शनिवार, १७ मे, २०२५

2192: A Sense of Gratitude


When I worked full-time as a teacher, I belonged to that institution, and it belonged to me. We knew each other well. I had been a part of it for years. So, appearances didn’t matter much. A simple dress would do just fine.


But now, I’m no longer tied to one institute full-time. Instead, I’ve taken on the role of carrying forward and spreading the immense learning and rich experiences that place gave me. Somehow, this new path landed in my lap and I’ve embraced it.


These days, I find myself traveling across Pune, visiting different academic institutions to speak about research. Each place is new to me, and I am new to them. But when I walk in, I never feel alone. Along with me come all the people, ideas, and blessings that shaped me.


Though people see just me, I am merely a representative, there’s something greater behind me. I am the messenger, the voice, not the entire story.

That’s why I now choose to dress thoughtfully, with intention. Most often, I prefer wearing a saree. And because of that, my eyes are now naturally drawn to sarees, online, in shops, everywhere.


Just a few days ago, I bought a lovely cotton saree. While giving it for finishing work, a thought brushed past my mind: from the weaver who spun it, to the seller, to those who prepared it for wearing, anyone among them might have admired it. Maybe they felt, “What a beautiful saree, I wish I could buy one for myself, or for someone I love.” Even after I wear it, many others might appreciate it. It’s only human, it’s natural to admire something lovely.


So, I asked myself: What little gesture can I make to ensure that this appreciation remains pure, free of envy or discomfort, both for others and myself?


And here’s what came to me. It’s incredibly simple.

The moment you spot something that touches your heart, offer a silent nod of acknowledgment to the divine. Recognize that your ability to even desire it is a gift. If you’re fortunate enough to bring it home, place it in front of your sacred space and pause in humility. When you wear it, say a quiet prayer of joy. Before stepping out, whisper a few heartfelt words to the One who made it all possible.


That’s all. These small acts are enough to shift your energy, and others will sense the change too. It reflects in your presence.


And just to clarify, I only used the saree as an example. This feeling applies to everything, lets make it a habit dears.

२१९१: कृतज्ञता


मी पूर्णवेळ जेव्हा शिक्षिका म्हणून कार्यरत होते तेव्हा त्या ठिकाणाला मी आणि मला ते ठिकाण ठाऊक होते, माहिती होते आणि ओळखत होते, अनेक वर्षांपासून. त्यामुळे पेहेराव इतका जास्त महत्वपूर्ण नव्हता. साधा ड्रेस चालून जात होता. पण आता मी पूर्णवेळ कार्यरत नाही एका संस्थेमधे, परंतु, त्या संस्थेने जे भरभरून दिले त्याचा प्रचार, पसार करण्याचे कार्य आता मी हाती घेतले आहे किंबहुना माझ्या पदरात ते पडले आहे. संपूर्ण पुणे दर्शन सध्या होत आहे कारण मी अनेकविध शैक्षणिक संस्थानात जाते आहे आणि संशोधनाबद्दल बोलते आहे. मला ती प्रत्येक संस्था नवी आणि संस्थेला मी. प्रत्येक संस्थेत मी एकटी जात नाही तर माझ्यासोबत ज्यांनी ज्यांनी मला हा प्रचंड अनुभव, अनुभूती दिली, बहाल केली ती प्रत्येक व्यक्ती, गोष्ट, संघटना, विद्यापीठ ई. सगळेच असतात. बघणाऱ्यांना फक्त जरी मी दिसत असले तरी मी फक्त एक नाव म्हणून जाते "बोलविता ध्वनी" वेगळाच असतो. त्यामुळे मग मला साधंच पण विचारपूर्वक तय्यार होऊन जावं लागतं आणि अर्थातच मी साडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे माझ्या चार डोळ्यांना सदोदित आताशा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फक्त साड्याच दृष्टीस पडतात. परवाच मी अशी एक सुती साडी विकत घेतली, तिचे पुढील संस्कार करण्यासाठी जेव्हा दिली तेव्हा सहज एक विचार आपोआप मनाला शिवून गेलाच.  अगदी विणकारापासून ते साडी विक्रेती, मग इतर संस्कार करणारी सगळी मंडळी ह्यांच्या मनात असा विचार येऊच शकतो कि काय मस्त साडी आहे नाही? मला पण हवी अशीच, किंवा माझ्या आई / बहिणीला / बायकोला पण घ्यावी अशी. ती नेसून गेल्यावर सुद्धा अनेकांना ती आवडू शकते, सहज मनुष्य धर्म आहे हा, काहीच वावगं नाही त्यात. आणि मग ह्या मुळे यत्किंचितही कुठलाही त्रास होऊ नये म्हणून काही करता येईल का? तर सहज सोप्पं आहे. ती साडी दुकानात बघितल्यावर मला आवडली आहे हे मला समजलं / उमगलं म्हणून मनात "त्याचे" आभार माना. ती विकत घेण्याची क्षमता "त्याने" बहाल केली आहे म्हणून  धन्यवाद द्या, घरी पोचल्यावर "त्याच्या" समोर ती साडी ठेवून नतमस्तक व्हा, आणि जेव्हा नेसून बाहेर जाल तेव्हा "त्याच्या" कानावर घालून जा, "त्याला" सांगितल्याशिवाय बाहेर पडू  नका. बास इतकेच. अगदी सहज जमण्यासारखेच आहे. मग नक्कीच बघणाऱ्याची दृष्टी बदलतेंच, आणि दृष्टिकोन देखील. 

आणि हो, मी येथे फक्त साडीचे उदाहरण मांडले आहे, हे सगळ्याच बाबतीत लागू पडतं बरं का.   

गुरुवार, ८ मे, २०२५

शाळा

 मला लहानपणी माझ्या आई वडिलांनी शाळेत प्रवेश घेऊन पाठवले दररोज. शाळेची निवड त्यांची होती माझी कुठलीही परवानगी न घेता प्रवेश घेतला गेला. अर्थात ते वय असं असतं मुलांचं, कि परवानगी घेतली जात नाही आणि घेऊ शकत नाहीच. बरीच मुले अगदी आनंदाने उड्या मारत जातात शाळेत, मज्जा करतात, तर काही नाराज असतात, थोडा वेळ घेतात पण मग सगळं जुळवून घेतात. माझी मुले, शेजारी पाजारी सगळीच कडे असंच चित्र दिसतं मुलांना शाळेत घालतांना.  


"माझे माहेर पंढरी" ह्या अभंगात म्हटल्याप्रमाणे "बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई" अगदी त्याच पद्धतीने "तो" च मायबाप माझा आज देखील असं मी मानते आणि तेच सत्य आहे. अचानक एका महद-उत्साही पिल्लूला उड्या मारत शाळेत जातांना बघितले आणि सहज मनात आले कि मी अजूनही शाळेत आहे, "बाप्पाने / त्याने" मला ह्या संसाररूपी शाळेत घातले आहे. प्रवेश झाला आहे, परवानगी घेणे अशक्य कारण अडनेड माझं वय आहे. त्यामुळे नेउन बसवले आहे. आजूबाजूला सवंगडी आहेत, लहान मोठे असे, गुरु आहेत, खेळणी आहेत आणि नियम देखील. दर दिवशी किंवा बरेच वेळा खूप काही उलगडतं समोर शाळेचा दिवस सुरु झाला कि. अनेकदा शाळा आवडते, कधी नाही आवडत काही, तरी पण पुढील वर्गात एक तर जाता येतं किंवा ढकलले जाते, वरपास असे.  अगदी लहान मुले कशी बारावीच्या वर्गापर्यंत घातलेल्या शाळेत जातात, मस्त शिकण्याचा प्रयत्न करतात कुठलाही विचार न करता, अगदी उत्कृष्ट अशी शाळा आणि ह्या वयात हेच करायचे असते, टप्प्याटप्प्याने पुढे जायचे असते हेच त्यांना ठाऊक. 


मग ह्या संसाररूपी शाळेत असे बिनधास्त राहा कि? आहेत ना मायबाप, शिक्षक, मुख्याध्यापक आणि बाकी इतर सगळे सांभाळून घ्यायला. अगदी गृहपाठ, परीक्षा, वेगवेगळे आखून दिलेले तास, वेळापत्रक असे सगळे जगा. विद्यार्थी दशेत कोणीतरी जातं का विचारायला इतकेच तास का, एवढा गृहपाठ का? सगळं निमूटपणे करतो मग नेहेमीच करा. द्या "त्याच्यावर" सोपवून आणि पुढ्यात आलेलं कार्य सिद्धीस न्या. ते देखील त्याच्या मदतीशिवाय अशक्यच आहे म्हणा. 


आदरणीय पु. ल. देशपांडे म्हणतात ना "मज्जा संस्था" हे आपल्या मराठीत, तेच "नर्व्हस सिस्टीम" इंग्रजी भाषेत, बघण्याचा दृष्टिकोन आहे फक्त. "त्याने" फक्त सुख निर्माण केलं होतं असं मी अनेकदा, अनेकांकडून ऐकलं, वाचलं, आणि मानवाने केवळ त्याला दुःखासारखे बघितले आणि... असो. त्यामुळे चला तर मग दररोज शाळेचा उपभोग घेऊ यात दररोज.  

शनिवार, ३ मे, २०२५

2184: Mismatched


आज अगदी नेहेमीसारखीच एक रम्य संध्याकाळ होती. अवर्णनीय असं सुखावणारं वारं सुटलं होतं. हे सुख अनुभण्यासाठी माझ्या सोबत माझी जीवश्य-कंठश्य लेक होती, असंख्य ओळखीचे लोक होते सोसायटीतले, माझे सगळे आवडीचे मित्र-मैत्रिणी होत्या (वयवर्षे २), आणि अजून इतर बरेच जणं. तेवढ्यातच एक आजी आल्या, अगदी मनमोकळेपणाने बोलणाऱ्या. त्या माझ्या मते ८६-८७ वयोगटातल्या तरुणी आहेत आणि असंख्य अश्या त्यांच्या आठवणी, किस्से, गमती-जमती सांगत असतात नेहेमीच. त्या आमच्या सर्वांसोबत कट्ट्यावर बसणार होत्या आणि तेथे उंच-सखल भाग होता, त्यामुळे मग मी त्यांना हात दिलाच पण सांगितले, बोटाने दाखवले, त्यांचे लक्ष वेधले कि खाली बघा आणि मग पाय टाका. तेव्हा माझ्या चार डोळयांनी काही मस्त टिपले नकळत असे. त्या जो वर होत्या आमच्या सोबत गप्पा मारत तो वर माझं ध्यान सगळे गप्पांमधेच होते, पण जेव्हा त्या परत जायला निघाल्या तेव्हा पुन्हा एकदा ती पायरी दाखवण्यासाठी खाली बघितले आणि क्षणात विस्मृतीत गेलेले पुन्हा बघितले आणि मग मनातल्यामनात हशा पिकलाच. क्या बात है, काकूंनी मस्तपैकी दोन पायात दोन वेगळे रंगांचे, ढंगांचे, सुताचे, प्रकारचे मोजे परीधान केले होते, नकळत कदाचित. आणि त्या मस्त मौला फिरत होत्या, किंबहुना मिरवत होत्या. त्यांना दिसलं नाही घालतांना, का समजलं नाही, जाणवलं नाही का मिळाली नाही जोडी मोज्यांची आयत्या वेळी हे मला ठाऊक नाही, पण काहीही कारण का असेना त्यांनी ती रम्य वेळ संध्याकाळची चुकवली नाहीच, आल्या जे दिसलं ते घालून, मस्तच नाही का? अहाहा च. माझे बाबा म्हणायचे ना आपण करू ती फॅशन, अर्थात आपण काही जगावेगळं करत नाहीच कधीच.  पण अडून राहायचे नाही, थांबला तो संपला. पुढे जाणं अत्यंत महत्वाचे. मी एकदा एका आंतरराष्ट्रीय प्रवासात बघितले कि एक तरुणी भराभर विमानतळावर वावरते आहे, सगळी प्रवासासंबंधी कामे करते आहे प्रवासी  तिच्या संपूर्ण चकरांदरम्यान बघते तर काय तिने चपलांची जोड घातली होती, एक सारखीच पण वेगवेगळ्या रंगांची. उदाहरणार्थ, एका पायात निळी तर दुसऱ्यात पिवळी. मग न राहवून तिची कामे उरकल्यावर तिला गाठून विचारलं तर म्हणते कशी हि आत्ताची फॅशन आहे, विजोड घालण्याची. ते फार उत्कृष्ट दिसतं होतं, त्या ठिकाणाला अगदी शोभेसं, मनापासून आवडलं मला ते. ह्या आजींच्या मोज्यांमुळे मी १५-१८ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवू शकले, पुन्हा जगले आणि ताजेतवाने झाल्यासारखे झाले मला. 


एक जाड, कॉटन किंवा लोकरीचा मोजा तर दुसरा नायलॉन सारख्या पातळ धाग्यांचा आणि त्यांचे मजेत मिरवणे मी कधीच विसरू शकणार नाहीच. कोणीही त्यांना काहीही म्हटले तर नाहीच, आणि जर कोणी विचारले असते तर काकूंनी हसण्यावारी नेले असते, अगदी सहज असे, मनापासून आवडले मला ते.  

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

ध्यानाच्या लहरी: सामूहिक कल्याणाचा मार्ग


मी गुरुवर्यांकडून, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साधकांकडून आणि संशोधकांकडून असे ऐकले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट तास किंवा दिवस सातत्याने ध्यान, जप, मंत्रोच्चार किंवा पठण करते, तेव्हा त्याचे सकारात्मक तरंग अनेक सजीवांपर्यंत पोहोचतात आणि ते सर्वांसाठीच उपयुक्त ठरते. मला खात्री आहे की 'सजीव' या शब्दांमध्ये प्राणी, पक्षी, झाडे, फुले, वेली, फळे, भाज्या आणि पिकाऊ जमीन या सर्वांचा समावेश होतो. "वसुधैव कुटुंबकम्" या उक्तीप्रमाणेच, सर्व सजीव एकमेकांच्या साथीने प्रगती करतात. याचा अर्थ रामनामाचा, जपाचा आणि मंत्रोच्चारांचा महिमा खूप मोठा आहे. काही संशोधक तर या सकारात्मक लहरी सुमारे बत्तीस हजार लोकांपर्यंत पोहोचू शकतात असे आकडेवारीसह सांगतात. कदाचित याच कारणामुळे पूर्वीच्या लोकांना या गोष्टीची माहिती असल्यामुळे ते होम-हवन आणि इतर पूजा-अर्चा मंदिराच्या किंवा घराच्या प्रांगणात करत असत, जेणेकरून त्याचे लाभ शक्य तितक्या लवकर सर्वांपर्यंत पोहोचतील.

आज आपण आधुनिक जीवनशैली स्वीकारली असली तरी, प्रत्येकाने नित्यनियमाने एक माळ जप, मानसपूजा किंवा स्तोत्र पठण यांसारखे उपक्रम करायला हवेत. हे केवळ काही ठराविक लोकांसाठी किंवा समुदायांसाठी नाही, तर आपल्या स्वतःसाठी आणि वातावरणाच्या शुद्धतेसाठी तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.

माझी आई ताक, खीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ बनवताना आणि रवी फिरवताना सतत "राधा कृष्ण गोपाळ कृष्ण" असे म्हणायची. ते पाहून नकळतपणे आम्हालाही ती सवय लागली. आता तर वरण बनवतानासुद्धा सहजपणे कृष्णाचे नाव घेतले जाते. लहानपणी सकाळी उठल्याबरोबर जात्यावरच्या ओव्या, "कराग्रे वसते लक्ष्मी...", भूपाळी आणि त्यानंतर तुळस पूजन व्हायचे, मग देवाची पूजा आणि मग हे गोपाळ कृष्णाचे नामस्मरण. नैवेद्य दाखवताना मंत्रोच्चार आणि जेवायला बसताना "वदनिकवळ घेता..." म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये त्याचे स्मरण होत असे. मुलांची नावे घेतानाही त्याचे नाव मुखात येत असे. विविध माध्यमातून, प्रत्येक सणाला आणि व्रतवैकल्यांना घरोघरी प्रत्येकाकडून नाम घेतले जायचे. आता धावपळीच्या जीवनात हे सर्व मागे पडले असले तरी, जमेल तसे आणि जमेल तेव्हा याचा प्रयत्न नक्की करावा.

ब्रह्मकुमारी आश्रमाने सांगितल्याप्रमाणे, दर तासानंतर  एक मिनिट डोळे मिटून शांत बसण्याचा आणि बाहेरची हिरवळ पाहण्याचा नियम ठेवा. मीटिंगमध्ये असाल तरी पुढील तासाच्या कामासाठी हा छोटा ब्रेक खूप महत्त्वाचा आहे. शक्य असल्यास या वेळेत प्रार्थना करा, स्वतःशीConnect व्हा आणि 'त्याच्याशी' एकरूप होण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी, रविवारी काही क्षण आपल्या पृथ्वी मातेसाठी आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी नक्की द्या. दोन हस्तक आणि एक मस्तक पुरेसे आहेत; कुठेही आणि कधीही नामस्मरण करा, पण एक निश्चित ठिकाण आणि वेळ पाळा आणि सकारात्मक लहरी निर्माण करा.

२१८०: तरंग


मी असं ऐकलं आहे गुरुवर्यांकडून, श्रेष्ठ आणि जेष्ठ साधकांकडून आणि अर्थातच संशोधकांकडून कि एका व्यक्तीने काही खास तास, किंवा दिवस सातत्याने ध्यान केले, जप केला, मंत्रोच्चार केले, मंत्रांचे उच्चार केले, पठण केले तर ते अनेक सजीवांपर्यंत पोचतं, सर्वांनाच उपयोगी पडतं. मला खात्री आहे कि सजीव म्हणजे सगळेच, प्राणी, पक्षी, झाडं, फुलं, वेली, फळं, भाज्या, पिकाऊ जमीन ई. असणारच. "वसुधैव कुटुम्बकम्" प्रमाणे सगळेच सर्वांच्या साथीने पुढे मार्गस्थ होतात. म्हणजे बघा तो रामनामाचा, जपाचा, मंत्रोचारांचा महिमा, अगाध आहे. काही संशोधक तर आकड्यात मांडतात कि बत्तीस हजार जणांना त्या लहरी, तरंग पोचतात.  कदाचित हे आधीच्या लोकांना माहिती असल्यामुळे होमहवन आणि बाकी पूजा अर्चा ह्या मंदिराच्या किंवा घराच्या प्रांगणात होत होत्या, म्हणजे अधिकच लवकर त्या सर्वांपर्यंत पोचतील. 


जरी आता आपण सर्वच अत्याधुनिक जीवन शैली अंगिकारली असेल तरी देखील दररोज न चुकता एक माळ, मानसपूजा, स्तोत्र पठण असे उपक्रम करावेत, सर्वांनीच, काही थोड्या लोकांनी किंवा समुदायांनी नाही. फक्त आपल्यासाठी नाही, आपण करू शकतो म्हणून, सर्वांसाठी, वातावरणशुद्धी साठी, वातावरण निर्मिती साठी निश्चित करावे. 


माझी आई ताक करतांना, खीर किंवा कुठलेही दुधाचे पदार्थ करतांना, घुसळतांना, रवी वापरतांना "राधा कृष्ण गोपाळ कृष्ण" असे सतत म्हणत असायची. ते फक्त बघून आपोआप ती सवय आम्हाला लागलीच, न कळत. आता तर वरण सारखे करतांना सुद्धा सहज मुखातून कृष्णाचे नाव घेतले जातेच. अगदी आधी सकाळी उठल्याउठल्या जात्याच्या ओवी म्हणायच्या, "कराग्रे वसते लक्ष्मी...", भूपाळी, त्या नंतर तुळस पूजन होत असे, मग देवाची पूजा, त्या नंतर असे हे गोपाळ कृष्णाचे नाव, नैवैद्य दाखवतांना मंत्रोच्चार, पानावर बसतांना "वदनिकवळ घेता...", म्हणजे प्रत्येक वेळी त्याचे नामस्मरण होत असे. मुलांची नावे उचारतांना पण त्याचे नाम मुखी येत असे. विविध माध्यमातून, प्रत्येक सणाला, व्रतवैकल्यांना घरोघरी नाम घेतले जायचेच, प्रत्येकाकडून. आता प्रवाहपतित झाल्यामुळे हे सगळं जरी मागे पडलं असलं तरी जमेल तसे, जमेल तेव्हा प्रयत्न कराच. ब्रह्मकुमारी आश्रमाने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक एक तासाने एक मिनिटाचा अवधी हा डोळे बंद करण्याचा ठेवा, बाहेर हिरवळ बघण्यासाठी राखून ठेवा, मिटिंग सुरु असली तरी, पुढील तासात काय साध्य करायचं आहे त्या साठी हा पिटुकला ब्रेक अत्यावश्यक आहे, हवं असल्यास प्रार्थना करा ह्या वेळेत, स्वतःशी कनेक्ट व्हा, "त्याच्याशी" होण्याचा प्रयत्न करा, आठवड्याच्या शेवटी रविवारी हमखास काही क्षण आपल्या धरणीमाते साठी, आपल्या पुढील पिढ्यांसाठी नक्की वापरा. दोन हस्तक एक मस्तक पुरेसे आहे, कुठेही कधीही तर कराच नामस्मरण, पण एक ठिकाण, एक वेळ पाळा आणि तरंग निर्माण करा. 

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

२१७३: जगावेगळा सुगंध


मी दररोज हा सुगंध अनुभवतेच पण आज खास काही विशेष जाणवलं. दिवसभर उन्हाने माती कोरडी होते, कुंडीतली झाडे कोमेजू नये म्हणून दररोज सकाळी मी त्यांना पाणी घालण्याच्या निमित्याने त्यांच्याशी संवाद साधते, गप्पा मारते, कृतज्ञ होते आणि सुगंध अनुभवते. मोगरा भरभरून आला आहे बाल्कनीत, कन्हेरी पण बहरली आहेच, तुळस तर विचारू नकाच आणि ह्या शिवाय तो अत्यंत प्रिय, वेगळा, हवाहवासा असणारा मातीचा सुगंध, दिवस बहरून, फुलून असा सुरु होतो. माझ्या ओळखीच्या काही संशोधकांनी हाच मातीचा सुगंध त्यांच्या प्रयोगशाळेत निर्माण केला आहे आणि ते त्याचा उपयोग अनेक वेळा करतात. जेव्हा जेव्हा त्यांना असं दिसून येतं कि प्रयोगशाळेत खूप तास काम करून सगळे दमलेत तेव्हा त्यांना ताज तवाने करण्याचे काम हा मानव-निर्मित मातीचा सुगंध करतो.  काही क्षण ते लॅबोरेटरीत मातीचा सुगंध फवारल्यासारखा करतात, न विचारता, अचानक आणि मग सगळेच त्याचा आनंद घेतात. 


बाकी बऱ्याच ठिकाणी हा असा सुगंध असलेले रूम फ्रेशनर्स मिळतात हल्ली. मी असं ऐकलं आहे कि ह्या अश्या अनोख्या सुगंधाचा पर्फुम / अत्तर पण तय्यार केलं आहे कोणीतरी आणि ते वापरात पण आहे म्हणे. जेव्हा अश्या प्रकारचे पर्फुम किंवा रूम फ्रेशनर्स तय्यार करतात तेव्हा माणसाच्या कातडीला अपाय होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली जाते, किंवा जर कोणी कपड्यावर त्याचा प्रयोग केला तर डाग पडू नये म्हणून तसा फॉर्मुला वापरला जातो. 


मग सहज माझ्या मनात विचार आला, हा मातीचा अप्रतिम असा सुगंध नक्की आहे कोणा साठी? फक्त माणसांसाठी, त्यांना पुढील कामात ऊर्जा मिळावी म्हणून, का हि एक फक्त नैसर्गिक प्रक्रिया आहे?


त्याच उत्कृष्ट अश्या सुगंधानेच माझ्याशी संवाद साधत मला उत्तर दिले देखील. तो म्हणाला आणि मला समजलं कि हा सुगंध फक्त माणसासाठी नसून तो झाडांसाठी आहे, मुळांसाठी, फळं - पानं - फुलं - पक्षी - जमिनीखालचे कीटक / प्राणी ई. साठी पण आहे हो. सर्वांनाच ऊर्जेची, कामे / दैनंदिनी पुढे नेण्याची गरज असते. त्यामुळे हा मातीचा दरवळ खूप जणांसाठी निर्माण केला आहे. मला सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करणाऱ्या सर्वांना आणि लॅब मध्ये देखील काम करणाऱ्या सर्वांना अशी विनंती आहे कि ह्या मुळांसाठी, फळं - पानं - फुलं - पक्षी - जमिनीखालचे कीटक / प्राणी ई. साठी पण असा एक पर्फुम / फ्रेशनर शोधून काढा म्हणजे अधेमधे तो झाडांवर किंवा मातीवर फवारता येईल आणि अवतीभोवती सर्वांनाच त्याचा लाभ होईल. जशी म्युसिक थेरपी चा वापर सर्रास करतात मुळांसाठी, फळं - पानं - फुलं - पक्षी - जमिनीखालचे कीटक / प्राणी ई. साठी, तसाच ह्याचा पण करावा पण योग्य असा. फळं - फुलं ह्यांचे उत्पन्न वाढवण्याकरता नाही.  त्यांना प्रफुल्लित वाटण्यासाठी फक्त. पण तो फॉर्मुला पानांवर, फांद्यांवर सहज सोप्पा असावा, इजा न करता आनंद घेता यावा असा. 


तिन्ही पातळीवर असणाऱ्या सर्वांना लाभ होण्यासाठी काय सुंदर नैसर्गिक प्रक्रिया साधली आहे आणि कुठलीही अपेक्षा न करता ते तो सुगंध सर्वांना देत राहतात, जमिनीच्या खाली, झाडांना  आणि माणसांना (लहान, थोर,  मोठे, गरीब, श्रीमंत सर्वांना), आणि त्यावर  फळं - पानं - फुलं - पक्षी ई. ना पण. क्या बात है? "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण". 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...