शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

उपवास


माझा एक बघण्याचा दृष्टिकोन फक्त. आधीच्या काळी स्त्रिया घर सांभाळायच्या आणि पुरुष शेती किंवा अर्थार्जनाचे काम शिस्तीत करत होते. त्यावेळी सोवळं-ओवळं फार कडक होतं त्यामुळे स्वयंपाक घरात सर्वांना प्रवेश नसायचा, किंवा तशी गरज भासायची नाही. त्यावेळी गोष्टच वेगळी होती. आहार भरपूर आणि सर्वतोपरी पौष्टिक असा. कष्ट आणि महेनतीची कामे खूप त्यामुळे भूक पण लागायची आणि अन्न पचयाचं देखील. त्यावेळी बहुतांशी दिवसातून फक्त दोनदा जेवण होतं असे. न्याहारी क्वचित किंवा प्रत्येकाकडची प्रथा नव्हती. पुरुषांना स्वयंपाक घरात प्रवेश ठराविक वेळी आणि स्त्रियांना घराबाहेर जाणं मोजकेच असं काहीस होतं दृश्य, सर्वमान्य असं. घरं मोठी, वाडे आणि रूढी परंपरा देखील अगदी वेगळ्या. कुठलीही तुलना नाही, पण आजच्या मानाने फारच निराळे असे सगळेचं.  उपवासाची पण एक खास बात होती. उपवास म्हणजे फक्त दूध, फलाहार किंवा पाणी, इतकंच मर्यादित. कटाक्षाने पाळायचे उपवास करणारे. फारच व्यवस्थित निश्चय आणि संयम पाळला जायचा. उपवासाचा दिवशीचे जेवण देखील फार वेगळ्या धाटणीतले असायचे. उपवासाच्या दिवशी जेवतांना ताटावरून नाही उठायचं हा नियम नाही, कधीच नव्हता, पण त्यावेळी मुलींनी वाढायचे ठरलेले होते. पंक्तीची एक वेगळी शिस्त होती. घरं नेहेमी भरलेले असायचे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याच लोकांचा राबता असायचा. भरपूर लोक एकावेळी बहुतांशी जमिनीवर / खाली बसून जेवायचे. कधी कधी जागा जशी उपलब्ध असेल तश्या प्रमाणे एका नंतर एक पंक्ती पण होतं असतं. जेवतांना बोलायचे टाळले जायचे, तो त्यावेळी अन्नाचा अपमान समजला जायचा.  तेव्हाचे ते नियम त्या वेळेनुसार संपुष्टात आलेत. ज्यांच्या घरी दोघे नोकरीला जातात, घराबाहेर पडतात त्यांच्याकडे अतिनियम पाळणे अशक्यच आहे. त्यामुळे "दोन हस्तक आणि एक मस्तक" एवढंच काय ते मनापासून अर्पण करा. "त्याच्या" साठी काही क्षण द्या नक्की तेवढं बास आहे. जेवतांना उठावं लागलं तर काहीही बिघडत नाही, उपवासाच्या दिवशी देखील. कुठलाही असा नियम कुठल्याही ग्रंथात लिहिला किंवा नमूद केलेला नाही. एक ठराव, सून, मुलगी किंवा घराची स्त्री नोकरी करणारी हवी तर मग सगळं माफ, सर्वांनी आहे तसं सामावून, समजून घेतलंच पाहिजे आणि घेतांना दिसतात बरेच जण आताशा. हा चांगला बदल आहे. नाही तर मग घरच्या स्त्रीला घरीच राहू द्या, सन्मानाने.

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

दुसरी बाजू


आपण सगळेच अगदी लहानपणी पासून ते अगदी आत्तापर्यंत अनेकदा डोंगरावर चढत गेलो आहोत. शाळेची सहल, मित्रांबरोबर किंवा घरच्यांसोबत केलेली ती चढाई. मग ती डोंगरावर असेल नाहीतर उंच देवळात, ती मज्जा वेगळीच, नाही का? आठवतेय का? काय म्हणतेय मी, अहो जेव्हा त्या पायऱ्या किंवा नुसता चढ चढल्यावर दम लागतोच. दम लागला कि आपण पाण्याचे दोन घोट घेण्यास टेकतो, दगडावर, पायरीवर, झाडाच्या बुंध्याशी, सावली बघून ई. अगदी दोन शब्द बोलणं पण तेव्हा त्या क्षणी नको वाटतं. थोडासा दम खाल्ला, दीर्घ श्वास नित्य नियमित, सुरळीत झाला कि मग एक स्मित हास्य येत गालावर आणि मग बोललं जातं. तो जो दीर्घ श्वास आपण सगळे घेतो उंच चढल्यावर, सायकल चालवल्यावर, धावल्यावर, पळून झालं कि, खेळून दमलो कि, किंवा इतर वेळी म्हणजे फक्त शारीरिक श्रम नसतात तर ते एक समाधान असते. म्हणूनच बहुतेक दीर्घ श्वास घेते वेळी बहुतांशी सर्वांचे डोळे बंद होतात आपोआप किंवा मिटले जातात. तो आनंद, अत्यानंद, संतोष काही जागावेगळाच असतो. आपल्या शरीराने मस्त काहीतरी कमावले आहे, गुरुत्वाकर्षणाने, हवा, वारा ई. ने  ते साध्य करायला मदत केली म्हणून. आपण कळत-नकळत त्या सर्वांना शतशः मनःपूर्वक धन्यवाद देतो, दरवेळी. 


हि जी नाण्याची दुसरी बाजू आहे ती प्रत्येक वेळी बघितली तर? मज्जा येईल नाही. दीर्घ श्वास फक्त योग करतांना किंवा करायचा म्हणून किंवा घेतला जातो म्हणून नाही तर कधी कधी असे दीर्घ श्वसन करते वेळी  प्रत्येकाला धन्यवाद द्या, अगदी आवर्जून. प्रत्येक दीर्घ श्वास कोणाच्या तरी नावे करून तर बघा काय कायापालट होईल तो. इतक्या वर्षात तुमच्या संपर्कात आलेले सजीव आणि निर्जीव सगळेच आठवायला सुरवात करा म्हणजे नंतर ती सवय होईलच आणि कृतकृत्य होईल. प्रत्येक राहिलेले घर, शाळा, कचेरी, प्रत्येक वस्तू जिच्या मुळे तुम्हाला मस्त शिकता आलं, डोक्यावर सुरक्षित छत लाभलं, शेतकरी ज्या मुळे पोटभर उत्कृष्ट चविष्ट चारीठाव मिळालं आणि तृप्त होता आलं, ते बाकी सर्व व्यक्ती आणि वल्ली देखील हो. चला तर मग ह्या दिनदर्शिकेनुसार सुरु होणाऱ्या नवीन वर्षी हा प्रयोग करून बघूया. सर्वांना नवीन वर्षाच्या पोटभर शुभेच्छा. 

प्रकाश झोत


ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आणि शांतपणे जर गाडी पुढे नेण्याचे संकेत द्यायचे असल्यास प्रकाशझोताचा म्हणजे डिप्पर चा वापर करतात. पण ते रात्रीच्या वेळी, अंधारातच गाडीचे दिवे प्रकर्षाने दिसणार आणि वापरता येणार ना? अर्थात काहीच वाहनचालक ह्या पद्धतीने वाहनांच्या दिव्यांचा असा वापर करतात. दिवस उजेडी मी तरी असा वापर केलेला कधीच बघितला नाही कारण त्याचा काहीच फायदा होणार नाही. डिप्पर सारखा वापरायचा म्हणजे एक कामाचं नाही का? वाढीव काम आणि त्यामुळे पुढचा सरकला तर ठीक नाही तर ते कष्ट आणि काम वायाच, उगाच मनस्ताप तो वेगळा. असो. 


इतक्यात मी एका संस्थेमध्ये सेशन घायला गेले होते. ते ठिकाणं बरेच दूर होते. गाडी चालक दिवस उजेडी सातत्याने डिप्पर वापरतं होता. इतका कि त्याशिवाय गाडी तो चालवूच शकत नव्हता. इतका जास्त उपयोग त्या दिव्यांचा बरा नाही. पण मी कोण म्हणणार. मी आपली गप्पा बसून सगळे ह्याची देही ह्याची डोळा बघत होते. त्या बिचाऱ्या गाडीच्या दिव्यांची कीव येतं होती मला, पण काहीच तरणोपाय नव्हता. आधी झाली माझी मनातल्या मनात चिडचिड पण नंतर मी ते सगळं आनंदाने स्वीकारलं, नवीन रस्त्यावर, बाहेरच्या पाट्यांवर, विविध दुकानांवर माझं लक्ष्य वेधलं आणि ते ठिकाणं गाठलं. काय हि सवय. अर्थात मी गेली इतकी वर्षे विविध गाड्या चालवल्या आहेत त्यामुळे जास्त त्रास होतो. पण दुर्लक्ष्य करणे एवढंच माझ्या हातात होतं ते मी केलं. "असे चालक येति आणि स्मृती ठेवुनी जाती". मी अनेकदा त्या वरिष्ठ, वयाने श्रेष्ठ, अनुभवी चालकाला सांगण्याचा अथक प्रयत्न केला खरा पण मी कसा श्रेष्ठ, कित्ती वर्ष कित्ती भन्नाट गाडी चालवतो ई. ची टेप सतत सुरु होती. म्हटलं "हे पालथ्या घड्यावर पाणी आहे", सोडा. 

बदल


सध्या मी विविध संस्थांमध्ये अतिथी म्हणून जाते. विविध संस्थान म्हणजे वेगवेगळ्या जागा, ठिकाणं, त्यामुळे शहरात फिरायला मिळतं. नवनवीन जागा, रस्ते, वाहतूक आणि बरेच काही सहज टिपलं जातं. एवढ्यात नजरेस पडलेलं वास्तव्य म्हणजे ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढलेली खाण्याची दुकानं आणि त्याच्याच शेजारी पानठेले. जेथे बघावं तेथे भरपूर प्रमाणात खाद्य पदार्थ मिळण्याची सोय झाली आहे खरी पण ते कितपत शरीराला योग्य आहे हे पडताळून बघितलं पाहिजे. तसेच सिगरेटचे पण आहे. इतकी जण ओढतांना दिसतात कि ज्याचं नाव ते. का? प्रत्येक वयोगटातील, आर्थिक आणि सामाजिक स्तरातील, विविध प्रकारचे काम करणारी मंडळी, आणि विद्यार्थी देखील. ह्या सगळ्यांमुळे सिगरेट किंवा तत्सम गोष्टी ओधरणाऱ्यांना आणि तो धूर कळत- नकळत संपर्कात येणाऱ्यांना धोकादायक आहेच. संगणक तज्ज्ञांनी असे काही अँप तय्यार केले पाहिजेत कि सिगरेट ओढणे आटोक्यात येईल, त्यावर धरबंध राहील, म्युझिक किंवा इतर थेरपी वापरून शांत करणे, लक्ष वेधणे ई. सल्ले मिळाले तर खूप फायदा नक्की होईल, सर्वांनाच. कुठेतरी आळा बसने अत्यावश्यक आहेच. 


बाहेरच्या खाण्या संदर्भात आठवलेली एक गोष्ट अशी कि माझ्या एक प्रमुख डीन होत्या. त्या दिवसभर लागेल एवढं सगळं घरून घेऊन यायच्या. मोठा डब्बा आणत होत्या त्या अगदी दररोज. शिवाय त्यांच्या रोजच्या डब्यात दुसऱ्यांसाठी पण काही पदार्थ भरपूर प्रमाणात असायचे. त्यांच्या कपाटात नेहेमीच कोरडे खाद्य पदार्थ, सुकामेवा ई. साठवलेला असायचा. त्यामुळे त्यांना कधीच बाहेरचं खावं लागलं नाहीच. अशी काही तरी उपाय योजना करायला हवी म्हणजे चांगलं सगळं पोटात जाईल आणि पुढे कुठलीही व्याधी होणार नाहीच. तंत्रज्ञानाची मदत सहज घेता येईल कारण आजकाल सगळंच ऑनलाईन पैसे दिले जातात, त्यात ठिकाणाचं नाव देखील येतं. त्यावरून सगळं सहज शक्य आहे. "हेल्थ इज वेल्थ" तिला सर्वतोपरी सांभाळा मंडळी. नाईलाज असेल तरच बाहेरचे ग्रहण करा. 

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

Wanted

 The beauty of any language is the words are like double sword. The meaning is reflected as you use them. Hence its so much of fun to keep using the words in different constructs always. Might be to develop, enhance and augment this habit there was an exercise since school days for all "make sentence from" the given word. 

Likewise, the actual and very well known meanings of the word wanted are:

1. Something, some items are needed, wished

2. Criminal is wanted, looking for...

But here I am now wanted by many. As I opted for voluntary retirement, my society friends, neighbours, other friends, family, kids especially, other colleges, other social media groups, relatives and many are looking to talk to me, go with me on excursions, trips, get togethers, some are waiting to get my advise regarding further education of kids and what not. The feeling is awesome, as if they were waiting for me since many years. And they make it a point to inform me that as you were so tide up for so many years we understood and never bothered you. But now you should take part in this and that, lets go places, people are inviting me to stay over and the list is big enough for me to enjoy. Its so much visible that they loved me for so many years and loving me more now. What else to ask for? Which other certificates to earn? I really feel honored. They not only stop by just telling me but go behind me, literally affectionately force me and involve me in all activities. These tiny yet important things make me feel good and wanted enough. Oops rather more than enough. Love you all.   

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

फुगलेली ++


दिड एक वर्षांपूर्वी मी फुगलेली "ती" नावाची पिटुकली कथा / अनुभव कथन केला होता. आज त्यात एक अजून भर पडली म्हटलं "नेकी और पुछपुछ", आणि ताबडतोब काढली कि माझी संगणकीय लेखणी आणि सुरु झाले. आज रविवार आणि बरेच दिवसात भेट झाली नव्हती तिची म्हणून इडलीचा बेत आखला. सकाळी इडली कुकर लावतांना माझ्या कडे काम करणारी ताई कशी म्हणते "इडली रवा जास्त चांगला नाही वापरायला, तांदूळ पेक्षा?", मी म्हटलं "हो आणि सोप्पा पण वापरायला कारण तो तस्साच न मिक्सर मधून फिरवता डाळीत / डाळीच्या मिश्रणात कालवायचा, बास". त्या वर पठ्ठी म्हणते कशी "तसं नाही हो, रवा वापरला कि ती इडली चांगली फुगते". मी इतकी म्हणजे इतकी हसले, तिला काहीही समजले नाहीच, कारण फुगणे ह्या बद्दल हे मागे लिहिलेलं सगळं तरळलं माझ्या डोळ्यासमोर. बघा फुगणे ह्या प्रकारात अजून एकाची उप्स एकीची भर पडली. क्या बात है. आधी ते पीठ फुगाव लागतं आणि तेव्हाच ती फुगते, नरम होते, भन्नाट लागते आणि सर्वांना आवडते. जसं सर्फ एक्सेल च्या जाहिरातीत म्हणतात "डाग अच्छे है", अगदी तस्सच "फुगणे जरुरी आहे".  

https://drpreetimulay.blogspot.com/2022/09/blog-post_3.html


चव


"काय वर्णू तव गूण, अल्पमती नारायण" असं काहीसं होतं माझं हा पिटुकला शब्द कानावर पडल्यावर. 

१. नारळाचा चव 

२. पदार्थांची चव 


पिटुकला दिसतो खरा पण दोन्हीला अगदी सहजी सामावून घेतलं आहे पठ्याने, अर्थात आपली मायबोलीची पण कमाल, धमाल आहेच म्हणावं. तिचं महत्व अनन्य साधारणच. तो आणि ती, अगदी पाण्यासारखी सामावून घेतली आहे ह्या शब्दाने. हवं तसं वापरा, त्या अर्थाने मग वापरात येणार आणि अर्थपूर्ण रित्या देखील. असे असतील अनेक शब्द मायबोलीत पण आज ह्याचं महत्व प्रकर्षाने जाणवलं म्हणून हा पंक्ती प्रपंच. महाराष्ट्रीयन खाणे असो किंवा कोकणी नारळाचा चव अनेक पदार्थांची चव वृद्धिंगत करतोच. दाक्षिण्यात स्वयंपाकात पण आणि अर्थात अनेक भारतीय व्यंजनात आहेच ह्याचं अढळ स्थान. 


प्रत्येक माणसामध्ये पण असे दोघांचे गूण असतातच, प्रसंगानुरूप ते बाहेर पडतात, वापरले जातात, कमी येतात. एक मुलगी, स्त्री हिला सन्मानाने बाईमाणूस असं संबोधलं जातं आणि काही वडिल किंवा मुलं आई बहिणीची माया देतातच किंवा त्या पद्धतीने सांभाळ करतात. गुरूंचे देखील नेहेमीच असे असते, कधी आई म्हणून समजावून सांगतात तर कधी वडिलांसारखे वरकरणी कठोर होतात. 


समरस होऊन जाणं हा मुळात प्रत्येक सजीवांचा स्वधर्म आहेच, आपण तो नेहेमी अंगिकारतो आणि नकळत तो उभारून येतो गरजेनुसार. त्यामुळे ह्या जीवन श्रुष्टीला त्याबद्दल आभार माना किंवा भाषेला पण कोणीही वेगळं नाही, सगळे सारखे, वैविध्य भूमिका निभावणारे असे. 


आणि हो तोच नारळाचा चव आधी चाखून बघितला, पदार्थांमध्ये घालण्याआधी तर त्याची न्यारी, अनोखी, ती उत्कृष्ट चव कळते आणि पदार्थांची चव वाढवते ते वेगळंच. तो चव ती कधी होऊन जातो हे कळण्याआधी माणूस खाऊन तृप्त झाला असतो.  

 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...