गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

2265: From Neighbor to Network


My day started on an incredibly high note, something truly wonderful happened, and I can barely find the words to explain my feelings.

I’ve known her since she was just three months old. Today, at 19, she has gracefully entered one of the world's best institutes to pursue a thoughtfully designed interdisciplinary engineering course. As neighbors, I witnessed her growth firsthand and her ascent into the most astonishing, multifaceted personality. I am immensely proud of her giant efforts and see this as a true validation of awesome parenting.

The journey started when she was three months, and today, she sent me a connect request on LinkedIn. Wow.

I was literally in tears for many reasons:

1. She remembered me, 

2.She grew up so quickly and understood the importance of this vibrant platform and professional networking, 

3. She felt like connecting with me. That shows the countable activities I engaged in were meaningful enough for a youngster like her to seek this connection. I became truly speechless.

I was truly speechless. I should mention that as a simple teacher at heart, a small-town girl from a Marathi-speaking school with nothing "fancy" to attract the new generation, receiving this request made me feel exceptionally validated.

All the very best to one of the brightest upcoming engineers I know! Her achievements across music, health, and simplicity are testaments to her remarkable, well-rounded personality.


2264: A tale of a visitor

A tale of a visitor at the new society: He visited a family friend, who recently purchased a new flat in the outskirts of the city. After grilling the friend, the new owner, about the features of the society, amenities provided, good, bad, and worst, recommendations to buy/invest here, and why they purchased, after almost an hour or two, he (the guest) finally got up to say goodbye. The guest was leaving. The new flat is on the first floor. The host showed the walkway/staircase way to go down, but the guest insisted on going by lift. The guest is young, or rather, always shows off how young he is physically and mentally to everyone possible. So such a person opted to go down to the ground floor to catch the cab by lift. And the electricity went off. The host shouted to come out of the lift, and guests kept arguing, but you said there is a backup, right? So why should I come out? The door was getting closed; it's a closed capsule lift. Even though the guest was not ready to accept it, he is around 70+, but still he continued with the argument about backup. Somehow the host literally pulled him outside. OMG, what was this? And why remain so adamant? What do you achieve? When and where to argue is still not clear? Why?

Clarity is a must in life. Only because there is a lift with backup as an amenity, everyone without need should use it? Why? No, big no. 

What if the backup system fails and the guest gets locked up for a couple of hours? In closed capsule lifts with no electricity supply, it's very hard to breathe, and why enter into a scary situation for no reason? 

२२६३: धक्कादायक बदल


अगदी मला समजायला लागले तेव्हा पासून मी हेच बघत मोठी झाले, घरी दारी कि दसरा म्हणजे सर्व घराची साफसफाई, भली मोठी रांगोळी दारात, उत्कृष्ट  तोरण दाराला, भल्या मोठ्या प्रमाणात केलेल्या नारळ वड्या, नैवेद्याला नारळी भात आणि इतर साग्रसंगीत संपूर्ण भरीव थाळी, नवीन कपडे, खूप म्हणजे खूप जणांचे घरी येणे आपटयाची पाने द्यायला, सीमोल्लंघन, देवळात मोठ्या पुरुषांनी, मुलांनी जाणे, लहानांनी आजूबाजूच्या थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, दिवसभर भरभरून असे अनेक कार्यक्रम. घरी असतील तेवढ्या गाड्या धुणे, पुसणे, पूजा करणे, हार घालणे आणि तिला त्या दिवशी संपूर्ण आराम देणे. अगदी तसेच साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे ऐपतीप्रमाणे सोनं विकत घेणे, किंवा जर प्रत्येक गुरुपुर्ष्यामृताला घेत असल्यास, किंवा दसऱ्यानिमित्य आधीच खरेदी केली असल्यास मग पैसे खर्च न करणे ई. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कुटुंबासमवेत, घरासोबत, गाडी सोबत, अंगणात क्वालिटी वेळ घालवणे असे. येणा जाणाऱ्यांशी पोटभर गप्पा मारणे, विविध पदार्थ खाणे आणि एकंदरीत मज्जाच मज्जा, आरती, प्रसाद, धार्मिक वातावरण. सगळ्यांकडेच असेच वातावरण, सर्वत्र सारखेच, उत्कृष्ट असे, काहीही फरक नाहीच. त्यामुळे अजून मज्जा यायची. कित्ती म्हणजे कित्ती असंख्य आठवणी आहेत माझं मलाच माहिती. आई खास भरतकाम विणकाम करून छोटीशी पिशवी शिवून द्यायची. ती घेऊन सगळ्या घरी जायचं सोनं वाटायला आणि ती पिशवीभर खाऊ आणून द्यायचा आईला, अगदीच काही आवडीचं  मिळालं तर यथेच्छ ताव मारायचा त्यावर. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आम्ही घरी रात्री कोणीच जेवायचं नाहीच इतका प्रसाद खाल्ला जायचा.  


आता मी अगदी अत्यानंदाने अतिशय मनाला भावणारी शांतता अनुभवते आहे आज, खास अशी. गाडी नाही त्यामुळे त्याचं काम नाही. आणि बाकीचे काहीच करावेसे वाटत नाही, म्हणजे निराशेने वगैरे अजिबात नाही, समाधानाने. बाप्पाने इतके आधी करून घेतले आहे कि आता कुठलीही जबरदस्ती नाही, मोजमाप नाही, उणेदुणे नाही त्यामुळे उत्कृष्ट अशी भरभरून शांतता आहे. शाळेत, महाविद्यालयात, नोकरी करत असतांना, आईच्या घरी असतांना सलग अनेक वर्ष सगळं उपभोगलं  अगदी दोन भल्यामोठ्या प्रदर्शन्या देखील, रामनगरची आणि धंतोलीतली. दरवर्षी, न चुकता. तो मसाला पापड, आकाश पाळणा, हसरे चेहेरे, मौत का कुआ आणि इतर छोटे झुले. अहाहा च. काय दिवस होते ते? भन्नाट. मन तृप्त होईपर्यंत सगळं केलं, आता तो अल्बम फक्त बघायचा, सिम्युलेशन म्हणतात ना तसे.  आता बकेट लिस्ट उरलेली नाहीच कारण कधी ती केलीच नाही, माहीतच नव्हती, आणि सगळंच मनात यायच्या आत, काय म्हणतात तसे फोमो वगैरे समजायच्या आत मिळालंच, भरभरून, मग काय उरणार सांगा. इतकं सुंदर आयुष्य कोणाला जगायला मिळतात हो? ते देखील सेल्फी नाही, महागडे फोन नाही, भरमसाठ पैसे नाहीत, महागडी गाडी नाही, उगाचच बाहेर जाऊन खाणे नाही. सगळं कसं शुद्ध सात्विक असं. 


 कुठेही गाजावाजा न करता, पडद्यामागे राहून त्याने प्रीती नावाची,  किंवा ह्या प्रीतीसाठी स्क्रिप्ट लिहिली. ती इतकी भन्नाट होती कि ह्या पेक्षा जास्त त्यात काहीच असू शकत नव्हतं. अगदी शाळकरी वयात खूप सेवा घडली हातून, आपोआप, काहीच करावं लागलं नाही खास, वेगळं, वेगळ्या वाटेने जाऊन वगैरे. मग महाविद्यालयात देखील अजून त्यात वृद्धिगत व्हायला मिळालं आणि खूप वेगळ्या स्तरावर कामे झाली, मदत करता आली, पूजा-अर्चा, व्रत वैकले घडून आली हातून. सत्संग, किंवा त्याच्या सातत्याने सानिध्यात राहायला मिळालं, "त्याच्या" महिमा कानावर पडत राहिल्या आणि मी घडत राहिले. शाळा असो किंवा कॉलेज तेव्हा बहुतांशी प्रत्येक सणाला सुट्टी असायची. ७५% उपस्थिती प्रार्थनीय होती, त्याचा बडगा नव्हता. विविध स्क्रीन्स नव्हती, उत्कृष्ट वातावरण, जेवण होतं, नोकरी सुरु झाली, सासरी पदार्पण झाले तेव्हा सगळं सहज आणि जमेल तेवढं करता आलं कारण सर्वोत्तम सगळं करून झालं होत तोवर, अनेक वेळा, अनेक ठिकाणी.  ते जे करून घेतलं ते इतकं मनःपूर्वक होतं कि समाधानाची परिसीमा म्हणायला हरकत नाहीच. काय आहे ना तो सुप्रीम फोर्स, किंवा तो माझा बाप्पा. मी  तर आज पुन्हा एकदा हे सगळं आठवून, छे छे, मी कोण, माझी काय बिशाद कि मी आठवेंन सगळं हो, त्याने आठवण करून दिली, जसा कि भाला मोठा चित्रपटाचं जणू, आणि परत एकदा त्याच्या पायी नतमस्तक झाले, आभार मानले, परिपूर्ण झाले हे निश्चित. हे असं अद्वितीय आणि अद्भुत किती जणांच्या वाट्याला येत हे मला ठाऊक नाही  पण त्या भाग्यवंतातली एक निश्चित आहे. ह्याचा अर्थ मला आता करायचे नाही, बाकी करतात ते व्यर्थ असे नाहीच मुळी. आज मी हि अशी आहे. बास. 

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

२२६२: चवीमागचं रसायनशास्त्र

 काही महिन्यांपूर्वीची ही गोष्ट आहे. माझ्या एका लाडक्या मैत्रिणीने, जी माझी शेजारीणदेखील आहे, तिने वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी सुरु केली. मग काय, माझ्यासारखी खवय्यी शांत बसणार कशी? तिने ठरवले होते की प्रत्येक पदार्थाचे दोन प्रकार करायचे: एक म्हणजे अतिशय पौष्टिक, आणि दुसरा तोच पदार्थ पण नेहमीसारखा. माझ्यासाठी ही पर्वणीच होती! मी अर्थातच पौष्टिक पद्धतीने केलेल्या प्रकाराला मंजुरी देत ऑर्डर दिली. इतकी भन्नाट चव होती, की ज्याचे नाव ते!

मग तो सिलसिला सुरूच राहिला. ती पदार्थ करत गेली आणि मी, माझी लेक यथेच्छ ताव मारत गेलो. पदार्थ दरवेळी चविष्ट तर असायचेच; पण उत्कृष्ट रित्या मांडणी केलेले, गरमागरम आणून दिलेले आणि सहज-सुलभ देखण्या पॅकिंगमध्ये असल्याने खाण्याची मजा अधिकच वाढायची. अनेक आठवणी निर्माण झाल्या. तिला खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा प्रसन्न आहे, याची मला वेळोवेळी जाणीव झाली. तिच्या घरचे किती भाग्यवान आहेत, हेदेखील प्रकर्षाने जाणवले.

आता माझे वास्तव्य मोठ्या भावाकडे आहे, त्यामुळे मला इच्छा असूनही तिच्या हातची चव चाखता येत नाही, ऑर्डर करता येत नाही. म्हणून, आणि हातात थोडा वेळ आहे म्हणून मग मीच विडा उचलला आणि कामाला लागले. आधी आठवून आठवून सगळे साहित्य आणले. मग यथोचित जुळवाजुळव झाल्यावर रगडा पॅटीस नावाचा तो पदार्थ—तोही पौष्टिक प्रकारात—बनवायला घेतला.

जिन्नस आठवणीने आणणे, भिजवणे, उकडणे, साल काढणे, चिरणे, शिजवणे, भाजणे, चटण्या करणे... अबब! केवढी मोठी यादी ही! कित्येक प्रक्रियेतून तावून सुलाखून मग ती एक सुबक सुंदर डिश तयार होते. सगळं करता करता माझी तर दमछाकच झाली.

एवढे करूनही तिच्यासारखी उत्कृष्ट चव माझ्या पदार्थाला आली नाहीच! पण मला महदाश्चर्य वाटले की, ऑर्डर्स घेणे, त्या नेटाने पूर्ण करणे आणि त्यात सुबकता आणणे किती अवघड आहे! माझ्या मैत्रिणीची कमाल आहे! या व्यतिरिक्त घरची असंख्य कामे, नियोजित व्यायाम, मुलांना शिकवणे, सातत्याने हास्य कायम ठेवणे, सर्वांशी गप्पा मारणे, घरच्यांची काळजी घेणे, अध्यात्मिक बाजू सांभाळणे—ही यादी न संपणारी आहे. ऑर्डर्स घेणे हा तिच्या व्यवसायाचा भाग असला तरी, ते आव्हान अजिबात सोपे नाही. याची प्रचिती मला आज पुन्हा एकदा आली. धन्य ती रूपाली.

तिच्या हातून अशीच खवय्यांना मेजवानी मिळत राहो, हीच सदिच्छा!

(मला स्वयंपाकघरात काम करणे इतके आव्हानात्मक वाटण्याची काही कारणे आहेत. मी खूपच लवकर ह्यात पडले, माझ्या आजूबाजूला ज्या सगळ्या सख्या होत्या तेव्हा आणि त्यांच्या मोठ्या बहिणी, ते वातावरण, बाहेर खायला अजिबात न मिळणे किंवा ती पद्धत माहित नसणे (खिजगणतीत नसणे), घरच्याच पदार्थांची माहिती असलेली महती आणि निर्माण झालेली प्रचंड आवड, सातत्याने केलेले प्रयोग, ह्या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे मी अनेकदा माझ्या आईला म्हटलं देखील दहावी झाली आता बास शिक्षण, मला स्वयंपाक करायचा आहे, घर सांभाळायचं आहे. पण कुठले काय, तिने मला विद्यावाचस्पतिच करून सोडले. मग काय सगळेच सुटले, आणि ते कायमचेच. मावशी सगळं सांभाळायच्या आणि मी कॉलेजचे काम. )


सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

२२५९: नवीन मोटर कार छोट्यांसाठी मैदानी खेळ?


गेले काही दिवस मी एक नवीन संकल्पना उदयास येताना बघते आहे, ती म्हणजे लहान मुलांसाठी तयार केलेली मोठी खेळण्यातील मोटर कार. ही मोटार मुले (३ वर्ष वयोगटातील मुलांसाठी) स्वतः चालवू शकतात किंवा रिमोटने आई-वडीलही चालवू शकतात; मुलाने फक्त ऐटीत आत बसायचे, बास. बटनांवर चालणारी, बॅटरी असलेली ही गाडी आठवणीने आणि सातत्याने चार्ज करणे आवश्यक असते, अन्यथा ती चालणार नाही. या मोटारीची किंमत ऐकून तर माझी दाही बोटे तोंडात गेली; बापरे, इतकी महाग! आणि त्यात रिमोटचे सेल, बॅटरीची देखभाल, इत्यादी खर्च वेगळेच. आणि हे सगळे कशासाठी? 

पालक यामागचे कारण काय देतात? तर तो घरी कंटाळतो, सतत मोबाईल/टीव्ही बघतो, आम्ही कामात असतो, त्याला खेळायला खाली घेऊन गेले की तो नुसता पळतो, रस्त्यावर गाड्या येतात, म्हणून त्याला ह्यात अडकवून ठेवायचे. या गाडीत म्हणे गाणी लागतात, मोठ्यांच्या मोटारीसारखी बहुतांशी सगळी सोय आहे, दिवे आहेत, ती मागे-पुढे होऊ शकते आणि बरेच काही.

फक्त माझ्यामते, तीन आणि पुढील वयाच्या मुलांना भूक कशी लागणार जर ते धावले नाहीत, खेळले नाहीत, आणि त्यांना ऊन मिळाले नाही तर? मैदानी खेळांचे महत्त्व सर्वश्रुत आहेच, मग हे असले निष्क्रिय खेळ सध्या कशाला?

मला अजूनही आठवतंय, माझी मुलं जेव्हा लहान होती, तेव्हा सोसायटीत नवीन असल्यामुळे खेळाचे मैदान तयार नव्हते. माझ्या मते, किमान दोन वर्षे मी त्यांना दररोज ऑफिसमधून आल्यावर गाडीत घालून कुठल्या ना कुठल्या मोठ्या बागेत घेऊन जायचे. माझ्यासोबत त्यांना सांभाळणारी मदतनीस असायची, आणि मग ते मनसोक्त खेळायचे. मुलांच्या योग्य वाढीसाठी काहीतरी करणे भाग आहे.

ती गाडी बघून मला कमालीचं वेगळं वाटतं. त्या मोटारी एकतर खूप मोठ्या आकाराच्या आहेत आणि त्या ठेवायला जागा व्यापतात. मुलांना असं रिमोटने चालवणं किंवा त्या छोट्या मुलाला आत्तापासून अशा गोष्टी दररोज करायला देणं... नकोच! उंची वाढणे, ताकद येणे, भूक लागणे, सगळ्या मित्रांशी मिळून मिसळून खेळण्याची सवय होणे, पडणे, धडपडणे, चढणे, चालणे, पळणे, मातीत खेळणे, जंतूंची ओळख होणे, हे सगळं त्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी खूप काही महत्त्वाचे आहे. नुसती दिवसभर स्क्रीन किंवा एका जागी बसून राहणे पुरेसे नाही.

याऐवजी: व्यायामबद्ध जीवनशैलीसाठी कितीतरी संस्था आहेत; मुलांना तिथे घेऊन जाणे आवश्यक आहे.


रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

२२६१: ती

अगदी लहानपणापासून, काहीही समजायच्या आत, फक्त घरच्यांकडूनच नाही, तर शेजारी आणि संपूर्ण समाजाकडून माझ्या कानावर नेहमी एकच सूर पडला. तो काळ 'का?' हा प्रश्न विचारण्याचा नव्हता; मोठ्यांनी सांगितले तेच अंतिम सत्य. प्रत्येक क्षणी एकच गोष्ट सांगितली जायची: "नीट बस, नीट उठ, सासरी जायचं आहे."

जेवताना, बोलताना, वागताना,  प्रत्येक गोष्टीत सतत एकच पालुपद असायचं: "हे सगळे सासरी उपयोगी येईल." माझ्यावरच नव्हे, तर माझ्या सर्व मैत्रिणींवरही हात राखून खर्च केला जात असे.  घर आवरणे, स्वयंपाक, रांगोळी, गाणे, बागकाम, पूजा-अर्चा,  (ही यादी खूप मोठी होती) अशी सर्व स्तरावर जडणघडण होत होती. जणू आमची जडणघडण फक्त आणि फक्त त्या 'सासर'साठीच होत होती. "हे घर तुझे नाही, ते तुझे खरे घर आहे" असे सतत बिंबवले जायचे. 'काळा दोरा, खोटे दागिने घालायचे नाहीत, मोठ्याने हसायचे नाही, उगाच बोलायचे नाही...' असे संस्कार नकळत कोरले गेले.

हे संस्कार जणू  हवेत पसरलेले प्रेम इतके मस्त  होते की, आम्हा सगळ्या मैत्रिणींनी ते खूपच उत्साहाने स्वीकारले. आम्ही एका अद्भुत दुनियेत वावरत गेलो, मोठ्या कधी झालो कुणास ठाऊक? एकच उत्कट वाट पाहणं होतं की 'तो' येणार, मग आपण संपूर्ण विश्व जिंकायला मोकळे होऊ! तोच सर्वेसर्वा असेल, तो सर्वकाही करेल; तो म्हणजे काय, याची उपमा देण्यापलीकडे होती.

आज वाटते, इतकी वर्षे घरच्यांनी, शेजाऱ्यांनी आणि समाजाने घेतलेले अतोनात कष्ट व्यर्थ नाही गेले. ते व्यर्थ नव्हतेच, पण वास्तव खूप वेगळे होते. तो प्रेमाचा फुगा फुटला नाही, तो कायमचा विरून गेला. हवेतले ते प्रेम कुठे लुप्त झाले कुणास ठाऊक, गाडले गेले, की पुरात वाहून गेले!

या मागे मला आता दोन कारणे जाणवतात:

पहिले कारण: आमची घोडचूक. मुलींनी एका अदृश्य स्वप्नाची इतकी वाट बघितली, बहुतेक सगळं काही दुसऱ्याने करायचं बाकी ठेवलं, किंवा आहे त्यापेक्षा कैकपटीने सर्वोत्तमच चित्र रंगवलं. अर्थात, 'दुरून डोंगर साजरे' असं झालं.

दुसरे आणि महत्त्वाचे कारण: मुलींच्या मागे लागण्यातच सगळे कष्ट करत होते, वेळ देत होते, त्यांना घडवत राहिले, फक्त आणि फक्त 'ती' ला. पण 'त्या' चे काय? त्याला कोणी सांगितले का तितक्याच प्रेमाने की त्याला एका मुलीचा, तिच्या कुटुंबीयांचा, आणि तिच्या भावनांचा सांभाळ करायचा आहे? जसे तिला सांगितले गेले: 'असा बस, असा उठ, असा खर्च कर,' तसे त्याला शिकवले गेले नाही. 'सांभाळणे म्हणजे काय, मुलगी म्हणजे काय?' हे त्याला सांगितलेच गेले नाही.

बरं, सोशल मीडिया नव्हता, तरी पुस्तके होती, वाचनाला वेळ होता, वाचनालये होती. अनेक मुले आम्ही किती मोठे वाचक आहोत यावर अभिमान बाळगतात, मग समाजात बघून, लेखांकडून किंवा स्वतःच्या बुद्धीने तरी त्यांनी थोडी तयारी का केली नाही? ना स्वभाव पातळीवर, ना सामंजस्य पातळीवर, ना वैचारिक पातळीवर तसूभरही तयारी नसताना त्यांनी जोडीदार आणला. आणि मग, झाले संपले! अपवाद वगळता सर्वत्र चित्र फारच विद्रूप आहे. यामुळे विस्फोट, विद्रोह आणि अनेक स्तरांवर भरकटायला झाले.

अर्थात, आता या सगळ्या गोष्टी सोडून देत देत जीवनप्रवास पुढे सुरू राहिला आहे. आता स्वीकारले आहे, जे होणार होते, तेच झाले, आणि जे झाले तेच सर्वोत्तम होते. 'एकला चालो रे' या वृत्तीने, प्रत्येक क्षणी आनंद शोधत, मनःपूर्वक सर्वांना धन्यवाद देत, कुठलीही ढवळाढवळ न करता मार्गस्थ होणे, बाप्पाने दाखवलेल्या दिशेने जाणे, गोड आठवणींना उजाळा देणे, आणि 'प्रेम सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरवणे' हे सगळे मी अत्यानंदाने स्वीकारले आहे.

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

2243: Back to basics


I love the concept of the bell curve. Ever since I learned about its shape, its formulation, and what it tries to depict, I have been fascinated by it. Hats off to the creator of this concept.

With a lot of free time on my hands and enjoying my "Weekend Forever," literally a new YouTube video stood in front of me and I was captivated by it from beginning to end, due to multiple reasons: the podcast brand's name, the thumbnail, and the topic of discussion itself.

I love to go back to my school days in my mind. I often "visit" my old classroom, those benches, the blackboard, the huge ground, my classmates, and our simple, delicious tiffin. This video added another reason for me to stay there longer, in a simulated, visualized way. Those were awesome days, completely relaxed, full of fun and joy. For me, and I'm sure for many others, it was a time of continuously dreaming about happy things. Negativity never touched me back then; to be frank, I wasn't even aware it existed. But as we climb higher steps in life, in all senses, we get surrounded by unwanted things.

This video helped me come back to basics. The speaker powerfully suggested pronouncing the basic Marathi alphabets loudly and methodically. As per her research, chanting them twice daily can help activate every cell in the body, to overcome minor pains and health issues. What a simple yet terrific technique! The moment you start, you can feel almost every crucial part of your body getting involved. The results are mesmerizing as it takes you back to your school uniform, those benches, fun and group chanting. It's truly nostalgic.

Connect with the speaker and try it yourself. After climbing that high peak, it feels good to come back to basics, doesn't it?

hashtagNostalgia hashtagSimpleJoys hashtagWellness hashtagWeekendForever hashtagBellCurve hashtagSchoolDays hashtagMarathiAlphabet hashtagBackToSchool

https://lnkd.in/dhAnY2xU

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...