गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2442: When “He” decides, everything aligns

 Ideally, a devotee seeks the Divine.

But sometimes, the Divine decides to arrange the meeting.

Today, on Narasimha Jayanti, I experienced exactly that.

What began as a simple plan to attend a nearby ritual turned into something far deeper. A temple of Lord Rama… transformed, through an artist’s incredible work, into the form of Narasimha. So seamless, so powerful—it was hard to believe the original form beneath.

It wasn’t just the visual. It was the experience.

Kirtan after years. Aarti. Mahaprasad.
And above all, a quiet, unhurried presence, no rush, no distractions, just being there.

What stayed with me most was this:
When “He” decides, everything aligns.
You don’t go searching, He comes closer, in a form you may not expect.

Perhaps all forms are one, appearing differently across time.
And perhaps, every temple leads to the same presence.

A simple wish, to be at a certain place on a sacred day, fulfilled, effortlessly.

Grateful for moments like these.

#Gratitude #SpiritualReflections #NarasimhaJayanti #Faith #DivineTiming

२४४१: दर्शनाचा योग

 खरं तर भक्ताने देवाकडे, देवदर्शनाला जायला हवं. पण जेव्हा देवाला स्वतःच दर्शनाचा योग जुळवून आणायचा असतो, तेव्हा हे असंच घडतं. तोच येतो, वेगळ्या रूपात, स्वरूपात. "त्याला" किती काळजी बघा हो कमालच आहे.

असं वाटतं, सरतेशेवटी सगळे एकच. त्या त्या वेळी, वेगवेगळ्या रूपात अवतार घेतलेले. कुठल्याही देवळात जाणं तितकंच योग्य.

जयंतीच्या दिवशी तरी ठराविक देवळात जावं, ही भाबड्या भक्ताची आशा… आणि ती अशी पुरवली आज त्याने.


आज श्री नृसिंह जयंती. आमचं कुलदैवत, माहेर आणि सासर दोन्ही कडून. आईकडे मोठ्या प्रमाणावर, पण घरच्या घरीच, शास्त्रोक्त पद्धतीने साजरी होत असे आणि अजूनही होते. त्यानंतर अनेकदा श्री नीरा नरसिंहपूरला दर्शनाला जाण्याचा योग आला. दरवर्षी मग पूजा आणि उपवास एवढंच साधलं जायचं. श्री नृसिंहाची देवळंही फार ठिकाणी नाहीत.

म्हणूनच जेव्हा ह्या वर्षी अगदी माझ्या घराजवळच एक वैशिष्ट्यपूर्ण पूजा संपन्न होणार आहे हे समजलं, तेव्हा जावंसं वाटलं. आणि योग आला जाण्याचा, महाप्रसाद घेण्याचा आणि एका वेगळ्या अनुभूतीचा.

ते खरं चतुर्भुज श्रीराम मंदिर आहे. पण एका मूर्तिकाराने, कलाकाराने इतकं अभूतपूर्व नक्षीकाम केलं होतं की त्याच चतुर्भुज रामाचं रूप आज श्री नृसिंहाचं झालं होतं. इतकं अभूतपूर्व काम मी आजतागायत पाहिलं नव्हतं. कधीच वाटणार नाही की ती मूर्ती मूळतः श्रीरामांची आहे, पण बाह्यरूप मात्र आज श्री नृसिंहाचं होतं.

खूप तास लागले ते करायला त्या कलाकाराला. मी जेव्हा त्यांच्याशी बोलले, तेव्हा ते म्हणाले की ते खरं तर पेंटिंग केलं आहे. मला पाहताना तो चंदनलेप असल्यासारखं भासत होतं. जादूच आहे त्यांच्या हातात. "त्याने" करवून घेतलेलं हे सर्वोत्कृष्ट काम.

माझ्याकडे तर शब्दच नाहीत वर्णन करण्याकरता. इतकं ते विलोभनीय दृश्य होतं. श्री नृसिंह इतक्या जवळ येऊन मला दर्शनाचा लाभ देतील, हे स्वप्नवतच वाटतं खरं.

मला केवळ दूर जायला नको म्हणून कीर्तन, आरती, महाप्रसाद, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळ मूर्ती श्रीरामांची, मंदिर श्रीरामाचं आणि स्वरूप मात्र श्री नृसिंहाचं कमाल आहे "त्याची".

मी लग्नाआधी कीर्तन ऐकलं होतं. आता बघा, किती वर्षं उलटून गेलीत. कीर्तन म्हणजे शेवटी काय कथाकथन, गोष्टीरूपी त्याचं दर्शन, त्याला संगीत आणि वाद्यांची साथ. पण ते "ह्याची देही ह्याची डोळा" अनुभवणं म्हणजे एक पर्वणीच. आणि तिचा लाभ मला आज, आपोआप झाला.

 "तो" फक्त आला नाही अगदी जवळच्या ठिकाणी, तर गाडी घोडे धाडले घ्यायला, प्रसाद घरपोच आणून देण्याची सोय केली. फक्त उपस्थिती अपेक्षित होती माझी तेथे आणि घडवून आणलं सगळं. खूप वर्षांनी, अगदी शांतपणे कुठलीही घाईगडबड नाही, उद्या कचेरीत जाण्याची घाई नाही, पहाटे उठून डबे नाहीत असं पोटभर दर्शन आणि सगळे विविध कार्यक्रम साधता आले, याबद्दल त्याचे मनःपूर्वक आभार. 

बुधवार, २९ एप्रिल, २०२६

2440: From Turbulence to Clarity… A Simple Practice

A small yet powerful moment from "Mere Sai" serial on Sony Liv stayed with me today.

A devotee once asked Sai, "Please perform a miracle so my business becomes successful. I have already failed in three ventures." Sai gave him an earthen pot and asked him to fetch water from a nearby pond. 

The first time, the water was muddy.
The second time, it was still muddy.
The third time, it appeared clear.

He brought the water back. Sai then added a handful of soil into it again. The devotee got frustrated. "Why did you spoil it again? How will this quench your thirst?" Sai calmly replied, "Wait. Let the soil settle. The water will become clear again."

And then He explained:

"Your mind works the same way.
When it is disturbed, your decisions go wrong.
So before taking any important decision, pause.
Take some water, add soil, and let it settle.
Till then, chant Ram’s name. Speak your thoughts to Him.
Allow the disturbance to settle. A clear mind always shows a clear path."

For me, the real takeaway is this:

"Don’t do this only in moments of urgency.
Make it a daily practice to chant Ram’s name.
It gradually cleanses the mind.
So when the time comes to decide, your mind is already clearer, calmer, and more aware."

https://www.youtube.com/watch?v=y38_pItDfxM%20

(watch%20till%20first%2010.05minutes,%20Sai%20and%20Raghunath%20conversation)


२४३९: गढूळपणातून स्पष्टतेकडे एक साधा मार्ग


आज "मेरे साई" सोनी वरची एक सिरीयल मधील एक छोटासा प्रसंग मनात खोलवर उतरला.

एका भक्ताने साईंना विनंती केली, माझा व्यवसाय यशस्वी व्हावा म्हणून काही चमत्कार करा
तो पुढे सांगतो, मी आतापर्यंत तीन व्यवसायांत अपयशी ठरलो आहे. 
साईंनी त्याला एक मातीचं भांडं दिलं आणि जवळच्या तळ्यातून पाणी आणायला सांगितलं. पहिल्यांदा पाणी गढूळ होतं, दुसऱ्यांदा पुन्हा तेच, तिसऱ्यांदा तेच पाणी शांत आणि स्वच्छ दिसलं. तो पाणी घेऊन आला, साईंनी पुन्हा त्यात माती टाकली, भक्त चिडला "हे काय पुन्हा पाणी खराब केलं आता तहान कशी भागवणार?". साई शांतपणे म्हणाले, "थांब माती खाली बसू दे पाणी पुन्हा स्वच्छ होईल", आणि मग त्यांनी सांगितलं

जीवनात आणि व्यवसायातही असंच होतं, मन गढूळ झालं की निर्णय चुकतात, म्हणून निर्णय घेण्याआधी थांब, रामाचं नाव घे, रामाशी बोल, आणि माती खाली बसू दे.

फक्त गरज पडली तेव्हाच नाही, तर रोज नियमितपणे रामनाम घ्या, ते मनातली गढूळपणाची थर हळूहळू कमी करतं, आणि जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते, तेव्हा मन आधीच अधिक स्वच्छ स्थिर आणि सजग असतं. घाईत घेतलेले निर्णय चुकतात, शांत मनातून घेतलेले निर्णय टिकतात, रामनाम ही फक्त गरजेची गोष्ट नाही ती मन स्वच्छ ठेवण्याची सवय आहे.

https://www.youtube.com/watch?v=y38_pItDfxM (watch till first 10.05minutes, Sai and Raghunath conversation)


रविवार, २६ एप्रिल, २०२६

२४३८: साध्यातलं असाधारण

आमचं छोटंसं चौकोनी कुटुंब. त्यात आम्ही तिघे चारीठाव जेवणारे. पण माझा थोरला भाऊ मात्र फक्त पोळी भक्त. भात तो बघायचा पण नाही. मला लहान असल्यामुळे असेल किंवा मी भात भक्त असल्यामुळे असेल, समजायचंच नाही की हा भात का खात नाही?

त्याचं खरं कारण मग लक्षात आलं.

आम्ही जेवायला बसलो आणि मी भात कालवला. मस्त साग्रसंगीत. भरपूर तूप, मीठ, आमटी वगैरे. की मग तो माझं ताट काढून घ्यायचा. म्हणायचा कसा, तुझ्या सारखा भात कोणीच कालवत नाही. मी म्हणायचे की मी माझा खाते आणि तुला दुसरा कालवून देते. पण नाही. पहिला वहिला कालवलेलाच मस्त असतो म्हणायचा. काय त्यात अप्रूप वाटायचं कोणास ठाऊक. पण भात खायचा तर मी कालवलेलाच. हे जणू एक समीकरणच झालं होतं.

हा सिलसिला बरेच वर्ष सुरू राहिला. आणि मग थोडा काळ पुढील शिक्षण, दोनाचे चार, नवीन ठिकाणी रुळवून घेणं यात गेला. आणि मग काय विचारता, माझ्या पिल्लांनाही माझ्या हातचा भात फार आवडायला लागला. कुणाला खाऊ घालायला आवडणं, हीच एक वेगळी भाषा आहे हे तेव्हा कळलं.

माझे बाबा पार रस्त्यावर उभे असायचे माझी वाट बघत. मी कधी ऑफिसमधून येते ते. हे बहुतांशी रोजचंच. पण ते खरी वाट बघायचे ती शनिवार रविवारची. किंबहुना शुक्रवारची.

मी आले की संध्याकाळी सुरू त्यांचे प्रश्न. उद्या काय करणार? कुठला पदार्थ? सुट्टी आहे तुला? मला फक्त पदार्थाचं नाव सांग. आणि मग सगळं लागणारं साहित्य आणून, धुवून, चिरून, अगदी साग्रसंगीत तयार करून ठेवायचे. आणि म्हणायचे आता कर.

मी काही फार उत्तम शेफ नव्हते. पण ते सर्वोत्तम कौतुक करणारे होते. उत्साह वाढवणारे होते. घरी वैविध्य पदार्थ करून खाऊ घालते माझी लेक याचं त्यांना खूप कौतुक होतं. प्रोत्साहन द्यावं तर त्यांनीच. कधीच नावं ठेवली नाहीत. कधी फटकारलं नाही. ते सगळं गोड मानून घ्यायचे.

आज मी असाच एक खिचडीचा भन्नाट प्रकार करून फस्त केला. कालवताना हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं डोळ्यांसमोर उभं राहिलं.

अशा तुमच्याही काही साध्या पण खास आठवणी असतील, तर नक्की शेअर करा.

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

2437: Readymade

I must have been in 4th standard when my father introduced a concept that our small town in Maharashtra had never seen before readymade construction.

Precast slabs, ready walls, structures assembled rather than built brick by brick. Back then, I did not understand how new or revolutionary it was. Nor did I realize why I naturally lean toward research and curiosity. Perhaps it was always around me. Perhaps it was him.

Despite being in a government job, he constantly experimented, innovated, and thought ahead of his time.

Today, I was reminded of him.
I came across an award-winning construction project completed in record time. Curious, I explored further and there it was again: readymade slabs, prefabricated walls, modular construction. The same principles now used in flyovers, metro bridges, and large-scale infrastructure.

Temporary factories set up on-site.
Work running 24 hours a day, in three shifts.
Machines operating relentlessly.
Deadlines conquered. Awards earned.

And yes, people involved workers, supervisors, engineers... surely got their rest in shifts.

But I paused at a different question.

What about the machines that ran non-stop for N days?
What about the land that never slept?
What about mother nature, whom we so lovingly call “mother”?

Does she not deserve silence, stillness, recovery?

What about the tiny lives beneath the soil? the insects, organisms, ecosystems quietly sustaining the earth?

What about the birds nesting nearby who never disturbed us, yet are forced to flee?

Who gave us the permission to disrupt everything around us in the name of speed and recognition?

They do not protest.
They do not complain.

But does their silence mean acceptance?

I am not against innovation. In fact, I come from it.

But must innovation always come at the cost of disturbance?
At the cost of noise, pollution, imbalance?

We celebrate “24×7 productivity.”
But should nature also be forced into that schedule?

If we can design silent kitchen appliances,
if we can engineer precision in the smallest devices why can’t we build quieter construction systems?

Why can’t sustainability be as important as speed?

Let things grow at their own pace.

Let progress be mindful, not forceful.

Before approving and applauding such projects, pause and ask:

Who else is paying the price for this speed?

Because the ones who suffer the most are often the ones who cannot speak.

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

२४३६: एकट्याचा खेळ


माझ्या फ्लॅटच्या अगदी जवळ ओपन जिम आहे. तेथे रहिवाश्यांची सतत ये-जा असते. पण आज अचानक एक वेगळाच आवाज आला, जणू काही तरी अतिशय जोरात पडलं आहे असा. म्हणून काळजीपोटी मी दरवाजा उघडून बघते तर काय? आणि हे साधारण दुपारी दोनच्या सुमारास झालं बरं का. ती जिममध्ये फेरफटका मारण्याची वेळ नाहीच.

तर बघते तर काय? एक साधारण दहावीतील मुलगा चेंडू-बॅट खेळत होता. पुन्हा एकदा वाचा मंडळी, एक मुलगा क्रिकेट खेळत होता. तेव्हाच माझ्या लक्षात आलं बरंच काही. मी क्रिकेटर अजिबात नाही, तरीदेखील मला हे ठाऊक आहे की एकट्यानं कधीच क्रिकेटचा खेळ खेळला जात नाही, किमान दोन व्यक्ती लागतातच. अर्थात, जर कोणी मोठ्या प्रमाणात खेळणारा खेळाडू असेल, तर तो कधी कधी एकटा खेळतो, पण त्याला सराव असं संबोधलं जातं. मग तो बॅटिंगचा असो किंवा बॉलिंगचा, सरावाच्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन असतं. बॉल आपोआप पुढ्यात येतो, आजूबाजूला जाळी लावलेली असते, कधी कधी बॉल बांधलेला असतो आणि तशी ती जागा असते.

हे काही तरी प्रकरण वेगळं जाणवलं म्हणून मी ‘विनंती’ या शब्दाने सुरुवात केली.

मी: "दादा, अहो ही क्रिकेट खेळण्याची जागा नाही. ओपन जिम आहे फक्त. आजूबाजूला लोक राहतात. अग्निशामक यंत्रणा आहे काचेच्या दाराच्या आत..."

दादा चढ्या आवाजात: "जिम आहे ना, मग? इथे नाही तर कुठे खेळायचं?"

मी: "खाली, बाहेरच्या जागेत, मोकळ्या जागेत."

दादा जरा जास्त तोऱ्यात: "बाहेर ऊन आहे. खाली गाड्या आहेत, त्यांना लागलं तर? आणि मी सिझन बॉलने खेळत नाही आहे. साधा टेनिस बॉल आहे, तो लागत नाही..."

मी: "जमल्यास इथे खेळू नका. ऊन उतरल्यावर खाली खेळा. पुन्हा एकदा विनंती आहे."

मला अंदाज आला होता की हा असा का बोलतोय, इतक्या वरच्या पट्टीत बोलतोय आणि बॉल आक्रमकपणे मारतोय, म्हणजे काही तरी गडबड निश्चित आहेच. म्हणून मग मी तिथेच थांबून आत आले. एकटा खेळायला आलेला बघूनच, आणि आमचं बोलणं झाल्यावरदेखील दोनदा फारच विचित्र असे फटके मारून स्वारी निघून गेली.

हाच जोश, हाच उत्साह, हीच ऊर्जा योग्य मार्गाने वळवायला हवी. नाहीतर वाया जाईल आणि कदाचित नुकसानदेखील होऊ शकतं.

मी अनेकदा वाचलं आहे, ऐकलं आहे, अनुभवलंदेखील आहे की सर्वोत्तम असा गुण जर कुठला असेल तर तो म्हणजे ऐकण्याची कला. त्यानंतर नम्रपणा आणि बाकी इतर. इथे काहीच आढळलं नाही मला. शब्द खाली पडू दिलाच नाही त्याने. हे मला ठीक आहे, पण समाजात, कचेरीत आणि इतरत्र उपयुक्त ठरणार नाहीच.

हा कशाचा परिणाम आहे हे मला ठाऊक नाही, पण त्या तरुणाने, त्याच्या आई-वडिलांनी आणि अशा प्रकारची वर्तणूक ठेवणाऱ्या इतरांनी जागं होणं गरजेचं आहे. आधी काहीतरी घडवा, मोठे व्हा. आवश्यक असेल तेव्हाच आवाज चढवा. असो.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...