मंगळवार, १६ जुलै, २०२४

खरे कारण


फ्लॅट संस्कृतीला का लोकांनी थारा दिला, का त्यांना बैठे घर पद्धतीपेक्षा फ्लॅट भावाला? असंख्य कारणे आहेत, काही ठळक: सुरक्षा, सोयी, शेजार, समुदाय, वैविध्य कार्यक्रम, देखभाल आपोआप होते, स्वच्छता, आणि बरेच काही. पण ह्या सर्वांच्या पल्याड पण एक कारण आहे. फ्लॅट्स म्हणजे गगनचुंबी इमारती. एका प्लॉट वर अनेक कुटुंब राहतात. बैठे घर म्हणजे एका छोट्या किंवा मोठ्या प्लॉट वर / जागेवर फक्त एकच कुटुंब. इथे जमीन मालकीची नसते, पण अनेक जण त्यावर राहत  असतात. ते मागे पुढे राहायला येतात, एकाच वेळी नाही. काही जण फ्लॅट्स विकतात, खरेदी करतात आणि असे अनेक वेळा होते. त्या एका जमिनीच्या तुकड्यावर जेव्हा एक कुटुंब राहते तेव्हा फक्त एकदाच त्या वास्तूची पूजा होते, झाली असते कितीतरी आधी जेव्हा ते घर बांधले असते आधीच्या पिढीने.  पण फ्लॅट म्हणजे जितकी कुटुंबे तितक्यावेळी त्या एका प्लॉट वर पूजा. आपल्या भारतातले पुजारी मोठ्या आवाजात पूजा सांगतात, करतात, मोठ्याने आरती म्हणतात, त्यामुळे फक्त ज्या फ्लॅट मधे पूजा होत असते फक्त त्यांनाच नाही तर आजूबाजू, वर खाली अगदी सर्वांना ते मंत्रोच्चार कानावर पडतात, एक सुंदर, भावपूर्ण, भक्तिमय वातावरण निर्मिती होते आणि त्याचा उपयोग खूप दिवस दिसतो, कळतो, आणि पोचतो देखील सर्वांना, सर्व सजीवांना. ह्या महत्वाच्या कारणासाठी देखील फ्लॅट जास्त भावत असतील प्लॉट पेक्षा. असा माझा अंदाज तर आहेच पण ती वास्तू देवता देखील जास्त प्रमाणात आणि चांगल्या कुटुंबीयांना नक्कीच बोलवत असणार, साद घालत असणार, त्या शिवाय हे घडणे नाहीच. 

अँप चा वेढा


सध्या अगदी सगळेच जण आप-ला असं म्हणणं पूर्णतः विसरले आहे. आपले घर, गाव, माणसं, मित्र, सखा आणि इतर. आता देखील आहेत, भरमाढ आहे पण वास्तवात नाहीत आणि आताशा अस्तित्वात नसलेले पण आहेत, AI च्या कृपेने. असंख्य अँप ने अक्षरशः वेढले आहे सर्वांना सर्वत्रच. शब्दांमध्ये मांडण्या पल्याड असे आहे सर्व. जो बघावं तो फक्त अँप ची भाषा बोलतो, अँप वर असतो, त्यांच्याशीच हुतगुज करतो, संपर्कात राहतो, गरज नसल्यास देखील. असो. कालाय तस्मै नमः !!! काळाचा महिमा अगाध. आणि हे सर्व दूर पसरलेले आहे, फक्त शिक्षितच नाहीत, ह्या किंवा त्या गटातले नाही तर सगळेच एका माळेचे मणी असे झालेत. म्हणजे व्यापारी पण त्यांचा फायदा किंवा व्यापार वाढवण्यासाठी त्यांच्या पद्धतीचे, किंवा त्यांच्यासाठी तय्यार केलेले अँप वापरतात, आणि आपण जे ग्राहक असतो ते वेगळे व्हर्जन. 


काही दुकानांसमोर तर अँप शी सलंग्न असलेले आणि सामान पोचते करणारे च जास्त घेरलेले असतात, इतकी घाई असते त्यांना जगावेगळी कि तेच काय ते फक्त काम करतात बाकी सगळे रिकामटेकडे. 


आणि अश्या स्थितीत, अश्या वेढलेल्या जगात जर मी तुम्हाला सांगितले कि एक असा अवलिया आहे जो मस्त पैकी धंदा करतो आहे गेले अनेक वर्षांपासून, त्याच्या कडे ओंलीने पेमेंट ची सुविधा आहे, कार्ड मशीन आहे, अत्याधुनिक दुकान आहे, माल खूप चांगल्या दर्जाचा ठेवतो आणि एक सातत्य आहे. उगाच नको ते तो ठेवतच नाही किंबहुना तय्यारच करत नाही. त्याच्या कडे जाऊनच माल आणावा लागतो. मी मागल्यावेळी गेले तेव्हा विचारले कि तुम्ही घरी पाठवू शकाल का काही मागवलं तर. तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. ज्यांना यायचं आहे ते येथेच येऊन घेऊन जातात मॅडम. नको ते अँप्स. आणि खरंच त्याचे दुकान / बेकारी कुठल्याही अँप वर नाहीच आहे. कोणाला तरी पाठवा किंवा स्वतः घेऊन जा, बास. अँप वर न राहता धंदा करता येतो, खप होतो, व्यापारी आनंदाने जगू शकतो,  हे सगळं लक्षात येतं ह्या दुकानदाराकडे बघून आणि खूप समाधान मिळतं. जे आहे ते खूप आहे हा कल आवर्जून आवडला मला त्याचा. वाहवत नाही गेला तो हे  करणं अवघड आहे जेव्हा आजूबाजूची सगळीच दुनिया भलत्याच्या पाठिमागे धावते आहे तेव्हा.  माझ्या दृष्टीने एकंदरीत सुरक्षा, न हपापता धंदा करणे, आणि तो उत्कृष्ट रित्या चालवणे गुणवत्ता सांभाळून हे अँप शिवाय आधी पण चालत होतं आणि आता देखील चालतंय.   

सोमवार, १५ जुलै, २०२४

काटेकोर


मला आज  एका शासकीय कचेरीत काम होते. त्या साठी एक व्यक्ती म्हणे मला मदत करणार होता. त्याचा नंबर मला त्याच्या बॉस नी पाठवला शनिवारी आणि म्हणाले कि ह्या व्यक्तीला संपर्क करा तो तुमचे काम करण्यासाठी मदत करेल. मग काय साधारणतः ९.३० च्या सुमारास मी त्यांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांना निरोप पाठवला, म्हणजे मेसेज केला तरी देखील काहीच उत्तर नाही. मग पुन्हा काही वेळाने प्रयत्न केला, केले पण व्यर्थ. मग न राहवून त्या व्यक्तीच्या मालकांना फोन करून विचारले कि ते ठीक आहेत ना? ते येणार आहेत का? का कोणी अजून मला मदत करणार आहेत? ई.  तेव्हा मला मिळालेले उत्तर अवाक करणारे होते, अर्थात खूप छान आहे हे असं काटेकोर राहणं. कचेरीची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच अशी आहे. मग ते त्या आधी का फोन उचलतील? कचेरी सुरु झाली कि मगच फोन सुरु होणार त्यांचा. मी हे ऐकून खरंच अवाक झाले. मला असं अजिबात नाही म्हणायचं कि वाटेल तेव्हा त्यांनी फोन वर हजर राहणे अत्यावश्यक आहे. पण सोमवार, एका नवीन हफ्त्याची सुरवात आणि दहाच्या ऐवजी ९.३० वाजले होते. फोन नका उचलू, मेसेज ला तर उत्तर द्या पण नाही म्हणजे नाहीच. शिस्त आवडली काय भावली मला. खूप वेगळं वाटलं ह्या अश्या सातत्याने फोन वर राहणाऱ्या जगात असे अवलिया पण तक धरून आहेत हे मस्त आहे एकंदरीत. त्यांनी दहा ला मग मला फोन केला माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि अश्या रितीने मी एक नाविन्यपूर्ण सवय अनुभवली.  ठरवलं तर काहीही चांगलं असं करूच शकतो माणूस. आधी मला किंचित राग नाही पण वेगळं वाटलं मला. म्हटलं गाडी चालवत असेल, रस्त्यात असेल, कशाला उगाच फोन उचलायला लावायचा. पण हा नियम समजला आणि काय बोलू असं झालं, थोड्या संमिश्र अश्या भावना उत्पन्न झाल्या मात्र.  

गुरुवार, ४ जुलै, २०२४

एक सहज मनात आलेला विचार


माझ्या मते साधारणतः १९९४ किंवा १९९५ पासून भारतीय शिक्षित मुलं परदेशी जाऊ लागली, किंबहुना त्यांच्या कंपन्या त्यांना पाठवू लागल्या. हि सगळी सॉफ्टवेअर तय्यार करणारी मंडळीच होती. ह्या कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेत तरुण आणि बाकी सर्व वयोगटातील मुलं पाठवत असतं कारण कलायन्ट्स तेथील होते, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या गरजा समजणे आवश्यक होते, म्हणजे मग यथायोग्य बदल करून त्यांना हवी तशी सिस्टिम देता येईल. म्हणजे सगळेच खुश. ह्या व्यतिरिक्त अजून एक उद्देश होता इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय मंडळींना पाठवण्याचा. आधी मोठ्या प्रमाणात फक्त मुलं पाठवली जायची, नंतर मुलींनी पण नंबर लावले आणि जिंकल्या देखील. तो उद्देश असा होता कि तिथली संस्कृती, किंवा खूप सुंदर गोष्टी आत्मसात करून भारतात रुजवणं, मग त्या सामाजिक असो, वयक्तिक असो नाही तर वैचारिक असो. कुठल्याही थरावर असतो पण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाकडून काही ना काही तरी शिकण्यासारखे नेहेमीच असते. उदाहरणार्थ, अमेरिकेचे म्हटले तर तेथे मला जाणवलं तेवढं च इथे नमूद करते आहे, तेथे दुसऱ्यांचा आदर आहे, शिस्त आहे, स्वच्छता आहे, दुजाभाव किंवा दुय्यम वागणूक नाही मुलं आणि मुलींमधे, त्यामुळे घरचे सगळेच सगळीच कामे नेटाने करतातच. त्यांना तारीफ करणं मस्त जमतं. प्रत्येक काम तेथे महत्वाचे आहे, एखादा व्यक्ती स्वकमाईने खातोय हे जास्त महत्वाचे आहे. मुन्ना भाई त्याच्या चित्रपटात म्हणतो तशी जादू कि झप्पी तेथे सर्रास दिली जाते. रस्त्यावर एखादी व्यक्ती जर रस्ता ओलांडत असेल, मग कुठल्याही वयाची असो, तेथे हॉर्न वाजवून भंडावून सोडत नाहीत चारी दिशांनी पायी चालणाऱ्याला. 


मुंबईची वेस ओलांडली कि ताबडतोब म्हणजे क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण जग हिंडलेली व्यक्ती टिपिकल भारतीय, मध्यम वर्गीयांसारखी कशी काय वागू शकते ह्याचं महद आश्चर्य वाटतं मला. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, कुठल्याही थराला काहीच कसा बदल होत नाही, अनेक वर्ष तिथल्याच लोकांबरोबर काम करून सुद्धा?  किती तो दुटप्पी पणा. मला ह्या वरून भारतीय मध्यम वर्गीय सासवा आठवल्या ज्यांना फक्त हवं तेवढंच ऐकू येतं हवं तेव्हाच. कशासाठी इतके चेहेरे घेऊन / बाळगून फिरायचं? काय मिळतं हे सगळं करून? बरं फक्त कामासाठी नाही तर फिरायला म्हणून किंवा इतर काही कारणांनी पण खूप जणं जाऊन आली आहेत अनेक देशात, ह्या २०२४ साला पर्यंत. मग देश पातळीवर तर सोडाच साधा घर किंवा  समाज पातळीवर पण यत्किंचित बदल नाही हो. जैसे थे.  तेथे जाऊनच शिकता येतं का? तर नाही. इतके सिनेमे बघितले जातात त्या देशात तय्यार केलेले, वेब सिरीज आहेत, व्हिडीओ आहेत, तरी देखील बदल शून्य. नको ते बरोबर उचलले जातेच, मग त्याच बरोबरीने चांगले का नाही? आणि तरी देखील स्वतःला सुधारक म्हणून मिरवतात, मी कित्ती मोकळा आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे ह्याचेच पाढे सतत. उपवाद आहेत, पण नगण्य आणि अदृश्य स्वरूपात, सहज नजरेस पडत नाहीच. १९९५-२०२४ म्हणजे जवळपास ३० वर्षांचा काळ गेला, सरला पण स्थितीत सुधारणा नाहीच. आज पासून जमल्यास इतरांच्यात नाक खुपसणे सोडा, सर्वांनां आदर देऊन तर बघा, घरची कामे व्यायाम म्हणून करून बघा स्वतः, हॉर्न न वाजवता थोडेसे आधी घरून निघून बघा जमतंय का (इतकी वर्ष मी चारचाकी चालवते आहे न हॉर्न वाजवता भारतीय रस्त्यांवर, भारतीय चालकांमधे), रस्त्यावर घाण करू नका आणि इतर असे अनेक मुद्दे आहेत. क्षमस्व, मी फक्त माझ्या डोक्यात आलेले विचार मांडले आहेत, सळसळत मला जेव्हा मी हे असे धेडगुजरे लोक बघते. असो. "तबला हि माझा आणि डग्गा सुद्धा". 

मंगळवार, २ जुलै, २०२४

चिकित्सक, वैद्यकीय व्यवसायी ह्यांचा दिवस


काल सर्वत्र सर्व सजीवांना सुधृढ ठेवणाऱ्या अवलियांचा दिवस होता, डॉक्टर्स डे ह्या नावाने तो प्रसिद्ध आहे. ह्या निमित्याने माझी जीवनरेषा ज्यांनी सांभाळली आहे त्या सर्वांना मी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ह्या अद्भुत व्यवसायाशी अनेक म्हणी संलग्न आहेत. त्यातली एक अशी कि डॉक्टर ला बघितले कि अर्धा आजार बरा होतो, असं त्यांचं फक्त व्यक्तिमत्वच नसतं तर त्यांचा अनुभव खूप बोलका असतो. त्यांना शिताफीने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ह्यांना सांभाळण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची कला अवगत झाली असते. किंवा त्यांना तसेच राहावे लागते हा त्यांच्या व्यवसायाचा मूळ सिद्धांत आहे. अंतर्बाह्य बरं करण्याची जबाबदारी असते ह्या सर्व निष्णात डॉक्टरांवर. त्या ते बखुबी निभावतातच. सातत्याने वेदना जे धैर्याने हाताळतात मग त्यांच्या समोर जातांना प्रत्येकाने सुबक सुंदर, म्हणजे साध्या पण शिस्तीत वेष आणि केशभूषा करून का जाऊ नये? माझ्या मते तरी येणार रुग्ण बघूनच डॉक्टरचा असला नसला थकवा दूर गेला पाहिजे. त्यांना मरगळ येत काम नये.  


दुसरा मुद्दा असा कि फक्त शारीरिकच व्याधी नसतात ना सर्वांना? मानसिक पण असू शकतात. किंबहुना काही संशोधन कर्ते म्हणतात कि बहुतांशी मानसिक गरजा किंवा व्याप जास्त असतात, शारीरिक कमी. पण व्याधी होण्याकरता हे खताचे काम करते. तेव्हा मानसिक स्वास्थ्य जपणे अतिशय महत्वाचे असते. हे जपण्याकरता, म्हणजे स्वतःचे आणि इतर जनांचे देखील फक्त डॉक्टरचं कमी येत नाहीत, तर व्यायाम, कामात व्यग्र ठेवणे, साधना, छंद, उत्तर शोधणे पसंद करणे, अडथळ्यांभोवती फिरत न राहता, आणि असे अनेक मार्ग आहेत. गुरूशी संवाद साधणे हा त्यातील एक सर्वोच्च मार्ग. गुरु म्हणजे कुठे तरी हिमालय पर्वतात स्थानापन्न असायलाच हवा असे नाही. आपले अनेक गुरु असू शकतात, किंबहुना असतातच. गुरूंना, गुरुजनांना, थोरा मोठ्यांना, अनुभवी व्यक्तींना प्रश्न उद्भवल्यावर आणि त्याची उत्तरे शोधल्यावर नेमके कुठले जास्त योग्य आहे हे समजले कि मग "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे" अशी स्थिती निश्चित होतेच. गुरुजन म्हणजे आपले आई वडील, आई वडिलांसारखे, शेजारी, मैत्रिणी, आधुनिक आध्यात्मिक गुरु / गाढे अभ्यासक असे. गुरुजनांच्या संपर्कात राहणे, मेडिटेशन च्या मार्गावर चालणे, वागणे आणि बोलणे ठेवले, सातत्य जपले तर मग मानसिक स्वास्थ निश्चित लाभतेच. फक्त वर वर गुरूंचा सल्ला घेणे नव्हे. माझ्या दृष्टीने हे सर्व गुरुजन म्हणजे मला डॉक्टरांच्या जागी आहेतच. ते प्रिव्हेंटिव्ह पद्धतीने समजावून सांगतात, मार्ग दाखवतात, बरोबर राहतात, आणि गडबड झालीच तर सांभाळून कसे पुढे जायचे ते देखील सुचवतात. मग हे डोस पण अतिशय महत्वाचे ठरतात, नुसते, किंवा पारंपरिक औषधांसोबत सुद्धा.  कारण फक्त गोळ्या घेऊन चालत नाहीच, वरच्या मजल्यावर तश्या हालचाली होणे, विचार होणे, कृती होणे अत्यावश्यक आहेच. त्यामुळे मला लाभलेल्या अश्या योग्य डॉक्टर्स ना साष्टांग नमन. तुमचे मार्गदर्शन असेच सातत्याने लाभू द्या, माझे बोट तुम्ही कधीही सोडू नका हि प्रार्थना आणि विनंती सुद्धा.  आधी फक्त वैद्य होते, कुटुंबांचे पिढ्यांपिढ्या एकाच डॉक्टर असायचे. त्यामुळे आजीचा बटवा + एकत्र कुटुंब पद्धती, थोरामोठ्यांचे मार्गदर्शन हेच जास्त कमी पडत होते. प्रत्येक घरोघरी सगळं सांभाळून घेतल्यामुळे असेल त्यावेळी कदाचित एखादा दुसरा वैद्य असायचा संपूर्ण गावात. आता गल्लीत दहा आहेत.   थोरामोठयांचें ऐका, आधुनिक संतांची शिकवण अंगिकारा, त्यांच्या सानिध्यात राहा आणि फरक अनुभव शारीरिक आणि मानसिक पातळीवर.   

सोमवार, १ जुलै, २०२४

श्रीती


आज मी एक व्हिडिओ बघितला युट्युब वर. फोटो, मथळा / शीर्षक आणि अवधी मस्त होता, म्हटलं बघावं. त्यात एक लग्न सोहोळा चित्रित करून दाखवला आहे. लग्नाचे सारे विधी भारतीय पद्धतीने विधियुक्त केलेले दिसतं आहेत. लग्न लागल्यावर, वर माला झाल्यावर मोठ्यांचे आशीर्वाद घेतांना देखील दिसले रिवाजाप्रमाणे. ज्या आजी आशीर्वाद देत होत्या त्या नव्वदीच्या पुढच्या वाटल्या. आणि सगळेच फार म्हणजे फार खुश दिसत आहेत. गुरुजी पण मनःपूर्वक शास्त्रोक्त पूजा सांगतांना ऐकू आले, बघितले देखील. मंडप, सजावट, साड्या, दागिने, हार, हळद समारंभ, मेहेंदी ई. सगळंच साग्रसंगीत झालेलं आढळलं. हे सगळं बघते वेळी खूप खास वाटतं होतं आणि अनेक मस्त प्रश्न मनात आलेच. माझ्या मते श्रुती आणि नीती ह्यांचे ते लग्न होते, म्हणून त्यांना श्रीती असं प्रेमाने बोलवत होते. दोघीही खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होत्या. त्या व्हिडीओ तरी सगळ्यांनाच हे मान्य होते हे देखील आढळले. 


ह्या बाबतीत सासर कुठलं? कोण सासू म्हणून हुकूम चालवणार? कोणी मंगळसूत्र घालायचं? दोन माहेर आहेत, लाभलेत त्यांना, पण सासरचं काय? कोण कोणाच्या घरी राहायला जाणार आपलं घर सोडून? का त्या तिसऱ्याच घरी स्थायिक होणार? जे विधी करून घेतले गुरुजींनी त्यात काही फरक होता का? कारण वचनं फेऱ्याप्रमाणे असतात, मग येथे काय होतं? घर सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? कोण नमतं घेणार? सर्वसाधारण पणे आधी असं गृहीत धरलं जायचं आणि तसंच वागलं जायचं कि मुलगा बाहेर जाऊन कमवणार आणि मुलीने घराकडे जास्त लक्ष द्यायचं, नोकरी करणारी असली तरी देखील. येथे सुनेकडून अपेक्षांचं काय? जावयाचा मान कोणाला? लग्नाची बोलणी झाली तेव्हा इतकी चांदी, सोने द्या ई. कोण म्हटलं असणार? आणि असे ढीगभर प्रश्न उभे ठाकलेत माझ्या पुढ्यात. 


तुम्ही नक्की मनात म्हणत असाल कि काय झालंय हिला? हे काय प्रश्न आहेत? अगं हा एक खास लग्न सोहोळा आहे, त्याला का ठराविक मोजमाप लावतेस? आणि कुठल्या जमान्यात वावरते आहेस. ह्या २०२४ मधे असं काहीही नसतं. 


अगदी बरोबर. २०२४ काय, लग्न म्हणजे खरं तर असं काहीच नको. एकमेकांना लागणारी, हवी असलेली साथ देणे हे होय, ज्याला बॉटम लाईन असे संबोधतात.  एकमेकांना सांभाळून पुढे जायचे. प्रत्येकवेळी खंबीर पणे उभे ठाकायचे.  दोघेही अगदी प्रत्येक ठिकाणी एक आहेत, कोणीही वरचढ नाहीच हे दर्शवायचे. दोघांनी मिळून घर चालवायचे, फुलवायचे, आदर्श ठेवायचा, जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या, उणेदुणे ला थाराच न ठेवता, सासुरवास न घडवता, सततच्या अपेक्षा न बाळगता, घालून पाडून न वागता ई. हक्काचा साथीदार जो कधीच गैरसमज करणार नाही, झालाच तर दूर करेल आणि सर्वतोपरी साथ देईल, हे म्हणजे लग्न संस्था.  आधीच्या कुटुंबीयांनी मुलांना आणि मुलींना भेदभाव करून लहानाचे मोठे केले. समाजाने देखील फक्त मुलांना जास्त महत्व दिले, एक दंभ तय्यार केला, टिकवला, आणि सगळंच रसातळाला गेलं. अपवाद आहेत, पण फारच कमी. मुलींना सामान हक्काने, प्रेमाने वागवलं असतं, लग्नाच्या मूळ संकल्पनेला जीवापाड जपलं असतं तर? तेच आता नावं ठेवायला मागे पुढे बघत नाहीत. मुलींना किती दिवस "तो" खालच्या थराला बघू शकणार. म्हणून मग आता त्याने त्याची शस्त्रे काढली आहेत असं दिसतंय आणि मूळ पदावर आणून ठेवलंय सर्वांना. घ्या म्हणावं आता. उत्कृष्ट सगळं सुरळीत सुरु होतं, स्वहस्ते घालवलं उगाचच, आणि अनेक इतर कारणांसोबत हे कारण घेऊन वाटचाल सुरु आहे, कायदा आला आहे आणि अश्या दृष्टीने, मूळपदावर येऊन सगळे कुटुंबव्यवस्था सुरु ठेवत आहेत. मुख्यत्वे भारतीय समाजाने, मुलांनी जागे होण्याची वेळ निघून गेली आहे,  आता तरी डोळे उघडा, मुलींना मान द्या, कामं करा, शांतात नांदू दे  घरात. पुन्हा एकदा सांगते उपवाद आहेत, बदल घडत आहेत, पण अगदी हळुवार. 

Life lines


I guess in 2002, I started visiting a place called a hospital or clinic. Precisely in January 2004, I was admitted to the special ward for around 10 days with very few drops of water here and there. That’s it. So from, I guess, May 2003 to February 2004, the special team of four gynacs worked with me tiredlessly with their expertise. I am visiting my memory lanes while jotting down these words. My newborns were taken care of so well by these experts that I am not able to describe it in words.

Then again, from September 2018 to date, the meetings with the most unique personalities in the world continued. Today I am standing on my own feet again, the second time, all because of a special team who worked with me, listened to me, were there in my thick and thins always, and motivated me by their deeds. They took my case, or, I must say, my nut case, as a challenge, and here I go, standing tall again, walking, climbing, and moving ahead.

I was extremely surprised to know why my most beloved son chose the toughest path of study—his MBBS. It was only because he never wanted to see any mother suffer in the future. I became speechless when I found out about it. What a thought at such a tender age, indeed? Pats on his back.

So doctors are uniquely different personalities, weaved holistically with great expertise to handle all living beings, even the toughest ones like me. Salutes to all who worked tiredlessly for my legs. It was not at all easy for them. I bow down in front of them always, every day for sure. Wishes of Doctors Day to all my life lines. 

@drgaurijoshi @drleenaauty @drpriyankawalzode @dranjalibhide @drumaalurkar @drdyanadachitale @drvedmulay

https://www.linkedin.com/posts/dr-preeti-mulay-536b43a9_life-lines-i-guess-in-2002-i-started-visiting-activity-7213468832802213888-317w?utm_source=share&utm_medium=member_desktop


2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...