, डाळीचे पीठ, भाजणी, तांदुळाची पिठी, काहीही ढकललं जायचं.  पण असे साग्रसंगीत केलेला पदार्थ फार म्हणजे फारच चविष्ट होत असे. 


ह्या अश्या सगळ्या अनुभुवनची मस्त उजळणी झाली काल. धन्यवाद त्या पीठाला. ते घट्ट च राहिलं असतं तर कदाचित मी पट्टापट लाटून, करून मोकळी झाले असते, थापून लाटण्याची किंवा थापलाट करण्याची वेळ आली नसती, काहीही आठवलं नसतं, जुन्या दिवसांचा फेरफटका मारता आला नसता आणि हा पंक्ती प्रपंच पण साधता आला नसता. 

रविवार, २ जून, २०२४

ऍक्युप्रेशर

 असं ऐकिवात आहे कि तळहातावर म्हणे सगळे ऍक्युप्रेशर पॉईंट्स असतात. म्हणजे शारीरिक काहीही दुखणं असलं तरी तज्ज्ञ मंडळी फक्त हातातले काही ठिकाणी दाबून बरे करतात. आधीच्या काळी जेव्हा कुठलीही अत्याधुनिक साधने नव्हती तेव्हा पाट्यावर वाटणे, रवीने घुसळणे, पोळ्या लाटणे, खलबत्यात कुटणे अशी कामे घरीच केली जात. त्यामुळे नैसर्गिकरित्या सगळे पॉईंट्स अगदी नित्य नियमाने दाबले जायचे, जसे कि प्रतिबंधात्मक उपाय. अर्थात तेव्हा घरची लक्ष्मी घरच्या कामाकडे बघायची, प्रदूषण नव्हते, अंगणातले / शेतातले सगळे ताजे जिन्नस खायला मिळत होते त्यामुळे तब्बेती मस्त होत्या सर्वांच्या. पण स्वयंपाक घरात आपसूक होणारे ऍक्युप्रेशर खूपच महत्वाचे होते, सर्वांपेक्षा, माझ्यामते. ह्याचा आज मला अद्भुत प्रत्यय आला आणि अनोख्या पद्धतीने जाणवले, उमगले. 


माझी स्वयंपाकात मदत करणारी मदतनीस एक संपूर्ण आठवडा सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे सध्या स्वयंपाक घर माझ्या ताब्यात आहे, संपूर्ण. त्यामुळे सगळी अवजारं जेव्हा मी वापरायला सुरवात केली तेव्हा नव्याने त्याचा महत्वाचा वापर नजरेस पडला. उगाच नाही "तो" काम करणाऱ्या मावशींना सुट्टी घेण्याची सद्बुद्धी देतो, ते देखील काही ठराविक दिवसानंतर. काही ठिकाणी अगदी ऑफिस असल्यासारखे मावशी रविवारी सुट्टी घेतातच. त्यामुळे आठवड्यातून एकदा त्या घरच्या स्वयंपाक करणाऱ्याला ऍक्युप्रेशर मिळत असेल, आणि अर्थात नकळत त्याचा फायदा देखील. 


मला बाकीच्यांचं ठाऊक नाही पण मी जे बघितलं लहानपणीपासून ते असं होतं कि आई ताक घुसळून लोणी काढतांना किंवा लोण्याचे तूप काढवतांना "राधा कृष्ण गोपाळ कृष्ण" असे सात्यत्याने म्हणत असे. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जाई त्यामुळे. मला पण नकळत तशीच सवय लागली. रवी हातात घेतली कि मनात जप आपोआप सुरु होतोच. किंबहुना काहीही हलवतांना, दुधाच्या पदार्थांना हाताळतांना देखील सुरु होतो जप. सवयीचा परिणाम, अजून काय. शारीरिक,  थोडक्यात अध्यात्मिक आणि मानसिक स्वास्थ मस्त सांभाळले जाते त्यामुळे. म्हणजे बघा घरी स्वयंपाक करण्याचे फायदे, असंख्य असे. अर्थात सद्यपरिस्थित सर्वांना सहज जमणे आणि त्याचा लाभ घेणे अशक्य आहे. पण जमेल तेव्हा "चेंज ऑफ वर्क इज रेस्ट" असं म्हणून करून बघा, मस्त वाटेल, आनंद मिळेल, सर्वतोपरी.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...